दौलतनगर दि. ०८:-पाटण
तालुक्यात मुसळधार पावसामुळे तालुक्यातील डोंगराखाली वसलेल्या मौजे म्हारवंड, जिमणवाडी,
बाटेवाडी-पाठवडे, बांधवाट, पाबळवाडी, सवारवाडी, भैरेवाडी-डेरवण, कडयाखालची
बोर्गेवाडी व टोळेवाडी येथील गांवातील जमिनी मोठया प्रमाणात खचल्या असून
डोंगरावरील धोकादायक दगड तसेच माती गांवावर कोसळण्याची भिती निर्माण झाल्याने या
गांवाचे सुरक्षित ठिकाणी तात्काळ निवारा शेड उभारुन स्थलातंर करावे अशी मागणी
पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचेकडे
केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्हाधिकारी
यांना काल रात्रीच पाटण तालुक्यातील डोंगर खचलेल्या सर्व गांवाना शेड उभारुन या
गांवाचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत.जिल्हाधिकारी सातारा यांचेकडून
यावर तात्काळ कार्यवाही सुरु झाली आहे. जिल्हाधिकारी सातारा यांनी सार्वजनीक
बांधकाम विभागाच्या संबधित अधिकाऱ्यांना पाऊस कमी होताच या गांवामध्ये निवारा शेड
उभारण्याच्या कामांस सुरुवात करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
पाटण विधानसभा मतदारसंघात गेले
चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळत असून या मुसळधार पावसामुळे पाटण तालुक्यातील
डोगंराखाली वसलेल्या मौजे म्हारवंड, जिमणवाडी,बाटेवाडी-पाठवडे, बांधवाट,पाबळवाडी,सवारवाडी,भैरेवाडी-डेरवण,कडयाखालची
बोर्गेवाडी व टोळेवाडी या गांवामध्ये डोंगर खचण्याचे प्रकार मोठया प्रमाणात घडले
आहेत.तसेच गावांच्या वर डोंगरात मोठमोठे दगड असून सदरचे दगड व डोंगरातील माती
मुसळधार पावसामुळे घसरण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.यामुळे या
गांवामध्ये मोठया प्रमाणात भितीचे वातावरण पसरले असल्याने या गांवातील कुटुंबाचे
अतिवृष्टीच्या काळात स्थलांतर करणे गरजेचे असून याकरीता या गांवातील कुटुंबाना
सुरक्षित ठिकाणी डोंगर पठारावर निवारा शेड उभारुन देवून येथील कुटुंबांची
राहण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी आग्रही मागणी आमदार शंभूराज देसाईंनी
राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याशी दुरध्वनीवरुन संपर्क साधून
केली.आमदार देसाईंच्या मागणीची तातडीने दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री ना.फडणवीस
यांनी सातारा जिल्हयाच्या जिल्हाधिकारी श्रीमती श्वेता सिंगल यांना पाटण तालुक्यात
डोंगराखाली वसलेल्या मौजे म्हारवंड,जिमणवाडी, बाटेवाडी-पाठवडे,बांधवाट,पाबळवाडी,सवारवाडी,भैरेवाडी-डेरवण,कडयाखालची
बोर्गेवाडी व टोळेवाडी या गांवाना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवून या गांवातील
कुटुंबाना सुरक्षित असा निवारा मिळणेकरीता डोंगर पठारावर शेड उभारण्याच्या कामांस
तात्काळ सुरुवात करावी असे आदेश काल रात्रीच दुरध्वनीवरुन दिले असून सातारा
जिल्हाधिकारी यांनीही तात्काळ सार्वजनीक बांधकाम विभागाचे संबधित अधिकारी यांना
पाटण तालुक्यातील पावसाचे प्रमाण कमी होताच मौजे म्हारवंड,जिमणवाडी,बाटेवाडी-पाठवडे,बांधवाट,
पाबळवाडी, सवारवाडी, भैरेवाडी-डेरवण, कडयाखालची बोर्गेवाडी व टोळेवाडी या
गांवामध्ये येथील ग्रामस्थांशी संपर्क साधून त्यांच्या मागणीनुसार डोंगरपठारावर
सुरक्षित ठिकाणी निवारा शेड उभारण्याच्या कामांस सुरुवात करावी अशा सुचना दिल्या
आहेत.जिल्हाधिकारी श्रीमती श्वेता सिंगल यांनी आमदार शंभूराज देसाईंना आपले
मागणीवरुन राज्याचे मुख्यमंत्री यांनी कालच या गांवाच्या निवारा शेडसंदर्भात मला
सुचित केलेनुसार आम्ही प्रत्यक्षात कामांस सुरुवात करीत असल्याचे सांगितले
आहे.आमदार शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्री यांचेकडून मिळालेल्या आदेशानुसार तसेच
जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून सार्वजनीक बांधकाम विभागाचे पाटण उपविभागाचे
संबधित अधिकारी यांना तात्काळ बोलवून त्यांची बैठक घेत पावसाचे प्रमाण कमी होत
चालले असून मौजे म्हारवंड, जिमणवाडी, बाटेवाडी-पाठवडे,बांधवाट,पाबळवाडी,सवारवाडी,भैरेवाडी-डेरवण,कडयाखालची
बोर्गेवाडी व टोळेवाडी या गांवातील ग्रामस्थांशी तात्काळ संपर्क साधून त्यांच्या
मागणीनुसार डोंगरपठारावर सुरक्षित ठिकाणी निवारा शेड उभारण्याच्या कामांस सुरुवात
करावी व लवकरात लवकर ही निवारा शेड येथील कुटुंबाना उभी करुन त्यांचे तात्काळ
स्थलातंर करावे असे सुचित केले आहे.
Jantecha Amdar Garibacha Sevak Takal Dakhal Gheun Sarkari Madat Lokansathi Milun Dilyabaddal Sarwa janteche Ashirwad Aplya pathishi Aahet
ReplyDelete