दौलतनगर दि.11(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-
महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार
शंभूराज देसाई यांचे चिरंजिव व पाटण तालुक्याचे युवा नेते मा.यशराज देसाई (दादा) यांचा वाढदिवस पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये नामदार शंभूराज देसाई यांचे
मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेवतीने शालेय वह्या, खाऊ वाटप तसेच सर्व
रोग निदान शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करुन विविध सामाजिक
उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात
आला.
महाराष्ट्र
राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे चिरंजिव व पाटण तालुक्याचे युवा नेते मा. यशराज देसाई (दादा) यांचे
दि. १0 ऑक्टोंबर रोजीचे वाढदिवसा निमित्त पाटण
विधानसभा मतदारसंघामध्ये गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली शिवसेना,युवासेना व युवा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने शालेय वह्या, खाऊ वाटप तसेच सर्व
रोग निदान शिबिर व रक्तदान शिबिर विविध सामाजिक सामाजिक उपक्रम
राबवून साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार पाटण मतदारसंघातील
तारळे, चाफळ, मल्हारपेठ, पाटण, कोयना, नाटोशी, मरळी, ढेबेवाडी, कुंभारगाव या
विभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामार्फत गरीब व गरजू कुटुंबातील शालेय
विद्यार्थी व विद्यार्थीनींना सामाजिक अंतर ठेऊन वहयांचे व खाऊंचे वाटप करण्यात
आले. मा.यशराज देसाई यांचे वाढदिवसानिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ.
श्रीकांत शिंदे फौंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई
यांचे मार्गदर्शनाखाली धावडे,ता.पाटण येथे सर्व रोग निदान आरोग्य शिबीराचे आयोजन
करण्यात आले होते. या शिबीरामध्ये मोरणा विभागातील 437 लोकांनी आरोग्याची तपासणी
केली. तसेच शिवसेना काळगाव,कुंभारगाव , ढेबेवाडी विभागातील शिवसेना युवासेना व युवा संघटनेच्या पदाधिकारी
यांनी तळमावले व मान्याचीवाडी तर मल्हारपेठ विभागातील पदाधिकारी यांनी शेडगेवाडी
विहे येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करुन या शिबीरामध्ये रक्तदात्यांनी रक्तदान
केले. दरम्यान मा. यशराज देसाई (दादा) हे वाढदिवसा दिवशी सातारावरुन
येताना ऊरुल, निसरेफाटा, मल्हारपेठ, नारळवाडी, येराडवाडी,नवसरी,नाडे,सांगवड फाटा,
गव्हाणवाडी व चोपदारवाडी या ठिकाणी ग्रामस्थांसह,युवकांनी वाढदिवसानिमित्त
उत्साहात स्वागत करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच कारखाना कार्यस्थळावरील
स्व. लोकनेते बाळासाहेब देसाई, कै.सौ.वत्सलादेवी देसाई(ताईसाहेब),स्व.शिवाजीराव देसाई(आबासाहेब) यांचे पुर्णाकृती
पुतळ्यांना पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केल्यानंतर दौलतनगर येथील गणेशमंदीरात
गणरायाचे दर्शन घेऊन मरळी ता.पाटण येथे ग्रामदैवत निनाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर
मरळी ग्रामस्थांचेवतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.दौलतनगर,ता.पाटण
येथील शिवविजय हॉलमध्ये वाढदिवसानिमित्त आलेल्या हितचिंतकांकडून वाढदिवसाच्या
शुभेच्छा स्विकारल्या. वाढदिवसानिमित्त लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व
शिक्षण समुहाचेवतीने त्यांचा सत्कारा करण्यात आला. विविध संस्थाच्यावतीने वहीतूला
करुन वाढदिवस अभिष्टचिंतन केले. यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई उद्योग व शिक्षण
समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी मतदारसंघातील शिवसेना युवासेना व युवा
संघटनेचे कार्यकर्ते, युवक, हितचिंतक यांनी प्रत्यक्ष भेटून व भ्रमणध्वनीवरुन तसेच सोशल
मिडीयाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment