दौलतनगर दि.१०:- पाटण
तालुक्यात गत महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यात डोंगराखाली वसलेल्या एकूण
आठ गांवावर आलेल्या आपत्तीमध्ये,डोंगर खचणे, दरड कोसळणे, भूसख्लन होणे इत्यादी
कारणामुळे बाधित झालेल्या गांवातील नागरिकांचे तात्पुरते सुरक्षित स्थळी स्थलातंर
करणेकरीता या गांवामध्ये सुरक्षित स्थळी निवारा शेड उभारण्याकरीता राज्य शासनाने २
कोटी ३१ लाख ४,९९१ रुपयांचा निधी आठ गांवाकरीता मंजुर केला असून शेड बांधणीच्या
अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेसंदर्भातील शासन निर्णय शासनाच्या महसूल व वन
विभाग (मदत व पुनर्वसन) विभागाने दि.०६.०९.२०१९ रोजी पारित केला असल्याची माहिती
आमदार शंभूराज देसाईंनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकात म्हंटले आहे की,पाटण
तालुक्यात गत महिन्यात मोठया प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यात
डोंगराखाली वसलेल्या मौजे जिमनवाडी, बोर्गेवाडी (घोट),कळंबे,भैरेवाडी
(डेरवण),बाटेवाडी,पाबळवाडी, केंजळवाडी, मसुगडेवाडी या गांवाच्या वरील असणाऱ्या
डोंगराचा भाग खचणे, दरडी कोसळणे,गावांमध्ये मोठया प्रमाणात भूसख्लन होणे इत्यादी
कारणांमुळे अनेक कुटुंबे बाधित झाली होती. या बाधित कुटुंबिंयाना आपतकालीन
परिस्थितीमध्ये सुरक्षित स्थळी त्यांचे स्थलांतर करणेकरीता या कुटुबांना निवारा
शेड बांधणेकरीता शासनाने विशेष बाब म्हणून मंजुरी दयावी याकरीता राज्याचे
मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचेकडे मी सुरुवातीपासूनच आग्रही मागणी केली
होती.पाटण तालुक्यातील या आठ गावांमध्ये ही आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्याने
आपला जीव मुठीत घेवून जगणाऱ्या या कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलातंर करणेकरीता या
गांवामध्ये सुरक्षित ठिकाणी निवारा शेड उभारावे ही बाब अतिवृष्टीकाळात मुख्यमंत्री
यांचे निदर्शनास आणून दिली असताना मुख्यमंत्री ना.फडणवीस यांनी व्हिडीओ
कॉन्फरन्सव्दारे जिल्हाधिकारी,सातारा यांना पाटण तालुक्यातील डोंगरा खाली वसलेल्या
गांवामध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या आपत्तीचा सामना करणेकरीता या गांवातील बाधित
कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करुन त्यांना तात्पुरती निवारा शेड उभारण्याची
कामे तातडीने निधीची तसेच प्रशासकीय मान्यतेची वाट न पहाता सुरु करावी अशा सुचना
दिल्या होत्या.मुख्यमंत्री यांचे आदेशावरुन जिल्हाधिकारी, सातारा यांनी उपविभागीय
अधिकारी तसेच तहसिलदार यांना या गांवातील बाधित कुटुंबियांची पहाणी करुन सार्वजनीक
बांधकाम विभागामार्फत बाधित कुटुंबांना निवारा शेड बांधणेच्या कामांचे अंदाजपत्रक
तयार करुन घेवून या कामांना सार्वजनीक बांधकाम विभागामार्फत सुरुवात करावी असे
सांगण्यात आल्यानंतर तातडीने या कामांना सुरुवात करण्यात आली होती. या आठ
गांवामध्ये सुरक्षित ठिकाणी बाधित कुंटुंबाना स्थलांतरीत होणेकरीता निवारा शेड
बांधणेची कामे सुरु झाली आहेत.मुख्यमंत्री यांनी या कामांना निधी देण्याचे मान्य
केलेप्रमाणे मुख्यमंत्री यांचे आदेशावरुन शासनाच्या महसूल व वन विभाग (मदत व
पुनर्वसन) विभागाने दि.०६.०९.२०१९ रोजी पाटण तालुक्यातील आठ गांवातील निवारा शेड
बांधणेच्या कामांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेसंदर्भातील शासन निर्णय
पारित केला आहे. या निर्णयामध्ये मौजे जिमनवाडी येथे २० कुटुंबाकरीता ३१ लाख २१
हजार ८२३ रुपये, बोर्गेवाडी (घोट) येथे १५ कुटुंबाकरीता २७ लाख ४२ हजार २३१ रुपये,कळंबे
येथे १६ कुटुंबाकरीता २७ लाख ४२ हजार २३१ रुपये, भैरेवाडी (डेरवण) येथे १२
कुटुंबाकरीता २३ लाख ९३ हजार ७३० रुपये, बाटेवाडी येथे २१ कुटुंबाकरीता ३१ लाख २२
हजार ३६९ रुपये,पाबळवाडी येथे ०३ कुटुंबाकरीता ११ लाख ६३ हजार १९९ रुपये,
केंजळवाडी येथे २२ कुटुंबाकरीता १५ लाख ७४ हजार ६७० रुपये, मसुगडेवाडी येथे २०
कुटुंबाकरीता ३१ लाख २२ हजार ३६९ रुपये व मसुगडेवाडी येथेच २० कुटुंबाकरीता दुसरे
ठिकाणी निवारा शेड क्रं.३ व ४ बांधणे याकरीताही ३१ लाख २२ हजार ३६९ रुपये असा एकूण
२ कोटी ३१ लाख ४,९९१ रुपयांचा निधी आठ गांवाना मंजुर करण्यात आला आहे. मंजुर
झालेल्या निधीतून ३० दिवसाच्या आत ही कामे पुर्ण करण्याचे निर्देश शासन
निर्णयामध्ये देण्यात आले आहेत. पाटण तालुक्यातील या आठ गावांमध्ये ही आपतकालीन
परिस्थिती सदरची निवारा शेड उभारण्याकरीता माझे सातत्याच्या मागणीवरुन मुख्यमंत्री
ना.देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने सदरचा निधी मंजुर करुन दिल्याबद्दल या आठ
गांवातील बाधित कुटुंबांच्या वतीने मुख्यमंत्री यांचे आपण आभार मानले असल्याचेही
आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकात म्हंटले आहे.
No comments:
Post a Comment