Saturday, 10 August 2019

कोयना धरणातील जलाशयाचे आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते ओटी भरण व जलपुजन. कोयनामाई शांत, धरणातून ४४८५३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग धरणाचे दरवाजे ५ फुटावर.




दौलतनगर दि.१० :-महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणातील शिवसागर जलाशयामध्ये 100 टीएमसी हून अधिक पाणीपातळी ओलंडल्यानंतर गुरुवार दि.०9 ऑगस्ट,2019 रोजी सकाळी १०२.९७ टीएमसी पाणीसाठा असताना कोयना धरणातील शिवसागर जलाशयाचे ओटीभरण व जलपुजन पाटण तालुक्याचे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते दुपारी १२.१५ वा. करण्यात आले. कोयना धरणातील जलाशयाचे जलपुजन झालेनंतर कोयनामाई शांत झाली असून धरणातून पाण्याचा विसर्ग व्यवस्थापनाकडून कमी करण्यात आला आहे.धरणातून ४४८५३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून धरणाचे दरवाजे ५ फुटावर करण्यात आले आहेत.
           यावेळी कोयना धरण बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे,कोयना धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील,शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील,माजी पंचायत समिती सदस्य हरीश भोमकर,प्रदीप पाटील,माजी सरपंच शैलेंद्र शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती.एकूण 105 टीएमसी पाणीसाठा क्षमता असणाऱ्या कोयना धरणात दि. ०९ ऑगस्ट, 201९ रोजी सकाळी १०२.९७ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता.
            प्रतिवर्षी दि.15 ऑगस्टला 100 टीएमसी पाणीसाठयाचा टप्पा पुर्ण करणाऱ्या कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाने दि.०५ ऑगस्टलाच 100 टीएमसी पाणीसाठयाचा टप्पा ओलंडला होता दि.०३ ऑगस्टपासून पाटण तालुक्यात मुसळधार कोसळणाऱ्या अतिवृष्टीमुळे कोयना धरणातील पाणी दि.०३ ऑगस्ट रोजीच धरणाच्या ६ वक्र दरवाज्यातून सोडण्यास सुरुवात करण्यात आली होती.त्यानंतर सातत्याने कोयना धरणातून जादा पाणी सोडण्यात आल्याने कोयना नदीस महापुर येवून या विभागातील संपर्क पुर्णत: तुटलेला असल्याने कोयना धरणाने 100 टीएमसी पाणीसाठयाचा टप्पा ओलाडंला असला तरी जलपुजन घेण्यात आले नव्हते. दि.०८ ऑगस्ट रोजी कोयना नदीतील महापुर ओसरल्यानंतर जलपुजन घेण्यात आले असल्याचे यावेळी आमदार शंभूराज देसाईंनी सांगत ते म्हणाले प्रतिवर्षी दि.15 ऑगस्टला 100 टीएमसी पाणीसाठयाचा टप्पा पुर्ण होतो गतवर्षीच १०० टीएमसी पाणीसाठा होणेकरीता दि.३० ऑगस्ट पर्यंत कालावधी लागला होता.यंदाच्या वर्षीही माहे जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने कोयना धरण भरेल का नाही याबाबत साशंकता होती मात्र ऑगस्ट महिन्यामध्ये मुसळधार पावसाने सुरुवात केल्याने दि.०३ ऑगस्टला कोयना धरण पुर्ण क्षमतेने भरण्यास सुरुवात झाली. गत आठ ते दहा दिवसात एवढा मुसळधार पाऊस कोसळला की त्याने सगळे जनजीवन विस्कळीत करुन टाकले. तालुक्यात महापुर आला, अनेक गांवाचा संपर्क तुटला, अनेक गांवाना नदीच्या पाण्याने वेढा घातला त्या परिस्थितीतून पाटण तालुका हळूहळू सावरत आहे. असे सांगून त्यांनी कोयना धरणातील शिवसागर जलाशयाचे जलपुजन व ओटीभरण करण्याची पंरपरा आहे.पाटण मतदारसंघातील तमाम जनतेने मला या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यामुळे राज्यातील सर्वात मोठया आपले कोयना धरणातील जलाशयाचे जलपुजन व ओटीभरण करण्याची संधी मला गेली पाच वर्षे मिळत आहे मी स्वत:ला खुप भाग्यवान समजत असून ही संधी मला मिळवून देणाऱ्या पाटण तालुक्यातील तमाम जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो. कोयना धरण बांधकाम मंडळाच्या तत्कालीन अधीक्षक अभियंता वैशाली नारकर, तसेच सध्याचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, कोयना धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी व व्यवस्थापन कोयना धरणाच्या संदर्भात २४ तास कार्यरत आहेत.तसेच कोयना धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर नदीकाठच्या गांवामध्ये दक्षता घेण्याचे कार्य उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार रामहरी भोसले हे अधिकारी व त्यांच्या देखरेखीखाली सर्वच तालुका प्रशासन कार्यरत आहे. कोयना धरणातील पाण्यामुळे अवघा महाराष्ट्र प्रकाशमान होत असून शेतीकरीताही या पाण्याचा चांगला वापर होत असून कोयना धरण आपले तालुक्यात आहे हे आपले सर्वांचे भाग्य असल्याची प्रतिक्रिया आमदार शंभूराज देसाईंनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

महापुर ओसरला आहे, पंचनाम्यांच्या कामांला लागा. आमदार शंभूराज देसाईंच्या सर्व अधिकाऱ्यांना सुचना. पुर ओसरताच आमदार शंभूराज देसाईंनी घेतली तातडीची बैठक.





           दौलतनगर दि. १०:-गेले पाच ते सहा दिवस पाटण तालुक्यात सातत्याने कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे व कोयना धरणातून मोठया प्रमाणात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कोयना नदीकाठी महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे अनेक गांवाचा संपर्कही तुटला होता.आता महापुर ओसरला आहे सगळे रस्ते,पुल वाहतूकीकरीता खुले झाले आहेत. अतिवृष्टीमुळे अनेक गांवामध्ये मातीची राहत्या घराच्या भिंती कोसळल्या आहेत, तर अनेक घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे. शेतीबरोबर शेतीपिकांचेही व सार्वजनीक मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले असून नुकसान झालेल्या जनतेला लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देणेकरीता तातडीने पंचनाम्यांच्या कामांला लागा अशा सक्त सुचना आमदार शंभूराज देसाईंनी पाटण मतदारसंघातील तालुका प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.जनतेला नुकसान भरपाई तसेच सार्वजनीक मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीची पुर्नंबांधणी करणेकरीता निधी आणण्यास मी सक्षम आहे यात मी कुठेही कमी पडणार नाही आपले नुकसानीचे अहवाल लवकरात लवकर शासनाकडे सादर करा म्हणजे लवकरात मदत मिळण्यास मदत होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
              गेले पाच ते सहा दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने आणि कोयना धरणातून मोठया प्रमाणात सोडण्यात आलेल्या पाण्याने विश्रांती घेतल्यामुळे महापुराची परिस्थिती आटोक्यात येताच आमदार शंभूराज देसाईंनी या अतिवृष्टीत मोठया प्रमाणात नुकसान झालेल्या मालमत्तेचे तातडीने पंचनामे करण्याकरीता तालुका प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांची तातडीची बैठक तहसिल कार्यालय,पाटण येथे घेतली.आमदार शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रामहरी भोसले, गट विकास अधिकारी मीना साळुंखे,पाटण पोलिस निरिक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे,सार्वजनिक बांधकाम,जिल्हा परिषद बांधकाम पाटबंधारे,बांधकाम विभाग,कृषी,पाणी पुरवठा,सार्वजनीक आरोग्य,शिक्षण,वीज वितरण,विभागाचे सर्व शाखा अभियंता व पाटण नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे शासकीय अधिकारी उपस्थित होते.
              यावेळी आमदार शंभूराज देसाईंनी गेले पाच ते सहा दिवस मुसळधार कोसळणाऱ्या अतिवृष्टीमुळे डोंगरी व दुर्गम भागातील अनेक गांवामध्ये मातीची राहत्या घराच्या भिंती कोसळल्या आहेत,कोयना नदीकाठच्या अनेक गांवामध्ये पुराचे पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे.नदीकाठच्या शेती पाण्यात गेल्यामुळे येथील तसेच इतर भागातील शेतीपिकांचेही व सार्वजनीक मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले यामध्ये लहान लहान पुले पाण्याखाली गेल्याने या पुलांचे, ग्रामीण रस्त्याचे तसेच नदीकाठच्या विहीरी पाण्याखाली गेल्याने पिण्याच्या पाण्याच्या योजनांचे, डोंगर पठारावरील ग्रॅव्हीटीच्या योजनांचे तर नदीकाठच्या उपसा जलसिंचन योजनांचेही मोठे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ करुन ते शासनास सादर करावेत त्याची एक प्रत माझेकडेही देण्यात यावी.लवकरात लवकर आपल्या मतदारसंघातील नुकसानीचे पंचनामे तयार करुन नुकसानभरपाईचा अहवाल शासनाकडे सादर केल्यानंतर नुकसानभरपाई तसेच सार्वजनीक मालमत्तेची पुर्नंबांधणी करणेकरीता आवश्यक असणारा निधी शासनाकडून मंजुर करुन आणण्यास मदत होईल.सन २००५ च्या अतिवृष्टीत अशाच प्रकारे अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेनंतर तत्कालीन मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांचेकडून मोठया प्रमाणात नुकसानभरपाई व निधी आणण्यास मदत झाली होती.आताचे मुख्यमंत्री यांचेकडेही या नुकसानीची भरपाई मिळविणेकरीता मी तातडीने मुख्यमंत्र्याकडे जाणार आहे त्यांचेकडे मदत मागताना आपल्या कडे किती नुकसान झाले आहे याची सविस्तर माहिती असणे आवश्यक असल्याने पंचनाम्याच्या कामांत कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांनी हयगय करु नये.अनपेक्षित अतिवृष्टी व महापुरामुळे मोठया प्रमाणात जनतेचे नुकसान झाले आहे.त्यांना तातडीने मदत मिळवून देणे अत्यंत गरजेचे आहे.अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला आहे त्याची दुरुस्ती करणेकरीता आवश्यक असणारे साहित्य याची मागणी संबधित विभागाने करावी.पाटण तालुक्यात अतिवृष्टी व महापुरामुळे संपर्कहीन झालेल्या गांवातील कुटुंबाना तसेच पुराचा वेढा पडल्यामुळे स्थलातंरीत झालेल्या कुटुंबांना पुढील दोन महिने पुरेल एवढे धान्य व रॉकेल उपलब्ध करुन देणेकरीता राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री यांचेकडे कालच मागणी केली आहे.लवकरच हे धान्य मिळविणेकरीता माझे प्रयत्न सुरु आहेत. डोंगराखाली वसलेल्या गांवातील जमिनी मोठया प्रमाणात खचल्या असल्याने तसेच डोंगरावरील धोकादायक दगड तसेच माती गांवावर कोसळण्याची भिती निर्माण झाल्याने या गांवाचे सुरक्षित ठिकाणी तात्काळ निवारा शेड उभारुन स्थलातंर करण्याच्या सुचना मुख्यमंत्री यांनी दिल्या असून यांचे अंदाज पत्रकेही संबधित विभागाने लवकरात लवकर सादर करावित म्हणजे या गांवाना आवश्यक निवारा मिळेल अशाही सुचना त्यांनी यावेळी दिल्या.
चौकट:- न थकता, न थांबता आमदार देसाईंचे जनतेला मदतीचे कार्य सुरुच.
             अतिवृष्टीमुळे व महापुरामुळे हैरान झालेल्या जनतेला दिलासा तसेच लवकरात लवकर मदतीचा आधार देणेकरीता गेले पाच ते सहा दिवस आमदार शंभूराज देसाई अहोरात्र अनेक मार्गाने प्रयत्न करीत आहेत. न थकता, न थांबता जनतेच्या भेटीगाठीबरोबर प्रशासनाच्या वतीने जनतेला आवश्यक ती मदत लवकरात लवकर मिळणेकरीता मिळेल त्या ठिकाणी, मिळेल त्या वेळेत शासकीय अधिकाऱ्यांना बोलवून ते सुचना देत असून आमदार शंभूराज देसाईंचे हे कार्य अखंडीत सुरु आहे.




Wednesday, 7 August 2019

पाटण तालुक्यात डोंगर खचल्याने धोका निर्माण झालेल्या गांवाना सुरक्षित ठिकाणी निवारा शेड उभारा. मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे सातारा जिल्हाधिकारींना आदेश. जिल्हाधिकारी यांचेकडून तात्काळ कार्यवाही सुरु.






दौलतनगर दि. ०८:-पाटण तालुक्यात मुसळधार पावसामुळे तालुक्यातील डोंगराखाली वसलेल्या मौजे म्हारवंड, जिमणवाडी, बाटेवाडी-पाठवडे, बांधवाट, पाबळवाडी, सवारवाडी, भैरेवाडी-डेरवण, कडयाखालची बोर्गेवाडी व टोळेवाडी येथील गांवातील जमिनी मोठया प्रमाणात खचल्या असून डोंगरावरील धोकादायक दगड तसेच माती गांवावर कोसळण्याची भिती निर्माण झाल्याने या गांवाचे सुरक्षित ठिकाणी तात्काळ निवारा शेड उभारुन स्थलातंर करावे अशी मागणी पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचेकडे केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्हाधिकारी यांना काल रात्रीच पाटण तालुक्यातील डोंगर खचलेल्या सर्व गांवाना शेड उभारुन या गांवाचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत.जिल्हाधिकारी सातारा यांचेकडून यावर तात्काळ कार्यवाही सुरु झाली आहे. जिल्हाधिकारी सातारा यांनी सार्वजनीक बांधकाम विभागाच्या संबधित अधिकाऱ्यांना पाऊस कमी होताच या गांवामध्ये निवारा शेड उभारण्याच्या कामांस सुरुवात करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
                   पाटण विधानसभा मतदारसंघात गेले चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळत असून या मुसळधार पावसामुळे पाटण तालुक्यातील डोगंराखाली वसलेल्या मौजे म्हारवंड, जिमणवाडी,बाटेवाडी-पाठवडे, बांधवाट,पाबळवाडी,सवारवाडी,भैरेवाडी-डेरवण,कडयाखालची बोर्गेवाडी व टोळेवाडी या गांवामध्ये डोंगर खचण्याचे प्रकार मोठया प्रमाणात घडले आहेत.तसेच गावांच्या वर डोंगरात मोठमोठे दगड असून सदरचे दगड व डोंगरातील माती मुसळधार पावसामुळे घसरण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.यामुळे या गांवामध्ये मोठया प्रमाणात भितीचे वातावरण पसरले असल्याने या गांवातील कुटुंबाचे अतिवृष्टीच्या काळात स्थलांतर करणे गरजेचे असून याकरीता या गांवातील कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी डोंगर पठारावर निवारा शेड उभारुन देवून येथील कुटुंबांची राहण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी आग्रही मागणी आमदार शंभूराज देसाईंनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याशी दुरध्वनीवरुन संपर्क साधून केली.आमदार देसाईंच्या मागणीची तातडीने दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री ना.फडणवीस यांनी सातारा जिल्हयाच्या जिल्हाधिकारी श्रीमती श्वेता सिंगल यांना पाटण तालुक्यात डोंगराखाली वसलेल्या मौजे म्हारवंड,जिमणवाडी, बाटेवाडी-पाठवडे,बांधवाट,पाबळवाडी,सवारवाडी,भैरेवाडी-डेरवण,कडयाखालची बोर्गेवाडी व टोळेवाडी या गांवाना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवून या गांवातील कुटुंबाना सुरक्षित असा निवारा मिळणेकरीता डोंगर पठारावर शेड उभारण्याच्या कामांस तात्काळ सुरुवात करावी असे आदेश काल रात्रीच दुरध्वनीवरुन दिले असून सातारा जिल्हाधिकारी यांनीही तात्काळ सार्वजनीक बांधकाम विभागाचे संबधित अधिकारी यांना पाटण तालुक्यातील पावसाचे प्रमाण कमी होताच मौजे म्हारवंड,जिमणवाडी,बाटेवाडी-पाठवडे,बांधवाट, पाबळवाडी, सवारवाडी, भैरेवाडी-डेरवण, कडयाखालची बोर्गेवाडी व टोळेवाडी या गांवामध्ये येथील ग्रामस्थांशी संपर्क साधून त्यांच्या मागणीनुसार डोंगरपठारावर सुरक्षित ठिकाणी निवारा शेड उभारण्याच्या कामांस सुरुवात करावी अशा सुचना दिल्या आहेत.जिल्हाधिकारी श्रीमती श्वेता सिंगल यांनी आमदार शंभूराज देसाईंना आपले मागणीवरुन राज्याचे मुख्यमंत्री यांनी कालच या गांवाच्या निवारा शेडसंदर्भात मला सुचित केलेनुसार आम्ही प्रत्यक्षात कामांस सुरुवात करीत असल्याचे सांगितले आहे.आमदार शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्री यांचेकडून मिळालेल्या आदेशानुसार तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून सार्वजनीक बांधकाम विभागाचे पाटण उपविभागाचे संबधित अधिकारी यांना तात्काळ बोलवून त्यांची बैठक घेत पावसाचे प्रमाण कमी होत चालले असून मौजे म्हारवंड, जिमणवाडी, बाटेवाडी-पाठवडे,बांधवाट,पाबळवाडी,सवारवाडी,भैरेवाडी-डेरवण,कडयाखालची बोर्गेवाडी व टोळेवाडी या गांवातील ग्रामस्थांशी तात्काळ संपर्क साधून त्यांच्या मागणीनुसार डोंगरपठारावर सुरक्षित ठिकाणी निवारा शेड उभारण्याच्या कामांस सुरुवात करावी व लवकरात लवकर ही निवारा शेड येथील कुटुंबाना उभी करुन त्यांचे तात्काळ स्थलातंर करावे असे सुचित केले आहे.

Monday, 5 August 2019

पाटण मतदारसंघातील ग्रामीण, डोंगरी भागातील विद्युतीकरणासाठी 01 कोटी 75 लाखांचा निधी मंजुर आमदार शंभूराज देसाई




           दौलतनगर दि. ०५:- पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण आणि डोंगरी भागातील सार्वजनीक पाणी पुरवठा योजना, प्राथमिक शाळांना विद्यूत पुरवठा करणे, पथदिप उर्जीकरण, गंजलेले लोखंडी पोल बदलणे, जादा क्षमतेची रोहित्रे बसविणे, शेतीकरीता वाढीवची रोहित्रे बसविणे या कामांकरीता आवश्यक असणारा निधी मिळणेकरीता जिल्हा नियोजन समितीकडे महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मंडल कार्यालय,सातारा यांचेमार्फत प्रस्ताव सादर करण्यात आले होते.सादर केलेल्या प्रस्तावानुसार जिल्हा नियोजन समितीकडून ०१ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंनी दिली असून सदरची मंजुर कामे तातडीने हाती घेण्याच्या सुचनाही आमदार शंभूराज देसाईंनी महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
               जिल्हा नियोजन समितीतंर्गत पाटण विधानसभा मतदारसंघात खालील गांवामध्ये विद्युतीकरणासाठी निधी मंजुर करण्यात आला आहे यामध्ये सळवे येथे एचटी/एलटी लाईनची सुधारणा अंतर्गत नवीन 63 केव्हीए रोहित्र बसविणे 9.79 लाख,राहुडे येथे पथदिप उर्जीकरण करणे 24 खांब 22 दिवे 2.81 लाख,मोरेवाडी कुठरे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्युतीकरणासाठी वाढीव पोल टाकणे 1.50 लाख,भातडेवाडी जिंती येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्युतीकरणासाठी वाढीव पोल टाकणे 2.49 लाख,पाचगणी येथे सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेचे विद्युतीकरण 2.60 लाख,पाटण तालुक्यातील गंजलेले लोखंडी पोल बदलणे 55.01 लाख, बेलवडे खुर्द येथे शतीसाठी 100 केव्हीए च्या रोहित्राच्या जागी 200 केव्हीए रोहित्र बसविणे 1.62 लाख,गमेवाडी चाफळ येथे शेतीसाठी 100 केव्हीए क्षमतेचे रोहित्र बसविणे 4.16 लाख,नाटोशी लोकरेवस्ती येथे शेतीसाठी 100 केव्हीए  क्षमतेचे रोहित्र बसविणे 4.99 लाख, येराड येथे शेतीसाठी 200 केव्हीए क्षमतेचे रोहित्र बसविणे 4.70 लाख, आडदेव येथे शेतीसाठी 100 केव्हीए क्षमतेचे रोहित्र बसविणे 4.24 लाख, दिवशी बुद्रुक येथे एचटी/एलटी लाईनची सुधारणा अंतर्गत अतिरिक्त रोहित्र बसविणे 8.25 लाख, बेलवडे येथील तुळशीचा डोह डीपी बसविणे 6.03 लाख,सुरुल येथील अतिभारीत असणाऱ्या एजी नं.1 डीपी साठी अतिरिक्त रोहित्र उभारणे 6.74 लाख, काढणे येथील पूल डीपीसाठी अतिरिक्त रोहित्र उभारणे 6.74 लाख,मानेगाव येथील म्हसोबा एजी डीपीसाठी अतिरिक्त रोहित्र उभारणे 6.74 लाख,येरफळे येथे अतिरिक्त रोहित्र उभारणे 3.30 लाख,तारळे येथे अतिरिक्त रोहित्र उभारणे 4.25 लाख,काढोली येथे अतिरिक्त रोहित्र उभारणे 4.69 लाख,गोषटवाडी येथे अतिरिक्त रोहित्र उभारणे 4.01 लाख,चिरंबे येथे अतिरिक्त रोहित्र उभारणे 4.24लाख,आटोली येथे अतिरिक्त रोहित्र उभारणे 5.46लाख, मणेरी येथे अतिरिक्त रोहित्र उभारणे 5.47लाख, तोंडोशी येथे अतिरिक्त रोहित्र उभारणे 3.29लाख, चोपडी येथे अतिरिक्त रोहित्र उभारणे 4.24लाख,पापर्डे येथे अतिरिक्त रोहित्र उभारणे 3.63 लाख असा एकूण २८ गांवातील विद्यूतीकरणाची कामे करण्यासाठी 01 कोटी ७५ लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मंडल कार्यालय,सातारा यांना उपलब्ध करुन देण्यात आला असल्याचे आमदार शंभूराज  देसाईंनी म्हंटले आहे..
      चौकट:- खराडवाडी येथे कोल्हापूर पध्दतीचे दोन बंधारे बांधण्यासाठी 63 लाख 95 हजारांचा निधी मंजूर
      जिल्हा नियोजन समितीतंर्गत ल.पा.विभाग राज्यस्तर यांचे विभागामार्फत पाटण मतदारसंघातील खराडवाडी येथे उत्तरमांड नदीवर दोन कोल्हापूर पध्दतीचे बंधारे बांधणेच्या कामासाठी अनुक्रमे 29 लाख व 34.95 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांमुळे या गांवातील सुमारे 72 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार होणार असून खराडवाडी येथील शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटण्यास मदत होणार असल्याचे आमदार शंभूराज देसाईंनी म्हटंले आहे.


तातडीचे काम असेल तरच बाहेर पडा- आमदार शंभूराज देसाईंचे आवाहन. अतिवृष्टीत सतर्क राहण्याच्या अधिकाऱ्यांना सुचना, जनतेलाही विनंती.





           दौलतनगर दि. ०५:-  कोयना धरणातून मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु असून पावसाचे प्रमाण वाढत आहे.ठिकठिकाणी कोयना नदीचे पाणी मुख्य रस्त्यावर,पाटण शहरात शिरले आहे.त्यामुळे तातडीचे अत्यंत महत्वाचे काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे.अशी विनंती आमदार शंभूराज देसाईंनी जनतेला केली असून कोयना धरणातून दोन-दोन तासाला जादाचे पाणी सोडण्याचा अंदाज व्यक्त केला जात असल्याने पुरपस्थितीवर नियंत्रण करणेकरीता तालुक्यातील प्रशासन सज्ज आहे तसेच घराबाहेर कुणीही लहान मुलांना घेवून जाऊ नये याकरीता तालुका प्रशासनाच्यावतीने आवाहनही करण्यात येत आहे.पोलीस यंत्रणेला स्ट्रायकींग फोर्स यासारखी जादा पोलीस कुमक पाठविणेसंदर्भात वरीष्ठ अधिकारी यांना सुचित केले असून पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांचेशी माझे बोलणे झाले असून या सर्व परिस्थितीवर माझे वैयक्तीक लक्ष आहे.त्यासाठी अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याच्या सुचना आमदार शंभूराज देसाईंनी तालुका प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.
           पाटण शहरात कोयना नदीचे ठिकठिकाणी घुसलेले पाणी पाहण्याकरीता तसेच पुरपरिस्थिती नियंत्रणात आणणेकरीता आमदार शंभूराज देसाईंनी पाटण शहरातील मुख्य रस्त्यासह पाणी घुसलेल्या ठिकाणांची पहाणी केली यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे आवाहन केले.यावेळी प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रामहरी भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे,गटविकास अधिकारी श्रीमती मीना साळुंखे,या प्रमुख अधिकाऱ्यासंह विविध खात्यांचे तालुका प्रशासनातील अधिकारी यावेळी उपस्थित होते.
                यावेळी आमदार शंभूराज देसाई पाटण येथील धांडे पुल तसेच एसटी स्टॅन्ड व लायब्ररी चौक येथे कोयना नदीतून घुसलेल्या व मुख्य रस्त्यावर पहाणी करताना प्रातांधिकारी,तहसिलदार तसेच पोलीस यंत्रणांना नदीचे पाणी मोठया प्रमाणात रस्त्यावर आले असून आलेले पाणी पहाण्याकरीता शहरातील नागरिक व महिला लहान मुलांसह रस्त्यावर येत आहेत हे चुकीचे आहे. पाण्यात एखादयाचा पाय घसरण्याची भिती असल्याने अत्यंत महत्वाचे,दवाखान्यातील वगैरे काम असेल तरच नागरिंकानी घराचे बाहेर पडावे तसेच जिथे पाणी जादा प्रमाणात आहे तिथे जाणे टाळावे.कोयना धरणात पावसाचे प्रमाण जादा असल्याने मोठया प्रमाणात पाण्याचा साठा होत आहे.त्यामुळे दर दोन तासाला धरणातील पाणी सोडण्याचे प्रमाणही वाढविण्यात येण्याची शक्यता आहे. येथील परिस्थिती पाहून मी स्वत: कोयना धरणाकडे जाणार असून पुरपरिस्थीती हातळण्याकरीता सर्व तालुका प्रशासनाचे अधिकारी सज्ज आहेत.मुख्य रस्त्यावरील पाण्यामध्ये युवक दुचाकी गाडया घेवून जात आहेत पोलीस यंत्रणांनी अशा ठिकाणी दोन पोलीस कर्मचारी यांच्या नेमणूका करुन अशाप्रकारे कोणी स्टंटबाजी करीत असल्यास त्यांना रोखावे.नागरिकांनीही तालुका प्रशासनाला सहकार्य करावे असे आमदार शंभूराज देसाईंनी यावेळी सांगितले. तसेच नावडी,मंद्रुळहवेली, जमदाडवाडी मळावस्ती या गांवामध्येही कोयना नदीचे पाणी शिरले आहे.नावडी गावचा संपर्क तुटलेला असून शासकीय अधिकाऱ्यांनी येथे सतर्क रहावे अशाही सुचना त्यांनी यावेळी केल्या तसेच आमदार शंभूराज देसाईंनी सांगवड येथील सिध्देश्वर मंदीराच्या मागील बाजूच्या खचलेल्या संरक्षक भिंतीचीही यावेळी पहाणी केली.
चौकट:- एस.टी.स्टॅन्डमध्ये अडकलेल्या ५० प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले.
              एस.टी स्टॅन्ड परीसरात घुसलेल्या पाण्याची पहाणी करताना स्टॅन्डमध्ये ५० प्रवाशी अडकले असल्याची बाब येथील आगारप्रमुखाने आमदार देसाईंच्या निदर्शनास आणून देता त्यांनी तातडीने कार्यकर्त्यांला फोन करुन टॅक्टर मागवून घेवून एस.टी.स्टॅन्डमधील ५० प्रवाशांना बाहेर काढेपर्यंत ते या परिसरात थांबून राहिले व त्यांना साळुंखे हायस्कुल येथे सुखरुप स्थलांतरीत केले तसेच त्यांना तातडीने खाणेकरीता नाष्त्याचीही सोय आमदार देसाईंनी करुन संध्याकाळी त्यांचे भोजनाची व्यवस्थाही आमदार शंभूराज देसाईंनी केली.
        चौकट:- आमदार शंभूराज देसाईनी जेसीबी (JCB) तून पाटण गाठले.
              कराड चिपळूण मुख्य रस्त्यावर येरफळे ते म्हावशी यादरम्यान कोयना नदीचे मोठया प्रमाणात पाणी आल्याने याठिकाणची वाहतूक बंद होती.पाटण शहराला पाण्याने विळखा घातल्याने पाटण येथे जाणे निकडीचे असल्याने प्रसंगवधान साधून आमदार शंभूराज देसाईंनी याठिकाणी जेसीबी बोलवून त्या जेसीबी मधून पाटण गाठले व येथील पुरपरिस्थितीची अधिकाऱ्यांसमवेत पहाणी केली.आमदार देसाईंच्या जेसीबी प्रवासामुळे जनतेसाठी कर्तव्य बजावणारा कर्तव्यदक्ष आमदार म्हणून सोशल मिडीयावर खुप चर्चा सुरु आहे.


Friday, 2 August 2019

सत्यजितसिंह पाटणकरांनी, तांबवे पुलाची चिंता करु नये, युती शासन व बांधकाम मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यासाठी सक्षम आहेत. सत्यजितसिंह पाटणकरांच्या तांबवे पुल पहाणी दौऱ्यावर आमदार शंभूराज देसाईंचा टोला.




           दौलतनगर दि. ०२:-  सन २०१४ पुर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात निवडणूकीच्या आधी विकासकामांचा दिखावा करण्याकरीता आघाडी सरकारने आवश्यक असणारा निधी मंजुर न करता नुसत्याच कामांच्या यादया प्रसिध्द केल्या आणि निधी मंजुर नसतानाही त्या कामांची भमिपुजनेही उरकून घेतली.तरीही त्यांच्या पदरात निराशाच पडली.काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातील त्या दिखावा केलेल्या यादयांमधील तांबवे येथील पुलाचा समावेश असून तांबवे येथील पुलाच्या कामांला सन २०१४ नंतर सत्तेवर आलेल्या युतीच्या शासनाने आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन दिल्याने हा पुल उभा राहिलेला दिसून येत आहे.पुलाच्या बाजूच्या जमिनीचा विषय न्यायप्रविष्ठ असल्याने याचे काम काहीकाळ मंदावले होते आता न्यायालयाने याचा निकालही दिला असल्याने पुलाचे बाजूच्या कामांस सुरुवात देखील करण्यात आली असून सत्यजितसिंह पाटणकरांनी तांबवे पुलाची चिंता करु नये,पुलाच्या कामांकरीता युती शासन व राज्याचे विद्यमान बांधकाममंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील सक्षम आहेत. पुलाचा प्रश्न तडीस नेण्यासाठी प्रयत्न करेन असे सांगणारे प्रयत्न करायला माजी आमदारपुत्र तुमच्याकडे आहेच काय ? असा टोला आमदार शंभूराज देसाईंनी लगाविला आहे.
             दोन दिवसापुर्वी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर सत्यजितसिंह पाटणकरांकडून पाटण विधानसभा मतदारसंघातील तांबवे ता.कराड येथील पुलाची पहाणी करुन काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळातील मंजुर कामेही पुर्ण करण्यात युती शासनाला अपशय आल्याचा जावईशोध लावला असल्याचे वृत्त वाचनात आले. मला त्यांना एका गोष्टीची आठवण करुन दयायची आहे.सन २०१४ ला विधानसभा निवडणूकीला सामोरे जाताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या आघाडी सरकारने निवडणूकीच्या तोंडावर मते मिळविण्याकरीता संपुर्ण राज्यामध्ये मोठया प्रमाणात विविध विकासकामांना निधी मंजुर न करता केवळ त्यां कांमाच्या यादया प्रसिध्द केल्या होत्या. आणि या यादयांवरुन या दोन्ही पक्षात मोठा वादंगही निर्माण झाला होता तेव्हा आपल्या तालुक्यातील तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या हस्ते या पुलाचे भूमिपुजन घेण्याचे नियोजन करण्यात आले असताना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ज्यामध्ये आपणही होता तेव्हा घाईगडबडीने तत्कालीन उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपुजनाचा कार्यक्रमही उरकून घेतला होता.हा सगळा प्रकार या तांबवे विभागातील जनतेने उघडया डोळयांनी पाहिला होता.याची आपणांस चांगलीच कल्पना असून या पुलाच्या कामांची माहिती न घेता लोकांची दिशाभूल करणारी वक्तव्ये करणे आपल्या सारख्यांना शोभत नाही.तांबवे पुलाचे बांधकाम करणेकरीता आवश्यक असणारा निधी हा युतीच्या शासनाने सत्तेवर आल्यानंतर मंजुर करुन दिला याची खात्री करावयाची असल्यास सन २०१४ नंतरच्या युती शासनाने जाहीर केलेले अर्थसंकल्प आणि या अर्थसंकल्पामध्ये शासनाने या पुलाच्या कामांकरीता प्रतिवर्षी किती व कशाप्रकारे निधी उपलब्ध करुन दिलेला आहे याची माहिती करुन घ्या. प्रत्यक्ष काम करणारा कोण आणि नुसतीच आश्वासने देवून जनतेची दिशाभूल करणारा कोण ? हे या विभागातील जनतेने नुसते ओळखलेच नाही तर या विभागातील जनतेला हे चांगलेच ज्ञात आहे.तांबवे पुलाच्या पुर्वेकडील जमिनीसंदर्भातील विषय न्यायप्रविष्ठ असल्याने पुलाच्या पुर्वेकडील काम काहीकाळ थांबले होते परंतू न्यायालयाने यासंदर्भात निकाल देवून येथील बाधित शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला देवून काम करण्याचे आदेश दिल्याने बाधित शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला देण्यात आल्याने पुर्वेकडील जमिनीतील कामांस सुरुवात देखील करण्यात आली होती मात्र अतिवृष्टीमुळे यामध्ये अडचणी येत असल्याने हे काम मंदावले आहे.पाऊस कमी होताच हे काम पुर्ण होईल.काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात या पुलाचे काम मंजुर झाले असल्याचे सांगणारे सत्यजितसिंह पाटणकरांना या पुलाचे काम कधी सुरु झाले आणि कधी पुर्ण झाले याचीतरी कल्पना आहे काय? गेल्या चार वर्षात हे काम कसे सुरु आहे याची माहिती घेण्याकरीता माजी आमदारपुत्र कितीवेळा या पुलावर आले.आत्ताच त्यांना या पुलाची कशी काय आठवण झाली.निवडणूकीच्या तोंडावर मीही काहीतरी करतोय, यासाठी मी प्रयत्न करेन त्यासाठी प्रयत्न करेन अशी आश्वासने देण्यापुर्वी तुमच्या हातात प्रयत्न करण्यासारखे आहेच काय? याचा विचार पहिल्यांदा करा.आणि तांबवे पुलाच्या कामांसंदर्भात तुम्ही चिंता करण्याची गरज नाही त्या करीता सत्तेवर असणारे युती शासन आणि राज्याचे सार्वजनीक बांधकाममंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील सक्षम आहेत.असा टोलाही आमदार शंभूराज देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांना लगाविला आहे.


लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांना आमदार शंभूराज देसाईंकडून विनम्र अभिवादन.




           दौलतनगर दि. ०२:-  वृत्तपत्राच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात क्रांतीची मशाल पेटवून देणारे तसेच “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” अशी सिंहगर्जना करणारे स्वातंत्र्य सेनानी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे स्मृतीशताब्दी व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत स्वत:ला झोकून देऊन मराठी माणसांच्या हक्कांसाठी जनजागृती करणारे लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दी प्रारंभानिमित्त पाटण विधानसभा मतदारसंघाच्या वतीने मतदारसंघाचे आमदार व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक आमदार शंभूराज देसाईंनी विनम्र अभिवादन केले.
           दौलतनगर ता.पाटण येथील “महाराष्ट्र दौलत” लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे स्मृतीशताब्दी व लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दी प्रारंभानिमित्त आदराजंली वाहण्याचा कार्यक्रम पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे वतीने आयोजीत करण्यात आला होता.यावेळी आमदार शंभूराज देसाईंनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचे प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने विनम्र अभिवादन केले.यावेळी पाटण विधानसभा मतदारसंघातील जय मल्हार मातंग समाजातील पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील पदाधिकारी,अधिकारी व  कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.