पाटण
मतदारसंघातील कराड चिपळूण या राज्यमार्गाला पर्यायी रस्ता असावा म्हणून साजूर ते
गारवडे- मारुलहवेली फाटा – पापर्डे- मोरगिरी ते मेंढेघर पासून नवजापर्यंतचा रस्ता
हा राज्याचे बांधकाम मंत्री राहिलेल्यांना मंत्रीपदाच्या काळात करता आला नाही तो
रस्ता मी केवळ आमदार म्हणून राज्यमार्ग करुन आणला. आज हा रस्ता पहा राज्यमार्गाला
साजेसा असा रस्ता तयार झाला आहे. या राज्यमार्गाला केंद्रीय मार्ग निधी मधून
गारवडे ते मोरगिरी भागापर्यंत पहिल्या टप्प्यात व दुस-या टप्पयात मोरगिरी ते नेरळे
या रस्त्याच्या कामांना निधी देण्याचे केंद्रीय मंत्री ना.नितीनजी गडकरी यांनी मला
आश्वासन दिले आहे त्यानुसार गारवडे ते मोरगिरी रस्त्याच्या कामांचा प्रस्ताव देखील
सादर झाला आहे त्यापुर्वी राज्याच्या अर्थसंकल्पातून हा रस्ता पुर्णत्वाकडे नेला
असल्याचे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाईंनी केले.
आमदार शंभूराज देसाई यांनी कोयना भूकंप पुर्नवसन
समितीकडून आणलेल्या निधीतुन करावयाच्या पापर्डे अंर्तगत रस्त्याचे भूमिपुजन पापर्डे
ता.पाटण याठिकाणी आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते
बोलत होते.यावेळी कार्यक्रमास मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,शिवदौलत
बँकेचे चेअरमन ॲड मिलींद पाटील,कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,जिल्हा परिषद
माजी सदस्या सौ.सुग्रा खोंदू, माजी सदस्य बशीर खोंदू, पंचायत समिती सदस्य संतोष
गिरी, पंचायत समिती माजी विरोधी पक्षनेते ॲड.डी.पी जाधव, जयवंतराव पाटील,कारखान्याचे
संचालक बबनराव भिसे,शिवशंभो दुध संघाचे चेअरमन अधिक पाटील,शिवदौलत बँकेच्या
संचालिका सौ.कुसुम मोहिते,राजाराम मोहिते,रामचंद्र पाटील,संरपच सुनंदा
थेटे,उपसरंपच उमेश देसाई, बांधकाम विभागाचे उपअभियंता वसंत खाडे, शाखा अभियंता राजाराम
खंडागळे या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.
याप्रसंगी
बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, मी केवळ आमदार आहे. तालुक्याचा आमदार म्हणून
तालुक्यातील गांवे आणि डोंगरी भागातील वाडयावस्त्या रस्त्याने जोडण्याकरीता माझा
कसोशीने प्रयत्न सुरु आहे. त्याचबरोबर मोठया गावांना जोडणारे रस्ते करण्याकरीता
राज्याच्या अर्थसंकल्पातून कोटयावधी रुपयांचा निधी पाटण तालुक्यातील रस्त्यांना आणण्यामध्ये
आपल्याला यश मिळाले आहे. आपल्या तालुक्यात राज्याचे सार्वजनीक बांधकाम खात्याचे
मंत्रीपद होते. या मंत्रीपदाच्या काळात आपल्या तालुक्यातील एकही रस्ता या माजी
बांधकाम मंत्री यांनी राज्यमार्ग करुन आणला नाही परंतू मी केवळ आमदार असताना पाटण
तालुक्यातील कराड चिपळूण रस्त्याला पर्यायी राज्यमार्ग व्हावा याकरीता शासनाकडे
सातत्याने प्रयत्न केले आणि कोयना नदीच्या दक्षिणेकडील साजूर ते गारवडे-
मारुलहवेली फाटा – पापर्डे- मोरगिरी ते मेंढेघर पासून नवजापर्यंतचा हा आपला रस्ता
राज्यमार्ग करुन घेण्यात मला यश मिळाले. गारवडे पासून मोरगिरी पर्यंत राज्याच्या
अर्थस्ंकल्पातून मोठया प्रमाणात निधी आणून या रस्त्याचे काम पुर्णत्वाकडे नेलेच
पंरतू या रस्त्यावर असणा-या पुलांच्या कामांनाही मोठया प्रमाणात निधी मंजुर करुन
आणला आज ही कामे मार्गी लागली आहेत. या राज्यमार्गाला केंद्रीय मार्ग निधी मधून
गारवडे ते मोरगिरी भागापर्यंत रुदीकरण करणेकरीता पहिल्या टप्प्यात व दुस-या
टप्पयात मोरगिरी ते नेरळे या रस्त्याच्या कामांना निधी देण्याचे केंद्रीय मंत्री
ना.नितीनजी गडकरी यांनी मला आश्वासन दिले आहे यासंदर्भात मी ना.गडकरी यांची पुणे
याठिकाणी जावून भेट घेतली आहे. लवकरच या कामांस निधी मंजुर होईल. २००४ पुर्वी या
रस्त्याची काय अवस्था होती परंतू २००४ आमदार झालेनंतर पहिल्यांदा गव्हाणवाडी फाटा
ते मारुलहवेली फाटा या रस्त्याचे काम हाती घेतले आणि पुर्णत्वाकडे नेले. २००९ नंतर
परत या रस्त्याची दुरावस्था झाली त्याकाळात आमदार राहिलेल्यांनी या रस्त्याकडे
पाहिले देखील नाही पण आता आपण हा रस्ता संपुर्ण पुर्ण करुन घेतला आहे.पापर्डे गावामध्ये सुमारे ७८ ते ८० लाख रुपयांची कामे
मंजुर झाली आहेत त्यातील अनेक पुर्ण देखील झाली आहेत. गावातील ग्रामस्थांच्या
मागण्या आहेत त्या पुर्ण करण्याकरीता मी कधीही कमी पडणार नाही.विरोधकांनी
निवडणूकीच्या काळात येवून येथील रस्त्यांसंदर्भात भूमिपुजन करण्याचे नाटक केले ते
नाटकच होते कारण त्यांना हा रस्ता भूमिपुजन करुनही पुर्ण करता आला नाही तो रस्ता
आपल्या माध्यमातून होत आहे याचा आनंद आहे. ही निवडणूक ते ती निवडणूक जनतेच्या दारात मते मागण्याकरीता जाणा-या
विरोधकांना विकासकामांच्या माध्यमातून आपण उत्तर दयायचे आहे. याकरीता ग्रामस्थांनी
एकजुटीने राहून आपला विकास साधून घ्यावा असेही आवाहन त्यांनी शेवठी बोलताना
सांगितले. उपस्थितांचे स्वागत अनिल पाटील महाराज यांनी करुन आभार विक्रम देसाई
यांनी मानले.
No comments:
Post a Comment