दौलतनगर दि.०७:- स्वातंत्र्यापासून
आजपर्यंत पाटण मतदारसंघातील डोंगरपठारावरील त्या ३७ गांवातील अनेक गांवाना आणि
वाडयावस्त्यांना जोडणारे रस्ते तुमचे पिताश्री राज्याचे सार्वजनीक बांधकाम
खात्याचे कॅबिनेट मंत्री असताना का देवू शकले नाहीत किंवा त्या रस्त्यांवर बांधकाम
खात्यातील एक रुपयांचाही निधी का खर्चू शकले नाहीत? असा खडा सवाल आमदार शंभूराज
देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांना दिला असून मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर
पहिल्यांदा मतदारसंघातील जनतेला आणि डोंगरपठारावरील त्या गांवाना व
वाडयावस्त्यांना दया आणि मगच येणाऱ्या विधानसभा निवडणूकीची मते मागायला त्या ३७
गांवात जावा असा उघड सल्ला आमदार शंभूराज देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांना
ढेबेवाडी याठिकाणी दिला आहे.
ढेबेवाडी ता.पाटण येथे आमदार
शंभूराज देसाईंच्या प्रयत्नातून राज्य शासनाच्या हरीतऊर्जा योजनेतंर्गत मंजुर
झालेल्या कोळेकरवाडी ते अनुतेवाडी ते कारळे नव्याने रस्ता करणे ०३ कोटी ९९
लाख,भोसगांव ते आंब्रुळकरवाडी ते कोळेकरवाडी नव्याने रस्ता करणे ०३ कोटी ८६ लाख व
०१ कोटी रुपयांच्या ढेबेवाडी पाटीलआव्हाड ते बनपुरी रस्त्याचे रुंदीकरण करणे अशा
एकूण ०८ कोटी ८५ लाख रुपयांच्या निधीच्या कामांच्या भूमिपुजन कार्यक्रमानंतर
कार्यकर्त्यांच्या जाहीर सभेत ते बोलत होते.यावेळी देसाई साखर कारखान्याचे माजी
चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण, पंचायत समिती माजी उपसभापती डी.आर.पाटील,सदस्य
पंजाबराव देसाई,तालुकाप्रमुख राजेश चव्हाण,दिलीपराव जानुगडे,विशाल पवार, मनोज
मोहिते,नारायण कारंडे,रणजित पाटील, शिवाजीराव शेवाळे,प्रशांत साळुंखे,विकास गिरीगोसावी,तुकाराम
जाधव,नानासो साबळे,संचालक वसंत कदम,बबनराव भिसे आदी मान्यवरांसह प्रमुख पदाधिकारी
व कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
याप्रसंगी आमदार शंभूराज देसाई म्हणाले,सत्यजितसिंह पाटणकर मी गत पाच
वर्षात काय विकास केला असा प्रश्न तुम्हाला पडला आहे ना? हा प्रश्न मला
विचारण्याअगोदर तुम्ही माझेबरोबर पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेला एका प्रश्नाचे
उत्तर जाहीरपणे दया.तुमचे पिताश्री सलग पाच वर्षे राज्याचे सार्वजनीक बांधकाम
विभागाचे कॅबिनेट मंत्री होते,पाटण मतदारसंघात डोंगरपठारावर आज अशी गावे आहेत त्या
डोंगर पठारावरील गांवाना मी केवळ मतदारसंघाचा आमदार असताना ९० कोटी ३३ लाख २८ हजार
असा कोटयावधी रुपयांचा निधी शासनाकडून मंजुर करुन आणला आणि या रस्त्यांची कामे
मार्गी लावली यातील अनेक कामे पुर्ण झाली, अनेक कामे प्रगतीपथावर असून सुरु आहेत
तर अनेक कामांच्या निविदा प्रसिध्द झाल्या असून कार्यारंभ आदेश देणे बाकी आहेत. या
कामांची यादीच मी तुम्हाला देतो मी यादी देत असलेलो ३७ रस्ते हे पाटण मतदारसंघातील
डोंगरपठारावरील ३७ गांवाचे असून या रस्त्यांच्या कामांमुळे डोंगरपठारावरील अनेक
गावे व वाडयावस्त्यां जोडल्या गेल्या आहेत व जाणार आहेत. हे रस्ते आपले पिताश्री बांधकाम
मंत्री म्हणून का करु शकले नाहीत किवा राज्याचा पाच वर्षात प्रत्येक वर्षी दोन ते
तीन हजार कोटी रुपयांचा बांधकाम विभागाला मिळणाऱ्या निधीतील एक रुपयांचा निधी या ३७
कामांवर का खर्च करु शकले नाहीत? याचे उत्तर दया.
मी
आपणांस जाहीरपणे सांगतो मी केवळ सत्ताधारी पक्षाचा आमदार असताना देखील पाटण
मतदारसंघातील डोंगरपठारावरील गुरेघर ते पाचगणी, दिक्षी ते आटोली, गोकूळ तर्फ पाटण ते काहिर,
काहिर ते हुंबरणे, रासाठी ते
गाढखोप, नाडे ढेबेवाडी
ते शिद्रुकवाडी, गुढे ते वरची शिबेवाडी,कसणी
ते निगडे ते माईगंडेवाडी,
जिंती
ते मोडकवाडी ते सातर,घोट ते जन्नेवाडी, माटेकरवाडी ते वरेकरवाडी,गणेवाडी गावपोहोच रस्ता,खालची
केळेवाडी ते वरची केळेवाडी, म्हारवंड गांवपोहोच रस्ता,हुंबरणे ते पांढरेपाणी, सडादाढोली ते महाबळवाडी,पाचगणी
ते नागवाणटेक,आटोली ते भाकरमळी, घोट ते बोर्गेवाडी, बोर्गेवाडी महिंद ते
वरपेवाडी,आंबेघर तर्फ मरळी ते पाळशी, जुळेवाडी वाल्मिकी रस्ता ते कदमवाडी, सातेवाडी नाटोशी ते
जाधववाडी,करपेवाडी ते टेटमेवाडी,लोटलेवाडी ते काळगाव ते डाकेवाडी ते कसणी, डावरी
ते चोपडेवाडी ते भालेकरवाडी, गावडेवाडी ते खुडुपलेवाडी, गावडेवाडी फाटा ते
धुईलवाडी,कोकीसरे नवलाईवार्ड ते गवळीनगर,वेताळवस्ती काळगाव ते
मस्करवाडी,माईंगडेवाडी ते गणेशवाडी ते हौदाचीवाडी म्हाळुंगेवाडी ते सातर,भोसगाव ते
आंब्रुळकरवाडी ते कोळेकरवाडी, कोळेकरवाडी ते अनुतेवाडी ते कारळे, घेरादातेगड
गावपोहोच,काठीटेक ते आवसरी, रामेल फाटा ते रामेलरस्ता व वर्पेवाडी गोकुळ तर्फ पाटण
गावपोहोच असे एकूण ३७ रस्ते युतीच्या शासनाकडून मंजुर करुन आणले या ३७
रस्त्यांच्या कामांकरीता एकूण ९० कोटी ३३ लाख २८
हजार रुपयांचा निधी मंजुर करुन आणला. एवढा कोटयावधी रुपयांचा निधी या रस्त्यांच्या
कामांना मंजुर झाला त्यामुळेच डोंगर पठारावरील जनतेचे जीवनमान सुखकर झाले. या
गांवाना आपल्याला अधिकार असतानाही जाणिवपुर्वक रस्ता या मुलभूत सुविधेपासून वंचीत
ठेवण्याचे पाप आपल्याकडून झाले का याचा जाब ही जनता येणाऱ्या निवडणूकीत तुम्हाला
विचारल्याशिवाय राहणार नाही. आपले पिताश्री व आपण या रस्त्यांच्या कामांना
आतापर्यंत का निधी देवू शकला नाही आपल्यात हिम्मत असेल तर एकदा जनतेसमोर छातीठोपणे
जाहीर करा असे आवाहन त्यांनी शेवठी बोलताना सत्यजितसिंह पाटणकरांना केले. उपस्थितांचे
स्वागत एकनाथ जाधव यांनी केले.
No comments:
Post a Comment