Tuesday 27 February 2018

वाड्याच्या पायर्या झिजवूनही जनतेच्या पदरी निराशाच-----आमदार शंभूराज देसाई


                 
      पाटण तालुक्यातील डोंगरपठारावरील गावे आजही मुलभूत सोयी सुविधापासून वंचित आहेत. या लोकांच्यासमोर अनेक नागरी समस्यांचा डोंगर उभा आहे. वन्यप्राण्यांचा हल्ला असो की शासनाच्या सुविधा असो येथील ग्रामस्थांना मदतीसाठी झगडावे लागत आहे. यापूर्वी येथे उभा राहिलेल्या पवनउर्जा प्रकल्पामध्ये स्थानिक शेतकरी भरडला गेला. त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेवून कवडीमोल दराने जमिन खरेदी झाल्या. त्या फसवणूक झालेल्या शेतकर्यांनी वाड्याच्या पायर्या झिजवल्या पण त्यांना न्याय मिळाला नाही. आपण सत्तेत आल्यानंतर त्या लोकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यांना मुलभूत सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी आपण कटीबद्ध असून मिळालेल्या सत्तेचा वापर हा सर्वसामान्य जनतेच्या विकासाकरिता झाला पाहिजे यादृष्टीने माझी वाटचाल सुरू आहे. ज्या विरोधकांना जनतेने पोत्यानी मते दिली त्याच विऱोधकांनी जनतेची दिशाभूल केली. त्यामुळे विकासाच्या नावाखाली दिशाभूल करणार्या विरोधकांना आगामी विधानसभा निवडणूकीत धडा शिकवावा असे आवाहन आमदार शंभूराज देसाई यांनी केले.
            वाटोळे ता. पाटण येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत नळपाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन आणि येथील रस्त्याचे भूमीपूजन व सभामंडपाचे उद्गाटन अश्या संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, शिवदौलत बॅकेचे चेअरमन अॅड. मिलिंद पाटील, माजी सभापती सौ. मुक्ताबाई माळी, डोंगरी संघटनेचे अध्यक्ष हणमंतराव मिसाळ, उपाअध्यक्ष जगन्नाथ शिर्के, चंद्रकांत पवार, राम झोरे, राम पवार, सरपंच मनोज पवार, संतोष पवार, सिताराम पवार, मनोज पवार, मरड, धनगरवाडी, मिसाळवाडी, घाणबी, तामकडे, घेरादातेगड, वनकुसवडे या गावातील ग्रामस्थांची उपस्थिती होती.
           याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले की, पाटण तालुक्यातील डोंगरपठारावरील गावामुळे आज वन्यजीवसृष्टी सुरक्षित आहे. परंतु येथील ग्रामस्थ सुरक्षित नाही. विकासाच्या नावाखाली खाजगी कंपन्यानी केलेले अतिक्रमण स्थानिक शेतकर्याच्या मुळावर उठले आहे. त्यामुळे वन्यप्राण्याचे माणसांच्यावर हल्ले वाढले आहेत. या ग्रामस्थांना मदतीसाठी झगडावे लागत आहे. पवनउर्जा प्रकल्पामध्ये स्थानिक शेतकरी भरडल्याची अनेक घटनाही समोर आल्या. त्या अन्यायग्रस्त शेतकर्यांनी न्यायासाठी वाड्य़ाच्या पायर्याही झिजवल्या. परंतु पवनउर्जा प्रकल्पाचे शिल्पकार असलेल्याकडून त्या अन्यायग्रस्त शेतकर्यांना न्याय मिळाला नाही. आपण सत्तेत आल्यानंतर संबंधित शेतकर्यांना न्याय मिळवून देण्याच प्रामाणिक प्रयत्न केला. निवडणूकापुरते विरोधकांनी मते मागून डोंरपठारवरील लोकांचा विश्वासघात केला. यामध्ये फक्त खाजगी कंपन्याच्या वाहनाकरिता डांबरीकरणे रस्ते करण्यात आले. परंतु सर्वसामान्य लोकांना दळवळणासाठी माती व मुरूमाचे रस्ते सुद्धा मिळाले नाहीत. दळणवळणाची सोय नसल्याने ही गावे विकासापासून वंचित राहील. येथील मुलांना शिक्षणासाठी चिखल मातीचे रस्ते तुडवत जावावे लागत आहे. शुद्ध पिण्य़ाच्या पाण्याअभवी लोकांच्या आरोग्याचे प्रश्न गंभीर बनत चालले आहेत. विजेअभावी अनेकांच्या घरात अंधार असल्याची परस्थिती आजही अनेक घरात आहे. वन्यप्राण्याच हल्ला कुठून कधी आणि कसा होईल हे सांगता येणे कठीन असल्याचे हद्य हेलवण्याच्या व्यथा येथील तरूण सांगताना आजही वाईट वाटते. येथील कित्येक पिढ्या आज हा संघर्ष करीत जीवन जगल्या. स्थानिक लोकांना आता जाणीव होत आहे की, पोत्यांनी ज्यांना मतदान केले त्या विरोधकांनी विकासाच्या नावाखाली आपली दिशाभूल केली आहे. आपण सत्तेत आल्यानंतर त्या लोकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यांना मुलभूत सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी आपण कटीबद्ध असून मिळालेल्या सत्तेचा वापर हा सर्वसामान्य जनतेच्या विकासाकरिता झाला पाहिजे यादृष्टीने माझी वाटचाल सुरू आहे. त्यामुळे विकासाच्या नावाखाली दिशाभूल करणार्या विरोधकांना आगामी विधानसभा निवडणूकीत धडा शिकवावा असे आवाहन आमदार शंभूराज देसाई यांनी केले. दरम्यान वाटोळे गावातील राष्ट्रवादी कॉग्रेसाच्या बहुसंख्य कार्यकर्त्यानी शिवसेनेत प्रवेश केला.कार्यक्रमाचे प्रस्ताविक बबन माळी यांनी केले तर आभार धर्मेद्र पवार यांनी मानले.


विकासकामाच्या माध्यमातून पाटण विधानसभेचा चेहरा मोहरा बदलणार – आमदार शंभूराज देसाई





 गेल्या तीन वर्षांच्या काळात तालुक्यातील प्रत्येक गांवात वाडी_वस्तीवर रस्ता पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी वीज बारमाही रस्ते पुल आदी कोट्यावधी रुपयांची विकासकामे करून तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा आपण प्रयत्न केला आहे. असे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाई यांनी केले. 
          ते कळंब व जळव येथे सुमारे पावणे तीन कोटी रुपयांच्या पाल तारळे जळव मनदुरे पाटण रस्त्यांच्या भूमिपुजन व कळंबे चावडी इमारत व साकव पुलाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. 
यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई शिवदौलत बँकेचे चेअरमन मिलिंद पाटील अभिजीत पाटील गजानन जाधव सोमनाथ खामकर युवराज नलवडे तुषार चव्हाण गौरव परदेशी जवळच्या सरपंच शितल कदम रुक्मिणी पवार सुवर्णा पवार ज्ञानदेव कदम कळंबेचे उपसरपंच रविंद्र जाधव विश्वास पवार गिरजाबाई जाधव सुभाष जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. 
           यावेळी आ. शंभूराज देसाई पुढे म्हणाले तारळे विभागातील विरोधी गटाचे उमेदवार जनतेची दिशाभूल करून निवडून आले.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पैशाचा वारेमाप वापर करून मतदारांना आमिष दाखवून मतापुरता उपयोग केला. परंतु निवडून आल्यानंतर उमेदवार इकडे पुन्हा फिरकले नाहीत. निवडणुकीपुरते आमिषे दाखवून मते मागायला येतात व जनता याला बळी पडते याची आपणास खंत वाटते. तारळे विभागाच्या सर्वच गावात आपण विकासकामे पोहचवली आहेत. लोकांनी जिल्हा परिषद निवडणुकीत धडा घेऊन यापुढे देसाई गटाच्या विकासात्मक वाटचालीत बरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे. तारळे विभाग हा देसाई गटाचा बालेकिल्ला आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी लोकांच्या पर्यंत विकासकामे पोहचवावी. सुज्ञ जनता विकास कामांच्या पाठीशी राहील. पाल तारळे मणदुरे पाटण रस्ता व्हावा अशी येथील जनतेची अनेक दिवसांपासून मागणी होती. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकरांनाही या रस्त्यासाठी एवढा प्रचंड निधी बांधकाम मंत्री असताना आणता आला नाही. यावरुन पाटणकरांची निष्क्रीयता दिसून येते. विकासकामे न करता केवळ निवडणूकी पुरते लोकांच्या दारात मताचा जोगवा मागायला जाणार्‍या विरोधकांना लोकांनी चांगलेच  ओळखले आहे. कराड चिपळूण हा 320 कोटींचा विना टोल रस्ता मंजुर करुन आणला. त्या रस्त्याचे काम प्रगती पथावर आहे. या रस्त्यासाठी कोणताही टोल आकारला जाणार नाही. परंतु याच रस्त्यांसाठी दादांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना सुद्धा दोन_दोन टोलनाके जनतेच्या मानगुटीवर बसवले होते. असा टोलाही आमदार शंभूराज देसाईंनी पाटणकरांना लगावला. आ. देसाई पुढे म्हणाले कळंबे ते डफळवाडी रस्त्याचे विरोधकांनी एक वर्षा पुर्वी भूमिपुजन केले होते. अजूनही या रस्त्यावर एक खडाही पडला नाही. स्वतः काम करायचे नाही दुसरा करतोय त्यात खो घालायचा अशी विरोधकांची प्रवृत्ती आहे त्यामुळे तारळे विभागातील जनतेनेही त्यांना खड्या सारखे बाजूला ठेवावे. कार्यकर्त्यांनी तीन वर्षात केलेली विकासकामे जनते पर्यंत पोहचवून तालुक्यात फक्त आ. शंभूराज देसाई माध्यमातून विकासकामांची गंगा सुरू आहे हे पटवून सांगावे. असे शेवटी आ.शंभूराज देसाई म्हणाले. शंकर पवार यांनी स्वागत व आभार मानले.

Saturday 24 February 2018

पाटण तालुक्याची विकासाच्या बाबतीत भक्कम स्थितीकडे वाटचालः आमदार शंभूराज देसाई




        केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये शिवसेना-भाजपचे सरकार आहे. पाटण विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाचे आमदार म्हणून तालु्क्यातील जनतेने  मला स्पष्ठ बहुमत दिले आहे. त्यामुळे पाटण तालुक्यात देसाई गटाची तागडी अधिक वजनदार आहे. मी आमदार म्हणून तळागाळातील जनतेचे मुलभूत प्रश्न आक्रमकपणे विधानभवनात मांडल्याने त्याकडे शासनाचे लक्ष वेधले गेले. त्यामुळे पाटण तालुक्याच्या प्रत्येक विभागात विकासाची कामे अधिक गतीने सुरू झाल्याचे आपण पाहत आहेत. पायाभूत सुविधा मिळवून देत पाटण तालुका विकासाच्या बाबतीत भक्कम स्थितीकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाई यांनी केले.
      डेरवण ता. पाटण येथे गावातील ग्रामपंचायत अंतर्गत रस्त्याच्या खडीकरणडांबरीकरण या विकासकामाच्या भूमीपूजनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाईशिवदौलत बॅकेचे चेअरमन अॅड. मिलिंद पाटीललोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे व्हा. चेअरमन राजाराम पाटीलमाजी संचालक बी. आर. पाटीलसंजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष भरत साळुंखेशिवदौलत बॅकेचे संचालक चंद्रकांत पाटीलमाजी जिल्हा परिषद सदस्य डी. वाय. पाटील,दत्तात्रय वेल्हाळविजय पाटीलप्रकाश नेवगे,सरपंच आशाताई यादव,उपसरपंच प्रकाश पाटोळेमनोहर यादवसंजय यादव,प्रशांत यादव,मच्छिंद्र यादव,संजय पवार,वसंत पवार यांची उपस्थिती होती. 
        याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले कीपाटण तालुक्याची भौगोलिक परस्थिती पाहता तालुक्याचा ग्रामीण भाग दर्याखोर्यानी विखुरलेला आहे. त्यामुळे विकासकामे करताना त्याठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. ग्रामीण भागातील राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग यांना शासनाचा निधी प्राप्त होतो. परंतु इतर जिल्हा मार्ग आणि ग्रामीणडोंगरी भागाला जोडणार्या वाड्या वस्त्यांमधील ग्रामीण रस्त्यांना आवश्यक असणारा निधी मिळत नाही. ते ग्रामीण भाग एकमेकांना दळवळणाच्या माध्यमातून जोडता येत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्या अडचणीवर मात करीत आज गावागावात रस्त्याचे जाळ विणलं जात आहे. रस्ते हा पायाभूत सुविधांचा मूलभूत घटक आहे. पाटण तालुक्यातील बहुताशी ठिकाणी डोंगरी आणि ग्रामीण भागातील लोकांच्या मूलभूत सुविधा असणार्या दळणवळण करिता ग्रामीण रस्तेमोर्या ओढ्यावरील साकव पुलांची नितांत गरज भासत आहे. रस्ता तयार करताना कधी रस्ता नसतोच म्हणून हवा असतोकधी तो असलेला रुंद करून सुधारायचा असतोतर कधी पूर्णपणे नवीनच पर्याय तयार करायचा असतो. अश्या पद्धतीने रस्त्याच्या विकासाची कामे पाटण तालुक्यात सुरू आहेत. यासाठी प्रशासकीय अधिकारी आपली मरगळ बाजूला सारून काम करताना दिसत आहेत. २०१४ च्या बहुमतामुळे पाटण तालुक्यात देसाई गटाची तागडी अधिक वजनदार आहे. पाटण तालुक्याचे आमदार म्हणून तळागाळातील जनतेचे मुलभूत प्रश्न आक्रमकपणे विधानभवनात मांडल्याने त्याकडे शासनाचे लक्ष वेधले गेल्याने  तालुक्याच्या प्रत्येक विभागात विकासाची कामे अधिक गतीने सुरू झाल्याचे आपण पाहत आहेत. डेरवण गावामध्ये जवळजवळ साकव पूलपाण्याची टाकीरस्त्याची कामेसभामंडप अशी विकासकामे केली आहेत.  त्यामुळे ही विकासकामे गावासाठी वरदान ठरू लागली आहेत. त्यामुळे पायाभूत सुविधा मिळवून देत पाटण तालुका विकासाच्या बाबतीत भक्कम स्थितीकडे वाटचाल करीत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संजय यादव यांनी केले तर आभार संदीप यादव यांनी मानले.  


Friday 23 February 2018

विकासकामे खेचून आणणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या पाठीशी जनता राहील-आमदार शंभूराज देसाई


     
                पाटण विधानसभा मतदारसंघात डोळ्यांना दिसतील अशी विकासकामे सुरू आहेत. असे एकीकडे चित्र असताना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक निकालामध्ये आपल्याला ठेच लागली. लागलेली ती ठेच सुधारण्याची संधी आपल्याला विधानसभा निवडणूकीमध्ये मिळणार आहे. राज्यात आणि केंद्रात आपली सत्ता आहे. मिळालेल्या सत्तेच्या माध्यमातून कधी नव्हती एवढी विकास कामे पाटण विधानसभा मतदारसंघात सुरू आहेत. त्यामुळे पाटण तालुक्यात आपल्याला विकासात्मक बदल झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. विकासकामे करण्य़ासाठी आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपलल्या हक्काचा आमदार मिळालेला आहे. त्यामुळे विकासकामे खेचून आणणार्या लोकप्रतिनिधीच्या पाठीशी जनता ताकदीने उभी राहिल असा ठाम विश्वास आमदार शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.
            माजगांव ता. पाटण येथील सर्वसाधारण साकव योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या साकव पूलाच्या भूमीपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, शिवदौलत बॅकेचे चेअरमन अॅड. मिलिंद पाटील, लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे व्हा. चेअरमन राजाराम पाटील, माजी संचालक बी. आर. पाटील, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष भरत साळुंखे, शिवदौलत बॅकेचे संचालक चंद्रकांत पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य डी. वाय. पाटील, दत्तात्रय वेल्हाळ, विजय पाटील, प्रकाश नेवगे, बी. डी. शिवदास, अशोक हिंगणे, अंकूश पाटील, गोरख चव्हाण, कृष्णत पाटील, अॅड. चंद्रकांत कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता घोडके, यांची प्रमुख उपस्थिती होती.
           याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले की, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक निकालानंतर विरोधकांना आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. परंतु त्यांची स्वप्नेच ठेवायची असतील तर आपल्याला आजपासूनच कामाला लागणे गरजेचे आहे. पाटण तालुक्यातील चाफळ विभागाला विकासाच्या बाबतीस नेहमीच झुकते माफ दिले आहे. यापूर्वी येथील ग्रामस्थांना विकासाच्या कामासाठी झगडावे लागत होते. जनतेच्या प्रश्नाची दखल घेतली जात नव्हती. सन 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणूकीत आमदार म्हणून नेतृत्व करण्याची संधी दिली. राज्यात आणि आणि केंद्रात शिवसेना भाजपची सत्ता आहे. मिळालेल्या सत्तेचा पुरेपुर वापर करीत आपण तालुक्यात तीन वर्षात मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. त्यामुळे पाटणमध्ये विकासात्मक चित्र पाहण्यास मिळत आहे. रस्त्याची, धरणांच्या पुनर्वसनाची नळपाणीपुरवठा योजना, छोटे मोठे साकव पुलांचे प्रश्न मार्गी लागताना दिसत आहे. आता आपल्याला विकासकामे करण्यासाठी हक्काचा आमदार मिळाला आहे.  जनतेचे प्रश्न जागेवर सोडवण्यासाठी जनता दरबाराच्या माध्यामातून लोकांना चांगले व्यासपीठ मिळाले आहे. सरकारी कामासाठी लोकांना थांबवे लागत नाही. एखादे काम थांबले तर जनता दरबारात त्या व्यक्तीला न्याय मिळू लागला आहे. त्यामुळे सामान्यातील सामान्य माणसामध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे पाहण्यास मिळत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीत विरोधकांनी दिलेल्या आश्वासनाची पुर्तता त्यांच्याकडून झाली का? याचा जाब विचारण्याची वेळ जनतेवर येवून ठेपली आहे. पाटण तालुक्याच्या विधानसभेची निवडणूक दोन वर्षावर येवून ठेपली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवणूकीत लागलेली ठेच सुधारण्याची संधी यानिमित्ताने आपल्याला मिळालेली आहे. अश्यातच एका पराजयाने खचून जाण्याएवढा देसाई गटाचा कार्यकर्ता दुबळा नाही हे आपण सर्वजण जाणतो. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकीत क्षणिक मोहाला बळी न पडता विकासात्मक राजकरणाच्या पाठमागे जनता ताकदीने उभी राहिल असा ठाम विश्वास आमदार शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला. चंद्रकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. राजाराम पाटील यांनी आभार मानले.

Wednesday 14 February 2018

आमदार शंभूराज देसाई यांचा मंगळवार दि. २० फेब्रुवारी, २०१८ रोजी पाटण तहसिल कार्यालयामध्ये जनता दरबार. जनता दरबारास जिल्हयास्तरीय अधिकारी निमंत्रित.



पाटण विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी व समस्या जागेवर सोडविण्याकरीता पाटण विधानसभा मतदारसंघाचे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचा जनता दरबार हा मंगळवार दि. २० फेब्रुवारी, २०१८ सकाळी १०.०० वाजता पाटण तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित केला आहे. या जनता दरबारामध्ये आमदार शंभूराज देसाई हे पाटण मतदार संघातील जनतेच्या समस्यांचे व विकास कामासंदर्भातील अडी-अडचणी जाणून घेणार आहेत, तसेच या जनता दरबारास जिल्हयाच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे,सातारा जिल्हयाचे जिल्हा पोलिस अधिक्षक संदिप पाटील, सहयाद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालीका डॉ. विनिता व्यास, सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ साताराचे अधिक्षक अभियंता विजय घोगरे, सार्वजनिक बांधकाम मंडळ,साताराचे अधिक्षक अभियंता संभाजी माने, सातारा सिंचन मंडळाचे अधिक्षक अभियंता सौ. वैशाली नारकर, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता संजय साळे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे सातारा विभागाचे विभाग नियंत्रक श्रीमती अमृता ताम्हणकर, या जिल्हास्तरीय अधिकारी यांना निमंत्रित केले असून या जनता दरबारास जनतेने आपल्या समस्या घेऊन मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार शंभूराज देसाई यांच्या कार्यालयाकडून प्रसिध्दीपत्रकाव्दारे करण्यात आले  आहे.
आमदार शंभूराज देसाई यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या पत्रकांत म्हंटले आहे की, आमदार शंभूराज देसाई यांनी सन २००४ ते २००९ या कालावधीत पाटण विधानसभा मतदार संघातील आम जनतेच्या असणा-या प्रलंबित समस्यांचे व विकास कामांसंदर्भातील अडी-अडचणींचे तातडीने निराकरण करणेकरीता तालुकास्तरीय सर्व शासकीय अधिकारी यांचे समवेत जनता दरबार आयोजित करण्याची त्यांनी नविन संकल्पना राबविल्याने तालुक्यातील जनतेच्या अडी-अडचणींचा निपटारा जागेवरच संबंधित शासकीय अधिकारी यांचेसमारे होत होता. त्यामुळे जनतेच्या वेळेची व आर्थिक बचत होत असल्याने आम जनतेमध्ये समाधानाचे वातावरण होते. आमदार शंभूराज देसाई यानी अशाच पध्दतीने सन २०१४ ला पुनश्च: आमदार झाल्यानंतर आमदारकीच्या पहिल्या महिन्यातच दि. २४.११.२०१४, ०७.११.२०१५ व ०१.१२.२०१६ रोजी पाटण या ठिकाणी जनता दरबारांचे आयोजन केले होते. या तिन्ही जनता दरबारास तालुक्यातील जनतेने उत्स्फुर्त प्रतिसाद दिला होता.
दरम्यान दि. २० फेब्रुवारी २०१८ रोजी आयोजित केलेल्या चौथ्या जनता दरबारास जिल्हा प्रशासनाच्या प्रमुख जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा पोलिस अधिक्षक, सहयाद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालीका, सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ साताराचे अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधिक्षक अभियंता, सातारा सिंचन मंडळाचे अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे सातारा विभागाचे विभाग नियंत्रक या सर्व जिल्हास्तरीय अधिकारी यांना निमंत्रित केले आहे. त्यामुळे दि. २० फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वाजता तहसिल कार्यालय,पाटण या ठिकाणी  आयोजित केलेल्या जनता दरबारास पाटण विधानसभा मतदार संघातील आम जनतेने बहुसंख्येने उपस्थित राहून आप-आपले प्रलंबित प्रश्न, समस्या तसेच विकास कामांबाबतच्या अडचणींचा तातडीने निपटारा करण्यासाठी आपल्या समस्यांची लेखी निवेदने आमदार शंभूराज देसाई यांचकडे सादर करावीत असे आवाहनही शेवटी पत्रकांत केले आहे.             

दि. १६/०२/२०१८ रोजी राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री, आरोग्य मंत्री व पालकमंत्री पाटण तालुक्याच्या दौ-यावर ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे इमारतीचे उदघाटन बनपूरी रस्त्याचे भूमिपूजन .



          
         पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून राज्याचे अर्थसंकल्पातून उभारण्यात आलेल्या ढेबेवाडी, ता. पाटण येथील ग्रामीण रुग्णालय इमारतीचे उदघाटन मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून मंजुर केलेल्या कंकवाडी ते कडववाडी बनपूरी रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दि.१६.०२.२०१८ रोजी सकाळी १०.०० वा करण्यात आले असून आमदार शंभूराज देसाई यांच्या विनंतीवरुन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री  ना. एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना. विजय शिवतारे हे पाटण तालुक्याच्या दौ-यावर येत असून या मान्यवरांच्या  प्रमुख उपस्थितीत हे कार्यक्रम होणार असून ना. एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते बनपुरी याठिकाणी भव्य नागरी सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई यांच्या कार्यालयाकडून प्रसिध्दीपत्रकाव्दारे  देण्यात आली आहे.
         आमदार शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून राज्य शासनाच्या अर्थसंकल्पातून मौजे ढेबेवाडी, ता. पाटण येथील ग्रामीण रुग्णालयाचे नूतन इमारत उभारण्यात आली असून या इमारतीचा उदघाटन समारंभ राज्याचे आरोग्यमंत्री ना.डॉ.दिपक सावंत यांचे शुभहस्ते सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे अध्यक्षतेखाली सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना. विजय शिवतारे यांचे प्रमुख उपस्थितीत सकाळी १०.०० वा. ढेबेवाडी, ता. पाटण या ठिकाणी संपन्न होणार आहे. तसेच  सन २०१७-१८ चे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कंकवाडी बनपूरी ते कडववाडी बनपूरी या रस्त्याचा भूमिपूजन कार्यक्रम सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.एकनाथ शिदे यांचे शुभहस्ते आरोग्यमंत्री ना.डॉ.दिपक सावंत यांचे अध्यक्षतेखाली सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना. विजय शिवतारे यांचे प्रमुख उपस्थितीत सकाळी १०.३० वा. मौजे बनपूरी, ता. पाटण या ठिकाणी होणार आहे. तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा पाटण तालुक्याचेवतीने जाहिर नागरी सत्कार तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते होणार आहे. या प्रसंगी मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई, शिवदौलत बँकेचे चेअरमन ॲङ मिलिंद पाटील, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन डॉ. दिलीपराव चव्हाण, माजी सभापती सौ. वनिता नारायण कारंडे, माजी उपसभापती डी. आर. पाटील, कारखान्याचे संचालक विकास गिरी गोसावी, वसंत कदम, सुरेश पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरी या कार्यक्रमांस ढेबेवाडी विभागातील कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांनी मोठया संख्येन उपस्थित रहावे, असे आवाहन बनपूरी येथील शंभूराज युवा संघटना शिवसेना ढेबेवाडी विभाग ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले असल्याचेही पत्रकात म्हंटले आहे.