दौलतनगर दि.०8:- सन २०१९-२० आर्थिक वर्षात अर्थसंकल्पाव्यतिरिक्त पाटण
विधानसभा मतदारसंघातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांचे रस्ते करणेकरीता अतिरिक्तचा निधी मंजुर करावा अशी
मागणी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व सार्वजनीक बांधकाम मंत्री
ना.चंद्रकांतदादा पाटील यांचेकडे केली होती या मागणीमध्ये एकूण सहा रस्त्यांची
कामे प्रस्तावित केली होती या प्रस्तावित कामांना मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस
व सार्वजनीक बांधकाम मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी अतिरिक्तचा १०.०० कोटी
रुपयांचा निधी सार्वजनीक बांधकाम विभागाकडून मंजुर केला असून निधी मंजुर केल्याचे
लेखी पत्र सार्वजनीक बांधकाम विभाग,मंत्रालय यांनी दि.०७.०९.२०१९ रोजी पारित केले असल्याची
माहिती आमदार शंभूराज देसाईंनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
पत्रकात म्हंटले आहे की,राज्याचे
मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व सार्वजनीक बांधकाममंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील
यांचेकडे पाटण या डोंगराळ व दुर्गम भागातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांची
तसेच पुलांची कामे करणेकरीता सन २०१९ च्या जुनच्या अर्थसंकल्पातून निधी मंजुर
करणेकरीता एकूण १६ रस्त्यांची व पुलांची कामे सुचविण्यात आली होती जुनच्या
अर्थसंकल्पातून शासनाने एकूण १० कामे मंजुर केली होती या १० कामांकरीता १५ कोटी १३
लाख रुपयांचा निधी मंजुर केला होता व यातील ०६ कामे प्रलंबीत राहिली होती प्रलंबीत
राहिलेल्या या सहा कामांना शासनाच्या सार्वजनीक बांधकाम विभागाकडून सन २०१९-20 अंतर्गत
याच आर्थिक वर्षात अतिरिक्तचा निधी मंजुर करावा अशी मागणी मुख्यमंत्री ना.देवेंद्र
फडणवीस व सार्वजनीक बांधकाम मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांचेकडे केल्यानंतर
त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांवरील सहा
रस्त्यांच्या कामांना अतिरिक्तचा १०.०० कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन दिला आहे
यामध्ये पाटण
विधानसभा मतदारसंघातील प्रमुख जिल्हा मार्गावरील अनेक प्रमुख गावांना जोडणारे हे
रस्ते आहेत.निधी मंजूर झालेली कामे खालीलप्रमाणे नाडे सांगवड मंद्रुळकोळे ढेबेवाडी
रस्ता प्रजिमा 58 किमी 02/400 ते 6/00 मध्ये भाग गव्हाणवाडी फाटा ते दौलतनगर मरळी या लांबीत सुधारणा करणे 2
कोटी 70 लाख,नवजा हेळवाक मोरगिरी साजूर गारवडे रस्ता रामा 148 किमी 43/00 ते 49/00
ची सुधारणा करणे भाग वाडीकोतावडे ते शिंदेवाडी फाटा ०3 कोटी,नागठाणे तारळे पाटण
रस्ता प्रजिमा 37 किमी 11/750 ते 13/00 भाग कोंजवडे ते तारळे भागातील लांबीमध्ये
सुधारणा करणे 70 लाख,चरेगाव चाफळ दाढोली रस्ता प्रजिमा 53 किमी 2/00 ते 3/800 व
12/00 ते 14/200 ची सुधारणा करणे 1 कोटी 60 लाख,रामा 136 ते साकुर्डी बेलदरे तळबीड
रा.म.मा.4 ते तासवडे शहापूर ते रामा 124 रस्ता प्रजिमा 61 किमी 0/00 ते 5/00 किमी
भाग साकुर्डी ते बेलदरे रस्त्याची सुधारणा करणे ०१ कोटी व गुहागर चिपळूण कराड जत
विजापूर रस्ता रामा 136 किमी 0/00 ते 2/00 भाग कोयना मार्केट वळण रस्त्याची
सुधारणा करणे ०१ कोटी अशा एकूण १०.०० कोटी
रुपयांचा निधी राज्य शासनाच्या बांधकाम विभागाने मंजुर केला असून निधी मंजुर केले
असल्याचे लेखी पत्र सार्वजनीक बांधकाम विभाग,मंत्रालय
यांनी दि.०७.०९.२०१९ रोजी पारित केले आहे या कामांच्या निविदा लवकरात
लवकर प्रसिध्द करुन सदरची कामे लवकरात लवकर सुरु करणेसंदर्भात बांधकाम विभागांच्या
अधिकाऱ्यांना सुचना दिल्या असून पाटण विधानसभा मतदारसंघातील सहा मोठया असणाऱ्या
राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गावरील रस्त्यांच्या कामांस मंजुरी देवून १०.००
कोटी रुपयांचा निधी मंजुर केलेबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व
सार्वजनीक बांधकाम मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांचे जाहीर आभार व्यक्त केले
असल्याचे आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी पत्रकात म्हंटले आहे.
No comments:
Post a Comment