Thursday 14 October 2021

ना.शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत कामे मार्गी लागणार पाटण तालुक्यातील मागासवर्गीय वस्त्यांमधील विकास कामांना 1.50 कोटी रुपयांचा निधी वितरित.

 


दौलतनगर दि.14(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- सन २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील बौध्द  मातंगवस्तीतील अंतर्गत रस्ते सुधारणा करण्याचे  विविध विकास कामांना निधी मंजूर होण्यासाठी  राज्य शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केलेल्या पाठपुराव्यानुसार या विभागाकडून पाटण तालुक्यातील 16 गांवातील बौध्द व मातंगवस्तीमध्ये रस्त्यांची सुधारणा करण्याच्या विकास कामांना ०१.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने पारित केला होता.मंजूर केलेली विकास कामे मार्गी लावण्याकरीता या कामांना नुकताच निधी वितरीत करण्यात आला असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत पाटण तालुक्यातील मागासवर्गीय वस्त्यांमधील विकास कामे लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती  गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे. 

                    प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे की, सन २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील बौध्द  मातंगवस्तीतील अंतर्गत रस्त्यांची सुधारणा करण्याच्या  विविध विकासकामांना आवश्यक असणारा निधी मंजुर करणेकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्य शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे पाठपुरावा केला होता.त्यानुसार पाटण तालुक्यातील 16 गावांतील विविध विकासकामांना ०१.50 कोटी रुपयांचा निधी मंजुर करत  निधी मंजुरीचा शासन निर्णय शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दि.26 मार्च, २०२० रोजी पारित केला आहे. परंतु राज्यामध्ये कोविड संसर्गामुळे विकास कामे मार्गी लावताना काही मर्यादा आल्याने या मागासवर्गीय वस्त्यांमधील विकास कामांना निधी वितरित करण्यात आला नव्हता. राज्याची आर्थिक परिस्थिती सध्या पुर्वपदावर येत असल्याने विकास कामांना निधी वितरित करण्याची कार्यवाही सुरु झाल्याने पाटण विधानसभा मतदारसंघातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतंर्गत मंजूर असलेल्या विकास कामांना निधी वितरित करण्यात आला असल्याचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने नुकताच पारित केला आहे. या शासन निर्णयानुसार पाटण तालुक्यातील मागासवर्गीयवस्तीमधील समावेश असणारी कामे मरळी येथे बौध्दवस्ती व मातंगवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, आवर्डे बौध्दवस्ती व मातंगवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, मरळोशी बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, गोकूळ तर्फ पाटण बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख,आटोली बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख,नाटोशी बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख,आडूळ गावठाण बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, केरळ बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा व गटर काम 10 लाख, रासाटी बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, कसणी बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, सावरघर बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, कुशी पुनर्वसन आवर्डे बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 06 लाख,चिंचेवाडी वजरोशी बौध्दवस्ती रस्ता सुधारणा 10 लाख,तामिणे बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, आंबवडे येथे बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, ढोकावळे बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 04 लाख अशा एकूण मंजूर 16 कामांकरीता 01.50 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतंर्गत मंजूर असलेल्या मागासवर्गीय वस्तीमधील विकास कामांच्या  निविदा प्रक्रिया करण्याची करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या असून मागासवर्गीय वस्त्यांमधील विकास कामांना लवकर सुरुवात होणार असल्याचे पत्रकांत शेवटी म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment