Friday 23 February 2018

विकासकामे खेचून आणणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या पाठीशी जनता राहील-आमदार शंभूराज देसाई


     
                पाटण विधानसभा मतदारसंघात डोळ्यांना दिसतील अशी विकासकामे सुरू आहेत. असे एकीकडे चित्र असताना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक निकालामध्ये आपल्याला ठेच लागली. लागलेली ती ठेच सुधारण्याची संधी आपल्याला विधानसभा निवडणूकीमध्ये मिळणार आहे. राज्यात आणि केंद्रात आपली सत्ता आहे. मिळालेल्या सत्तेच्या माध्यमातून कधी नव्हती एवढी विकास कामे पाटण विधानसभा मतदारसंघात सुरू आहेत. त्यामुळे पाटण तालुक्यात आपल्याला विकासात्मक बदल झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. विकासकामे करण्य़ासाठी आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपलल्या हक्काचा आमदार मिळालेला आहे. त्यामुळे विकासकामे खेचून आणणार्या लोकप्रतिनिधीच्या पाठीशी जनता ताकदीने उभी राहिल असा ठाम विश्वास आमदार शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.
            माजगांव ता. पाटण येथील सर्वसाधारण साकव योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या साकव पूलाच्या भूमीपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, शिवदौलत बॅकेचे चेअरमन अॅड. मिलिंद पाटील, लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे व्हा. चेअरमन राजाराम पाटील, माजी संचालक बी. आर. पाटील, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष भरत साळुंखे, शिवदौलत बॅकेचे संचालक चंद्रकांत पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य डी. वाय. पाटील, दत्तात्रय वेल्हाळ, विजय पाटील, प्रकाश नेवगे, बी. डी. शिवदास, अशोक हिंगणे, अंकूश पाटील, गोरख चव्हाण, कृष्णत पाटील, अॅड. चंद्रकांत कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता घोडके, यांची प्रमुख उपस्थिती होती.
           याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले की, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक निकालानंतर विरोधकांना आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. परंतु त्यांची स्वप्नेच ठेवायची असतील तर आपल्याला आजपासूनच कामाला लागणे गरजेचे आहे. पाटण तालुक्यातील चाफळ विभागाला विकासाच्या बाबतीस नेहमीच झुकते माफ दिले आहे. यापूर्वी येथील ग्रामस्थांना विकासाच्या कामासाठी झगडावे लागत होते. जनतेच्या प्रश्नाची दखल घेतली जात नव्हती. सन 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणूकीत आमदार म्हणून नेतृत्व करण्याची संधी दिली. राज्यात आणि आणि केंद्रात शिवसेना भाजपची सत्ता आहे. मिळालेल्या सत्तेचा पुरेपुर वापर करीत आपण तालुक्यात तीन वर्षात मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. त्यामुळे पाटणमध्ये विकासात्मक चित्र पाहण्यास मिळत आहे. रस्त्याची, धरणांच्या पुनर्वसनाची नळपाणीपुरवठा योजना, छोटे मोठे साकव पुलांचे प्रश्न मार्गी लागताना दिसत आहे. आता आपल्याला विकासकामे करण्यासाठी हक्काचा आमदार मिळाला आहे.  जनतेचे प्रश्न जागेवर सोडवण्यासाठी जनता दरबाराच्या माध्यामातून लोकांना चांगले व्यासपीठ मिळाले आहे. सरकारी कामासाठी लोकांना थांबवे लागत नाही. एखादे काम थांबले तर जनता दरबारात त्या व्यक्तीला न्याय मिळू लागला आहे. त्यामुळे सामान्यातील सामान्य माणसामध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे पाहण्यास मिळत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीत विरोधकांनी दिलेल्या आश्वासनाची पुर्तता त्यांच्याकडून झाली का? याचा जाब विचारण्याची वेळ जनतेवर येवून ठेपली आहे. पाटण तालुक्याच्या विधानसभेची निवडणूक दोन वर्षावर येवून ठेपली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवणूकीत लागलेली ठेच सुधारण्याची संधी यानिमित्ताने आपल्याला मिळालेली आहे. अश्यातच एका पराजयाने खचून जाण्याएवढा देसाई गटाचा कार्यकर्ता दुबळा नाही हे आपण सर्वजण जाणतो. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकीत क्षणिक मोहाला बळी न पडता विकासात्मक राजकरणाच्या पाठमागे जनता ताकदीने उभी राहिल असा ठाम विश्वास आमदार शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला. चंद्रकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. राजाराम पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment