Thursday 27 June 2019

लोकसभा निवडणूकीदिवशी तारळयात पदाधिकाऱ्यास मारहाण करणाऱ्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटीलवर अधिवेशन संपण्याच्या आत कारवाई करा. शासनाचे विधानसभेत आदेश. आमदार शंभूराज देसाईंनी मांडला औचित्याच्या मुद्या.



    

       
दौलतनगर दि.२७ :- लोकसभा निवडणूकीदिवशी पाटण विधानसभा मतदारसंघात तारळे येथील १२५, जाधवआळी मतदान केंद्रावर आपल्या पदाचा गैरवापर करुन दादागिरी करीत मतदान केंद्रप्रतिनिधी असणाऱ्या तारळे येथील शंभूराज युवा संघटनेच्या जबाबदार पदाधिकाऱ्यास विनाकारण मारहाण करणाऱ्या जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटीलवर पावसाळी अधिवेशन संपण्यापुर्वी कडक कारवाई करा असे आदेश शासनाने आज विधानसभागृहात दिले आहे. पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी या घटनेचा मुद्दा औचित्याच्या मुद्दाव्दारे आज विधानसभेत मांडला.आमदार शंभूराज देसाईंनी मांडलेला औचित्याचा मुद्दा दोन्ही बाजुच्या विधानसभा सदस्यांनी चांगलाच लावून धरल्याने विधानसभा सभागृहात बराच काळ गोंधळ निर्माण झाला होता.अधिवेशन संपण्यापुर्वी शासनाच्यावतीने कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याने विधानसभा सभागृहाचे कामकाज सुरळीत सुरु झाले.
           पाटण विधानसभा मतदारसंघात दि.२३ एप्रिल,२०१९ ला लोकसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी तारळे येथील १२५,जाधवआळी मतदान केंद्रावरील मतदान केंद्रप्रतिनिधी असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना उर्मट भाषा वापरत त्यातील सामाजीक कार्यात कार्यरत असणाऱ्या जबाबदार पदाधिकाऱ्यास सातारा जिल्हा अतिरिक्त पोलीस अधिक्षक यांचे पथकाने व स्वत: अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी कोणतेही कारण न देता किंवा पदाधिकाऱ्यांने कोणताही गुन्हा केला नसताना याठिकाणी उपस्थित मतदारांपुढे तसेच समाजापुढे अमानुषपणे मारहाण केली व या पदाधिकाऱ्यांना चार तास पोलीस स्टेशनला विनाकारण बसवून ठेवले यासर्व प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेवर तसेच या विभागातील मतदानावर याचा मोठया प्रमाणांत दुष्परीणाम झाला व समाजामध्ये चांगली प्रतिमा असणाऱ्या पदाधिकाऱ्यांची जाणिवपुर्वक प्रतिमा मलीन करण्याचा अतिरिक्त पोलीस अधीक्षक,सातारा यांनी व त्यांच्या पथकाकडून प्रयत्न करण्यात आला असून या प्रकारामुळे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांचे विरुध्द येथील समाजामध्ये तीव्र स्वरुपाचा उद्रेक,भावना व असंतोष निर्माण झाल्याने त्यांचे विरोधात आंदोलने करण्याची भूमिका या विभागातील जनतेकडून घेण्यात आली होती परंतू लोकसभेची निवडणूक असल्याने येथील नागरिकांनी व महिलावर्गाने असा कोणताही पवित्रा घेतला नाही दरम्यान आपल्या पदाचा गैरवापर करणाऱ्या जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षकाने केलेल्या या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करुन त्याचेवर कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी या विभागातील सर्वसामान्य जनता व पदाधिकारी यांचेवतीने राज्याचे गृहराज्यमंत्री,राज्याचे पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी सातारा व जिल्हा पोलीस अधीक्षक,सातारा यांचेकडे मी स्वत: तातडीने दि.२४.०४.२०१९ रोजीचे पत्राव्दारे करुनही वरीष्ठांकडून यासंदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची घटना आमदार शंभूराज देसाई यांनी औचित्याच्या मुद्दाव्दारे विधानसभा सभागृहात मांडली व पदाधिकाऱ्यास अमानुषपणे मारहाण करुन याठिकाणी मतदान केंद्रप्रतिनिधी असणाऱ्या इतर तिघांनाही आरोपीसारखे उलट पोलीसांनीच चौकशीस बोलविले व त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला ही बाब पुर्णत: चुकीची असून कायदयाला धरुन नाही मीच आमच्या पदाधिकाऱ्यांना आपल्याला मारहाण होवूनही पोलीसांनी चौकशीला बोलवायला आपण कोणताही गुन्हा केलेला नाही,आपण काही आरोपी नाही.अतिरिक्त पोलीस अधीक्षकाची दादागिरी दोनच दिवसात विधानसभा सभागृहात मांडून संबधित पोलीस अधिकाऱ्याची दादागिरी मोडीत काढणार असल्याचे सांगितले होते.अतिरिक्त पोलीस अधीक्षकाच्या या वर्तणुकीचा आणि दादागिरीचा मुद्दा सविस्तरपणे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर हा मुद्दा उचलून धरत दोन्ही बाजुच्या विधानसभा सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत आमदार शंभूराज देसाईंच्या मुद्दयाला पाठींबा दिल्याने बराच वेळ सभागृहात गोधंळाचे वातावरण निर्माण  झाले होते. दरम्यान पावसाळी अधिवेशन संपण्याच्या पुर्वी संबधित अतिरिक्त पोलीस अधीक्षकावर कडक कारवाई केली जाईल असे शासनाच्या वतीने आदेश देण्यात आल्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरळीत सुरु झाले.          

1 comment: