Tuesday 25 June 2019

लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे शताब्दी स्मारकाचे दुसरे टप्प्याकरीता १५ कोटी रुपयांचा निधी मंजुर. वित्तमंत्री ना.सुधीर मुनंगटीवार यांची विधानसभेत आज घोषणा. आमदार शंभूराज देसाईंच्या मागणीला यश.



दौलतनगर दि.२५ :- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे महाराष्ट्र दौलत  या शताब्दी स्मारकाचे पहिल्या टप्प्याचे १० कोटी रुपयांचे काम पुर्ण झाले असून लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे शताब्दी स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याकरीता यंदाच्या वर्षी १५ कोटी रुपयांचा निधी लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे वित्तमंत्री ना.श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत केली असून लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाईंच्या सातत्याच्या मागणीला या घोषणेमुळे यश मिळाले आहे.
                            मुंबई येथे राज्य शासनाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून या अधिवेशनात सन २०१९-२० च्या अतिरिक्त अर्थसंकल्पावरील चर्चेमध्ये महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू पाटणचे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाईंनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे महाराष्ट्र दौलत या शताब्दी स्मारकाचे पहिल्या टप्प्याचे कामाकरीता युतीच्या शासनाने १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्याने लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे शताब्दी स्मारक दिमाखात त्यांचे कर्मभूमित उभे आहे. राज्यातील एक देखणे असे स्मारक म्हणून हे स्मारक नावारुपास येत असून याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व वित्त मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार तसेच युतीच्या शासनाचे जाहीर आभार मानतो.महाराष्ट्र दौलत या शताब्दी स्मारकाच्या उदघाटनाच्या कार्यक्रमामध्ये राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे शताब्दी स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याकरीता आवश्यक असणारा निधी मंजुर केला जाईल दुसरे टप्प्याच्याही कामाला लवकरच सुरुवात करा असे जाहीर आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिलेप्रमाणे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे शताब्दी स्मारकाचे दुसऱ्या टप्प्याचे कामांकरीता यंदाच्या वर्षी आवश्यक असणारा १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दयावा अशी आग्रही मागणी केली होती.
                       आज दि.२५ जुन रोजी अतिरिक्त अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना राज्याचे वित्तमंत्री ना.श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी आमदार शंभूराज देसाईंच्या मागणीवरुन युतीच्या शासनाने स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे महाराष्ट्र दौलत शताब्दी स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम करणेकरीता १० कोटी रुपयांचा निधी यापुर्वीच उपलब्ध करुन दिला आहे.स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे शताब्दी स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामांकरीताही यंदाच्या वर्षी १५ कोटी रुपयांचा निधी लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्यात येईल अशी विधानसभेत घोषणा केली. वित्तमंत्री ना.श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत आज या निधीची घोषणा केल्यानंतर आमदार शंभूराज देसाईंनी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्र फडणवीसवित्तमंत्री ना.श्री.सुधीर मुनगंटीवार यांचे प्रत्यक्ष भेटून पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या व लोकनेतेप्रेमी जनतेच्या वतीने जाहीर आभार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment