Tuesday 27 February 2018

विकासकामाच्या माध्यमातून पाटण विधानसभेचा चेहरा मोहरा बदलणार – आमदार शंभूराज देसाई





 गेल्या तीन वर्षांच्या काळात तालुक्यातील प्रत्येक गांवात वाडी_वस्तीवर रस्ता पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी वीज बारमाही रस्ते पुल आदी कोट्यावधी रुपयांची विकासकामे करून तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा आपण प्रयत्न केला आहे. असे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाई यांनी केले. 
          ते कळंब व जळव येथे सुमारे पावणे तीन कोटी रुपयांच्या पाल तारळे जळव मनदुरे पाटण रस्त्यांच्या भूमिपुजन व कळंबे चावडी इमारत व साकव पुलाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. 
यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई शिवदौलत बँकेचे चेअरमन मिलिंद पाटील अभिजीत पाटील गजानन जाधव सोमनाथ खामकर युवराज नलवडे तुषार चव्हाण गौरव परदेशी जवळच्या सरपंच शितल कदम रुक्मिणी पवार सुवर्णा पवार ज्ञानदेव कदम कळंबेचे उपसरपंच रविंद्र जाधव विश्वास पवार गिरजाबाई जाधव सुभाष जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. 
           यावेळी आ. शंभूराज देसाई पुढे म्हणाले तारळे विभागातील विरोधी गटाचे उमेदवार जनतेची दिशाभूल करून निवडून आले.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पैशाचा वारेमाप वापर करून मतदारांना आमिष दाखवून मतापुरता उपयोग केला. परंतु निवडून आल्यानंतर उमेदवार इकडे पुन्हा फिरकले नाहीत. निवडणुकीपुरते आमिषे दाखवून मते मागायला येतात व जनता याला बळी पडते याची आपणास खंत वाटते. तारळे विभागाच्या सर्वच गावात आपण विकासकामे पोहचवली आहेत. लोकांनी जिल्हा परिषद निवडणुकीत धडा घेऊन यापुढे देसाई गटाच्या विकासात्मक वाटचालीत बरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे. तारळे विभाग हा देसाई गटाचा बालेकिल्ला आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी लोकांच्या पर्यंत विकासकामे पोहचवावी. सुज्ञ जनता विकास कामांच्या पाठीशी राहील. पाल तारळे मणदुरे पाटण रस्ता व्हावा अशी येथील जनतेची अनेक दिवसांपासून मागणी होती. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकरांनाही या रस्त्यासाठी एवढा प्रचंड निधी बांधकाम मंत्री असताना आणता आला नाही. यावरुन पाटणकरांची निष्क्रीयता दिसून येते. विकासकामे न करता केवळ निवडणूकी पुरते लोकांच्या दारात मताचा जोगवा मागायला जाणार्‍या विरोधकांना लोकांनी चांगलेच  ओळखले आहे. कराड चिपळूण हा 320 कोटींचा विना टोल रस्ता मंजुर करुन आणला. त्या रस्त्याचे काम प्रगती पथावर आहे. या रस्त्यासाठी कोणताही टोल आकारला जाणार नाही. परंतु याच रस्त्यांसाठी दादांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना सुद्धा दोन_दोन टोलनाके जनतेच्या मानगुटीवर बसवले होते. असा टोलाही आमदार शंभूराज देसाईंनी पाटणकरांना लगावला. आ. देसाई पुढे म्हणाले कळंबे ते डफळवाडी रस्त्याचे विरोधकांनी एक वर्षा पुर्वी भूमिपुजन केले होते. अजूनही या रस्त्यावर एक खडाही पडला नाही. स्वतः काम करायचे नाही दुसरा करतोय त्यात खो घालायचा अशी विरोधकांची प्रवृत्ती आहे त्यामुळे तारळे विभागातील जनतेनेही त्यांना खड्या सारखे बाजूला ठेवावे. कार्यकर्त्यांनी तीन वर्षात केलेली विकासकामे जनते पर्यंत पोहचवून तालुक्यात फक्त आ. शंभूराज देसाई माध्यमातून विकासकामांची गंगा सुरू आहे हे पटवून सांगावे. असे शेवटी आ.शंभूराज देसाई म्हणाले. शंकर पवार यांनी स्वागत व आभार मानले.

No comments:

Post a Comment