दौलतनगर दि.14(जनसंपर्क
कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- लोकनेते बाळासाहेब देसाई
सहकारी साखर कारखान्याच्या सन २०21-22 च्या ४८ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ शुक्रवार दि.15 ऑक्टोंबर, 2021 रोजी सकाळी १0.30 वाजता लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग
समुहाचे मार्गदर्शक,महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई व
मा.सौ.स्मितादेवी शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते तसेच मोरणा
शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई व युवा नेते यशराज देसाई (दादा) यांचे उपस्थितीत कारखाना कार्यस्थळ दौलतनगर (मरळी) येथे
संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमानिमित्त कारखान्याचे संचालक पांडूरंग आण्णासो
नलवडे व त्यांच्या पत्नी सौ. जयश्री पांडूरंग नलवडे यांचे हस्ते
सत्यनारायण महापुजा आयेाजित केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अशोकराव
पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
प्रसिध्दी पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, महाराष्ट्र
राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई व युवा नेते यशराज देसाई (दादा) यांच्या मार्गदर्शनाखाली चालू गळीत हंगामाची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात
आली आहे. कारखान्यामधील मशिनरी ओव्हर ऑईलिंग व रिपेअरिंगची कामे पुर्णत्वाकडे आली
आहेत. तसेच ऊस तोडणी व वाहतूकीसाठी आवश्यक तेवढया तोडणी मजूर यंत्रणेचे नियोजन
झालेले असून या गळीत हंगामाध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद व बिगर
ऊस उत्पादक सभासद यांनी कारखान्याचे शेती विभागाकडे नोंदवण्यात आलेल्या संपूर्ण
ऊसाचे गाळप करण्याच्या दृष्टीने सर्व ते नियोजन झाले आहे. ऊस उत्पादक सभासद व
शेतकरी या सर्वांच्या सांघिक प्रयत्नातून व सहकार्यातून यंदाचाही गळीत हंगाम
यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करीत लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुहाचे
मार्गदर्शक व महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे
शुभहस्ते व व मा.सौ.स्मितादेवी शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते तसेच मोरणा
शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई व युवा नेते यशराज देसाई (दादा) यांचे उपस्थितीत यंदाच्या ४8 व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ शुक्रवार दि.15 ऑक्टोंबर, 2021 रोजी सकाळी १0.30 वाजता कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियामांचे
पालन करीत कारखान्याचे संचालक मंडळ, ऊस उत्पादक सभासद,शेतकरी,पदाधिकारी व
कार्यकर्ते,अधिकारी व कर्मचारी यांचे उपस्थितीत कारखाना कार्यस्थळ, दौलतनगर
(मरळी) येथे संपन्न होणार असल्याचे शेवटी प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.
No comments:
Post a Comment