Wednesday, 20 October 2021

गोकूळ वर्पेवाडी पोहोच रस्त्याचे भूमिपूजन करुन केली वचनपूर्ती.गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत वर्पेवाडी गोकूळ तर्फ पाटण पोहोच रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न.




दौलतनगर दि.2१(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- गोकूळ वर्पेवाडीचे काम गत एक ते दिड वर्षापूर्वी मंजूर झाले आहे. मात्र संपूर्ण राज्यावर कोविड सारख्या आजाराचे संकट होते आणि त्यामुळेच विकास कामे थांबली होती. आता नव्याने कामे सुरु झाली असून पहिल्या टप्प्यातच गोकूळ वर्पेवाडीच्या रस्त्याचे काम हाती घेतले आहे. येणाऱ्या काही दिवसांतच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून गोकूळ वर्पेवाडी पोहोच रस्त्याचे भूमिपूजन करुन या गावातील ग्रामस्थांनी केलेली मागणी पुर्ण होत करत वचनपूर्ती केली, असे प्रतिपादन राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले.

                 ते गोकूळ वर्पेवाडी येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या वर्पेवाडी पेाहोच रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी  बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुग्रा खोंदू, माजी जिल्हा परिषद सदस्य बशीर खोंदू,माजी पंचायत समिती सदस्य नथूराम कुंभार,किसन गालवे,गणेश भिसे, सरपंच निता गालवे,उपसरपंच संजय आसवले,सदस्या स्नेहल गालवे,काहिर सरपंच लक्ष्मी शिंदे,पांडूरंग तांदळे,धावडे सरपंच दत्ता अवघडे,वाडीकोतावडे सरपंच सिंधुताई विचारे,नाटोशी सरपंच अविनाश कुंभार,उदय देसाई,कोकीसरे उपसरपंच शामराव पवार,राजेंद्र कदम, आंबेघर सरपंच शंकर कोळेकर,दिनकर कोळेकर,किसन बोत्रे,महादेव कचरे,आनंदा मोहिते,सुनील खामकर,राहूल कदम,सुरेश कदम यांची  प्रमुख उपस्थिती  होती.

                याप्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले की, एक दिड वर्षापूर्वी वर्पेवाडी येथील ग्रामस्थांनी रस्त्यांची प्राधान्याने मागणी  केली  होती.कारण यापूर्वी ज्यांच्या पाठी मागे उभे राहिला,त्यांनी निवडणुकीपुरती केवळ आश्वासने दिले.थातूर मातूर काम करुन लोकांची दिशाभूल करत खोटी आश्वासने देऊन केवळ झुलवत ठेवण्याचे काम जाणिवपूर्वक काही मंडळींनी केले.पण वर्पेवाडी रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रश्न काही मार्गी लागला नाही.जेव्हा ही गोष्ट वर्पेवाडी ग्रामस्थांच्या लक्षात आली तेव्हा सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन रस्त्याची एकमुखी मागणी केली. विचार करुनच विकास कामांचा शब्द माझ्याकडून दिला जातो आणि काहीही  झाले तरी दिलेला शब्द,आश्वासन पूर्ण करतो.आपण लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे विचारांचा वारसा जपणारा असून जनहिताच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली विकास कामे या डोंगरी व दुर्गम भागामध्ये मार्गी लागण्याचा यापुढे कायम प्रयत्न राहणार आहे. त्यामुळेच आज आपण मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या वर्पेवाडी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करत असून या कामाला येत्या आठ दिवसांत प्रत्यक्ष सुरुवात करुन हे रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, वर्पेवाडी ग्रामस्थांचा रस्त्याचा प्रश्न कायमस्वरुपी  सुटणार असून येथील ग्रामस्थांना दिलेला शब्द आज पुर्ण केला असल्याने ग्रामस्थांनीही आता विचार करणे गरजेचे आहे. कारण मागणी केलेली कामे जर मार्गी लागत असतील तर निश्चितच गावातील ग्रामस्थांची जबाबदारी वाढली आहे.लोकप्रतिनिधी म्हणून गावातील उर्वरित राहिलेली कामे मार्गी लावण्याचा यापुढे प्रयत्न करणार असल्याने ग्रामस्थांनीही निवडणूकीच्या काळातील अपप्रवृत्तींना थारा देऊ नये. दोन वर्षात वर्पेवाडी गावाकरीता दोन कामे मंजूर केली.तसेच मंजूर केलेली कामे पुर्ण झाल्यानंतर उर्वरित कामेही मार्गी लावणार असल्याने यापुढे विकासाच्या कामाला महत्त्व द्यावे असे आवाहन करुन सामान्य जनतेने मतदान केल्याने तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडूण आल्यानंतर राज्यमंत्री म्हणून मंत्री मंडळात काम करण्याची संधी मिळाली.त्यामुळे डोंगरी व दुर्गम भागातील मुलभूत विकासाच्या कामांना लागणारा निधी राज्याचा वित्त राज्यमंत्री म्हणून मोरणा विभागाला दिला जाईल असेही यावेळी ना.देसाई यांनी सांगीतले.आभार दत्ता गालवे यांनी केले तर आभार किसन गालवे यांनी मानले.

चौकट : ना.शंभूराज देसाई यांनी वर्पेवाडीच्या महिलांना दिले नळ पाणी  पुरवठा योजनेच्या मंजूरीचे पत्र.

           विधानसभा निवडणूकीच्या अगोदर वर्पेवाडी येथील ग्रामस्थांनी पोहोच रस्त्याची मागणी केली होती. तर या गावातील महिलांना नळ  पाणी  पुरवठा  योजनेचीही मागणी केली होती. वर्पेवाडी पोहोच रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्याचे काम मंजूर केले.तर नळ योजनेचे कामासाठी स्थानिक विकास निधीतून 10 लाख रुपयांचा निधी प्रस्तावित केला होता. वर्पेवाडीच्या रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी महिलांना आग्रही मागणी केलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या मंजूरीचे पत्र ना. देसाई यांनी उपस्थित महिलांना दिल्याने रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमामध्ये वर्पेवाडी येथील महिलांनी मागणी केलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेचे कामाचे मंजूरीचे पत्र दिल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्यांनी ना.देसाई यांचे आभार मानत धन्यवाद दिले.

Saturday, 16 October 2021

विकास कामांमध्ये राजकारण न करता गावा-गावांत जास्तीत जास्त कामे मार्गी लागणे गरजेचे. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर मणदुरे ते निवकणे रस्त्याचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न.

 


दौलतनगर दि.16(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-पाटण तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून गत पंचवार्षिकमध्ये मतदार संघामध्ये जास्तीत जास्त विकास कामांना निधी मंजूर करुन सर्व विकास कामे मार्गी लागण्याचा प्रयत्न आपण केला.राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे महाविकास आघाडीचे सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून यापुढे मतदारसंघात विविध विकास कामांना भरघोस निधी  मंजूर होईल. अजूनही गावा-गावांत विविध विकास कामांची मागणी होत असल्याने गावच्या सर्वांगीण विकास होण्याच्यादृष्टीने गावां-गावांतील विविध विकास कामांमध्ये कसलेही राजकारण न करता जास्तीत जास्त विकास कामे मार्गी लागणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले.

               ते मुख्यमंत्री  ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या मणदुरे ते निवकणे या रस्त्याची सुधारणा करणे या कामाचे भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, माजी पंचायती समिती सभापती सौ.मुक्ताबाई माळी,सुरेश जाधव,वाय.के.जाधव,बबन माळी,भरत साळूंखे,बबनराव भिसे,विजय जंबुरे,संजय निकम,विलास कुराडे,अशोक पवार,कृष्णत यादव,विजय कदम,संजय जाधव,प्रशांत पाटणकर,अनिल पाटणकर,वसंत पाटणकर,भरत पाटणकर,संतोष पाटणकर,किसन सावंत,अनिल यादव,विश्वास जाधव,दिनकर जाधव,लक्ष्मण जाधव,अशोक जाधव,रामचंद्र सपकाळ यांचेसह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते आदींची प्रमुख उपस्थिती होती.

            याप्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले की, पाटण तालुक्यातील निवकणे गावाला प्रसिध्द असे श्री जानाईदेवीचे मंदिर असून प्रसिध्द असे मोठे धार्मिक स्थान आहे. श्री जानाई देवीच्या यात्रेला आजू-बाजूच्या दोन तीन राज्यातील भाविक भक्त मोठया प्रमाणांत प्रतिवर्षी येथे येत असतात.यात्रेनिमित्त मोठी गर्दी येथे असते. अनेक भाविक जे यात्रेसाठी नेहमी येथे येतात.  मणदुरे विभागातील महत्त्वाचा असलेल्या मणदुरे ते निवकणे रस्त्याचे काम सुरु होण्यासाठी गेली तीन ते चार वर्षापासून या गावातील व विभागातील पदाधिकारी  व कार्यकर्त्यांची रस्त्याचे काम सुरु करण्याची कायम मागणी करुन त्यांचा सातत्याचा पाठपुरावा सुरु होता. आज मणदुरे ते निवकणे या रस्त्यासाठी  01 कोटी 40 लक्ष रुपये मंजूर करत या कामाचा भूमिपूजन कार्यक्रम होत आहे. बऱ्याच वर्षापासून या गावाची असणारी रस्त्याची मागणी आज पूर्ण झाली,असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळत आहे. गत दिड दोन वर्षामध्ये कोविड संसर्गामुळे निधीची मर्यादा आल्याने या रस्त्याचे काम सुरु होण्यासाठी विलंब झाला.परंतु आपली कामाची पध्दतच वेगळी आहे एखाद्या विकास कामाचं भूमिपूजन केलं की ते काम प्रत्यक्षात सुरु करायच आणि ते काम पूर्ण करायचं,अशीच आहे. विधानसभा निवडणूक डोळयासमोर ठेऊन काही मंडळींकडून या रस्त्याचे कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला गेला. लोकांच्यामध्ये गैरसमज करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला गेला. पण आज आपण याच रस्त्याचे कामाचे भूमिपूजन करुन प्रत्यक्ष कामांस सुरुवात करत असल्याने या मंडळींना आपण प्रत्यक्ष कृतीतून उत्तर दिले असल्याने अशा लोकांपासून आपण सावध राहिले पाहिजे. यापुढे विकास कामे करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी ठामपणे उभे राहून चांगले संघटन करण्यासाठी  कार्यकर्त्यांनी  एकत्र येणे गरजेचे आहे. सन 2004 ते 2009 या कालावधीत मणदुरे गावातील मागासर्वीय वस्तीकरीता साकव पूलाचे काम पूर्ण केले.पण हे काम करताना अनेक अडचणी आल्या.जाणिवपूर्वक विकास कामे होऊ नयेत यासाठी काही मंडळींकडून प्रयत्न केले गेले. परंतु गावातील महत्त्वाची अंतर्गत रस्ता, पोहोच रस्ता, नळ योजना, साकव व वळण बंधारा अशी कामे झाली पाहिजेत.याचा उपयोग हा संपूर्ण गावातील ग्रामस्थांसाठी होणार आहे. पण काही लोकांना आपल्या कामांची ॲलर्जी आहे. असे असले तरी विकास कामे करताना कोणतेही राजकारण आपण करत नाही.विधानसभा निवडणूकीला किती मतदान झाले याचा विचार विकास कामे देताना कधीच केला नाही.जनतेला विकास कामांसाठी जो शब्द दिला तो पुर्ण करण्यासाठी कितीही अडचणी आल्या तरी त्या दूर करुन ती कामे पुर्णत्वाकडे नेण्याचे काम केले.पण सामान्य जनतेसाठी आवश्यक असलेली कामे झाली पाहिजेत यासाठी विकास कामांमध्ये राजकारण न आणता गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ती जास्तीत जास्त कशी मार्गी लागतील यासाठी  पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेकडून प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे त्यांनी शेवटी सांगीतले.

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखानाच्या कर्मचाऱ्यांना 'यशराज देसाई' यांच्याकडून दिवाळी भेट 'कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी यांना ११ टक्के बोनस,गाळप उद्दीष्ट साध्य झाल्यास प्रोत्साहनपर बक्षीस देणार'

 

दौलतनगर दि.16(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखाना हा सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठीच सदैव प्रयत्नशील राहून कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांनी पिकवलेला संपूर्ण ऊस कारखान्यास गळीतास घालून यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करण्याचे आवाहन करून ही संस्था नावारुपाला आणण्यासाठी सभासद शेतकरी यांच्याबरोबर कर्मचारी वर्ग यांचा मोठा सहभाग आहे. त्यासाठी यावर्षी देसाई कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना ११ टक्के बोनस जाहीर करून या गळीत हंगामामध्ये दिलेली उद्दिष्टे अधिकारी व  कर्मचाऱ्यांनी वेळेत पूर्ण केल्यास त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा युवा नेते यशराज देसाई यांनी केले.

                 ते दौलतनगर,ता.पाटण याठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे 48 व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,चि.जयराज देसाई, शिवसेना सातारा जिल्हा अध्यक्ष जयवंतराव शेलार, कारखान्याचे अध्यक्ष अशोकराव पाटील, व्हा.चेअरमन राजाराम पाटील,माजी अध्यक्ष डॉ. दिलीपराव चव्हाण,ॲड.मिलिंद पाटील,गजानन जाधव,सोमनाथ खामकर,शशिकांत निकम,आनंदराव चव्हाण,अशोक डिगे,पांडूरंग नलवडे,बबनराव भिसे, सौ.विश्रांती विजय जंबुरे,सौ.दिपाली पाटील,जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर,संतोष गिरी यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, सभासद उपस्थित होते. 

                यशराज देसाई पुढे म्हणाले,केंद्र सरकारचे सहकारी साखर कारखानदारी आणि साखरे बाबतचे उदासीन धोरण आहे.  परिणामी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाची एफ.आर.पी. देण्यात  अडचणी निर्माण झाल्या. सातारा जिल्ह्यात मोजक्याच कारखान्यांनी शंभर टक्के एफ.आर.पी. दिली आहे.यासंदर्भात देशातील सहकार क्षेत्रातील जाणते नेतृत्व असणारे आदरणीय शरद पवार साहेबांनी सुद्धा कारखान्यावर आर्थिक बोजा पडू नये यासाठी एफ.आर.पी.ची कारखान्यांनी  तीन टप्प्यात द्यावी अशा सूचना केल्या आहेत.लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्यानेही  ९० टक्के एफ.आर.पी. रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. केवळ १० टक्के देणे बाकी आहे. मात्र ती ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर ही  जमा केली जाईल, असे स्पष्ट करून यशराज पुढे म्हणाले राज्यातील सहकारी साखर उद्योग सध्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चालला असून सहकारी साखर कारखाने शंभर टक्के शासनाच्या नियमाचे पालन करूनच  कारखाने चालवावे लागतात. लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे कार्यक्षेत्र पाहिल्यानंतर निम्माहून अधिेक क्षेत्र हे डोंगंरी भागात आहे. कोयना नदीकाठी अल्प प्रमाणात ऊसाचे कार्यक्षेत्र आहे. संपुर्ण पाटण तालुक्यातील ऊसाची लागवड पाहिली तर तीन ते साडेतीन लाख मे.टनाच्या वर जात नाही. ही वस्तूस्थिती असताना देखील आपले कारखान्याने कारखान्याच्या सभासंदाना व ऊस उत्पादक शेतक-यांना इतर मोठया कारखान्यांच्या बरोबरीने प्रतिवर्षी दर दिला आहे.या वर्षीचा गळीत हंगाम यशस्वी होण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाकडून आवश्यक ती सर्व कामे पुर्णत्वाकडे गेली असून ऊस तोडणी मजूर भरतीचे पुर्ण क्षमतेने नियोजन करण्यात आले असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, जाणीवपूर्वेक बाहेरच्या काऱखान्याला ऊस घालणाऱ्याची शेतकऱ्यांची मानसिकता बदलली पाहिजे. बाहेर जाणार ऊस थांबवण्यासाठी संचालक मंडळाबरोबर सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तालुक्यातील शेतक-यांनी व सभासदांनी कार्यक्षेत्रातील ऊस बाहेरच्या कारखान्यांना न घालता नोंद केलेला संपुर्ण ऊस हा आपलेच लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यास गळीताकरीता देवून गळीत हंगाम य़शस्वी करण्यासाठी सर्व शेतकरी व सभासदांनी प्रयत्न करावेत,असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

Thursday, 14 October 2021

ना.शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत कामे मार्गी लागणार पाटण तालुक्यातील मागासवर्गीय वस्त्यांमधील विकास कामांना 1.50 कोटी रुपयांचा निधी वितरित.

 


दौलतनगर दि.14(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- सन २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील बौध्द व मातंगवस्तीतील अंतर्गत रस्ते सुधारणा करण्याचे  विविध विकास कामांना निधी मंजूर होण्यासाठी  राज्य शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केलेल्या पाठपुराव्यानुसार या विभागाकडून पाटण तालुक्यातील 16 गांवातील बौध्द व मातंगवस्तीमध्ये रस्त्यांची सुधारणा करण्याच्या विकास कामांना ०१.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने पारित केला होता.मंजूर केलेली विकास कामे मार्गी लावण्याकरीता या कामांना नुकताच निधी वितरीत करण्यात आला असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत पाटण तालुक्यातील मागासवर्गीय वस्त्यांमधील विकास कामे लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती  गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे. 

                    प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे की, सन २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील बौध्द व मातंगवस्तीतील अंतर्गत रस्त्यांची सुधारणा करण्याच्या  विविध विकासकामांना आवश्यक असणारा निधी मंजुर करणेकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्य शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे पाठपुरावा केला होता.त्यानुसार पाटण तालुक्यातील 16 गावांतील विविध विकासकामांना ०१.50 कोटी रुपयांचा निधी मंजुर करत  निधी मंजुरीचा शासन निर्णय शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दि.26 मार्च, २०२० रोजी पारित केला आहे. परंतु राज्यामध्ये कोविड संसर्गामुळे विकास कामे मार्गी लावताना काही मर्यादा आल्याने या मागासवर्गीय वस्त्यांमधील विकास कामांना निधी वितरित करण्यात आला नव्हता. राज्याची आर्थिक परिस्थिती सध्या पुर्वपदावर येत असल्याने विकास कामांना निधी वितरित करण्याची कार्यवाही सुरु झाल्याने पाटण विधानसभा मतदारसंघातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतंर्गत मंजूर असलेल्या विकास कामांना निधी वितरित करण्यात आला असल्याचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने नुकताच पारित केला आहे. या शासन निर्णयानुसार पाटण तालुक्यातील मागासवर्गीयवस्तीमधील समावेश असणारी कामे मरळी येथे बौध्दवस्ती व मातंगवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, आवर्डे बौध्दवस्ती व मातंगवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, मरळोशी बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, गोकूळ तर्फ पाटण बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख,आटोली बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख,नाटोशी बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख,आडूळ गावठाण बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, केरळ बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा व गटर काम 10 लाख, रासाटी बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, कसणी बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, सावरघर बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, कुशी पुनर्वसन आवर्डे बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 06 लाख,चिंचेवाडी वजरोशी बौध्दवस्ती रस्ता सुधारणा 10 लाख,तामिणे बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, आंबवडे येथे बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, ढोकावळे बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 04 लाख अशा एकूण मंजूर 16 कामांकरीता 01.50 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतंर्गत मंजूर असलेल्या मागासवर्गीय वस्तीमधील विकास कामांच्या  निविदा प्रक्रिया करण्याची करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या असून मागासवर्गीय वस्त्यांमधील विकास कामांना लवकर सुरुवात होणार असल्याचे पत्रकांत शेवटी म्हंटले आहे.

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून पाटण तालुक्यातील 50 तर सुपने मंडलातील 11 नळ पाणी पुरवठा योजनांचा जलजिवन मिशन आराखडयात समावेश समावेश..

 


दौलतनगर दि.14(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागामध्ये वसलेल्या गावांच्या व वाडयावस्त्यांकरीता असलेल्या नळ पाणी पुरवठा योजना हया कालबाहय तसेच नादुरुस्त झाल्याने या गावांना व वाडयावस्त्यांना पाणी टंचाई भासत असल्याने येथील नळ पाणी पुरवठा योजना नव्याने करण्यासंदर्भात संबंधित गावातील ग्रामस्थांनी सातत्याने मागणी केली होती. पाटण विधानसभा मतदारसंघातील नळ पाणी पुरवठा योजनांचा राज्य शासनाच्या जलजीवन मिशन योजनेमध्ये समावेश होण्यासाठी पाणी पुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांचेकडे पाठपुरावा केल्यानंतर गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण तालुक्यातील 50 व सुपने मंडलांतील 11 अशा एकूण 61 योजनांचा राज्य शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत समावेश करण्यात आला असून या नळ पाणी पुरवठा योजनांचे प्रस्ताव तातडीने मंजूरीकरीता सादर करण्याच्या सुचना ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला केल्या असल्याची माहिती गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने  प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

               प्रसिध्दीपत्रकांमध्ये पुढे म्हंटले आहे की, पाटण तालुका हा डोंगरी व दुर्गम भागामध्ये वसलेला असून पावसाळयामध्ये मोठया प्रमाणांत झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगरी भागामधील अनेक गावांच्या व वाडया वस्त्यांकरीता अस्तित्वात असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनांचे मोठया प्रमाणांत नुकसान झाले.तर काही गावांच्या नळ पाणी पुरवठा योजना हया कालबाहय व नादुरुस्त झाल्या असल्याने याही नळ पाणी पुरवठा योजनांची तातडीने पुनर्बांधणी करणे गरजेचे होते. पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणाऱ्या गावांच्या व वाडयावस्त्यांच्या नळ पाणी पुरवठा योजना हया राज्य शासनाच्या जलजीवन मिशन योजनेमध्ये समाविष्ठ करण्यात याव्या यासाठी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांचेकडे मी लेखी पत्राव्दारे विनंती केलेली होती. तसेच यासंदर्भात त्यांचेकडे सातत्याचा पाठपुरावा केला होता. त्यानुसार पाटण तालुक्यातील 50 व सुपने मंडलांतील 11 अशा एकूण 61 योजनांचा राज्य शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पाटण तालुक्यातील काळोली, सडानिनाई(सडावाघापूर), चाफळ, जंगलवाडी(जाधववाडी चाफळ), पाडळोशी, तावरेवाडी(पाडळोशी), मसुगडेवाडी (पाडळोशी), बोर्गेवाडी (घोट), फडतरवाडी (घोट),नुने,पांढरेपाणी(आटोली),आटोली,गव्हाणवाडी,बेंदवाडी माळवाडी सवारवाडी कडवे,धामणी,रुवले,मरळोशी, लोटलेवाडी(काळगावं), काळगावं, डाकेवाडी(वाझोली), शिद्रुकवाडी(काढणे),पाळशी,लोहारवाडी(काळगावं),कामरगावं, मानाईनगर,आवसरी(काठी),पाचगणी,काहिर,कडवे खुर्द रेडेवाडी,डोणीचावाडा (वांझोळे),नहिंबे चिरंबे,ताईगडेवाडी तळमावले, भारसाखळे, विठ्ठलवाडी (शिरळ), करपेवाडी (काळगावं), जळव,कातवडी,येराडवाडी,सदुवर्पेवाडी चेणगेवाडी सळवे,चाळकेवाडी,चव्हाणवाडी(धामणी),ठोमसे,मारुल तर्फ पाटण, आडूळ,निगडे,पाचुपतेवाडी ग्रा.पं.,आंबवडे खुर्द,भिकाडी मिसाळवाडी धनगरवाडा (मरड) व मसुगडेवाडी दाढोली तर सुपने मंडलातील आबईचीवाडी, गमेवाडी, केसे,बेलदरे,साजूर,उत्तर तांबवे,वस्ती साकुर्डी,पश्चिम सुपने,आरेवाडी, पाडळी(केसे),डेळेवाडी अशा 61 योजनांचा गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून राज्य  शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत समावेश करण्यात आला आहे. तसेच या नळ पाणी  पुरवठा  योजनांची  अंदाजपत्रके आवश्यक त्या कागदपत्रांसह तातडीने  तयार करण्यात येऊन या नळ पाणी पुरवठा योजनांचा जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मंजूरीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे शेवटी पत्रकांत म्हंटले आहे.


Wednesday, 13 October 2021

गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते देसाई कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रम.

 

 

दौलतनगर दि.14(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या सन २०21-22 च्या ४८ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ शुक्रवार दि.15 ऑक्टोंबर, 2021 रोजी सकाळी १0.30 वाजता लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुहाचे मार्गदर्शक,महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई व मा.सौ.स्मितादेवी शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते तसेच मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई व युवा नेते यशराज देसाई (दादा) यांचे उपस्थितीत कारखाना कार्यस्थळ दौलतनगर (मरळी) येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमानिमित्त कारखान्याचे संचालक पांडूरंग आण्णासो नलवडे व त्यांच्या पत्नी सौ. जयश्री पांडूरंग नलवडे यांचे हस्ते सत्यनारायण महापुजा आयेाजित केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

                            प्रसिध्दी पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई व युवा नेते यशराज देसाई (दादा) यांच्या मार्गदर्शनाखाली चालू गळीत हंगामाची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे. कारखान्यामधील मशिनरी ओव्हर ऑईलिंग व रिपेअरिंगची कामे पुर्णत्वाकडे आली आहेत. तसेच ऊस तोडणी व वाहतूकीसाठी आवश्यक तेवढया तोडणी मजूर यंत्रणेचे नियोजन झालेले असून या गळीत हंगामाध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद व बिगर ऊस उत्पादक सभासद यांनी कारखान्याचे शेती विभागाकडे नोंदवण्यात आलेल्या संपूर्ण ऊसाचे गाळप करण्याच्या दृष्टीने सर्व ते नियोजन झाले आहे. ऊस उत्पादक सभासद व शेतकरी या सर्वांच्या सांघिक प्रयत्नातून व सहकार्यातून यंदाचाही गळीत हंगाम यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करीत लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुहाचे मार्गदर्शक व महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते व व मा.सौ.स्मितादेवी शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते तसेच मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई व युवा नेते यशराज देसाई (दादा) यांचे उपस्थितीत यंदाच्या ४8 व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ शुक्रवार दि.15 ऑक्टोंबर, 2021  रोजी सकाळी १0.30 वाजता कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियामांचे पालन करीत कारखान्याचे संचालक मंडळ, ऊस उत्पादक सभासद,शेतकरी,पदाधिकारी व कार्यकर्ते,अधिकारी व कर्मचारी यांचे उपस्थितीत कारखाना कार्यस्थळ, दौलतनगर (मरळी) येथे संपन्न होणार असल्याचे शेवटी प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.

Monday, 11 October 2021

मा.यशराज देसाई(दादा) यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा.

 


 

दौलतनगर दि.11(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-  महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे चिरंजिव व पाटण तालुक्याचे युवा नेते मा.यशराज देसाई (दादा) यांचा वाढदिवस पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेवतीने शालेय वह्या, खाऊ वाटप तसेच सर्व रोग निदान शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करुन विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे चिरंजिव व पाटण तालुक्याचे युवा नेते  मा. यशराज देसाई (दादा) यांचे दि. १0 ऑक्टोंबर रोजीचे वाढदिवसा निमित्त पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली  शिवसेना,युवासेना व युवा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने शालेय वह्या, खाऊ वाटप तसेच सर्व रोग निदान शिबिर व रक्तदान शिबिर विविध सामाजिक सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार पाटण मतदारसंघातील तारळे, चाफळ, मल्हारपेठ, पाटण, कोयना, नाटोशी, मरळी, ढेबेवाडी, कुंभारगाव या विभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामार्फत गरीब व गरजू कुटुंबातील शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनींना सामाजिक अंतर ठेऊन वहयांचे व खाऊंचे वाटप करण्यात आले. मा.यशराज देसाई यांचे वाढदिवसानिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली धावडे,ता.पाटण येथे सर्व रोग निदान आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये मोरणा विभागातील 437 लोकांनी आरोग्याची तपासणी केली. तसेच शिवसेना काळगाव,कुंभारगाव , ढेबेवाडी विभागातील  शिवसेना युवासेना व युवा संघटनेच्या पदाधिकारी यांनी तळमावले व मान्याचीवाडी तर मल्हारपेठ विभागातील पदाधिकारी यांनी शेडगेवाडी विहे येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करुन या शिबीरामध्ये रक्तदात्यांनी रक्तदान केले. दरम्यान मा. यशराज देसाई (दादा) हे वाढदिवसा दिवशी सातारावरुन येताना ऊरुल, निसरेफाटा, मल्हारपेठ, नारळवाडी, येराडवाडी,नवसरी,नाडे,सांगवड फाटा, गव्हाणवाडी व चोपदारवाडी या ठिकाणी ग्रामस्थांसह,युवकांनी वाढदिवसानिमित्त उत्साहात स्वागत करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच कारखाना कार्यस्थळावरील स्व. लोकनेते बाळासाहेब देसाई, कै.सौ.वत्सलादेवी देसाई(ताईसाहेब),स्व.शिवाजीराव देसाई(आबासाहेब) यांचे पुर्णाकृती पुतळ्यांना पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केल्यानंतर दौलतनगर येथील गणेशमंदीरात गणरायाचे दर्शन घेऊन मरळी ता.पाटण येथे ग्रामदैवत निनाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर मरळी ग्रामस्थांचेवतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.दौलतनगर,ता.पाटण येथील शिवविजय हॉलमध्ये वाढदिवसानिमित्त आलेल्या हितचिंतकांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा स्विकारल्या. वाढदिवसानिमित्त लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचेवतीने त्यांचा सत्कारा करण्यात आला. विविध संस्थाच्यावतीने वहीतूला करुन वाढदिवस अभिष्टचिंतन केले. यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई उद्योग व शिक्षण समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी मतदारसंघातील शिवसेना युवासेना व युवा संघटनेचे कार्यकर्ते, युवक, हितचिंतक यांनी  प्रत्यक्ष भेटून व भ्रमणध्वनीवरुन तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.