दौलतनगर
दि. १०:-गेले पाच ते सहा दिवस पाटण तालुक्यात
सातत्याने कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे व कोयना धरणातून मोठया प्रमाणात सोडण्यात
आलेल्या पाण्यामुळे कोयना नदीकाठी महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे
अनेक गांवाचा संपर्कही तुटला होता.आता महापुर ओसरला आहे सगळे रस्ते,पुल
वाहतूकीकरीता खुले झाले आहेत. अतिवृष्टीमुळे अनेक गांवामध्ये मातीची राहत्या
घराच्या भिंती कोसळल्या आहेत, तर अनेक घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने मोठे
नुकसान झाले आहे. शेतीबरोबर शेतीपिकांचेही व सार्वजनीक मालमत्तेचेही मोठे नुकसान
झाले असून नुकसान झालेल्या जनतेला लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देणेकरीता
तातडीने पंचनाम्यांच्या कामांला लागा अशा सक्त सुचना आमदार शंभूराज देसाईंनी पाटण
मतदारसंघातील तालुका प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.जनतेला नुकसान भरपाई
तसेच सार्वजनीक मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीची पुर्नंबांधणी करणेकरीता निधी
आणण्यास मी सक्षम आहे यात मी कुठेही कमी पडणार नाही आपले नुकसानीचे अहवाल लवकरात
लवकर शासनाकडे सादर करा म्हणजे लवकरात मदत मिळण्यास मदत होईल असेही त्यांनी यावेळी
सांगितले.
गेले
पाच ते सहा दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने आणि कोयना धरणातून मोठया प्रमाणात
सोडण्यात आलेल्या पाण्याने विश्रांती घेतल्यामुळे महापुराची परिस्थिती आटोक्यात
येताच आमदार शंभूराज देसाईंनी या अतिवृष्टीत मोठया प्रमाणात नुकसान झालेल्या
मालमत्तेचे तातडीने पंचनामे करण्याकरीता तालुका प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांची
तातडीची बैठक तहसिल कार्यालय,पाटण येथे घेतली.आमदार
शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस पाटणचे उपविभागीय अधिकारी
श्रीरंग तांबे,तहसिलदार रामहरी भोसले, गट विकास अधिकारी मीना साळुंखे,पाटण पोलिस
निरिक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे,सार्वजनिक बांधकाम,जिल्हा परिषद बांधकाम
पाटबंधारे,बांधकाम विभाग,कृषी,पाणी पुरवठा,सार्वजनीक आरोग्य,शिक्षण,वीज वितरण,विभागाचे
सर्व शाखा अभियंता व पाटण नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे शासकीय अधिकारी
उपस्थित होते.
यावेळी
आमदार शंभूराज देसाईंनी गेले पाच ते सहा दिवस मुसळधार कोसळणाऱ्या अतिवृष्टीमुळे
डोंगरी व दुर्गम भागातील अनेक गांवामध्ये मातीची राहत्या घराच्या भिंती कोसळल्या
आहेत,कोयना नदीकाठच्या अनेक गांवामध्ये पुराचे पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले
आहे.नदीकाठच्या शेती पाण्यात गेल्यामुळे येथील तसेच इतर भागातील शेतीपिकांचेही व
सार्वजनीक मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले यामध्ये लहान लहान पुले पाण्याखाली गेल्याने
या पुलांचे, ग्रामीण रस्त्याचे तसेच नदीकाठच्या विहीरी पाण्याखाली गेल्याने
पिण्याच्या पाण्याच्या योजनांचे, डोंगर पठारावरील ग्रॅव्हीटीच्या योजनांचे तर
नदीकाठच्या उपसा जलसिंचन योजनांचेही मोठे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे
पंचनामे संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ करुन ते शासनास सादर करावेत
त्याची एक प्रत माझेकडेही देण्यात यावी.लवकरात लवकर आपल्या मतदारसंघातील नुकसानीचे
पंचनामे तयार करुन नुकसानभरपाईचा अहवाल शासनाकडे सादर केल्यानंतर नुकसानभरपाई तसेच
सार्वजनीक मालमत्तेची पुर्नंबांधणी करणेकरीता आवश्यक असणारा निधी शासनाकडून मंजुर
करुन आणण्यास मदत होईल.सन २००५ च्या अतिवृष्टीत अशाच प्रकारे अतिवृष्टी व
महापुरामुळे नुकसान झालेनंतर तत्कालीन मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांचेकडून
मोठया प्रमाणात नुकसानभरपाई व निधी आणण्यास मदत झाली होती.आताचे मुख्यमंत्री यांचेकडेही
या नुकसानीची भरपाई मिळविणेकरीता मी तातडीने मुख्यमंत्र्याकडे जाणार आहे
त्यांचेकडे मदत मागताना आपल्या कडे किती नुकसान झाले आहे याची सविस्तर माहिती असणे
आवश्यक असल्याने पंचनाम्याच्या कामांत कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांनी हयगय करु
नये.अनपेक्षित अतिवृष्टी व महापुरामुळे मोठया प्रमाणात जनतेचे नुकसान झाले
आहे.त्यांना तातडीने मदत मिळवून देणे अत्यंत गरजेचे आहे.अनेक ठिकाणी वीजपुरवठा
खंडीत झाला आहे त्याची दुरुस्ती करणेकरीता आवश्यक असणारे साहित्य याची मागणी
संबधित विभागाने करावी.पाटण तालुक्यात अतिवृष्टी व महापुरामुळे संपर्कहीन झालेल्या
गांवातील कुटुंबाना तसेच पुराचा वेढा पडल्यामुळे स्थलातंरीत झालेल्या कुटुंबांना
पुढील दोन महिने पुरेल एवढे धान्य व रॉकेल उपलब्ध करुन देणेकरीता राज्याचे अन्न
नागरी पुरवठा मंत्री यांचेकडे कालच मागणी केली आहे.लवकरच हे धान्य मिळविणेकरीता माझे
प्रयत्न सुरु आहेत. डोंगराखाली वसलेल्या गांवातील जमिनी मोठया प्रमाणात खचल्या
असल्याने तसेच डोंगरावरील धोकादायक दगड तसेच माती गांवावर कोसळण्याची भिती निर्माण
झाल्याने या गांवाचे सुरक्षित ठिकाणी तात्काळ निवारा शेड उभारुन स्थलातंर
करण्याच्या सुचना मुख्यमंत्री यांनी दिल्या असून यांचे अंदाज पत्रकेही संबधित
विभागाने लवकरात लवकर सादर करावित म्हणजे या गांवाना आवश्यक निवारा मिळेल अशाही
सुचना त्यांनी यावेळी दिल्या.
चौकट:-
न थकता, न थांबता आमदार देसाईंचे जनतेला मदतीचे कार्य सुरुच.
अतिवृष्टीमुळे
व महापुरामुळे हैरान झालेल्या जनतेला दिलासा तसेच लवकरात लवकर मदतीचा आधार
देणेकरीता गेले पाच ते सहा दिवस आमदार शंभूराज देसाई अहोरात्र अनेक मार्गाने
प्रयत्न करीत आहेत. न थकता, न थांबता जनतेच्या भेटीगाठीबरोबर प्रशासनाच्या वतीने
जनतेला आवश्यक ती मदत लवकरात लवकर मिळणेकरीता मिळेल त्या ठिकाणी, मिळेल त्या वेळेत
शासकीय अधिकाऱ्यांना बोलवून ते सुचना देत असून आमदार शंभूराज देसाईंचे हे कार्य
अखंडीत सुरु आहे.
No comments:
Post a Comment