Saturday 7 September 2019

जनसुविधा योजनेतंर्गत पाटण मतदारसंघातील ग्रामपंचायत कार्यालये,तिर्थक्षेत्र विकास, नागरी सुविधा व स्मशानभूमि सुधारण्याच्या कामांना 01 कोटी 07 लाख रुपयांचा निधी मंजुर. कामांचे प्रशासकीय मान्यता आदेश प्राप्त - आमदार शंभूराज देसाईंची माहिती.




दौलतनगर दि.07 :- जिल्हा नियोजन समितीतंर्गत सन २०१9-20 मध्ये ग्रामपंचायतींना जनसुविधा पुरविणेसाठी देण्यात येणाऱ्या विशेष अनुदानातून पाटण मतदारसंघातील 3 ग्रामपंचायत कार्यालय, 4 क वर्ग तिर्थक्षेत्र विकास, 2 मोठया ग्रामपंचायतींच्या नागरी सुविधा व 9 गावांच्या स्मशानभूमि सुधारणा करण्याच्या कामांना जिल्हा वार्षिक आराखडयातून 01 कोटी 07 लक्ष रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला असून या कामांचे प्रशासकीय मान्यता आदेशही संबधित यंत्रणेकडून प्राप्त करुन देण्यात आले असून लवकरच या कामांच्या निविदा प्रसिध्द होवून कामांना सुरुवात होईल अशी  माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
                            आमदार शंभूराज देसाई यांनी पत्रकांत म्हंटले आहे,जिल्हा नियोजन समितीतंर्गत जिल्हा वार्षिक आराखडयातून ग्रामपंचायतींना जनसुविधा व नागरी सुविधा पुरविणेसाठी प्रतिवर्षी अनुदान देण्यात येते. यंदाच्या वर्षी सन २०१9-20 मध्ये ग्रामपंचायतींना जनसुविधा पुरविणेसाठी पाटण मतदारसंघातील ०3 ग्रामपंचायत कार्यालय इमारती, ०4 क वर्ग तिर्थक्षेत्र विकास, 2 मोठया ग्रामपंचायतींना नागरी सुविधा पुरविणे व 9 गांवातील स्मशानभूमि सुधारणा करणे ही कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यानुसार या योजनेतंर्गत या कामांना विशेष अनुदानातून ग्रामपंचायत कार्यालय बांधणेसाठी अनुक्रमे मौजे सोनवडे ग्रामपंचायतीस १० लक्ष रुपये, मारुल तर्फ पाटण ग्रामपंचायत कार्यालय १० लक्ष व पेठशिवापूर ग्रामपंचायत कार्यालय १० लक्ष असे ३0 लक्ष रुपयांचा निधी ग्रामपंचायत कार्यालये बांधणेकरीता मंजुर करण्यात आला आहे. क वर्ग तिर्थक्षेत्र विकास योजनेतून येराडवाडी,ता.पाटण येथील श्री रुद्रेश्वर मंदिर परिसराकडे कराड चिपळूण रस्ता नारळवाडी स्टॉप येथून जाणेकरीता रस्ता खडीकरण,डांबरीकरण 08 लाख, दौलतनगर,ता.पाटण येथील श्री गणेश मंदिराकडे जाणारा रस्ता 07 लाख, बनपेठवाडी येराड येथे येडोबा मंदिर परिसरात यात्री निवारा शेड 07 लाख व गुरेघर वाघजाई देवी यात्रा परिसर सुशोभिकरण 05 लाख असा एकूण 27 लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे. तर 02 मोठया ग्रामपंचायतींना नागरी सुविधा पुरविणेकरीता 13 लाखांचा निधी मंजूर झाला असून यामध्ये तारळे येथील मुख्य बाजारपेठेतील अंतर्गत रस्ता सुधारणा 07 लाख व तांबवे ता. कराड येथील अंतर्गत रस्ता सुधारणा 05 लाख मंजुर आहेत तसेच  9 गांवातील स्मशानभूमि पोहोच रस्ते, निवारा शेड, स्मशानभूमि रस्ता सुधारणा करणे या कामाकरीता 38.00 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये सळवे येथे स्मशानभूमी शेड बांधणे व स्मशानभूमी रस्ता सुधारणा करणे 10 लाख, घोट येथे स्मशानभूमी व निवारा शेड बांधणे 04 लाख, डोंगळेवाडी (माणगाव),ता.पाटण येथे स्मशानभूमी रस्ता सुधारणा 03 लाख,डिगेवाडी (मुरुड) येथे स्मशानभूमी शेड व रस्ता सुधारणा 03 लाख,कवरवाडी पिंपळगाव येथे स्मशानभूमी शेड व रस्ता सुधारणा 03 लाख, बहुले,ता.पाटण येथे स्मशानभूमी शेड 04 लाख, चाळकेवाडी येथे नागनाथ मंडळ ते स्मशानभूमी रस्ता सुधारणा 03 लाख,बाचोली,ता.पाटण येथे स्मशानभूमी शेड 04 लाख,जांभेकरवाडी मरळोशी,ता. पाटण येथे स्मशानभूमी व निवारा शेड 04 लाख असा एकूण या जनसुविधांच्या कामांकरीता 01 कोटी 07 लाख रुपयांचा निधी मंजुर करुन देण्यात आला आहे. या कामांच्या प्रशासकीय मान्यता आदेशही संबधित यंत्रणेकडून प्राप्त करुन देण्यात आले असून मंजुर झालेल्या या कामांच्या निविदा लवकरात लवकर प्रसिध्द करुन या कामांना तातडीने सुरुवात करण्याचे आदेश संबधित विभागांना देण्यात आले असल्याचेही आमदार शंभूराज देसाई यांनी पत्रकात म्हंटले आहे.,

No comments:

Post a Comment