दौलतनगर दि.16(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-पाटण
तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून गत पंचवार्षिकमध्ये मतदार संघामध्ये जास्तीत जास्त
विकास कामांना निधी मंजूर करुन सर्व विकास कामे मार्गी लागण्याचा प्रयत्न आपण केला.राज्याचे
मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे महाविकास आघाडीचे सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून
यापुढे मतदारसंघात विविध विकास कामांना भरघोस निधी मंजूर होईल. अजूनही गावा-गावांत विविध विकास कामांची
मागणी होत असल्याने गावच्या सर्वांगीण विकास होण्याच्यादृष्टीने गावां-गावांतील विविध
विकास कामांमध्ये कसलेही राजकारण न करता जास्तीत जास्त विकास कामे मार्गी लागणे गरजेचे
असल्याचे प्रतिपादन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले.
ते
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर
झालेल्या मणदुरे ते निवकणे या रस्त्याची सुधारणा करणे या कामाचे भूमिपूजन
कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,
माजी पंचायती समिती सभापती सौ.मुक्ताबाई माळी,सुरेश जाधव,वाय.के.जाधव,बबन माळी,भरत
साळूंखे,बबनराव भिसे,विजय जंबुरे,संजय निकम,विलास कुराडे,अशोक पवार,कृष्णत
यादव,विजय कदम,संजय जाधव,प्रशांत पाटणकर,अनिल पाटणकर,वसंत पाटणकर,भरत पाटणकर,संतोष
पाटणकर,किसन सावंत,अनिल यादव,विश्वास जाधव,दिनकर जाधव,लक्ष्मण जाधव,अशोक
जाधव,रामचंद्र सपकाळ यांचेसह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते आदींची प्रमुख उपस्थिती
होती.
याप्रसंगी
बोलताना ते पुढे म्हणाले की, पाटण तालुक्यातील निवकणे गावाला प्रसिध्द असे श्री जानाईदेवीचे
मंदिर असून प्रसिध्द असे मोठे धार्मिक स्थान आहे. श्री जानाई देवीच्या यात्रेला आजू-बाजूच्या
दोन तीन राज्यातील भाविक भक्त मोठया प्रमाणांत प्रतिवर्षी येथे येत असतात.यात्रेनिमित्त
मोठी गर्दी येथे असते. अनेक भाविक जे यात्रेसाठी नेहमी येथे येतात. मणदुरे विभागातील महत्त्वाचा असलेल्या मणदुरे ते
निवकणे रस्त्याचे काम सुरु होण्यासाठी गेली तीन ते चार वर्षापासून या गावातील व विभागातील
पदाधिकारी व कार्यकर्त्यांची रस्त्याचे काम
सुरु करण्याची कायम मागणी करुन त्यांचा सातत्याचा पाठपुरावा सुरु होता. आज मणदुरे ते
निवकणे या रस्त्यासाठी 01 कोटी 40 लक्ष रुपये मंजूर करत या कामाचा
भूमिपूजन कार्यक्रम होत आहे. बऱ्याच वर्षापासून या गावाची असणारी रस्त्याची मागणी आज
पूर्ण झाली,असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे
यांचे नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून महत्त्वाच्या
खात्यांची जबाबदारी सांभाळत आहे. गत दिड दोन वर्षामध्ये कोविड संसर्गामुळे निधीची मर्यादा
आल्याने या रस्त्याचे काम सुरु होण्यासाठी विलंब झाला.परंतु आपली कामाची पध्दतच वेगळी
आहे एखाद्या विकास कामाचं भूमिपूजन केलं की ते काम प्रत्यक्षात सुरु करायच आणि ते काम
पूर्ण करायचं,अशीच आहे. विधानसभा निवडणूक डोळयासमोर ठेऊन काही मंडळींकडून या रस्त्याचे
कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला गेला. लोकांच्यामध्ये गैरसमज करण्याचा केविलवाणा
प्रयत्न केला गेला. पण आज आपण याच रस्त्याचे कामाचे भूमिपूजन करुन प्रत्यक्ष कामांस
सुरुवात करत असल्याने या मंडळींना आपण प्रत्यक्ष कृतीतून उत्तर दिले असल्याने अशा लोकांपासून
आपण सावध राहिले पाहिजे. यापुढे विकास कामे करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी ठामपणे उभे
राहून चांगले संघटन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. सन 2004 ते 2009 या कालावधीत मणदुरे गावातील मागासर्वीय
वस्तीकरीता साकव पूलाचे काम पूर्ण केले.पण हे काम करताना अनेक अडचणी आल्या.जाणिवपूर्वक
विकास कामे होऊ नयेत यासाठी काही मंडळींकडून प्रयत्न केले गेले. परंतु गावातील महत्त्वाची
अंतर्गत रस्ता, पोहोच रस्ता, नळ योजना, साकव व वळण बंधारा अशी कामे झाली पाहिजेत.याचा
उपयोग हा संपूर्ण गावातील ग्रामस्थांसाठी होणार आहे. पण काही लोकांना आपल्या कामांची
ॲलर्जी आहे. असे असले तरी विकास कामे करताना कोणतेही राजकारण आपण करत नाही.विधानसभा
निवडणूकीला किती मतदान झाले याचा विचार विकास कामे देताना कधीच केला नाही.जनतेला विकास
कामांसाठी जो शब्द दिला तो पुर्ण करण्यासाठी कितीही अडचणी आल्या तरी त्या दूर करुन
ती कामे पुर्णत्वाकडे नेण्याचे काम केले.पण सामान्य जनतेसाठी आवश्यक असलेली कामे झाली
पाहिजेत यासाठी विकास कामांमध्ये राजकारण न आणता गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ती
जास्तीत जास्त कशी मार्गी लागतील यासाठी पदाधिकारी
व कार्यकर्ते यांचेकडून प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे त्यांनी शेवटी सांगीतले.
No comments:
Post a Comment