दौलतनगर दि. ०५:- पाटण
विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण आणि डोंगरी भागातील सार्वजनीक पाणी पुरवठा योजना,
प्राथमिक शाळांना विद्यूत पुरवठा करणे, पथदिप उर्जीकरण, गंजलेले लोखंडी पोल बदलणे,
जादा क्षमतेची रोहित्रे बसविणे, शेतीकरीता वाढीवची रोहित्रे बसविणे या कामांकरीता
आवश्यक असणारा निधी मिळणेकरीता जिल्हा नियोजन समितीकडे महाराष्ट्र राज्य विज वितरण
कंपनी मंडल कार्यालय,सातारा यांचेमार्फत प्रस्ताव सादर करण्यात आले होते.सादर
केलेल्या प्रस्तावानुसार जिल्हा नियोजन समितीकडून ०१ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी
मंजुर करण्यात आला असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंनी दिली असून सदरची मंजुर
कामे तातडीने हाती घेण्याच्या सुचनाही आमदार शंभूराज देसाईंनी महाराष्ट्र राज्य
विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
जिल्हा नियोजन
समितीतंर्गत पाटण विधानसभा मतदारसंघात खालील गांवामध्ये विद्युतीकरणासाठी निधी
मंजुर करण्यात आला आहे यामध्ये सळवे येथे एचटी/एलटी लाईनची सुधारणा अंतर्गत नवीन
63 केव्हीए रोहित्र बसविणे 9.79 लाख,राहुडे येथे पथदिप उर्जीकरण करणे 24 खांब 22
दिवे 2.81 लाख,मोरेवाडी कुठरे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या
विद्युतीकरणासाठी वाढीव पोल टाकणे 1.50 लाख,भातडेवाडी जिंती येथे जिल्हा परिषद
प्राथमिक शाळेच्या विद्युतीकरणासाठी वाढीव पोल टाकणे 2.49 लाख,पाचगणी येथे
सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेचे विद्युतीकरण 2.60 लाख,पाटण तालुक्यातील गंजलेले
लोखंडी पोल बदलणे 55.01 लाख, बेलवडे खुर्द येथे शतीसाठी 100 केव्हीए च्या
रोहित्राच्या जागी 200 केव्हीए रोहित्र बसविणे 1.62 लाख,गमेवाडी चाफळ येथे
शेतीसाठी 100 केव्हीए क्षमतेचे रोहित्र बसविणे 4.16 लाख,नाटोशी लोकरेवस्ती येथे
शेतीसाठी 100 केव्हीए क्षमतेचे रोहित्र
बसविणे 4.99 लाख, येराड येथे शेतीसाठी 200 केव्हीए क्षमतेचे रोहित्र बसविणे 4.70
लाख, आडदेव येथे शेतीसाठी 100 केव्हीए क्षमतेचे रोहित्र बसविणे 4.24 लाख, दिवशी
बुद्रुक येथे एचटी/एलटी लाईनची सुधारणा अंतर्गत अतिरिक्त रोहित्र बसविणे 8.25 लाख,
बेलवडे येथील तुळशीचा डोह डीपी बसविणे 6.03 लाख,सुरुल येथील अतिभारीत असणाऱ्या एजी
नं.1 डीपी साठी अतिरिक्त रोहित्र उभारणे 6.74 लाख, काढणे येथील पूल डीपीसाठी
अतिरिक्त रोहित्र उभारणे 6.74 लाख,मानेगाव येथील म्हसोबा एजी डीपीसाठी अतिरिक्त
रोहित्र उभारणे 6.74 लाख,येरफळे येथे अतिरिक्त रोहित्र उभारणे 3.30 लाख,तारळे येथे
अतिरिक्त रोहित्र उभारणे 4.25 लाख,काढोली येथे अतिरिक्त रोहित्र उभारणे 4.69
लाख,गोषटवाडी येथे अतिरिक्त रोहित्र उभारणे 4.01 लाख,चिरंबे येथे अतिरिक्त रोहित्र
उभारणे 4.24लाख,आटोली येथे अतिरिक्त रोहित्र उभारणे 5.46लाख, मणेरी येथे अतिरिक्त
रोहित्र उभारणे 5.47लाख, तोंडोशी येथे अतिरिक्त रोहित्र उभारणे 3.29लाख, चोपडी
येथे अतिरिक्त रोहित्र उभारणे 4.24लाख,पापर्डे येथे अतिरिक्त रोहित्र उभारणे 3.63 लाख
असा एकूण २८ गांवातील विद्यूतीकरणाची कामे करण्यासाठी 01 कोटी ७५ लाख रुपयांचा
निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मंडल
कार्यालय,सातारा यांना उपलब्ध करुन देण्यात आला असल्याचे आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे..
चौकट:- खराडवाडी येथे कोल्हापूर पध्दतीचे दोन बंधारे बांधण्यासाठी 63
लाख 95 हजारांचा निधी मंजूर
जिल्हा नियोजन समितीतंर्गत ल.पा.विभाग
राज्यस्तर यांचे विभागामार्फत पाटण मतदारसंघातील खराडवाडी येथे उत्तरमांड नदीवर
दोन कोल्हापूर पध्दतीचे बंधारे बांधणेच्या कामासाठी अनुक्रमे 29 लाख व 34.95 लाख
रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांमुळे या
गांवातील सुमारे 72 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार होणार असून
खराडवाडी येथील शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटण्यास मदत होणार असल्याचे
आमदार शंभूराज देसाईंनी म्हटंले आहे.
No comments:
Post a Comment