Friday 2 August 2019

सत्यजितसिंह पाटणकरांनी, तांबवे पुलाची चिंता करु नये, युती शासन व बांधकाम मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यासाठी सक्षम आहेत. सत्यजितसिंह पाटणकरांच्या तांबवे पुल पहाणी दौऱ्यावर आमदार शंभूराज देसाईंचा टोला.




           दौलतनगर दि. ०२:-  सन २०१४ पुर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात निवडणूकीच्या आधी विकासकामांचा दिखावा करण्याकरीता आघाडी सरकारने आवश्यक असणारा निधी मंजुर न करता नुसत्याच कामांच्या यादया प्रसिध्द केल्या आणि निधी मंजुर नसतानाही त्या कामांची भमिपुजनेही उरकून घेतली.तरीही त्यांच्या पदरात निराशाच पडली.काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातील त्या दिखावा केलेल्या यादयांमधील तांबवे येथील पुलाचा समावेश असून तांबवे येथील पुलाच्या कामांला सन २०१४ नंतर सत्तेवर आलेल्या युतीच्या शासनाने आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन दिल्याने हा पुल उभा राहिलेला दिसून येत आहे.पुलाच्या बाजूच्या जमिनीचा विषय न्यायप्रविष्ठ असल्याने याचे काम काहीकाळ मंदावले होते आता न्यायालयाने याचा निकालही दिला असल्याने पुलाचे बाजूच्या कामांस सुरुवात देखील करण्यात आली असून सत्यजितसिंह पाटणकरांनी तांबवे पुलाची चिंता करु नये,पुलाच्या कामांकरीता युती शासन व राज्याचे विद्यमान बांधकाममंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील सक्षम आहेत. पुलाचा प्रश्न तडीस नेण्यासाठी प्रयत्न करेन असे सांगणारे प्रयत्न करायला माजी आमदारपुत्र तुमच्याकडे आहेच काय ? असा टोला आमदार शंभूराज देसाईंनी लगाविला आहे.
             दोन दिवसापुर्वी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर सत्यजितसिंह पाटणकरांकडून पाटण विधानसभा मतदारसंघातील तांबवे ता.कराड येथील पुलाची पहाणी करुन काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळातील मंजुर कामेही पुर्ण करण्यात युती शासनाला अपशय आल्याचा जावईशोध लावला असल्याचे वृत्त वाचनात आले. मला त्यांना एका गोष्टीची आठवण करुन दयायची आहे.सन २०१४ ला विधानसभा निवडणूकीला सामोरे जाताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या आघाडी सरकारने निवडणूकीच्या तोंडावर मते मिळविण्याकरीता संपुर्ण राज्यामध्ये मोठया प्रमाणात विविध विकासकामांना निधी मंजुर न करता केवळ त्यां कांमाच्या यादया प्रसिध्द केल्या होत्या. आणि या यादयांवरुन या दोन्ही पक्षात मोठा वादंगही निर्माण झाला होता तेव्हा आपल्या तालुक्यातील तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या हस्ते या पुलाचे भूमिपुजन घेण्याचे नियोजन करण्यात आले असताना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ज्यामध्ये आपणही होता तेव्हा घाईगडबडीने तत्कालीन उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपुजनाचा कार्यक्रमही उरकून घेतला होता.हा सगळा प्रकार या तांबवे विभागातील जनतेने उघडया डोळयांनी पाहिला होता.याची आपणांस चांगलीच कल्पना असून या पुलाच्या कामांची माहिती न घेता लोकांची दिशाभूल करणारी वक्तव्ये करणे आपल्या सारख्यांना शोभत नाही.तांबवे पुलाचे बांधकाम करणेकरीता आवश्यक असणारा निधी हा युतीच्या शासनाने सत्तेवर आल्यानंतर मंजुर करुन दिला याची खात्री करावयाची असल्यास सन २०१४ नंतरच्या युती शासनाने जाहीर केलेले अर्थसंकल्प आणि या अर्थसंकल्पामध्ये शासनाने या पुलाच्या कामांकरीता प्रतिवर्षी किती व कशाप्रकारे निधी उपलब्ध करुन दिलेला आहे याची माहिती करुन घ्या. प्रत्यक्ष काम करणारा कोण आणि नुसतीच आश्वासने देवून जनतेची दिशाभूल करणारा कोण ? हे या विभागातील जनतेने नुसते ओळखलेच नाही तर या विभागातील जनतेला हे चांगलेच ज्ञात आहे.तांबवे पुलाच्या पुर्वेकडील जमिनीसंदर्भातील विषय न्यायप्रविष्ठ असल्याने पुलाच्या पुर्वेकडील काम काहीकाळ थांबले होते परंतू न्यायालयाने यासंदर्भात निकाल देवून येथील बाधित शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला देवून काम करण्याचे आदेश दिल्याने बाधित शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला देण्यात आल्याने पुर्वेकडील जमिनीतील कामांस सुरुवात देखील करण्यात आली होती मात्र अतिवृष्टीमुळे यामध्ये अडचणी येत असल्याने हे काम मंदावले आहे.पाऊस कमी होताच हे काम पुर्ण होईल.काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात या पुलाचे काम मंजुर झाले असल्याचे सांगणारे सत्यजितसिंह पाटणकरांना या पुलाचे काम कधी सुरु झाले आणि कधी पुर्ण झाले याचीतरी कल्पना आहे काय? गेल्या चार वर्षात हे काम कसे सुरु आहे याची माहिती घेण्याकरीता माजी आमदारपुत्र कितीवेळा या पुलावर आले.आत्ताच त्यांना या पुलाची कशी काय आठवण झाली.निवडणूकीच्या तोंडावर मीही काहीतरी करतोय, यासाठी मी प्रयत्न करेन त्यासाठी प्रयत्न करेन अशी आश्वासने देण्यापुर्वी तुमच्या हातात प्रयत्न करण्यासारखे आहेच काय? याचा विचार पहिल्यांदा करा.आणि तांबवे पुलाच्या कामांसंदर्भात तुम्ही चिंता करण्याची गरज नाही त्या करीता सत्तेवर असणारे युती शासन आणि राज्याचे सार्वजनीक बांधकाममंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील सक्षम आहेत.असा टोलाही आमदार शंभूराज देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांना लगाविला आहे.


1 comment: