दौलतनगर
दि.०६:- सत्यजितसिंह पाटणकर तुमचा पक्ष आणि तुम्ही येणाऱ्या
विधानसभा निवडणूकीत काय धन लावणार आहे हे पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेला
चांगलेच कळाले आहे. माझे निवासस्थानी भगवे वादळ पाहून तुमचा पोटसुळ उठला आहे. हे
मलाच काय जनतेच्याही लक्षात येवू लागले आहे.पाटण मतदारसंघात सगळीकडे भगवे वातावरण
घोंगावत असताना मी कोणत्या पक्षातून लढणार याची विचारणा करणारे सत्यजितसिंह पाटणकर
तुमच्या बुध्दीची कीव करावीशी वाटते. अहो महाशय,२०१४ च्या विधानसभेला शिवसेना
भाजपची युती होतीच कुठे? तरीही शिवसेना पक्षातून १८८२४ मतांनी तुम्हाला जनतेने धुळ
चारलीच की? भाजप शिवसेनेची युती तुटणार का अबाधित राहणार हे बारकं पोरगंही
सांगायला लागलय,त्यामुळे सत्यजितसिंह मोकळया खळयावर लई घाई करु नका,दातखिळी कुणाची
बसलीय आणि बसणार आहे हे तुम्हाला मतदार संघातील जनताच येत्या काही दिवसात दाखवून
देईल असा प्रतिटोला आमदार शंभूराज देसाईंनी पाटणकरांच्या बैठकीतील बोलण्यावर
लगाविला आहे.
मंद्रुळहवेली ता.पाटण येथे जलसंपदा विभागाकडून मंजुर
केलेल्या कोयना नदीकाठी सरंक्षक भिंत व घाट बांधणे या १ कोटी १० लाख १९ हजार
रुपयांच्या कामांचे भूमिपुजन आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते आयोजीत करण्यात आले
होते याप्रसंगी आमदार देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांच्या वक्तव्याचा समाचार घेतला
यावेळी जिल्हा परीषद सदस्य विजय पवार, पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर,कारखाना
संचालक बबनराव भिसे, आनंदराव चव्हाण, अशोकराव डिगे, माजी संचालक जे एम पवार,गोरखनाथ
देसाई, प्रा.विश्वनाथ पानस्कर,शिवदौलत संचालक जयसिंगराव बोडके,सरपंच विजय यादव,
उपसरपंच शारदा पानस्कर, कोयना धरण व्यवस्थापनचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील आदी
मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आमदार शंभूराज देसाई
म्हणाले, माजी आमदार पुत्र
विधानसभेच्या तोंडावर वाडयावर असून बैठकीत जरा लयच बोलायला लागलेत. बैठकीत बोलण्यापेक्षा आणि वाडयात बसून
पत्रके काढत बसण्यापेक्षा सत्यजितसिंह पाटणकर माझी हिमंत बघायला आणि कुठल्या
प्रश्नाचे उत्तर पाहिजे ते घ्यायला जनतेच्या समोरासमोर या मी कधीही तयार आहे असे
जाहीर आव्हान तुम्हाला देवून देवून आता मलाच कंटाळा आलाय, शाळेतल्या मुलांलाही
एकदा सांगितले तर लक्षात येवू लागले आहे. तुम्हाला अनेकदा आव्हाने देवून सुध्दा
तुमच्या लक्षात येत नसेल तर विधानसभेच्या तोंडावर माझी पक्षनिष्ठा आणि मी कसा
श्रेष्ठ आहे हे दाखविण्याकरीता तुम्ही सुरु केलेली पत्रकबाजी जनतेला नवीन
नाही.कारण तुम्हाला आता महिन्याभरावर विधानसभा निवडणूक आलीय म्हणून पत्रकबाजी सुचु
लागली आहे.परंतू तुमच्या असल्या पत्रकबाजीला आणि बैठकीतील बोलण्याला ना मी भिक
घालत,ना मतदारसंघातील जनता भीक घालत. सत्यजितसिंह पाटणकरांनी मला पक्षनिष्ठा शिकवू
नये, तुम्ही पक्षाशी किती निष्ठावान आहात हे मतदारसंघातील जनता ओळखून आहे.सगळेच
दरवाजे तुमच्याकरीता बंद असल्याने मावळतीकडे निघालेल्या पक्षाचे गोडवे गाण्याशिवाय
तुमच्याकडे दुसरा पर्यायच नाही. आपले कर्तृव काय आहे हे सातारा जिल्हयाला आणि
शिवसेना,भाजप पक्षालाही चांगलेच माहिती आहे. मी शिवसेना पक्षात १९९६ पासून कार्यरत
आहे आणि शिवसेना पक्षातूनच मी एकदा नव्हे दोनदा आमदार झालोय आणि येणाऱ्या
निवडणूकही छातीठोकपणे सांगतो शिवसेना पक्षातूनच तिसऱ्यांदा आमदार होणार आहे.हे आजच
लिहून ठेवा, कारण तुमची स्मरणशक्ती जरा नाजूक दिसतेय. सत्यजितसिंह पाटणकर माझे
तुमच्यासारखे नाही मला शिवसेनेत जेवढा मान आहे तेवढा भाजप मध्येही आहे आणि तुमच्या
राष्ट्रवादी पक्षातही तेवढाच आहे. राष्ट्रवादी पक्षाने तुमच्या पिताश्रींना
मंत्रीपद दिल्यामुळे तुम्ही आजही तुमच्या पक्षाचे गोडवे गाताय नाहीतर पक्षाशी
तुमची मंत्रीपदाची बांधिलकी नसती तर तुम्ही कधीच या पक्षातून त्या पक्षात आणि त्या
पक्षातून या पक्षात माकडउडया मारल्या असत्या हे सांगण्यासाठी कोण्या जोतिष्याची
गरज नाही.असे सांगून ते म्हणाले, यापुर्वीच्या निवडणूका मी कोणत्या पक्षातून आणि
कशा लढल्या, याची मापे काढण्यापेक्षा सत्यजितसिंह पाटणकर २०१४ च्या निवडणूकीत अर्ज
भरण्याची वेळ आली तरीही तुमच्या विचारांच्या कार्यकर्त्यांना कुठल्या दादाचा झेंडा
घेवू हाती असे म्हणण्याची वेळ आली होती. राज्यातल्या सगळया उमेदवारांचे अर्ज भरुन
झाले तरी पाटण मतदारसंघातला तुमचा कार्यकर्ता चाचपडत होता. मोठे दादा का ? छोटे
दादा? त्यामुळे माजी आमदार पुत्र माझी काळजी करण्यापेक्षा तुम्ही तुमची काळजी करा.
कारण तुमचे कर्तृव पाटणला आलेल्या शिवस्वराज्य यात्रेदिवशीच मतदारसंघातील जनतेच्या
लक्षात आले. बॅनरवर दहा बारा मोठया दिग्गज नेत्यांचे फोटो मतदारसंघातील जनतेने
पाहिले परंतू त्या यात्रेत पक्षाची चार माणसे तुमची पाठराखण करायला आली. बाकीच्या
मान्यवरांनी तुमच्याकडे का पाठ फिरवली हे जरा उघडपणे मतदारसंघातील जनतेला सांगता
का? तुमच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर माझेकडे आहे वेळ आल्यावर तुम्हाला
माझेपेक्षा पाटण मतदारसंघातील जनताच योग्यप्रकारे उत्तर देईल त्यामुळे माझा
तुम्हाला एक सल्ला राहील घाई करु नका,कुणाची दातखिळी बसलीय आणि कुणाची बसणार आहे
हे कळायला घोडमैदान लांब नाही.या आठवडा भरात विधानसभेची आचारसंहिता लागेल मग
महिन्याभरातच तुम्हाला तुमचे उत्तर मिळेल असा टोलाही आमदार शंभूराज देसाईंनी
सत्यजितसिंह पाटणकरांना लगाविला आहे.प्रास्ताविक बाजीराव पवार यांनी केले.
उपस्थितांचे आभार आनंदराव चव्हाण यांनी मानले.
फक्त आणि फक्त शंभुराजे
ReplyDeleteफक्त आणि फक्त शंभुराजे
ReplyDelete