दौलतनगर दि.२६ :- महाराष्ट्र
राज्य वीजनिर्मिती कंपनीकडून राज्यातील डोंगरी तालुक्यांकरीता विद्यूतची प्रंलबीत
कांमे करण्याकरीता डोंगरी विकास आराखडा तयार करावा असे धोरण राज्याचे ऊर्जामंत्री
यांनी आखले होते. त्यानुसार पाटण मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार शंभूराज देसाईंनी
त्यांचे पाटण या १०० टक्के डोंगरी तालुक्यातील विद्यूत विकासाची प्रलंबीत कांमे
करण्याकरीता महावितरणच्या सातारा मंडळाच्या अधीक्षक अभियंतामार्फत तयार केलेल्या डोंगंरी
विद्यूत विकास आराखडयास आवश्यक ११ कोटी २२ लाख रुपयांचा निधी मंजुर करुन दयावा
याकरीता राज्याचे ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचेकडे तसेच विधानसभा
सभागृहात लक्षवेदी सुचना व ताराकींत प्रश्नांच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने
पाठपुरावा केल्याने पाटण तालुक्यातील डोंगरी विद्यूत विकास आराखडयाला राज्याचे
ऊर्जामंत्री ना.बावनकुळे यांनी विशेष बाब म्हणून मान्यता देवून ११ कोटी २२ लाख
रुपयांचा निधी मंजुर केला आहे.आमदार शंभूराज देसाईंनी मागणी केल्याप्रमाणे
सर्वच्या सर्व रक्कम ऊर्जामंत्री यांनी मंजुर केली असून निधी मंजुरीचे लेखी आदेश महाऊर्जा
विभागामार्फत दि.२५.०६.२०१९ रोजी पारित करण्यात आले आहे.
आमदार शंभूराज देसाईंनी या मंजुर निधीसंदर्भात म्हंटले आहे
की, राज्यातील डोंगरी तालुक्यांकरीता विद्यूतची प्रंलबीत कांमे करण्याकरीता
महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीकडून सर्व्हे करुन डोंगरी विकास आराखडा तयार
करावा असे धोरण राज्याचे ऊर्जामंत्री यांचे होते.त्यानुसार पाटण या १०० टक्के
डोंगरी तालुक्यातील विद्यूत विकासाची बरेच वर्षापासून प्रलंबीत असणारी विविध कामे
करण्याकरीता राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाच्या धोरणानुसार मी महावितरणच्या सातारा मंडळाच्या अधीक्षक अभियंतामार्फत पाटण डोंगरी
विद्यूत विकास आराखडा तयार केला असून या आराखडयातील कामांकरीता एकूण ११ कोटी २२
लाख रुपयांच्या निधीची गरज आहे. हा निधी ऊर्जामंत्री यांनी तात्काळ उपलब्ध करुन
दयावा याकरीता सातत्याने त्यांचेकडे व शासनाकडे पाठपुरावा केला.यासंदर्भात
महाराष्ट्र विधानसभेतही ऊर्जामंत्र्यांचे व शासनाचे लक्ष वेधण्याकरीता लक्षवेदी
सुचना तसेच तारांकीत प्रश्नही मांडले.मी दि.०८.१२.२०१६ व दि.३१.०७.२०१७ रोजी
मांडलेल्या तारांकीत प्रश्नावर पाटणच्या डोंगरी विद्यूत विकासाचा आराखडा शासनास
प्राप्त झाला असून यास निधी मंजुर करुन देणार असल्याचे आश्वासन ऊर्जामंत्री यांनी
मला दिले होते.ऊर्जामंत्री यांच्या आश्वासनानुसार दि.०८.०३.२०१८ रोजी लेखी
पत्राव्दारे या निधीची मागणी केल्यानंतर ऊर्जामंत्री लवकरच हा निधी मंजुर करुन
दिला जाईल असे सांगितले.
त्यानुसार राज्याचे ऊर्जामंत्री यांचे आदेशावरुन महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) महाराष्ट्र शासनाचे
प्र.अतिरिक्त महासंचालक यांनी दि.२५.०६.२०१९ रोजी पारित केलेल्या लेखी आदेशामध्ये
विधानसभा सदस्य आमदार शंभूराज देसाई यांनी विधानसभा सभागृहात मांडलेल्या लक्षवेदी
सुचनेच्या अनुषंगाने ऊर्जामंत्री
यांनी डोंगरी आराखडया अतंर्गत विद्यूत विषयक कामे करणेकरीता निधी उपलब्ध करणेबाबत
मान्य केले होते त्यास अनुसरुन आमदार शंभूराज देसाई यांचेकडील दि.०८.०३.२०१८
रोजीच्या पत्रान्वये डोगंरी विकास आराखडा अंतर्गत पाटण विधानसभा मतदारसंघात
विद्यूत विषयक कामांना ११ कोटी २२ लाख रुपयांचा निधी देण्यास मान्यता मिळाली आहे.
डोंगरी विकास आराखडयातंर्गत उच्चदाब व लघूदाब वाहिनीचे गंजलेले पोल बदलणे,मागणी
असणाऱ्या ठिकाणी नवीन उच्चदाबाचे रोहित्रे बसविणे, लुज गाळे ओढणे,गंजलेले कंन्डक्टर
बदलणे,केबल बदलणे,लघूदाब वाहिनीला स्पेअरर्स बसविणे,ताण देणे,वितरण रोहित्राला
पुर्नआर्थिंग करणे,वितरण रोहित्राची केबल बदलणे, गंजलेले डिस्ट्रीब्युशन बॉक्स बदलणे,बंद
पडलेले कप्यॉसिटर बदलणे, उपकेंद्रामधील ३३ केव्ही, २२ केव्ही, ११ केव्ही बेकर्स
बदलणे, आयसोलेटर बदलणे, करंट ट्रान्सफॉर्मर व भारित रोहित्र बॅटरी सेट,बॅटरी
चार्जर बदलणे,विशेष वितरण रोहित्राला पुर्नआर्थिंग करणे,कंन्ट्रोल पॅनलची दुरुस्ती
करणे इत्यादी कामांचा यामध्ये समावेश आहे.पाटण तालुक्यामध्ये मोठया प्रमाणात
पवनऊर्जा क्षेत्र असल्यामुळे डोंगरी विकास आराखडयातंर्गत पाटण तालुक्यातील विद्यूत
विषयक कामे पुर्ण करण्याकरीता “विशेष बाब” म्हणून महाऊर्जाकडे जमा असलेल्या मुलभूत सुविधा निधीमधून रु ११ कोटी २२ लाख
इतका निधी महावितरणला देण्यात येणार आहे. या निधी मधील कामे ही पुढील तीन
वर्षामध्ये पुर्ण करावयाची आहेत.असे या लेखी आदेशामध्ये म्हंटले असून सदरचे लेखी आदेश
अधिक्षक अभियंता,सातारा मंडळ,महावितरण यांना दि.२५.०६.२०१९ रोजी पाठविण्यात आले असल्याचे
आमदार शंभूराज देसाईंनी सांगितले असून लवकरच अधिक्षक अभियंता,सातारा मंडळ,महावितरण
यांची बैठक घेवून या आराखडयातील गंजलेले पोल बदलणे, नवीन पोल बसविणे,नवीन रोहित्रे
बसविणे,पाणी पुरवठा संस्थाना १६ तास वीज देणे ही प्राधान्याने करावयाच्या कामांना
सुरुवात करण्याचा माझा प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
चौकट:-
उच्चदाब जलसिंचन योजनेतंर्गत पाणी पुरवठा संस्थाना १६ तास वीजपुरवठा करता येणार.
आ.देसाई
डोंगरी
विद्यूत विकास आराखडयातंर्गत पाणी पुरवठा संस्थाना १६ तास वीजपुरवठा करण्याच्या
कामांचाही यामध्ये समावेश करावा असे अधिक्षक अभियंता, महावितरण यांना सुचित केले
होते त्यानुसार या डोंगरी आराखडयातून उच्चदाब जलसिंचन योजनेतंर्गत पाणी पुरवठा
संस्थाना १६ तास वीजपुरवठा करणे आता सुलभ होणार असल्याचे आमदार शंभूराज देसाईंनी
म्हंटले आहे.
No comments:
Post a Comment