Saturday 10 February 2018

तुम्हाला अपात्र करुनच जनतेने मला पात्र केले आहे. आमदार शंभूराज देसाईंचा विक्रमसिंह पाटणकरांना प्रतिटोला.


    माजी मंत्री पाटणकरसाहेब, आपण माझे वडीलांचे वयाचे आहात.आपले बोट धरायला मला नक्कीच आवडले असते परंतू बोट धरुनही काही उपयोग नाही कारण जनहितार्थ डोळयाला दिसेल असे एकही काम आपलेकडून झाले नाही हे जनताच गावा-गावात गेल्यानंतर सांगत आहे. आमदारकीच्या आणि मंत्रीपदाच्या कार्यकाळात तुम्ही जनतेच्या गरजेचे असणारी कामे केली असती तर गत तीन वर्षात मला शेकडो कोटींचे लहानमोठे रस्ते, लहानमोठे पुल, लहान मोठया पिण्याच्या पाण्याच्या योजना कराव्या लागल्या नसत्या.तालुक्यातील जनता आजही त्यांच्या मुलभूत गरजा असणा-या सुविधा गावागावात गेल्यानंतर मागत आहेत.जनतेची कामेच झाली नसल्याने आपले बोट धरुन आपण मला काय दाखविणार?तुमची निष्क्रीयता आणि माझी पात्रता तालुक्यातील जनतेने चांगलीच जाणली असून जनतेची फसवणूक करुन आमदार होणा-यांपैकी शंभूराज देसाई नक्कीच नाही म्हणूनच तुम्हाला अपात्र करुनच जनतेने मला पात्र केले असल्याचा प्रतिटोला आमदार शंभूराज देसाईंनी विक्रमसिंह पाटणकरांना लगाविला आहे.
    मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत पाटण तालुक्यात सर्वाधिक रस्त्यांची कामे मंजुर करुन आणलेबद्दल आमदार शंभूराज देसाईंचे आभार मानणेकरीता आलेल्या मौजे गारवडे, आबदारवाडी, शिद्रुकवाडी, चिंचेवाडी वजरोशी, मारुल तर्फ पाटण, बनपुरी व बोडकेवाडी गावातील ग्रामस्थांसमोर बोलताना आमदार शंभूराज देसाईंनी विक्रमसिंह पाटणकरांच्या पत्रकाचा समाचार घेतला.
    याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, तालुक्यातील सुज्ञ जनतेनेचे माजी मंत्री पाटणकरांना त्यांची निष्क्रीयता पाहून अपात्र आणि मला अपात्र केले आहे.पाटणकरसाहेबांना मंत्री असताना तालुक्यातील जनतेने त्यांचा पराभव करुन मला आमदार करुन माझी पात्रता काय आहे हे दाखवून दिले आहे.याचा विसर माजी मंत्रीमहोदयांना पडला आहे.विचारांची आणि विकासाची लढाई करण्याची शिकवण मला माझे पुर्वजांनी दिली आहे त्यामुळेच विकासाच्या मुद्दावर समोरासमोर येण्याचे आव्हान मी सारखे माजी मंत्री पाटणकरसाहेबांना देत आहे.जनतेच्या मुलभूत गरजासांठी तुम्ही आमदार असताना काय केले आणि मी आमदार म्हणून काय करतोय हे जनतेसमोर येण्याकरीताच समोरासमोर येण्याचे आव्हान मी त्यांना करीत आहे. आपण खरोखरच जनतेकरीता काही केले असेल तर जनताच न्याय करेल कोण पात्र आणि कोण अपात्र आहे याचा. असे सांगूनही पाटणकरसाहेब समोरासमोर येत नाहीत ते जनतेसमोर येवून बोलायला का घाबरतायत हे कोडे अद्यापही सुटत नाही.जरूर पाटणकरसाहेब माझे वडीलांचे वयाचे आहेत.त्यांचे बोट धरणे मी नक्कीच पसंत केले असते परंतू निष्क्रीय माजी आमदारांचे बोट धरुन उपयोग काय? माझी पात्रता काय हे सांगणारे पाटणकरसाहेब यांनी त्यांची पात्रता सिध्द करताना पाटण तालुक्यातील जनतेला एक उत्तर दयावे आपण नक्कीच सहावेळा आमदार झालात परंतू त्याकाळात शिक्के मारुन मतदान केले जात होते तेव्हा तालुक्याच्या वरील भागात अनेक गावात वाडीवस्तीवर ९८ ते ९९ टक्के मतदान होत होते मतदानाच्या मशिन आल्यापासून एवढे टक्के मतदान का होत नाही. आपल्या आमदारकीच्या काळात मशिनव्दारे मतदान झाले असते म्हणजे तेव्हाच आपणांस कोण पात्र आणि कोण अपात्र आहे हे समजून आले असते. असे सांगत ते म्हणाले, कराड चिपळूण मार्गाला समातंर मार्ग कोणी केला आणि याचा राज्यमार्गही कोणी करुन घेतला हे मी सांगण्यापेक्षा पाटणकरसाहेब आपणच या मार्गावरील गावांतील आणि वाडीवस्तीतील जनतेला विचारले तर हीच जनता तुम्हाला सांगेल हा मार्ग कोणी केला. याच मार्गावरचे तुमच्या निष्क्रीयतेचे एक उदाहरण पहा २००४ ला मी आमदार झालेनंतर गारवडे ते मोरगिरी या मार्गावर वाडीकोतावडे याठिकाणी मोरणा नदीवर सन २००८-०९ ला मी मोठा पुल मंजुर करुन आणला होता. २००८-०९ ला या कामांस प्रत्यक्षात सुरुवात झाली आणि २००९ नतंर येथील काही शेतक-यांनी त्यांच्या मोबदल्यासाठी आडकाठी आणल्याने या पुलाचे काम रखडले २००९ नंतर सलग पाच वर्षे पाटणकरसाहेब आमदार होते. त्यांना या पाच वर्षात या शेतक-यांच्या मोबदल्याचा आणि पर्यायाने या मोठया पुलाचा प्रश्न सोडविता आला नाही तो प्रश्न मी २०१४ ला परत आमदार झालेनंतर सोडविला आणि त्या शेतक-यांना त्यांचा मोबदलाही मिळवून दिला यावरुनच माजी मंत्री यांच्या कार्यपध्दतीचे दर्शन होते.कारखान्याच्या संदर्भात माजी मंत्री यांना बोलण्याचा कोणताच नैतिक अधिकार नाही देसाई कारखान्याला नेहमीच पाण्यात पाहणा-या पाटणकरांना कारखान्याच्या सुज्ञ सभासंदानी अनेकदा नाकारले आहे. शेतक-यांचा कारखाना कसा बंद पडेल यावरच तुमच्या दृष्टी असली तरी तुमच्या दृष्टीप्रमाणे येथे काहीही होणार नाही. शेतक-यांनी शेतक-यांसाठी चालविलेला हा कारखाना तुमच्या कुटील राजकारणात अडकणार नाही याची खबरदारी शेतक-यांनी आमच्यावर विश्वास दाखवून घेतली आहे त्याची काळजी आपण करु नये असेही शेवठी बोलताना ते म्हणाले.
चौकट:- वाडयात बसून बातम्यामध्ये नको ते घुसडायची सवय तुमचीच.
   मी तालुक्यात झालेल्या कार्यक्रमांच्या बातम्या प्रसिध्दीमाध्यमांना देत असून लोकप्रतिनिधींनी केलेल्या कामांच्या बातम्या मतदारसंघातील जनतेला समजाव्यात याकरीता प्रसिध्दीमाध्यमांना देणे ही प्रचलीत पध्दत आहे. आपण तर राज्याचे मंत्री राहिला आहात आपणांस हे ठाऊक नसावे हे आश्चर्यच आहे.कार्यक्रमांमधून मी जे बोलतो तेच माझे कार्यालयाकडून प्रसिध्दीस जाते, पाटणकरसाहेब आपल्यासारखे वाडयात बसून बातम्यामध्ये नको ते घुसडायची सवय मला नाही ती आपणांस आहे.माजी आमदार ना कोणते भूमिपुजन करु शकत ना उदघाटन मग वाडयातील बातम्यांमध्ये घुसडण्याव्यतिरिक्त आपणांकडे दुसरे आहे तरी काय? असा टोलाही आमदार देसाईंनी लगाविला आहे. 

No comments:

Post a Comment