Monday 12 February 2018

आमदार शंभूराज देसाईकडून सुपने मंडलातील विकासकामांचा अधिका-यांसमवेत आढावा. मंजुर कामे तात्काळ मार्गी लावण्याच्या अधिका-यांना सुचना.


    पाटण विधानसभा मतदारसंघातील कराड तालुक्यातील सुपने मंडलातील गांवामध्ये आमदार म्हणून गत तीन वर्षात ७ कोटी ४८ लाख ३२ हजार रुपयांची कामे मंजुर केली आहेत तर पुढील आर्थिक वर्षाकरीता ३ कोटी ३१ लाख २० हजार रुपयांची कामे प्रस्तावित केली आहेत. यामध्ये ब-याच वर्षापासून मागणी असणा-या मौजे केसे,साजूर,पश्चिम सुपने व तांबवे या गावातील कोयना नदीकाठच्या पुरसंरक्षक भिंतीची कामांना भरघोस असा निधी मंजुर करुन आणला आहे तर आरेवाडी, बेलदरे व पश्चिम सुपने या तीन गांवाच्या नळ पाणी पुरवठा योजनेचा समावेश मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेमध्ये केला आहे त्याच्या निविदाही लवकरच प्रसिध्द होत आहेत. असे स्पष्ट करीत गत तीन वर्षात राबविलेल्या आणि राबवावयाच्या विविध विकासकामांचा आढावा पाटण मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांनी कराड तालुक्याचे सर्व शासकीय अधिकारी व कार्यकर्ते यांच्यासमवेत कराड विश्रामगृह याठिकाणी घेतला व मंजुर कामे तात्काळ मार्गी लावण्याच्या सुचना त्यांनी यावेळी सर्व शासकीय अधिकारी यांना दिल्या.
    कराड तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी यांची सुपने मंडलातील गावांमध्ये राबविलेल्या व राबवावयाच्या विकासकामांसंदर्भात सर्व गावातील प्रमुख ग्रामस्थांसमवेत आमदार शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली आढावा बैठक कराड विश्रामगृह याठिकाणी आयोजीत केली होती.याप्रसंगी बैठकीस कराडचे उपविभागीय अधिकारी हिम्मत खराडे,जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील,कराड खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष हणमंतराव चव्हाण,महेंद्र पाटील,सुपने मंडलाचे समन्वयक शिवदौलत बँकेचे चेअरमन ॲड.मिलींद पाटील, प्रभाकर शिंदे,गोविंदराव शिंदे, शिवाजीराव गायकवाड,लक्ष्मण देसाई, संदीप सावंत,अर्जुन कळंबे,सचिन पाटील,निवासी नायब तहसिलदार अजित कु-हाडे व बबनराव भिसे यांच्यासह सर्व शासकीय अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
   याप्रसंगी प्रारंभी आमदार शंभूराज देसाई यांनी सुपने मंडलातील प्रत्येक गावांमध्ये व वाडयांमध्ये आमदार म्हणून दिलेल्या विविध विकासकामांचा गावनिहाय आढावा घेतला.यामध्ये प्रत्येक गावांमध्ये शासनाच्या विविध लेखाशिर्षाखाली सुरु असलेल्या कामांची सदयस्थिती जाणून घेत मंजुर असणारी कामे तात्काळ मार्गी लावा अश्या सुचना करीत ग्रामस्थांकडून आलेल्या प्रत्येक सुचनासंदर्भात संबधित विभागाच्या अधिका-यांना विचारणा करुन ग्रामस्थांच्या प्रश्नांची त्यांनी जागेवर सोडवणूक केली. तसेच उर्वरीत राहिलेल्या कामांसंदर्भात प्रत्येक गावनिहाय माहिती घेवून कोणते विकासकाम हे कोणत्या योजनेमध्ये समाविष्ट करुन ते पुर्ण करता येईल यासंदर्भात अधिकारी व ग्रामस्थ यांचेबरोबर सविस्तर चर्चा करण्यात आली. गत तीन वर्षात ७ कोटी ४८ लाख ३२ हजार रुपयांची कामे मंजुर केली आहेत तर पुढील आर्थिक वर्षाकरीता ३ कोटी ३१ लाख २० हजार रुपयांची कामे प्रस्तावित केली आहेत. पुढे ज्याप्रमाणात कामे प्रस्तावित करावयाची आहेत ती कांमे तात्काळ प्रस्तावित करुन या कामांना निधी उपलब्ध देणेकरीता मी कटीबध्द आहे दरम्यान संबधित अधिकारी यांनी आराखडे तयार करुन पाठपुरावा करावा असे सांगत आरेवाडी, बेलदरे व पश्चिम सुपने या तीन गांवाच्या नळ पाणी पुरवठा योजनेचा समावेश मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेमध्ये केला आहे या कामांकरीता अनुक्रमे २१ लाख ३६ हजार ७३२ रु. ८ लाख ९१ हजार ४०६ रु व ४२ लाख २९ हजार ७८५ रु निधी मंजुर केला आहे त्याच्या निविदा तात्काळ प्रसिध्द करण्याची कार्यवाही पाणी पुरवठा विभागाने तात्काळ करावी अश्याही सुचना आमदार शंभूराज देसाई यांनी अधिका-यांना दिल्या. आढावा बैठकीत सार्वजनीक बांधकाम विभाग,जिल्हा परिषद बांधकाम विभाग, एमएसईबी, लघू पाटबंधारे विभाग,पाणी पुरवठा विभाग,महसूल विभाग,शिक्षण विभाग व आरोग्य विभागांतंर्गत स्थानिक विकास निधी, डोंगरी विकास निधी,जिल्हा नियोजन विभागाकडील प्राप्त निधीमधील कामांचा सविस्तर आढावा आमदार शंभूराज देसाई यांनी घेतला.याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई पुढे म्हणाले,सुपने मंडल हे कराड तालुक्यातील एक भाग आहे आणि तो पाटण मतदारसंघातील आहे त्यामुळे या तालुक्यातील अधिका-यांनी विकासकामांच्या संदर्भात तसेच ग्रामस्थांच्या वैयक्तीक अडीअडचणीसंदर्भात प्रशासनाने योग्य ते सहकार्य सुपने मंडलातील ग्रामस्थांना करावे. विकासकामांत कोणतीही हयगय चालू देणार नाही. ग्रामस्थांचे प्रश्न सोडविण्याकरीता अधिका-यांकडून जेवढे कराड तालुक्यातील इतर विभागांना प्राधान्य दिले जाते तेवढेच प्राधान्य सुपने मंडलातील ग्रामस्थांनाही देण्यात यावे असे ते शेवठी बोलताना म्हणाले. उपस्थितांचे स्वागत निवासी नायब तहसिलदार अजित कु-हाडे यांनी केले व आभार जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment