Tuesday 6 February 2018

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील दुस-या टप्प्यातील ५ रस्त्यांच्या कामांना ७ कोटी ६८ लाख ५८ हजार रुपयांच्या निधीची शासनाची मंजुरी. आमदार शंभूराज देसाईंची माहिती.



     राज्य शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत सन २०१७-१८ करीता सुचविण्यात आलेल्या कामांमध्ये दुस-या टप्प्यातील पाच रस्त्यांच्या कामांना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली असून या कामांना देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय शासनाच्या ग्रामविकास विभागाने   दि. ३१ जानेवारी व दि.०१ फेब्रुवारी, २०१८ रोजी पारित केले असून पाच रस्त्यांच्या कामांकरीता ७ कोटी ६८ लाख ५८ हजार रुपयांचा निधी मंजुर केला असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

    पत्रकामध्ये आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे की, पाटण तालुक्यातील ग्रामीण आणि डोंगरी भागातील मोठया रस्त्यांच्या कामांना राज्य शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत सन २०१७-१८ मध्ये आवश्यक असणारा निधी मंजुर करणेविषयी ग्रामीण आणि डोंगरी भागातील रस्त्यांच्या कामांचे प्रस्ताव शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या संबधित यंत्रणेमार्फत सादर करण्यात आले होते. यातील पहिल्या टप्प्यात चार कामांना राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने प्रशासकीय मान्यता देवून या चार रस्त्यांच्या कामांकरीता ७ कोटी ३३ लाख ५५ हजार रुपयांचा निधी मंजुर केला आहे. त्यानंतर दुस-या टप्पयात उर्वरित पाच रस्त्यांच्या कामांनाही मंजूरी देऊन राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने दि. ३१ जानेवारी, व दि.०१ फेब्रुवारी, २०१८ रोजी शासन निर्णय पारीत केले असून या पाच रस्त्यांच्या कामांकरीता ७ कोटी ६८ लाख ५८ हजार रुपयांचा निधी मंजुर केला आहे. यामध्ये गारवडे पोहोच रस्ता करणे १.५०० किमी ८८ लाख ६५ हजार, दुसाळे पोहोच रस्ता करणे २.४०० किमी १ कोटी ५६ लाख ८९ हजार, व मोरगिरी ते आंब्रग रस्ता करणेकरीता ३.४०० किमी १ कोटी ९८ लाख ९९ हजार,शिद्रुकवाडी पोहोच रस्ता ३.२०० किमी १ कोटी ६३ लाख ९७ हजार व आबदारवाडी पोहोच रस्ता १.७०० किमी १ कोटी १५ लाख १६ हजार रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. तर या पाचही कामांची पाच वर्षाकरीता नियमीत देखभाल दुरुस्ती करणेकरीता अनुक्रमे ७ लाख ३९ हजार, ८ लाख १२ हजार, ११ लाख २५ हजार, ११ लाख ०३ हजार व ७ लाख १३ हजार रुपयांची तरतूदही शासनाने केली असून ४४ लाख ९२ हजार रुपये नियमीत देखभाल दुरुस्ती कामासह एकूण ७ कोटी ६८ लाख ५८ हजार रुपयांचा निधी मंजुर करुन या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्याचा शासन निर्णय शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि. ३१ जानेवारी व दि.०१ फेब्रुवारी, २०१८ रोजी पारित केले आहेत दरम्यान पहिल्या टप्प्यातील वजरोशी ते चिंचेवाडी रस्ता, कंकवाडी बनपुरी ते कडववाडी बनपुरी रस्ता करणे,उरुल ते बोडकेवाडी रस्ता व मारुल तर्फ पाटण ते वाजेगांव रस्ता या चार रस्त्यांसह गारवडे पोहोच रस्ता, दुसाळे पोहोच रस्ता, मोरगिरी ते आंब्रग रस्ता शिद्रुकवाडी पोहोच रस्ता व आबदारवाडी पोहोच रस्ता या पाच अशा ९ मोठया रस्त्यांच्या पुनर्बांधणीच्या कामांकरीता सुमारे १५ कोटी ०२ लाख १३ हजार एवढा भरघोस निधी मंजूर केला असून या कामांच्या निविदा लवकरच प्रसिध्द होवून या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे, असेही आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकात म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment