दौलतनगर दि.2१(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री
कार्यालय):- गोकूळ वर्पेवाडीचे काम गत एक ते दिड
वर्षापूर्वी मंजूर झाले आहे. मात्र संपूर्ण राज्यावर कोविड सारख्या आजाराचे संकट
होते आणि त्यामुळेच विकास कामे थांबली होती. आता नव्याने कामे सुरु झाली असून
पहिल्या टप्प्यातच गोकूळ वर्पेवाडीच्या रस्त्याचे काम हाती घेतले आहे. येणाऱ्या
काही दिवसांतच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून गोकूळ वर्पेवाडी पोहोच
रस्त्याचे भूमिपूजन करुन या गावातील ग्रामस्थांनी केलेली मागणी पुर्ण होत करत
वचनपूर्ती केली, असे प्रतिपादन राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी
केले.
ते गोकूळ वर्पेवाडी येथे मुख्यमंत्री ग्रामसडक
योजनेतून मंजूर झालेल्या वर्पेवाडी पेाहोच रस्त्याच्या भूमिपूजन
कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. यावेळी
जिल्हा परिषद सदस्य सुग्रा खोंदू, माजी जिल्हा परिषद सदस्य बशीर खोंदू,माजी पंचायत
समिती सदस्य नथूराम कुंभार,किसन गालवे,गणेश भिसे, सरपंच निता गालवे,उपसरपंच संजय
आसवले,सदस्या स्नेहल गालवे,काहिर सरपंच लक्ष्मी शिंदे,पांडूरंग तांदळे,धावडे सरपंच
दत्ता अवघडे,वाडीकोतावडे सरपंच सिंधुताई विचारे,नाटोशी सरपंच अविनाश कुंभार,उदय
देसाई,कोकीसरे उपसरपंच शामराव पवार,राजेंद्र कदम, आंबेघर सरपंच शंकर कोळेकर,दिनकर
कोळेकर,किसन बोत्रे,महादेव कचरे,आनंदा मोहिते,सुनील खामकर,राहूल कदम,सुरेश कदम
यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले की, एक दिड
वर्षापूर्वी वर्पेवाडी येथील ग्रामस्थांनी रस्त्यांची प्राधान्याने मागणी केली
होती.कारण यापूर्वी ज्यांच्या पाठी मागे उभे राहिला,त्यांनी निवडणुकीपुरती
केवळ आश्वासने दिले.थातूर मातूर काम करुन लोकांची दिशाभूल करत खोटी आश्वासने देऊन
केवळ झुलवत ठेवण्याचे काम जाणिवपूर्वक काही मंडळींनी केले.पण वर्पेवाडी
रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रश्न काही मार्गी लागला नाही.जेव्हा ही गोष्ट
वर्पेवाडी ग्रामस्थांच्या लक्षात आली तेव्हा सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन
रस्त्याची एकमुखी मागणी केली. विचार करुनच विकास कामांचा शब्द माझ्याकडून दिला जातो
आणि काहीही झाले तरी दिलेला शब्द,आश्वासन
पूर्ण करतो.आपण लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे विचारांचा वारसा जपणारा असून
जनहिताच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली विकास कामे या डोंगरी व दुर्गम भागामध्ये
मार्गी लागण्याचा यापुढे कायम प्रयत्न राहणार आहे. त्यामुळेच आज आपण मुख्यमंत्री
ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या वर्पेवाडी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करत असून
या कामाला येत्या आठ दिवसांत प्रत्यक्ष सुरुवात करुन हे रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी
प्रयत्नशील असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, वर्पेवाडी ग्रामस्थांचा रस्त्याचा
प्रश्न कायमस्वरुपी सुटणार असून येथील
ग्रामस्थांना दिलेला शब्द आज पुर्ण केला असल्याने ग्रामस्थांनीही आता विचार करणे
गरजेचे आहे. कारण मागणी केलेली कामे जर मार्गी लागत असतील तर निश्चितच गावातील
ग्रामस्थांची जबाबदारी वाढली आहे.लोकप्रतिनिधी म्हणून गावातील उर्वरित राहिलेली
कामे मार्गी लावण्याचा यापुढे प्रयत्न करणार असल्याने ग्रामस्थांनीही निवडणूकीच्या
काळातील अपप्रवृत्तींना थारा देऊ नये. दोन वर्षात वर्पेवाडी गावाकरीता दोन कामे
मंजूर केली.तसेच मंजूर केलेली कामे पुर्ण झाल्यानंतर उर्वरित कामेही मार्गी लावणार
असल्याने यापुढे विकासाच्या कामाला महत्त्व द्यावे असे आवाहन करुन सामान्य जनतेने
मतदान केल्याने तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडूण आल्यानंतर राज्यमंत्री म्हणून
मंत्री मंडळात काम करण्याची संधी मिळाली.त्यामुळे डोंगरी व दुर्गम भागातील मुलभूत विकासाच्या
कामांना लागणारा निधी राज्याचा वित्त राज्यमंत्री म्हणून मोरणा विभागाला दिला जाईल
असेही यावेळी ना.देसाई यांनी सांगीतले.आभार दत्ता गालवे यांनी केले तर आभार किसन
गालवे यांनी मानले.
चौकट :
ना.शंभूराज देसाई यांनी वर्पेवाडीच्या महिलांना दिले नळ पाणी पुरवठा योजनेच्या मंजूरीचे पत्र.
No comments:
Post a Comment