Thursday 14 October 2021

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून पाटण तालुक्यातील 50 तर सुपने मंडलातील 11 नळ पाणी पुरवठा योजनांचा जलजिवन मिशन आराखडयात समावेश समावेश..

 


दौलतनगर दि.14(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागामध्ये वसलेल्या गावांच्या व वाडयावस्त्यांकरीता असलेल्या नळ पाणी पुरवठा योजना हया कालबाहय तसेच नादुरुस्त झाल्याने या गावांना व वाडयावस्त्यांना पाणी टंचाई भासत असल्याने येथील नळ पाणी पुरवठा योजना नव्याने करण्यासंदर्भात संबंधित गावातील ग्रामस्थांनी सातत्याने मागणी केली होती. पाटण विधानसभा मतदारसंघातील नळ पाणी पुरवठा योजनांचा राज्य शासनाच्या जलजीवन मिशन योजनेमध्ये समावेश होण्यासाठी पाणी पुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांचेकडे पाठपुरावा केल्यानंतर गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण तालुक्यातील 50 व सुपने मंडलांतील 11 अशा एकूण 61 योजनांचा राज्य शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत समावेश करण्यात आला असून या नळ पाणी पुरवठा योजनांचे प्रस्ताव तातडीने मंजूरीकरीता सादर करण्याच्या सुचना ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला केल्या असल्याची माहिती गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने  प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

               प्रसिध्दीपत्रकांमध्ये पुढे म्हंटले आहे की, पाटण तालुका हा डोंगरी व दुर्गम भागामध्ये वसलेला असून पावसाळयामध्ये मोठया प्रमाणांत झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगरी भागामधील अनेक गावांच्या व वाडया वस्त्यांकरीता अस्तित्वात असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनांचे मोठया प्रमाणांत नुकसान झाले.तर काही गावांच्या नळ पाणी पुरवठा योजना हया कालबाहय व नादुरुस्त झाल्या असल्याने याही नळ पाणी पुरवठा योजनांची तातडीने पुनर्बांधणी करणे गरजेचे होते. पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणाऱ्या गावांच्या व वाडयावस्त्यांच्या नळ पाणी पुरवठा योजना हया राज्य शासनाच्या जलजीवन मिशन योजनेमध्ये समाविष्ठ करण्यात याव्या यासाठी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांचेकडे मी लेखी पत्राव्दारे विनंती केलेली होती. तसेच यासंदर्भात त्यांचेकडे सातत्याचा पाठपुरावा केला होता. त्यानुसार पाटण तालुक्यातील 50 व सुपने मंडलांतील 11 अशा एकूण 61 योजनांचा राज्य शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पाटण तालुक्यातील काळोली, सडानिनाई(सडावाघापूर), चाफळ, जंगलवाडी(जाधववाडी चाफळ), पाडळोशी, तावरेवाडी(पाडळोशी), मसुगडेवाडी (पाडळोशी), बोर्गेवाडी (घोट), फडतरवाडी (घोट),नुने,पांढरेपाणी(आटोली),आटोली,गव्हाणवाडी,बेंदवाडी माळवाडी सवारवाडी कडवे,धामणी,रुवले,मरळोशी, लोटलेवाडी(काळगावं), काळगावं, डाकेवाडी(वाझोली), शिद्रुकवाडी(काढणे),पाळशी,लोहारवाडी(काळगावं),कामरगावं, मानाईनगर,आवसरी(काठी),पाचगणी,काहिर,कडवे खुर्द रेडेवाडी,डोणीचावाडा (वांझोळे),नहिंबे चिरंबे,ताईगडेवाडी तळमावले, भारसाखळे, विठ्ठलवाडी (शिरळ), करपेवाडी (काळगावं), जळव,कातवडी,येराडवाडी,सदुवर्पेवाडी चेणगेवाडी सळवे,चाळकेवाडी,चव्हाणवाडी(धामणी),ठोमसे,मारुल तर्फ पाटण, आडूळ,निगडे,पाचुपतेवाडी ग्रा.पं.,आंबवडे खुर्द,भिकाडी मिसाळवाडी धनगरवाडा (मरड) व मसुगडेवाडी दाढोली तर सुपने मंडलातील आबईचीवाडी, गमेवाडी, केसे,बेलदरे,साजूर,उत्तर तांबवे,वस्ती साकुर्डी,पश्चिम सुपने,आरेवाडी, पाडळी(केसे),डेळेवाडी अशा 61 योजनांचा गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून राज्य  शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत समावेश करण्यात आला आहे. तसेच या नळ पाणी  पुरवठा  योजनांची  अंदाजपत्रके आवश्यक त्या कागदपत्रांसह तातडीने  तयार करण्यात येऊन या नळ पाणी पुरवठा योजनांचा जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मंजूरीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे शेवटी पत्रकांत म्हंटले आहे.


No comments:

Post a Comment