दौलतनगर दि.16(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-लोकनेते
बाळासाहेब देसाई सहकारी कारखाना हा सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठीच सदैव प्रयत्नशील
राहून कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांनी पिकवलेला संपूर्ण
ऊस कारखान्यास गळीतास घालून यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करण्याचे आवाहन करून ही
संस्था नावारुपाला आणण्यासाठी सभासद शेतकरी यांच्याबरोबर कर्मचारी वर्ग यांचा मोठा
सहभाग आहे. त्यासाठी यावर्षी देसाई कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना ११ टक्के बोनस
जाहीर करून या गळीत हंगामामध्ये दिलेली उद्दिष्टे अधिकारी व
कर्मचाऱ्यांनी वेळेत पूर्ण केल्यास त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाईल, अशी
घोषणा युवा नेते यशराज देसाई यांनी केले.
ते
दौलतनगर,ता.पाटण याठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे 48
व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी
मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,चि.जयराज देसाई, शिवसेना सातारा
जिल्हा अध्यक्ष जयवंतराव शेलार, कारखान्याचे अध्यक्ष अशोकराव पाटील, व्हा.चेअरमन राजाराम
पाटील,माजी अध्यक्ष डॉ. दिलीपराव चव्हाण,ॲड.मिलिंद पाटील,गजानन जाधव,सोमनाथ
खामकर,शशिकांत निकम,आनंदराव चव्हाण,अशोक डिगे,पांडूरंग नलवडे,बबनराव भिसे,
सौ.विश्रांती विजय जंबुरे,सौ.दिपाली पाटील,जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, पंचायत
समिती सदस्य सुरेश पानस्कर,संतोष गिरी यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक मंडळ,
सभासद उपस्थित होते.
यशराज
देसाई पुढे म्हणाले,केंद्र सरकारचे सहकारी साखर कारखानदारी आणि साखरे बाबतचे
उदासीन धोरण आहे.
परिणामी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाची एफ.आर.पी. देण्यात
अडचणी निर्माण झाल्या. सातारा जिल्ह्यात मोजक्याच कारखान्यांनी शंभर टक्के
एफ.आर.पी. दिली आहे.यासंदर्भात देशातील सहकार क्षेत्रातील जाणते नेतृत्व असणारे
आदरणीय शरद पवार साहेबांनी सुद्धा कारखान्यावर आर्थिक बोजा पडू नये यासाठी
एफ.आर.पी.ची कारखान्यांनी
तीन टप्प्यात द्यावी अशा सूचना केल्या आहेत.लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्यानेही
९० टक्के एफ.आर.पी. रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. केवळ १० टक्के
देणे बाकी आहे. मात्र ती ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर ही
जमा केली जाईल, असे स्पष्ट करून यशराज पुढे म्हणाले राज्यातील सहकारी साखर उद्योग
सध्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चालला असून सहकारी साखर कारखाने शंभर टक्के
शासनाच्या नियमाचे पालन करूनच कारखाने चालवावे लागतात. लोकनेते
बाळासाहेब देसाई कारखान्याचे कार्यक्षेत्र पाहिल्यानंतर निम्माहून अधिेक क्षेत्र
हे डोंगंरी भागात आहे. कोयना नदीकाठी अल्प प्रमाणात ऊसाचे कार्यक्षेत्र आहे.
संपुर्ण पाटण तालुक्यातील ऊसाची लागवड पाहिली तर तीन ते साडेतीन लाख मे.टनाच्या वर
जात नाही. ही वस्तूस्थिती असताना देखील आपले कारखान्याने कारखान्याच्या सभासंदाना
व ऊस उत्पादक शेतक-यांना इतर मोठया कारखान्यांच्या बरोबरीने प्रतिवर्षी दर दिला
आहे.या वर्षीचा गळीत हंगाम यशस्वी होण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाकडून आवश्यक ती
सर्व कामे पुर्णत्वाकडे गेली असून ऊस तोडणी मजूर भरतीचे पुर्ण क्षमतेने नियोजन
करण्यात आले असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, जाणीवपूर्वेक बाहेरच्या
काऱखान्याला ऊस घालणाऱ्याची शेतकऱ्यांची मानसिकता बदलली पाहिजे. बाहेर जाणार ऊस
थांबवण्यासाठी संचालक मंडळाबरोबर सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तालुक्यातील
शेतक-यांनी व सभासदांनी कार्यक्षेत्रातील ऊस बाहेरच्या कारखान्यांना न घालता नोंद
केलेला संपुर्ण ऊस हा आपलेच लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यास गळीताकरीता
देवून गळीत हंगाम य़शस्वी करण्यासाठी सर्व शेतकरी व सभासदांनी प्रयत्न करावेत,असे
आवाहनही त्यांनी शेवटी केले.
No comments:
Post a Comment