पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून राज्याचे अर्थसंकल्पातून उभारण्यात आलेल्या ढेबेवाडी, ता. पाटण येथील ग्रामीण रुग्णालय इमारतीचे उदघाटन व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून मंजुर केलेल्या कंकवाडी ते कडववाडी बनपूरी रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दि.१६.०२.२०१८ रोजी सकाळी १०.०० वा करण्यात आले असून आमदार शंभूराज देसाई यांच्या विनंतीवरुन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. एकनाथ
शिंदे, आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत व सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना. विजय शिवतारे हे पाटण तालुक्याच्या दौ-यावर येत असून या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हे कार्यक्रम होणार असून ना. एकनाथ
शिंदे यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते बनपुरी याठिकाणी भव्य नागरी सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई यांच्या कार्यालयाकडून प्रसिध्दीपत्रकाव्दारे देण्यात आली आहे.
आमदार शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून राज्य शासनाच्या अर्थसंकल्पातून मौजे ढेबेवाडी, ता. पाटण येथील ग्रामीण रुग्णालयाचे नूतन इमारत उभारण्यात आली असून या इमारतीचा उदघाटन समारंभ राज्याचे आरोग्यमंत्री ना.डॉ.दिपक सावंत यांचे शुभहस्ते व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. एकनाथ
शिंदे यांचे अध्यक्षतेखाली व सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना. विजय शिवतारे यांचे प्रमुख उपस्थितीत सकाळी १०.०० वा. ढेबेवाडी,
ता. पाटण या ठिकाणी संपन्न होणार आहे. तसेच सन
२०१७-१८ चे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कंकवाडी बनपूरी ते कडववाडी बनपूरी या रस्त्याचा भूमिपूजन कार्यक्रम सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.एकनाथ
शिदे यांचे शुभहस्ते व आरोग्यमंत्री ना.डॉ.दिपक सावंत यांचे अध्यक्षतेखाली व सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना. विजय शिवतारे यांचे प्रमुख उपस्थितीत सकाळी १०.३० वा. मौजे बनपूरी, ता. पाटण या ठिकाणी होणार आहे. तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. एकनाथ
शिंदे यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा पाटण तालुक्याचेवतीने जाहिर नागरी सत्कार तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते होणार आहे. या प्रसंगी मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई, शिवदौलत बँकेचे चेअरमन ॲङ मिलिंद पाटील, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन डॉ. दिलीपराव
चव्हाण, माजी सभापती सौ. वनिता
नारायण कारंडे, माजी उपसभापती डी. आर. पाटील, कारखान्याचे संचालक विकास गिरी गोसावी, वसंत कदम, सुरेश
पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरी या कार्यक्रमांस ढेबेवाडी विभागातील कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी मोठया संख्येन उपस्थित रहावे, असे आवाहन बनपूरी येथील शंभूराज युवा संघटना व शिवसेना ढेबेवाडी विभाग व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले असल्याचेही पत्रकात म्हंटले आहे.
No comments:
Post a Comment