दौलतनगर दि.०7:- सत्यजितसिंह
पाटणकर वाडयात बसताय,घरात बसताय अन् पत्रक काढताय, त्या पत्रकात तेच तेच वाचून आता
मतदारसंघातील जनतेलाही कंटाळा आलाय तुम्हाला माझ्या कामांवर आक्षेप घ्यायचा आहे
ना? तुम्हाला मला सवाल करायचा आहे ना? तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे
तुम्हाला हवी आहेत ना? मग एकदा नाही शंभरवेळा तुम्हाला आणि तुमच्या पिताश्रींना
सांगुन झालय काय सवाल जवाब करायचा आहे तो जनतेसमोर येवून करा.जनतेसमोर येवून सवाल
करायची भिती वाटत असेल तर तुमच्या सोईने वाडयाच्या खालचे ठिकाण ठरवा, वेळ ठरवा,
तुम्हाला सुरक्षित वाटावे म्हणून वाडयाच्या खालून दोन डेंगा टाकल्या की आपल्या
घरात तुम्हाला जाता येईल तुमची दोनचार हजार माणसे बोलवा मी एकटा येवून तुमच्या
प्रश्नांची उत्तरे दयायला तयार आहे.पण एकदा जनतेसमोर या असे खुले आव्हान आमदार
शंभूराज देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांना मारुलहवेली याठिकाणी जाहीर सभेत बोलताना
दिले आहे.
आमदार शंभूराज देसाईंच्या प्रयत्नातून मंजुर झालेल्या सुळेवाडी ते गव्हाणवाडी
ते पापर्डे येथील राज्य मार्गाचे रुंदीकरण करणे, मारुलहवेली व कोरीवळे येथे मोठे
पुल बांधणे अशा संयुक्तीक भूमिपुजन कार्यक्रमानंतर मारुलहवेली ता.पाटण येथील
कार्यकर्त्यांच्या जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी आमदार देसाईंनी वरीलप्रमाणे
खुले आव्हान सत्यजितसिंहांना दिले.यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर
कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,शिवदौलत बँकेचे चेअरमन मिलींद पाटील,पंचायत
समिती माजी विरोधी पक्षनेते ॲड.डी.पी. जाधव,माजी जि.प.सदस्य जालंदर पाटील,पंचायत
समिती सदस्य संतोष गिरी,माजी सदस्य प्रकाशराव जाधव, राजाराम मोहिते,कारखाना संचालक
बबनराव भिसे,पांडुरंग नलवडे,दादासो जाधव आदी मान्यवरांसह प्रमुख पदाधिकारी व
कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,माजी आमदारांचे चिरंजीव
सत्यजितसिंह पाटणकर वाडयात,घरात,कार्यकर्त्यांच्या बैठकीत बसून माझेविरोधात पत्रके
काढत आहेत. रोज वृत्तपत्रांना येणारी पत्रके पाहिली तर त्यात नवीन असे काहीच नाही
त्यांना वाटतेय मी केलेल्या १८०० कोटी रुपयांच्या नुसत्या गप्पा आहेत, नुसतेच आकडे
आहेत, कामे मतदारसंघात कुठे दिसत नाहीत.झालेला विकास खोटा आहे. आता याठिकाणी दहा
ते बारा गावातील नागरिक सभेला उपस्थित आहेत आता तुम्हीच सांगा तुमच्या गावांत गत
पाच वर्षात कामे झालीच नाहीत का? प्रत्येक गांवात एक नाही दोन नाही तीन तीन कांमे
झालेली आपल्याला डोळयाने दिसत आहेत आपल्याला कामे दिसतायत पण माजी आमदार पुत्रांना
ती दिसत नाहीत. पत्रकातून माझे कामांवर आक्षेप घेण्यापेक्षा किंवा पत्रकातून
माझेवर आरोप करुन त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत नसल्याचे सांगण्यापेक्षा माजी
आमदार विक्रमसिंह पाटणकर आणि त्यांचे सुपुत्र यांना एकदा नव्हे शंभरवेळा सांगून
झाले आहे पाटणकर पितापुत्र महाशय,तुम्हाला माझे कामांवर आक्षेपच घ्यायचा आहे ना?
तुम्हाला माझेकडून तुमच्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत ना तर मग जनतेसमोर येवून
मला सवाल करा मी जवाब दयायला तयार आहे.तुमच्या सोईने ठिकाण, तारीख,वेळ ठरवा मी केलेला
विकास आणि मला विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला दयायची माझी तयारी
आहे.तुम्हाला वाटल,शंभूराज लवाजमा घेवून चर्चेला येईल,तर भिऊ नका तुमच्या
सुरक्षिततेकरीता हवं तर तुमच्या वाडयाच्या खालचे ठिकाण ठरवा वाटल तर तुमचे दोन चार
हजार कार्यकर्ते बोलवा मी एकटा माझेसोबत कुणीही न घेवून येता तुमच्या प्रश्नांची
उत्तरे दयायला येणेस तयार आहे. तुम्हाला सुरक्षित वाटावे म्हणून वाडयाच्या खालून
दोन डेंगा टाकल्या की आपल्या घरात तुम्हाला जाता येईल पोलीस बंदोबस्तात माझा एकही
कार्यकर्ता या चर्चेत सहभागी होवू देवू नका माझी तयारी आहे. पण हे धाडस तुम्ही
करणार नाही कारण तुमच्यातली धमक पाटण मतदारसंघातील जनतेने अनुभवली आहे असे सांगून
ते म्हणाले,मी पाच वर्षात केलेल्या १८०० कोटी रुपयांचा विकास तुमचे पिताश्रींनी
दहा वर्षात केलेल्या कामांची गोळाबेरीज केली तरी १८०० कोटीपर्यंत तुम्ही जावू
शकणार नाही. हे मी छातीठोकपणे मतदारसंघातील जनतेसमोर सांगतो.म्हणूनच तुमच्या
पिताश्रींच्या कामांचा पंचनामा करुन त्यांना राज्याचे कॅबिनेटमंत्री असताना
साडेसहा हजार मतांनी आणि तुम्हाला १८८२४ एवढया मोठया मताधिक्कयाने मतदारसंघातील
जनतेने घरी बसविले आहे.माझे कामांचा पंचनामा येणाऱ्या निवडणूकीत भरघोस मताच्या
रुपाने करण्याचा निर्णय पाटण मतदारसंघातील जनतेने त्यांच्या त्यांच्या गांवात
झालेल्या विविध विकासकामांच्या माध्यमातून करण्याचा घेतला आहे. त्यामुळे पुन्हा
एकदा भरघोस मतांनी तुम्हाला पराभूत करुन तुमचाच पंचनामा करुन तुमचीच पंचाईत
करण्यासाठी जनता सज्ज झाली आहे. याचा विसर
सत्यजितसिंह पडू देवू नका असा सल्लाही आमदार देसाईंनी यावेळी बोलताना दिला.
उपस्थितांचे स्वागत ॲड.मारुती नांगरे यांनी केले व आभार प्रकाशराव जाधव यांनी मानले.
No comments:
Post a Comment