पाटण
तालुक्यातील डोंगरपठारावरील गावे आजही मुलभूत सोयी सुविधापासून वंचित आहेत. या
लोकांच्यासमोर अनेक नागरी समस्यांचा डोंगर उभा आहे. वन्यप्राण्यांचा हल्ला असो की
शासनाच्या सुविधा असो येथील ग्रामस्थांना मदतीसाठी झगडावे लागत आहे. यापूर्वी येथे
उभा राहिलेल्या पवनउर्जा प्रकल्पामध्ये स्थानिक शेतकरी भरडला गेला. त्यांच्या
अज्ञानाचा फायदा घेवून कवडीमोल दराने जमिन खरेदी झाल्या. त्या फसवणूक झालेल्या
शेतकर्यांनी वाड्याच्या पायर्या झिजवल्या पण त्यांना न्याय मिळाला नाही. आपण
सत्तेत आल्यानंतर त्या लोकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यांना
मुलभूत सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी आपण कटीबद्ध असून मिळालेल्या सत्तेचा वापर
हा सर्वसामान्य जनतेच्या विकासाकरिता झाला पाहिजे यादृष्टीने माझी वाटचाल सुरू
आहे. ज्या विरोधकांना जनतेने पोत्यानी मते दिली त्याच विऱोधकांनी जनतेची दिशाभूल
केली. त्यामुळे विकासाच्या नावाखाली दिशाभूल करणार्या विरोधकांना आगामी विधानसभा
निवडणूकीत धडा शिकवावा असे आवाहन आमदार शंभूराज देसाई यांनी केले.
वाटोळे ता. पाटण येथे मुख्यमंत्री
पेयजल योजनेअंतर्गत नळपाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन आणि येथील रस्त्याचे भूमीपूजन व
सभामंडपाचे उद्गाटन अश्या संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास मोरणा
शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, शिवदौलत बॅकेचे चेअरमन अॅड. मिलिंद पाटील, माजी सभापती सौ. मुक्ताबाई माळी, डोंगरी संघटनेचे अध्यक्ष हणमंतराव
मिसाळ, उपाअध्यक्ष जगन्नाथ शिर्के, चंद्रकांत पवार, राम झोरे, राम पवार, सरपंच मनोज पवार, संतोष पवार, सिताराम पवार, मनोज पवार, मरड, धनगरवाडी, मिसाळवाडी, घाणबी, तामकडे, घेरादातेगड, वनकुसवडे या गावातील ग्रामस्थांची
उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई
म्हणाले की, पाटण तालुक्यातील डोंगरपठारावरील
गावामुळे आज वन्यजीवसृष्टी सुरक्षित आहे. परंतु येथील ग्रामस्थ सुरक्षित नाही.
विकासाच्या नावाखाली खाजगी कंपन्यानी केलेले अतिक्रमण स्थानिक शेतकर्याच्या मुळावर
उठले आहे. त्यामुळे वन्यप्राण्याचे माणसांच्यावर हल्ले वाढले आहेत. या
ग्रामस्थांना मदतीसाठी झगडावे लागत आहे. पवनउर्जा प्रकल्पामध्ये स्थानिक शेतकरी
भरडल्याची अनेक घटनाही समोर आल्या. त्या अन्यायग्रस्त शेतकर्यांनी न्यायासाठी
वाड्य़ाच्या पायर्याही झिजवल्या. परंतु पवनउर्जा प्रकल्पाचे शिल्पकार असलेल्याकडून
त्या अन्यायग्रस्त शेतकर्यांना न्याय मिळाला नाही. आपण सत्तेत आल्यानंतर संबंधित
शेतकर्यांना न्याय मिळवून देण्याच प्रामाणिक प्रयत्न केला. निवडणूकापुरते
विरोधकांनी मते मागून डोंरपठारवरील लोकांचा विश्वासघात केला. यामध्ये फक्त खाजगी
कंपन्याच्या वाहनाकरिता डांबरीकरणे रस्ते करण्यात आले. परंतु सर्वसामान्य लोकांना
दळवळणासाठी माती व मुरूमाचे रस्ते सुद्धा मिळाले नाहीत. दळणवळणाची सोय नसल्याने ही
गावे विकासापासून वंचित राहील. येथील मुलांना शिक्षणासाठी चिखल मातीचे रस्ते तुडवत
जावावे लागत आहे. शुद्ध पिण्य़ाच्या पाण्याअभवी लोकांच्या आरोग्याचे प्रश्न गंभीर
बनत चालले आहेत. विजेअभावी अनेकांच्या घरात अंधार असल्याची परस्थिती आजही अनेक
घरात आहे. वन्यप्राण्याच हल्ला कुठून कधी आणि कसा होईल हे सांगता येणे कठीन
असल्याचे हद्य हेलवण्याच्या व्यथा येथील तरूण सांगताना आजही वाईट वाटते. येथील
कित्येक पिढ्या आज हा संघर्ष करीत जीवन जगल्या. स्थानिक लोकांना आता जाणीव होत आहे
की, पोत्यांनी ज्यांना मतदान केले त्या
विरोधकांनी विकासाच्या नावाखाली आपली दिशाभूल केली आहे. आपण सत्तेत आल्यानंतर त्या
लोकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यांना मुलभूत सोयी सुविधा
मिळवून देण्यासाठी आपण कटीबद्ध असून मिळालेल्या सत्तेचा वापर हा सर्वसामान्य
जनतेच्या विकासाकरिता झाला पाहिजे यादृष्टीने माझी वाटचाल सुरू आहे. त्यामुळे
विकासाच्या नावाखाली दिशाभूल करणार्या विरोधकांना आगामी विधानसभा निवडणूकीत धडा
शिकवावा असे आवाहन आमदार शंभूराज देसाई यांनी केले. दरम्यान वाटोळे गावातील
राष्ट्रवादी कॉग्रेसाच्या बहुसंख्य कार्यकर्त्यानी शिवसेनेत प्रवेश केला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक बबन माळी यांनी केले तर आभार धर्मेद्र पवार यांनी मानले.
No comments:
Post a Comment