Tuesday, 10 September 2019

पाटण तालुक्यातील डोंगरखाली वसलेल्या गांवाना निवारा शेड उभारण्यासाठी २ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी मंजुर पाटण तालुक्यातील ०८ गांवामध्ये उभी राहणार निवारा शेड- आमदार शंभूराज देसाई.





दौलतनगर दि.१०:- पाटण तालुक्यात गत महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यात डोंगराखाली वसलेल्या एकूण आठ गांवावर आलेल्या आपत्तीमध्ये,डोंगर खचणे, दरड कोसळणे, भूसख्लन होणे इत्यादी कारणामुळे बाधित झालेल्या गांवातील नागरिकांचे तात्पुरते सुरक्षित स्थळी स्थलातंर करणेकरीता या गांवामध्ये सुरक्षित स्थळी निवारा शेड उभारण्याकरीता राज्य शासनाने २ कोटी ३१ लाख ४,९९१ रुपयांचा निधी आठ गांवाकरीता मंजुर केला असून शेड बांधणीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेसंदर्भातील शासन निर्णय शासनाच्या महसूल व वन विभाग (मदत व पुनर्वसन) विभागाने दि.०६.०९.२०१९ रोजी पारित केला असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
               आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकात म्हंटले आहे की,पाटण तालुक्यात गत महिन्यात मोठया प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यात डोंगराखाली वसलेल्या मौजे जिमनवाडी, बोर्गेवाडी (घोट),कळंबे,भैरेवाडी (डेरवण),बाटेवाडी,पाबळवाडी, केंजळवाडी, मसुगडेवाडी या गांवाच्या वरील असणाऱ्या डोंगराचा भाग खचणे, दरडी कोसळणे,गावांमध्ये मोठया प्रमाणात भूसख्लन होणे इत्यादी कारणांमुळे अनेक कुटुंबे बाधित झाली होती. या बाधित कुटुंबिंयाना आपतकालीन परिस्थितीमध्ये सुरक्षित स्थळी त्यांचे स्थलांतर करणेकरीता या कुटुबांना निवारा शेड बांधणेकरीता शासनाने विशेष बाब म्हणून मंजुरी दयावी याकरीता राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचेकडे मी सुरुवातीपासूनच आग्रही मागणी केली होती.पाटण तालुक्यातील या आठ गावांमध्ये ही आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्याने आपला जीव मुठीत घेवून जगणाऱ्या या कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलातंर करणेकरीता या गांवामध्ये सुरक्षित ठिकाणी निवारा शेड उभारावे ही बाब अतिवृष्टीकाळात मुख्यमंत्री यांचे निदर्शनास आणून दिली असताना मुख्यमंत्री ना.फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे जिल्हाधिकारी,सातारा यांना पाटण तालुक्यातील डोंगरा खाली वसलेल्या गांवामध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या आपत्तीचा सामना करणेकरीता या गांवातील बाधित कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करुन त्यांना तात्पुरती निवारा शेड उभारण्याची कामे तातडीने निधीची तसेच प्रशासकीय मान्यतेची वाट न पहाता सुरु करावी अशा सुचना दिल्या होत्या.मुख्यमंत्री यांचे आदेशावरुन जिल्हाधिकारी, सातारा यांनी उपविभागीय अधिकारी तसेच तहसिलदार यांना या गांवातील बाधित कुटुंबियांची पहाणी करुन सार्वजनीक बांधकाम विभागामार्फत बाधित कुटुंबांना निवारा शेड बांधणेच्या कामांचे अंदाजपत्रक तयार करुन घेवून या कामांना सार्वजनीक बांधकाम विभागामार्फत सुरुवात करावी असे सांगण्यात आल्यानंतर तातडीने या कामांना सुरुवात करण्यात आली होती. या आठ गांवामध्ये सुरक्षित ठिकाणी बाधित कुंटुंबाना स्थलांतरीत होणेकरीता निवारा शेड बांधणेची कामे सुरु झाली आहेत.मुख्यमंत्री यांनी या कामांना निधी देण्याचे मान्य केलेप्रमाणे मुख्यमंत्री यांचे आदेशावरुन शासनाच्या महसूल व वन विभाग (मदत व पुनर्वसन) विभागाने दि.०६.०९.२०१९ रोजी पाटण तालुक्यातील आठ गांवातील निवारा शेड बांधणेच्या कामांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेसंदर्भातील शासन निर्णय पारित केला आहे. या निर्णयामध्ये मौजे जिमनवाडी येथे २० कुटुंबाकरीता ३१ लाख २१ हजार ८२३ रुपये, बोर्गेवाडी (घोट) येथे १५ कुटुंबाकरीता २७ लाख ४२ हजार २३१ रुपये,कळंबे येथे १६ कुटुंबाकरीता २७ लाख ४२ हजार २३१ रुपये, भैरेवाडी (डेरवण) येथे १२ कुटुंबाकरीता २३ लाख ९३ हजार ७३० रुपये, बाटेवाडी येथे २१ कुटुंबाकरीता ३१ लाख २२ हजार ३६९ रुपये,पाबळवाडी येथे ०३ कुटुंबाकरीता ११ लाख ६३ हजार १९९ रुपये, केंजळवाडी येथे २२ कुटुंबाकरीता १५ लाख ७४ हजार ६७० रुपये, मसुगडेवाडी येथे २० कुटुंबाकरीता ३१ लाख २२ हजार ३६९ रुपये व मसुगडेवाडी येथेच २० कुटुंबाकरीता दुसरे ठिकाणी निवारा शेड क्रं.३ व ४ बांधणे याकरीताही ३१ लाख २२ हजार ३६९ रुपये असा एकूण २ कोटी ३१ लाख ४,९९१ रुपयांचा निधी आठ गांवाना मंजुर करण्यात आला आहे. मंजुर झालेल्या निधीतून ३० दिवसाच्या आत ही कामे पुर्ण करण्याचे निर्देश शासन निर्णयामध्ये देण्यात आले आहेत. पाटण तालुक्यातील या आठ गावांमध्ये ही आपतकालीन परिस्थिती सदरची निवारा शेड उभारण्याकरीता माझे सातत्याच्या मागणीवरुन मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने सदरचा निधी मंजुर करुन दिल्याबद्दल या आठ गांवातील बाधित कुटुंबांच्या वतीने मुख्यमंत्री यांचे आपण आभार मानले असल्याचेही आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकात म्हंटले आहे.

Sunday, 8 September 2019

पाटण मतदारसंघातील ०६ रस्त्यांच्या कामांना अतिरिक्तचा १०.०० कोटीं रुपयांचा निधी मंजुर. आमदार शंभूराज देसाईंची माहिती.




दौलतनगर दि.०8:- सन २०१९-२० आर्थिक वर्षात अर्थसंकल्पाव्यतिरिक्त पाटण विधानसभा मतदारसंघातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांचे रस्ते  करणेकरीता अतिरिक्तचा निधी मंजुर करावा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व सार्वजनीक बांधकाम मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांचेकडे केली होती या मागणीमध्ये एकूण सहा रस्त्यांची कामे प्रस्तावित केली होती या प्रस्तावित कामांना मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व सार्वजनीक बांधकाम मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी अतिरिक्तचा १०.०० कोटी रुपयांचा निधी सार्वजनीक बांधकाम विभागाकडून मंजुर केला असून निधी मंजुर केल्याचे लेखी पत्र सार्वजनीक बांधकाम विभाग,मंत्रालय यांनी दि.०७.०९.२०१९ रोजी पारित केले असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
                        पत्रकात म्हंटले आहे की,राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व सार्वजनीक बांधकाममंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांचेकडे पाटण या डोंगराळ व दुर्गम भागातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांची तसेच पुलांची कामे करणेकरीता सन २०१९ च्या जुनच्या अर्थसंकल्पातून निधी मंजुर करणेकरीता एकूण १६ रस्त्यांची व पुलांची कामे सुचविण्यात आली होती जुनच्या अर्थसंकल्पातून शासनाने एकूण १० कामे मंजुर केली होती या १० कामांकरीता १५ कोटी १३ लाख रुपयांचा निधी मंजुर केला होता व यातील ०६ कामे प्रलंबीत राहिली होती प्रलंबीत राहिलेल्या या सहा कामांना शासनाच्या सार्वजनीक बांधकाम विभागाकडून सन २०१९-20 अंतर्गत याच आर्थिक वर्षात अतिरिक्तचा निधी मंजुर करावा अशी मागणी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व सार्वजनीक बांधकाम मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांचेकडे केल्यानंतर त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांवरील सहा रस्त्यांच्या कामांना अतिरिक्तचा १०.०० कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन दिला आहे यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील प्रमुख जिल्हा मार्गावरील अनेक प्रमुख गावांना जोडणारे हे रस्ते आहेत.निधी मंजूर झालेली कामे खालीलप्रमाणे नाडे सांगवड मंद्रुळकोळे ढेबेवाडी रस्ता प्रजिमा 58 किमी 02/400 ते 6/00 मध्ये भाग गव्हाणवाडी  फाटा ते दौलतनगर मरळी या लांबीत सुधारणा करणे 2 कोटी 70 लाख,नवजा हेळवाक मोरगिरी साजूर गारवडे रस्ता रामा 148 किमी 43/00 ते 49/00 ची सुधारणा करणे भाग वाडीकोतावडे ते शिंदेवाडी फाटा ०3 कोटी,नागठाणे तारळे पाटण रस्ता प्रजिमा 37 किमी 11/750 ते 13/00 भाग कोंजवडे ते तारळे भागातील लांबीमध्ये सुधारणा करणे 70 लाख,चरेगाव चाफळ दाढोली रस्ता प्रजिमा 53 किमी 2/00 ते 3/800 व 12/00 ते 14/200 ची सुधारणा करणे 1 कोटी 60 लाख,रामा 136 ते साकुर्डी बेलदरे तळबीड रा.म.मा.4 ते तासवडे शहापूर ते रामा 124 रस्ता प्रजिमा 61 किमी 0/00 ते 5/00 किमी भाग साकुर्डी ते बेलदरे रस्त्याची सुधारणा करणे ०१ कोटी व गुहागर चिपळूण कराड जत विजापूर रस्ता रामा 136 किमी 0/00 ते 2/00 भाग कोयना मार्केट वळण रस्त्याची सुधारणा करणे ०१ कोटी अशा एकूण १०.०० कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाच्या बांधकाम विभागाने मंजुर केला असून निधी मंजुर केले असल्याचे लेखी पत्र सार्वजनीक बांधकाम विभाग,मंत्रालय यांनी दि.०७.०९.२०१९ रोजी पारित केले आहे या कामांच्या निविदा लवकरात लवकर प्रसिध्द करुन सदरची कामे लवकरात लवकर सुरु करणेसंदर्भात बांधकाम विभागांच्या अधिकाऱ्यांना सुचना दिल्या असून पाटण विधानसभा मतदारसंघातील सहा मोठया असणाऱ्या राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गावरील रस्त्यांच्या कामांस मंजुरी देवून १०.०० कोटी रुपयांचा निधी मंजुर केलेबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व सार्वजनीक बांधकाम मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांचे जाहीर आभार व्यक्त केले असल्याचे आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी पत्रकात म्हंटले आहे.


Saturday, 7 September 2019

जनसुविधा योजनेतंर्गत पाटण मतदारसंघातील ग्रामपंचायत कार्यालये,तिर्थक्षेत्र विकास, नागरी सुविधा व स्मशानभूमि सुधारण्याच्या कामांना 01 कोटी 07 लाख रुपयांचा निधी मंजुर. कामांचे प्रशासकीय मान्यता आदेश प्राप्त - आमदार शंभूराज देसाईंची माहिती.




दौलतनगर दि.07 :- जिल्हा नियोजन समितीतंर्गत सन २०१9-20 मध्ये ग्रामपंचायतींना जनसुविधा पुरविणेसाठी देण्यात येणाऱ्या विशेष अनुदानातून पाटण मतदारसंघातील 3 ग्रामपंचायत कार्यालय, 4 क वर्ग तिर्थक्षेत्र विकास, 2 मोठया ग्रामपंचायतींच्या नागरी सुविधा व 9 गावांच्या स्मशानभूमि सुधारणा करण्याच्या कामांना जिल्हा वार्षिक आराखडयातून 01 कोटी 07 लक्ष रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला असून या कामांचे प्रशासकीय मान्यता आदेशही संबधित यंत्रणेकडून प्राप्त करुन देण्यात आले असून लवकरच या कामांच्या निविदा प्रसिध्द होवून कामांना सुरुवात होईल अशी  माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
                            आमदार शंभूराज देसाई यांनी पत्रकांत म्हंटले आहे,जिल्हा नियोजन समितीतंर्गत जिल्हा वार्षिक आराखडयातून ग्रामपंचायतींना जनसुविधा व नागरी सुविधा पुरविणेसाठी प्रतिवर्षी अनुदान देण्यात येते. यंदाच्या वर्षी सन २०१9-20 मध्ये ग्रामपंचायतींना जनसुविधा पुरविणेसाठी पाटण मतदारसंघातील ०3 ग्रामपंचायत कार्यालय इमारती, ०4 क वर्ग तिर्थक्षेत्र विकास, 2 मोठया ग्रामपंचायतींना नागरी सुविधा पुरविणे व 9 गांवातील स्मशानभूमि सुधारणा करणे ही कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यानुसार या योजनेतंर्गत या कामांना विशेष अनुदानातून ग्रामपंचायत कार्यालय बांधणेसाठी अनुक्रमे मौजे सोनवडे ग्रामपंचायतीस १० लक्ष रुपये, मारुल तर्फ पाटण ग्रामपंचायत कार्यालय १० लक्ष व पेठशिवापूर ग्रामपंचायत कार्यालय १० लक्ष असे ३0 लक्ष रुपयांचा निधी ग्रामपंचायत कार्यालये बांधणेकरीता मंजुर करण्यात आला आहे. क वर्ग तिर्थक्षेत्र विकास योजनेतून येराडवाडी,ता.पाटण येथील श्री रुद्रेश्वर मंदिर परिसराकडे कराड चिपळूण रस्ता नारळवाडी स्टॉप येथून जाणेकरीता रस्ता खडीकरण,डांबरीकरण 08 लाख, दौलतनगर,ता.पाटण येथील श्री गणेश मंदिराकडे जाणारा रस्ता 07 लाख, बनपेठवाडी येराड येथे येडोबा मंदिर परिसरात यात्री निवारा शेड 07 लाख व गुरेघर वाघजाई देवी यात्रा परिसर सुशोभिकरण 05 लाख असा एकूण 27 लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे. तर 02 मोठया ग्रामपंचायतींना नागरी सुविधा पुरविणेकरीता 13 लाखांचा निधी मंजूर झाला असून यामध्ये तारळे येथील मुख्य बाजारपेठेतील अंतर्गत रस्ता सुधारणा 07 लाख व तांबवे ता. कराड येथील अंतर्गत रस्ता सुधारणा 05 लाख मंजुर आहेत तसेच  9 गांवातील स्मशानभूमि पोहोच रस्ते, निवारा शेड, स्मशानभूमि रस्ता सुधारणा करणे या कामाकरीता 38.00 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये सळवे येथे स्मशानभूमी शेड बांधणे व स्मशानभूमी रस्ता सुधारणा करणे 10 लाख, घोट येथे स्मशानभूमी व निवारा शेड बांधणे 04 लाख, डोंगळेवाडी (माणगाव),ता.पाटण येथे स्मशानभूमी रस्ता सुधारणा 03 लाख,डिगेवाडी (मुरुड) येथे स्मशानभूमी शेड व रस्ता सुधारणा 03 लाख,कवरवाडी पिंपळगाव येथे स्मशानभूमी शेड व रस्ता सुधारणा 03 लाख, बहुले,ता.पाटण येथे स्मशानभूमी शेड 04 लाख, चाळकेवाडी येथे नागनाथ मंडळ ते स्मशानभूमी रस्ता सुधारणा 03 लाख,बाचोली,ता.पाटण येथे स्मशानभूमी शेड 04 लाख,जांभेकरवाडी मरळोशी,ता. पाटण येथे स्मशानभूमी व निवारा शेड 04 लाख असा एकूण या जनसुविधांच्या कामांकरीता 01 कोटी 07 लाख रुपयांचा निधी मंजुर करुन देण्यात आला आहे. या कामांच्या प्रशासकीय मान्यता आदेशही संबधित यंत्रणेकडून प्राप्त करुन देण्यात आले असून मंजुर झालेल्या या कामांच्या निविदा लवकरात लवकर प्रसिध्द करुन या कामांना तातडीने सुरुवात करण्याचे आदेश संबधित विभागांना देण्यात आले असल्याचेही आमदार शंभूराज देसाई यांनी पत्रकात म्हंटले आहे.,

सत्यजितसिंह, डोंगरपठारावरील त्या ३७ गांवाना तुमचे पिताश्री मंत्री असताना का रस्ते देवू शकले नाहीत? आमदार शंभूराज देसाईंचा सत्यजितसिंह पाटणकरांना ढेबेवाडीत सवाल




दौलतनगर दि.०७:- स्वातंत्र्यापासून आजपर्यंत पाटण मतदारसंघातील डोंगरपठारावरील त्या ३७ गांवातील अनेक गांवाना आणि वाडयावस्त्यांना जोडणारे रस्ते तुमचे पिताश्री राज्याचे सार्वजनीक बांधकाम खात्याचे कॅबिनेट मंत्री असताना का देवू शकले नाहीत किंवा त्या रस्त्यांवर बांधकाम खात्यातील एक रुपयांचाही निधी का खर्चू शकले नाहीत? असा खडा सवाल आमदार शंभूराज देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांना दिला असून मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर पहिल्यांदा मतदारसंघातील जनतेला आणि डोंगरपठारावरील त्या गांवाना व वाडयावस्त्यांना दया आणि मगच येणाऱ्या विधानसभा निवडणूकीची मते मागायला त्या ३७ गांवात जावा असा उघड सल्ला आमदार शंभूराज देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांना ढेबेवाडी याठिकाणी दिला आहे.
         ढेबेवाडी ता.पाटण येथे आमदार शंभूराज देसाईंच्या प्रयत्नातून राज्य शासनाच्या हरीतऊर्जा योजनेतंर्गत मंजुर झालेल्या कोळेकरवाडी ते अनुतेवाडी ते कारळे नव्याने रस्ता करणे ०३ कोटी ९९ लाख,भोसगांव ते आंब्रुळकरवाडी ते कोळेकरवाडी नव्याने रस्ता करणे ०३ कोटी ८६ लाख व ०१ कोटी रुपयांच्या ढेबेवाडी पाटीलआव्हाड ते बनपुरी रस्त्याचे रुंदीकरण करणे अशा एकूण ०८ कोटी ८५ लाख रुपयांच्या निधीच्या कामांच्या भूमिपुजन कार्यक्रमानंतर कार्यकर्त्यांच्या जाहीर सभेत ते बोलत होते.यावेळी देसाई साखर कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण, पंचायत समिती माजी उपसभापती डी.आर.पाटील,सदस्य पंजाबराव देसाई,तालुकाप्रमुख राजेश चव्हाण,दिलीपराव जानुगडे,विशाल पवार, मनोज मोहिते,नारायण कारंडे,रणजित पाटील, शिवाजीराव शेवाळे,प्रशांत साळुंखे,विकास गिरीगोसावी,तुकाराम जाधव,नानासो साबळे,संचालक वसंत कदम,बबनराव भिसे आदी मान्यवरांसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
             याप्रसंगी आमदार शंभूराज देसाई म्हणाले,सत्यजितसिंह पाटणकर मी गत पाच वर्षात काय विकास केला असा प्रश्न तुम्हाला पडला आहे ना? हा प्रश्न मला विचारण्याअगोदर तुम्ही माझेबरोबर पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेला एका प्रश्नाचे उत्तर जाहीरपणे दया.तुमचे पिताश्री सलग पाच वर्षे राज्याचे सार्वजनीक बांधकाम विभागाचे कॅबिनेट मंत्री होते,पाटण मतदारसंघात डोंगरपठारावर आज अशी गावे आहेत त्या डोंगर पठारावरील गांवाना मी केवळ मतदारसंघाचा आमदार असताना ९० कोटी ३३ लाख २८ हजार असा कोटयावधी रुपयांचा निधी शासनाकडून मंजुर करुन आणला आणि या रस्त्यांची कामे मार्गी लावली यातील अनेक कामे पुर्ण झाली, अनेक कामे प्रगतीपथावर असून सुरु आहेत तर अनेक कामांच्या निविदा प्रसिध्द झाल्या असून कार्यारंभ आदेश देणे बाकी आहेत. या कामांची यादीच मी तुम्हाला देतो मी यादी देत असलेलो ३७ रस्ते हे पाटण मतदारसंघातील डोंगरपठारावरील ३७ गांवाचे असून या रस्त्यांच्या कामांमुळे डोंगरपठारावरील अनेक गावे व वाडयावस्त्यां जोडल्या गेल्या आहेत व जाणार आहेत. हे रस्ते आपले पिताश्री बांधकाम मंत्री म्हणून का करु शकले नाहीत किवा राज्याचा पाच वर्षात प्रत्येक वर्षी दोन ते तीन हजार कोटी रुपयांचा बांधकाम विभागाला मिळणाऱ्या निधीतील एक रुपयांचा निधी या ३७ कामांवर का खर्च करु शकले नाहीत? याचे उत्तर दया.
             मी आपणांस जाहीरपणे सांगतो मी केवळ सत्ताधारी पक्षाचा आमदार असताना देखील पाटण मतदारसंघातील डोंगरपठारावरील गुरेघर ते पाचगणी, दिक्षी ते आटोली, गोकूळ तर्फ पाटण ते काहिर, काहिर ते हुंबरणे, रासाठी ते गाढखोप, नाडे ढेबेवाडी ते शिद्रुकवाडी, गुढे ते वरची शिबेवाडी,कसणी ते निगडे ते माईगंडेवाडी, जिंती ते मोडकवाडी ते सातर,घोट ते जन्नेवाडी, माटेकरवाडी ते वरेकरवाडी,गणेवाडी गावपोहोच रस्ता,खालची केळेवाडी ते वरची केळेवाडी, म्हारवंड गांवपोहोच रस्ता,हुंबरणे ते पांढरेपाणी, सडादाढोली ते महाबळवाडी,पाचगणी ते नागवाणटेक,आटोली ते भाकरमळी, घोट ते बोर्गेवाडी, बोर्गेवाडी महिंद ते वरपेवाडी,आंबेघर तर्फ मरळी ते पाळशी, जुळेवाडी वाल्मिकी रस्ता ते कदमवाडी, सातेवाडी नाटोशी ते जाधववाडी,करपेवाडी ते टेटमेवाडी,लोटलेवाडी ते काळगाव ते डाकेवाडी ते कसणी, डावरी ते चोपडेवाडी ते भालेकरवाडी, गावडेवाडी ते खुडुपलेवाडी, गावडेवाडी फाटा ते धुईलवाडी,कोकीसरे नवलाईवार्ड ते गवळीनगर,वेताळवस्ती काळगाव ते मस्करवाडी,माईंगडेवाडी ते गणेशवाडी ते हौदाचीवाडी म्हाळुंगेवाडी ते सातर,भोसगाव ते आंब्रुळकरवाडी ते कोळेकरवाडी, कोळेकरवाडी ते अनुतेवाडी ते कारळे, घेरादातेगड गावपोहोच,काठीटेक ते आवसरी, रामेल फाटा ते रामेलरस्ता व वर्पेवाडी गोकुळ तर्फ पाटण गावपोहोच असे एकूण ३७ रस्ते युतीच्या शासनाकडून मंजुर करुन आणले या ३७ रस्त्यांच्या कामांकरीता एकूण ९० कोटी ३३ लाख २८ हजार रुपयांचा निधी मंजुर करुन आणला. एवढा कोटयावधी रुपयांचा निधी या रस्त्यांच्या कामांना मंजुर झाला त्यामुळेच डोंगर पठारावरील जनतेचे जीवनमान सुखकर झाले. या गांवाना आपल्याला अधिकार असतानाही जाणिवपुर्वक रस्ता या मुलभूत सुविधेपासून वंचीत ठेवण्याचे पाप आपल्याकडून झाले का याचा जाब ही जनता येणाऱ्या निवडणूकीत तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाही. आपले पिताश्री व आपण या रस्त्यांच्या कामांना आतापर्यंत का निधी देवू शकला नाही आपल्यात हिम्मत असेल तर एकदा जनतेसमोर छातीठोपणे जाहीर करा असे आवाहन त्यांनी शेवठी बोलताना सत्यजितसिंह पाटणकरांना केले. उपस्थितांचे स्वागत एकनाथ जाधव यांनी केले.   

सत्यजितसिंह, प्रश्नांची उत्तरे हवी आहेत ना, तर तुमच्या वाडयाच्या खालचे ठिकाण ठरवा पण सवाल जवाब करायला एकदा जनतेसमोर या. आमदार शंभूराज देसाईंचे सत्यजितसिंह पाटणकरांना खुले आव्हान.





दौलतनगर दि.०7:- सत्यजितसिंह पाटणकर वाडयात बसताय,घरात बसताय अन् पत्रक काढताय, त्या पत्रकात तेच तेच वाचून आता मतदारसंघातील जनतेलाही कंटाळा आलाय तुम्हाला माझ्या कामांवर आक्षेप घ्यायचा आहे ना? तुम्हाला मला सवाल करायचा आहे ना? तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हवी आहेत ना? मग एकदा नाही शंभरवेळा तुम्हाला आणि तुमच्या पिताश्रींना सांगुन झालय काय सवाल जवाब करायचा आहे तो जनतेसमोर येवून करा.जनतेसमोर येवून सवाल करायची भिती वाटत असेल तर तुमच्या सोईने वाडयाच्या खालचे ठिकाण ठरवा, वेळ ठरवा, तुम्हाला सुरक्षित वाटावे म्हणून वाडयाच्या खालून दोन डेंगा टाकल्या की आपल्या घरात तुम्हाला जाता येईल तुमची दोनचार हजार माणसे बोलवा मी एकटा येवून तुमच्या प्रश्नांची उत्तरे दयायला तयार आहे.पण एकदा जनतेसमोर या असे खुले आव्हान आमदार शंभूराज देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांना मारुलहवेली याठिकाणी जाहीर सभेत बोलताना दिले आहे.
          आमदार शंभूराज देसाईंच्या प्रयत्नातून मंजुर झालेल्या सुळेवाडी ते गव्हाणवाडी ते पापर्डे येथील राज्य मार्गाचे रुंदीकरण करणे, मारुलहवेली व कोरीवळे येथे मोठे पुल बांधणे अशा संयुक्तीक भूमिपुजन कार्यक्रमानंतर मारुलहवेली ता.पाटण येथील कार्यकर्त्यांच्या जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी आमदार देसाईंनी वरीलप्रमाणे खुले आव्हान सत्यजितसिंहांना दिले.यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,शिवदौलत बँकेचे चेअरमन मिलींद पाटील,पंचायत समिती माजी विरोधी पक्षनेते ॲड.डी.पी. जाधव,माजी जि.प.सदस्य जालंदर पाटील,पंचायत समिती सदस्य संतोष गिरी,माजी सदस्य प्रकाशराव जाधव, राजाराम मोहिते,कारखाना संचालक बबनराव भिसे,पांडुरंग नलवडे,दादासो जाधव आदी मान्यवरांसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
             याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,माजी आमदारांचे चिरंजीव सत्यजितसिंह पाटणकर वाडयात,घरात,कार्यकर्त्यांच्या बैठकीत बसून माझेविरोधात पत्रके काढत आहेत. रोज वृत्तपत्रांना येणारी पत्रके पाहिली तर त्यात नवीन असे काहीच नाही त्यांना वाटतेय मी केलेल्या १८०० कोटी रुपयांच्या नुसत्या गप्पा आहेत, नुसतेच आकडे आहेत, कामे मतदारसंघात कुठे दिसत नाहीत.झालेला विकास खोटा आहे. आता याठिकाणी दहा ते बारा गावातील नागरिक सभेला उपस्थित आहेत आता तुम्हीच सांगा तुमच्या गावांत गत पाच वर्षात कामे झालीच नाहीत का? प्रत्येक गांवात एक नाही दोन नाही तीन तीन कांमे झालेली आपल्याला डोळयाने दिसत आहेत आपल्याला कामे दिसतायत पण माजी आमदार पुत्रांना ती दिसत नाहीत. पत्रकातून माझे कामांवर आक्षेप घेण्यापेक्षा किंवा पत्रकातून माझेवर आरोप करुन त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत नसल्याचे सांगण्यापेक्षा माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर आणि त्यांचे सुपुत्र यांना एकदा नव्हे शंभरवेळा सांगून झाले आहे पाटणकर पितापुत्र महाशय,तुम्हाला माझे कामांवर आक्षेपच घ्यायचा आहे ना? तुम्हाला माझेकडून तुमच्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत ना तर मग जनतेसमोर येवून मला सवाल करा मी जवाब दयायला तयार आहे.तुमच्या सोईने ठिकाण, तारीख,वेळ ठरवा मी केलेला विकास आणि मला विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला दयायची माझी तयारी आहे.तुम्हाला वाटल,शंभूराज लवाजमा घेवून चर्चेला येईल,तर भिऊ नका तुमच्या सुरक्षिततेकरीता हवं तर तुमच्या वाडयाच्या खालचे ठिकाण ठरवा वाटल तर तुमचे दोन चार हजार कार्यकर्ते बोलवा मी एकटा माझेसोबत कुणीही न घेवून येता तुमच्या प्रश्नांची उत्तरे दयायला येणेस तयार आहे. तुम्हाला सुरक्षित वाटावे म्हणून वाडयाच्या खालून दोन डेंगा टाकल्या की आपल्या घरात तुम्हाला जाता येईल पोलीस बंदोबस्तात माझा एकही कार्यकर्ता या चर्चेत सहभागी होवू देवू नका माझी तयारी आहे. पण हे धाडस तुम्ही करणार नाही कारण तुमच्यातली धमक पाटण मतदारसंघातील जनतेने अनुभवली आहे असे सांगून ते म्हणाले,मी पाच वर्षात केलेल्या १८०० कोटी रुपयांचा विकास तुमचे पिताश्रींनी दहा वर्षात केलेल्या कामांची गोळाबेरीज केली तरी १८०० कोटीपर्यंत तुम्ही जावू शकणार नाही. हे मी छातीठोकपणे मतदारसंघातील जनतेसमोर सांगतो.म्हणूनच तुमच्या पिताश्रींच्या कामांचा पंचनामा करुन त्यांना राज्याचे कॅबिनेटमंत्री असताना साडेसहा हजार मतांनी आणि तुम्हाला १८८२४ एवढया मोठया मताधिक्कयाने मतदारसंघातील जनतेने घरी बसविले आहे.माझे कामांचा पंचनामा येणाऱ्या निवडणूकीत भरघोस मताच्या रुपाने करण्याचा निर्णय पाटण मतदारसंघातील जनतेने त्यांच्या त्यांच्या गांवात झालेल्या विविध विकासकामांच्या माध्यमातून करण्याचा घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भरघोस मतांनी तुम्हाला पराभूत करुन तुमचाच पंचनामा करुन तुमचीच पंचाईत करण्यासाठी जनता सज्ज झाली आहे.  याचा विसर सत्यजितसिंह पडू देवू नका असा सल्लाही आमदार देसाईंनी यावेळी बोलताना दिला. उपस्थितांचे स्वागत ॲड.मारुती नांगरे यांनी केले व आभार प्रकाशराव जाधव यांनी मानले.

Thursday, 5 September 2019

सत्यजितसिंह, घाई नको,दातखिळी कुणाची बसलीय, अन् बसणार हे लवकरच समजेल. आमदार शंभूराज देसाईंचा प्रतिटोला.




दौलतनगर दि.०६:- सत्यजितसिंह पाटणकर तुमचा पक्ष आणि तुम्ही येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत काय धन लावणार आहे हे पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेला चांगलेच कळाले आहे. माझे निवासस्थानी भगवे वादळ पाहून तुमचा पोटसुळ उठला आहे. हे मलाच काय जनतेच्याही लक्षात येवू लागले आहे.पाटण मतदारसंघात सगळीकडे भगवे वातावरण घोंगावत असताना मी कोणत्या पक्षातून लढणार याची विचारणा करणारे सत्यजितसिंह पाटणकर तुमच्या बुध्दीची कीव करावीशी वाटते. अहो महाशय,२०१४ च्या विधानसभेला शिवसेना भाजपची युती होतीच कुठे? तरीही शिवसेना पक्षातून १८८२४ मतांनी तुम्हाला जनतेने धुळ चारलीच की? भाजप शिवसेनेची युती तुटणार का अबाधित राहणार हे बारकं पोरगंही सांगायला लागलय,त्यामुळे सत्यजितसिंह मोकळया खळयावर लई घाई करु नका,दातखिळी कुणाची बसलीय आणि बसणार आहे हे तुम्हाला मतदार संघातील जनताच येत्या काही दिवसात दाखवून देईल असा प्रतिटोला आमदार शंभूराज देसाईंनी पाटणकरांच्या बैठकीतील बोलण्यावर लगाविला आहे.
                मंद्रुळहवेली ता.पाटण येथे जलसंपदा विभागाकडून मंजुर केलेल्या कोयना नदीकाठी सरंक्षक भिंत व घाट बांधणे या १ कोटी १० लाख १९ हजार रुपयांच्या कामांचे भूमिपुजन आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते आयोजीत करण्यात आले होते याप्रसंगी आमदार देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांच्या वक्तव्याचा समाचार घेतला यावेळी जिल्हा परीषद सदस्य विजय पवार, पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर,कारखाना संचालक बबनराव भिसे, आनंदराव चव्हाण, अशोकराव डिगे, माजी संचालक जे एम पवार,गोरखनाथ देसाई, प्रा.विश्वनाथ पानस्कर,शिवदौलत संचालक जयसिंगराव बोडके,सरपंच विजय यादव, उपसरपंच शारदा पानस्कर, कोयना धरण व्यवस्थापनचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
            यावेळी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, माजी आमदार पुत्र विधानसभेच्या तोंडावर वाडयावर असून बैठकीत जरा लयच बोलायला लागलेत. बैठकीत बोलण्यापेक्षा आणि वाडयात बसून पत्रके काढत बसण्यापेक्षा सत्यजितसिंह पाटणकर माझी हिमंत बघायला आणि कुठल्या प्रश्नाचे उत्तर पाहिजे ते घ्यायला जनतेच्या समोरासमोर या मी कधीही तयार आहे असे जाहीर आव्हान तुम्हाला देवून देवून आता मलाच कंटाळा आलाय, शाळेतल्या मुलांलाही एकदा सांगितले तर लक्षात येवू लागले आहे. तुम्हाला अनेकदा आव्हाने देवून सुध्दा तुमच्या लक्षात येत नसेल तर विधानसभेच्या तोंडावर माझी पक्षनिष्ठा आणि मी कसा श्रेष्ठ आहे हे दाखविण्याकरीता तुम्ही सुरु केलेली पत्रकबाजी जनतेला नवीन नाही.कारण तुम्हाला आता महिन्याभरावर विधानसभा निवडणूक आलीय म्हणून पत्रकबाजी सुचु लागली आहे.परंतू तुमच्या असल्या पत्रकबाजीला आणि बैठकीतील बोलण्याला ना मी भिक घालत,ना मतदारसंघातील जनता भीक घालत. सत्यजितसिंह पाटणकरांनी मला पक्षनिष्ठा शिकवू नये, तुम्ही पक्षाशी किती निष्ठावान आहात हे मतदारसंघातील जनता ओळखून आहे.सगळेच दरवाजे तुमच्याकरीता बंद असल्याने मावळतीकडे निघालेल्या पक्षाचे गोडवे गाण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा पर्यायच नाही. आपले कर्तृव काय आहे हे सातारा जिल्हयाला आणि शिवसेना,भाजप पक्षालाही चांगलेच माहिती आहे. मी शिवसेना पक्षात १९९६ पासून कार्यरत आहे आणि शिवसेना पक्षातूनच मी एकदा नव्हे दोनदा आमदार झालोय आणि येणाऱ्या निवडणूकही छातीठोकपणे सांगतो शिवसेना पक्षातूनच तिसऱ्यांदा आमदार होणार आहे.हे आजच लिहून ठेवा, कारण तुमची स्मरणशक्ती जरा नाजूक दिसतेय. सत्यजितसिंह पाटणकर माझे तुमच्यासारखे नाही मला शिवसेनेत जेवढा मान आहे तेवढा भाजप मध्येही आहे आणि तुमच्या राष्ट्रवादी पक्षातही तेवढाच आहे. राष्ट्रवादी पक्षाने तुमच्या पिताश्रींना मंत्रीपद दिल्यामुळे तुम्ही आजही तुमच्या पक्षाचे गोडवे गाताय नाहीतर पक्षाशी तुमची मंत्रीपदाची बांधिलकी नसती तर तुम्ही कधीच या पक्षातून त्या पक्षात आणि त्या पक्षातून या पक्षात माकडउडया मारल्या असत्या हे सांगण्यासाठी कोण्या जोतिष्याची गरज नाही.असे सांगून ते म्हणाले, यापुर्वीच्या निवडणूका मी कोणत्या पक्षातून आणि कशा लढल्या, याची मापे काढण्यापेक्षा सत्यजितसिंह पाटणकर २०१४ च्या निवडणूकीत अर्ज भरण्याची वेळ आली तरीही तुमच्या विचारांच्या कार्यकर्त्यांना कुठल्या दादाचा झेंडा घेवू हाती असे म्हणण्याची वेळ आली होती. राज्यातल्या सगळया उमेदवारांचे अर्ज भरुन झाले तरी पाटण मतदारसंघातला तुमचा कार्यकर्ता चाचपडत होता. मोठे दादा का ? छोटे दादा? त्यामुळे माजी आमदार पुत्र माझी काळजी करण्यापेक्षा तुम्ही तुमची काळजी करा. कारण तुमचे कर्तृव पाटणला आलेल्या शिवस्वराज्य यात्रेदिवशीच मतदारसंघातील जनतेच्या लक्षात आले. बॅनरवर दहा बारा मोठया दिग्गज नेत्यांचे फोटो मतदारसंघातील जनतेने पाहिले परंतू त्या यात्रेत पक्षाची चार माणसे तुमची पाठराखण करायला आली. बाकीच्या मान्यवरांनी तुमच्याकडे का पाठ फिरवली हे जरा उघडपणे मतदारसंघातील जनतेला सांगता का? तुमच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर माझेकडे आहे वेळ आल्यावर तुम्हाला माझेपेक्षा पाटण मतदारसंघातील जनताच योग्यप्रकारे उत्तर देईल त्यामुळे माझा तुम्हाला एक सल्ला राहील घाई करु नका,कुणाची दातखिळी बसलीय आणि कुणाची बसणार आहे हे कळायला घोडमैदान लांब नाही.या आठवडा भरात विधानसभेची आचारसंहिता लागेल मग महिन्याभरातच तुम्हाला तुमचे उत्तर मिळेल असा टोलाही आमदार शंभूराज देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांना लगाविला आहे.प्रास्ताविक बाजीराव पवार यांनी केले. उपस्थितांचे आभार आनंदराव चव्हाण यांनी मानले.

सत्यजितसिंह, कोटयावधी रुपयांचा निधी आणायला धमक लागते. माझे विकासकामांचा पंचनामा उघडपणे करा, तुमचा पंचनामा करायला जनता सज्ज झालीय. आमदार शंभूराज देसाई





दौलतनगर दि.०५:- मतदारसंघातील जनतेच्या कामांकरीता साधा १ कोटी रुपयांचा निधी आणण्याची ज्यांची कुवत नाही ते माजी आमदार पुत्र सत्यजितसिंह पाटणकर वाडयात बसून मी पाटण मतदारसंघात केलेल्या १८०० कोटी रुपयांच्या निधीची मापे काढत आहेत. सत्यजितसिंह पाटणकर मी केलेल्या विकासकामांची जरुर मापे काढा माझे तुम्हाला जाहीर आवाहन आहे तुमचे ते कामच आहे.माझी मापे काढली नाहीत तर तुम्हाला विचारणार तरी कोण? गत पाच वर्षात तुमच्या पक्षप्रमुखांनी दिलेला ०१ कोटी रुपयांचा निधी सोडला तर पक्षातील इतर मान्यवरांकडून तुम्हाला साधा ०१ रुपयांचा जादा निधी मिळविता आला नाही.तुम्हाला १८०० कोटी रुपयांचा निधी काय कळणार?१८०० कोटी रुपयांचा निधी आणायला आणि तो जनतेच्या कामांसाठी मार्गी लावण्याकरीता महाशय धमक लागते.मी मंजुर करुन आणलेला १८०० कोटींचा निधी कुठे आणि कुठल्या गांवात खर्च झाला हे विधानसभा निवडणूकीची मते मागायला तुम्ही जाल तेव्हा मी नाही पाटण मतदारसंघातील जनताच तुम्हाला सांगेल,कारण निवडणूकीच्या प्रचारात तुमचाच पंचनामा करायला मतदारसंघातील जनता आता सज्ज झाली आहे असा विश्वास आमदार शंभूराज देसाईंनी व्यक्त केला आहे.
                 केसे ता.कराड येथे जलसंपदा विभागाकडून मंजुर केलेल्या कोयना नदीकाठी सरंक्षक भिंत व घाट बांधणे या २ कोटी १५ लाख ८६ हजार रुपयांच्या कामांचे भूमिपुजन आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते आयोजीत करण्यात आले होते याप्रसंगी आमदार शंभूराज देसाई बोलत होते.यावेळी जिल्हा परीषद सदस्य प्रदीप पाटील,कराड खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष हणमंतराव चव्हाण,शिवदौलत सहकारी बँकचे चेअरमन मिलींद पाटील,प्रभाकर शिंदे,कारखाना संचालक बबनराव भिसे, तुकाराम डुबल, लक्ष्मण देसाई,अविनाश पाटील,अविनाश देसाई,प्रकाश बाबर,काशिनाथ बाबर,आनंदराव कदम,सुनिल निकम,संदिप साळुंखे,फारूख पटेल,शिवाजीराव गायकवाड,शंकरराव थोरात,प्रविण थोरात,कोयना धरण व्यवस्थापनचे उपअभियंता श्रीमती नाईकनवरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
                 आमदार शंभूराज देसाई म्हणाले,मी मतदारसंघाचा आमदार म्हणून पाच वर्षात केलेल्या विविध विकासकामांचा जाहीर अहवाल तोही मतदारसंघातील गणवाईज पाटण मतदारसंघातील जनतेला अर्पण केल्यानंतर माजी आमदार पुत्रांनी आपल्या अकलेचे तारे तोडायला सुरुवात केली असल्याचे समजले. विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर मी केलेली विकासकामे जनतेसमोर मांडताना या महाशयानी या कामांचा पंचनामा करण्याचे आवाहन केल्याचे वाचनात आले. १८०० कोटींचा म्हणे फसवा विकास केला आहे. अहो महाशय १८०० कोटी कशाला म्हणतात हे तरी आपल्या लक्षात येते का? आपली गुणवत्ता पाच वर्षात केवळ ०१ कोटी रुपयांचा निधी मतदारसंघातील कामांना आणायची तीही पक्षप्रमुखांच्या मेहनबानीने.तुमच्या पक्षप्रमुखांनी तीही मेहनबानी तुमच्यावर केली नसती तर गत पाच वर्षात तुम्हाला ०१ रुपयांचाही निधी मतदारसंघातील जनतेच्या विकासा करीता आणता आला नसता. गत पाच वर्षात मी १८०० कोटीचा विकास केला का नाही याचा दाखला येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत देण्यासाठी पाटण मतदारसंघातील विकासकामे मार्गी लागलेली गावेच्या गावे आणि वाडयाच्या वाडया सज्ज झाल्या आहेत या गावातील आणि वाडयावस्त्यावरील मतदार विधानसभेची निवडणूक कधी लागतेय याचीच वाट पहात आहेत कारण त्या त्या गांवामध्ये आणि वाडयावस्त्यांमध्ये गत पाच वर्षात झालेल्या विकासकामांची जी आतापर्यंत सत्तेत असताना तुमच्या पिताश्रींना जमली नाहीत ती अनेक विकासकामे झाली आहेत आणि त्याची चेष्टा करणारे तुम्ही तुमचा पंचनामा याच निवडणूकीत करण्याचा विडा याच गावांनी व वाडयावस्त्यांनी उचलला आहे हे तुम्हाला निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर लक्षात येईल. मी केलेला विकास जनहितार्थ आहे का फसवा आहे हे सांगायला मला तुमच्या दाखल्याची गरज नाही. सत्यजितसिंह पाटणकर तुम्ही विधानसभेची निवडणूक एकदा नव्हे दुसऱ्यांदा लढवायला निघाला आहात तरीही तुमच्या लक्षात येईना की मतदारसंघातील जनता आता किती सुज्ञ झाली आहे. ढेबेवाडीतल्या माणसांना कोयना, तारळयातल्या माणसांना कुंभारगांव, सुपन्यातल्या लोकांना पाटण आणि मोरणेतल्या लोकांना मल्हारपेठ विभागात झालेला विकास माहिती आहे.पाटण मतदारसंघातल्या आठ विभागातील जनतेला ढेबेवाडी, कुंभारगांव, कोयना, तारळे, चाफळ, मोरणा, मल्हारपेठ आणि सुपने विभागात कुठे आणि कसा विकास झाला आहे हे उघडपणे माहिती आहे. त्यामुळे या विभागातला विकास त्या विभागात जावून सांगण्याची गरज मला भासली नाही आणि भासणार देखील नाही कारण तुमच्या मते हे विभाग असले तरी माझे मते पाटण विधानसभा मतदारसंघ एक आहे. आणि या एका पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेला कुठल्या मतदारसंघात आमदारांनी काय काय विकास केलाय हे जाहीरपणे माहिती आहे.तुम्हीच वाडयात बसून असल्यामुळे तुम्हाला त्या त्या विभागात जावून विकास पाहण्याची वेळ येणार आहे.विभागाविभागातील जनतेची काळजी तुम्ही करु नका मतदारसंघाचा आमदार म्हणून मी याकरीता सक्षम आहे आणि हे मतदारसंघातील जनतेनेही आता ओळखले आहे त्यामुळे मी केलेल्या विकासकामांची काय पोलखोल करायची आहे ती करुन घ्या कारण पोलखोल विकासकामांची करताना पोलखोल तुमची होणार आहे विकासकामांचा ध्यास घेतलेल्या पाटण मतदारसंघातील जनता आता येणाऱ्या निवडणूकीत तुमच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाना भीक घालणार नाही हे मात्र विसरु नका असा सल्लाही आमदार शंभूराज देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांना यावेळी बोलताना दिला आहे.