Saturday 10 August 2019

कोयना धरणातील जलाशयाचे आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते ओटी भरण व जलपुजन. कोयनामाई शांत, धरणातून ४४८५३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग धरणाचे दरवाजे ५ फुटावर.




दौलतनगर दि.१० :-महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणातील शिवसागर जलाशयामध्ये 100 टीएमसी हून अधिक पाणीपातळी ओलंडल्यानंतर गुरुवार दि.०9 ऑगस्ट,2019 रोजी सकाळी १०२.९७ टीएमसी पाणीसाठा असताना कोयना धरणातील शिवसागर जलाशयाचे ओटीभरण व जलपुजन पाटण तालुक्याचे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते दुपारी १२.१५ वा. करण्यात आले. कोयना धरणातील जलाशयाचे जलपुजन झालेनंतर कोयनामाई शांत झाली असून धरणातून पाण्याचा विसर्ग व्यवस्थापनाकडून कमी करण्यात आला आहे.धरणातून ४४८५३ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून धरणाचे दरवाजे ५ फुटावर करण्यात आले आहेत.
           यावेळी कोयना धरण बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे,कोयना धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील,शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील,माजी पंचायत समिती सदस्य हरीश भोमकर,प्रदीप पाटील,माजी सरपंच शैलेंद्र शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती.एकूण 105 टीएमसी पाणीसाठा क्षमता असणाऱ्या कोयना धरणात दि. ०९ ऑगस्ट, 201९ रोजी सकाळी १०२.९७ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता.
            प्रतिवर्षी दि.15 ऑगस्टला 100 टीएमसी पाणीसाठयाचा टप्पा पुर्ण करणाऱ्या कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाने दि.०५ ऑगस्टलाच 100 टीएमसी पाणीसाठयाचा टप्पा ओलंडला होता दि.०३ ऑगस्टपासून पाटण तालुक्यात मुसळधार कोसळणाऱ्या अतिवृष्टीमुळे कोयना धरणातील पाणी दि.०३ ऑगस्ट रोजीच धरणाच्या ६ वक्र दरवाज्यातून सोडण्यास सुरुवात करण्यात आली होती.त्यानंतर सातत्याने कोयना धरणातून जादा पाणी सोडण्यात आल्याने कोयना नदीस महापुर येवून या विभागातील संपर्क पुर्णत: तुटलेला असल्याने कोयना धरणाने 100 टीएमसी पाणीसाठयाचा टप्पा ओलाडंला असला तरी जलपुजन घेण्यात आले नव्हते. दि.०८ ऑगस्ट रोजी कोयना नदीतील महापुर ओसरल्यानंतर जलपुजन घेण्यात आले असल्याचे यावेळी आमदार शंभूराज देसाईंनी सांगत ते म्हणाले प्रतिवर्षी दि.15 ऑगस्टला 100 टीएमसी पाणीसाठयाचा टप्पा पुर्ण होतो गतवर्षीच १०० टीएमसी पाणीसाठा होणेकरीता दि.३० ऑगस्ट पर्यंत कालावधी लागला होता.यंदाच्या वर्षीही माहे जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने कोयना धरण भरेल का नाही याबाबत साशंकता होती मात्र ऑगस्ट महिन्यामध्ये मुसळधार पावसाने सुरुवात केल्याने दि.०३ ऑगस्टला कोयना धरण पुर्ण क्षमतेने भरण्यास सुरुवात झाली. गत आठ ते दहा दिवसात एवढा मुसळधार पाऊस कोसळला की त्याने सगळे जनजीवन विस्कळीत करुन टाकले. तालुक्यात महापुर आला, अनेक गांवाचा संपर्क तुटला, अनेक गांवाना नदीच्या पाण्याने वेढा घातला त्या परिस्थितीतून पाटण तालुका हळूहळू सावरत आहे. असे सांगून त्यांनी कोयना धरणातील शिवसागर जलाशयाचे जलपुजन व ओटीभरण करण्याची पंरपरा आहे.पाटण मतदारसंघातील तमाम जनतेने मला या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यामुळे राज्यातील सर्वात मोठया आपले कोयना धरणातील जलाशयाचे जलपुजन व ओटीभरण करण्याची संधी मला गेली पाच वर्षे मिळत आहे मी स्वत:ला खुप भाग्यवान समजत असून ही संधी मला मिळवून देणाऱ्या पाटण तालुक्यातील तमाम जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो. कोयना धरण बांधकाम मंडळाच्या तत्कालीन अधीक्षक अभियंता वैशाली नारकर, तसेच सध्याचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, कोयना धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी व व्यवस्थापन कोयना धरणाच्या संदर्भात २४ तास कार्यरत आहेत.तसेच कोयना धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर नदीकाठच्या गांवामध्ये दक्षता घेण्याचे कार्य उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार रामहरी भोसले हे अधिकारी व त्यांच्या देखरेखीखाली सर्वच तालुका प्रशासन कार्यरत आहे. कोयना धरणातील पाण्यामुळे अवघा महाराष्ट्र प्रकाशमान होत असून शेतीकरीताही या पाण्याचा चांगला वापर होत असून कोयना धरण आपले तालुक्यात आहे हे आपले सर्वांचे भाग्य असल्याची प्रतिक्रिया आमदार शंभूराज देसाईंनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

No comments:

Post a Comment