पाटण विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी
व समस्या जागेवर सोडविण्याकरीता पाटण विधानसभा मतदारसंघाचे उत्कृष्ट संसदपटु आमदार
शंभूराज देसाई यांचा जनता दरबार हा मंगळवार दि. २० फेब्रुवारी, २०१८ सकाळी १०.००
वाजता पाटण तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित केला आहे. या
जनता दरबारामध्ये आमदार शंभूराज देसाई हे पाटण मतदार संघातील जनतेच्या समस्यांचे व
विकास कामासंदर्भातील अडी-अडचणी जाणून घेणार आहेत, तसेच या जनता दरबारास जिल्हयाच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे,सातारा जिल्हयाचे जिल्हा पोलिस अधिक्षक संदिप
पाटील, सहयाद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालीका डॉ. विनिता व्यास, सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ साताराचे
अधिक्षक अभियंता विजय घोगरे, सार्वजनिक बांधकाम मंडळ,साताराचे अधिक्षक अभियंता संभाजी माने, सातारा सिंचन
मंडळाचे अधिक्षक अभियंता सौ. वैशाली नारकर, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता संजय साळे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे सातारा विभागाचे विभाग नियंत्रक
श्रीमती अमृता ताम्हणकर, या जिल्हास्तरीय अधिकारी यांना निमंत्रित
केले असून या जनता दरबारास जनतेने आपल्या समस्या घेऊन मोठया संख्येने उपस्थित रहावे,
असे आवाहन आमदार शंभूराज देसाई यांच्या कार्यालयाकडून प्रसिध्दीपत्रकाव्दारे
करण्यात आले आहे.
आमदार शंभूराज देसाई यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या
पत्रकांत म्हंटले आहे की, आमदार शंभूराज
देसाई यांनी सन २००४ ते २००९ या कालावधीत पाटण विधानसभा मतदार संघातील आम जनतेच्या
असणा-या प्रलंबित समस्यांचे व विकास कामांसंदर्भातील अडी-अडचणींचे तातडीने निराकरण करणेकरीता तालुकास्तरीय सर्व शासकीय अधिकारी यांचे
समवेत जनता दरबार आयोजित करण्याची त्यांनी नविन संकल्पना राबविल्याने तालुक्यातील जनतेच्या
अडी-अडचणींचा निपटारा जागेवरच संबंधित शासकीय अधिकारी यांचेसमारे
होत होता. त्यामुळे जनतेच्या वेळेची व आर्थिक बचत होत असल्याने
आम जनतेमध्ये समाधानाचे वातावरण होते. आमदार शंभूराज देसाई यानी
अशाच पध्दतीने सन २०१४ ला पुनश्च: आमदार झाल्यानंतर आमदारकीच्या
पहिल्या महिन्यातच दि. २४.११.२०१४, ०७.११.२०१५ व ०१.१२.२०१६ रोजी पाटण या
ठिकाणी जनता दरबारांचे आयोजन केले होते. या तिन्ही जनता दरबारास
तालुक्यातील जनतेने उत्स्फुर्त प्रतिसाद दिला होता.
दरम्यान दि. २० फेब्रुवारी २०१८ रोजी आयोजित केलेल्या चौथ्या जनता दरबारास जिल्हा प्रशासनाच्या
प्रमुख जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी,जिल्हा पोलिस अधिक्षक, सहयाद्री
व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालीका, सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ
साताराचे अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधिक्षक
अभियंता, सातारा सिंचन मंडळाचे अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे सातारा विभागाचे विभाग नियंत्रक
या सर्व जिल्हास्तरीय अधिकारी यांना निमंत्रित केले आहे. त्यामुळे
दि. २० फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वाजता
तहसिल कार्यालय,पाटण या ठिकाणी आयोजित केलेल्या जनता दरबारास पाटण
विधानसभा मतदार संघातील आम जनतेने बहुसंख्येने उपस्थित राहून आप-आपले प्रलंबित प्रश्न, समस्या तसेच विकास कामांबाबतच्या
अडचणींचा तातडीने निपटारा करण्यासाठी आपल्या समस्यांची लेखी निवेदने आमदार शंभूराज
देसाई यांचकडे सादर करावीत असे आवाहनही शेवटी पत्रकांत केले आहे.
No comments:
Post a Comment