Tuesday 13 February 2018

पवनऊर्जा प्रकल्पाच्या अवजड वाहतूकीमुळे खराब झालेल्या रस्त्याच्या पुर्नंबांधणीकरीता ७ कोटी ४९ लक्ष रुपयांचा निधी मंजुर- आमदार शंभूराज देसाईंची माहिती.


    पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात पवनऊर्जा प्रकल्पाच्या अवजड यंत्रसामुग्रीमुळे नादुरुस्त झालेल्या सार्वजनीक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्या अखत्यारितील इतर जिल्हा मार्ग आणि ग्रामीण मार्गावरील रस्त्यांच्या कामांना पुर्वस्थितीत आणून त्याची पुर्नंबांधणी करणेकरीता आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन देणेबाबत राज्याचे ऊर्जामंत्री व महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, पुणे यांचेकडे मागणी केलेप्रमाणे सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात पाटण तालुक्यातील ६ रस्त्याच्या कामांना ७ कोटी ४९ लक्ष ०४ हजार रुपयांचा निधी ऊर्जामंत्री यांचे आदेशावरुन राज्यस्तरीय पवनऊर्जा प्रकल्प रस्ते दुरुस्ती समितीने मंजुर केला सदरचा निधी तात्काळ वितरीत करुन सदरच्या रस्त्यांची कामे तात्काळ सुरु करण्याच्या सुचना महाऊर्जा नियामक मंडळाने सार्वजनीक बांधकाम विभागाला दिल्या असल्याची माहिती सदरच्या रस्त्यांची लवकरात लवकर पुर्नंबांधणी होणेकरीता सातत्याने प्रयत्न करणारे आमदार शंभूराज देसाईंनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
     आमदार शंभूराज देसाईंनी दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, पाटण तालुक्यातील डोंगर पठारावर मोठया प्रमाणात पवनऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीकरीता डोंगर पठाराकडे जाणा-या सार्वजनीक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्या अखत्यारितील इतर जिल्हा मार्ग आणि ग्रामीण मार्गावरील रस्त्यांवरुन अवजड यंत्रसामुग्रींची वाहतूक या पवनऊर्जा कंपन्यांकडून करण्यात आल्याने चांगल्या दर्जाचे करण्यात आलेल्या रस्त्यांची मोठया प्रमाणात दुरावस्था झाल्याने या रस्त्यांना पुर्वस्थितीत आणून त्याची पुर्नंबांधणी करणेकरीता आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन देणेबाबत तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने राज्याचे ऊर्जामंत्री व महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, पुणे यांचेकडे मी सातत्याने पाठपुरावा करीत होतो राज्याचे ऊर्जामंत्री यांचेसमवेत अनेकदा सदरचा निधी मंजुर करुन आणणेकरीता बैठकाही पार पडल्या आहेत. दरम्यान यासंदर्भात मी सन २००४ ते २००९ या कालावधीत पाटण तालुक्याचा आमदार असताना तत्कालीन अपारंपारिक ऊर्जा मंत्री यांचेकडे मी आग्रह धरुन पवनऊर्जा प्रकल्पाच्या अवजड यंत्रसामुग्रीच्या वाहतूकीमुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या कामांकरीता शासनाच्या ऊर्जा विभागाकडून व महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, पुणे यांचेकडून प्रति किलोमीटर १० लक्ष रुपयांचा निधी मंजुर करावा अशी आग्रही मागणी करुन ती तत्कालीन अपारंपारिक मंत्री विनय कोरे यांचेकडून मान्य करुन घेतली होती त्यानुसार मागील आर्थिक वर्षात तालुक्यातील मोरणा, ढेबेवाडी विभागातील अशाप्रकारे नादुरुस्त झालेल्या रस्त्याच्या कामांची पुर्नंबांधणी करणेकरीता निधी मंजुर करुन आणण्यात मला यश मिळाले. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात अशाच प्रकारे निधी मिळावा याकरीता तालुक्यातील एकूण ७ रस्त्यांची कामे शासनाचे ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे व महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, पुणे यांचेकडे प्रस्ताव सादर केले होते त्यानुसार येथील ६ रस्त्यांच्या कामांना महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, पुणे यांनी मंजुरी दिली असून यातील १५ किलोमीटर अंतराचे एक काम हे पाच कोटी रक्कमेच्या वर असलेकारणाने याकरीता ६ कोटी ०६ लक्ष ४४ हजार रुपयांच्या निधीची गरज असल्यामुळे सदरचे प्रस्तावित कामांच्या रक्कमेस शासनाची मंजुरी घेवून सदरचा निधी वितरीत करावा असे महाऊर्जा नियामक मंडळाने सुचित केले आहे. याही कामांस शासनाकडून मंजुरी देण्याचे आश्वासन शासनाचे ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला दिले आहे तोही निधी मंजुर होईल. दरम्यान सहा कामांना एकूण ७ कोटी ४९ लक्ष ०४ हजार रुपयांचा निधी ऊर्जामंत्री यांचे आदेशावरुन राज्यस्तरीय पवनऊर्जा प्रकल्प रस्ते दुरुस्ती समितीने मंजुर केला आहे मंजुर केलेल्या निधीमध्ये आंबेघर तर्फ मरळी ते पळशी रस्ता किमी ०/००० ते ३/५०० ची दुरुस्ती करणेकरीता १ कोटी ५२ लक्ष ७२ हजार, जुळेवाडी फाटा  वाल्मिकी रस्ता ते धडामवाडी रस्ता ग्रामा २४५ किमी ०/००० ते १/३०० ची दुरुस्ती करणे ४८ लक्ष ५० हजार, निवी ते कसणी रसता ग्रामा ३१२ किमी ०/००० ते २/५०० ची दुरुस्ती करणे ५१ लक्ष ९४ हजार, महिंद ते सळवे रस्ता ग्रामा ३१८ किमी ०/००० ते ३/२०० ची दुरुस्ती करणे १ कोटी १३ लक्ष ३९ हजार, निवी ते कसणी रस्‍ता ग्रामा ३१२ किमी २/५०० ते ४/५०० ची दुरुस्ती करणे ५५ लक्ष ०६ हजार व कसणी निगडे ते माईंगडेवाडी रस्ता ग्रामा ३१४ किमी ०/००० ते ८/००० ची दुरुस्ती करणे ३ कोटी २७ लक्ष ४३ हजार रुपये असे एकूण ७ कोटी ४९ लक्ष ०४ हजार रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. या सहा कामांच्या निविदा लवकरात लवकर प्रसिध्द करुन कामांना सुरुवात करण्याचे लेखी पत्र दि.०१.०२.२०१८ रोजी सार्वजनीक बांधकाम विभागाला देण्यात आले आहे तर जुळेवाडी फाटा ते वाल्मिकी रस्ता इजिमा १३७ किमी ५/५०० ते २०/५०० या १५ किमी रस्त्याच्या कामांस शासनस्तरावर मंजुरी देण्यात येणार असून याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. या १५ किमी रस्त्यांच्या कामासही लवकरात लवकर मंजुरी आणणेकरीता माझे प्रयत्न सुरु आहेत या कामामुळे एकूण ७ रस्त्यांच्या कामांना १३ कोटी ५५ लक्ष ४८ हजार निधी या कामांवर खर्ची होणार असल्याचे आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी सांगितले आहे.


No comments:

Post a Comment