दौलतनगर दि. ०२:- वृत्तपत्राच्या
माध्यमातून संपूर्ण देशभरात क्रांतीची मशाल पेटवून देणारे तसेच “स्वराज्य हा माझा
जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” अशी सिंहगर्जना करणारे स्वातंत्र्य सेनानी,
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे स्मृतीशताब्दी व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत स्वत:ला झोकून देऊन मराठी
माणसांच्या हक्कांसाठी जनजागृती करणारे लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दी
प्रारंभानिमित्त पाटण विधानसभा मतदारसंघाच्या वतीने मतदारसंघाचे आमदार व लोकनेते
बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक आमदार शंभूराज
देसाईंनी विनम्र अभिवादन केले.
दौलतनगर ता.पाटण येथील “महाराष्ट्र
दौलत” लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
यांचे स्मृतीशताब्दी व लोकशाहीर
आण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दी प्रारंभानिमित्त आदराजंली वाहण्याचा कार्यक्रम
पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकनेते
बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे वतीने आयोजीत करण्यात आला
होता.यावेळी आमदार शंभूराज देसाईंनी लोकमान्य बाळ
गंगाधर टिळक व लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांचे
प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या व लोकनेते
बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने विनम्र अभिवादन
केले.यावेळी पाटण विधानसभा मतदारसंघातील जय मल्हार मातंग समाजातील
पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण
समुहातील पदाधिकारी,अधिकारी व कर्मचारी
यांची प्रमुख उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment