Saturday 27 October 2018

हरीतऊर्जा योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील ग्रामीण रस्त्याचे प्रस्ताव सादर करा. ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संबधित यंत्रणांना सुचना.




      पाटण तालुक्याच्या दौ-यावर आलेले राज्याचे ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचेकडे तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यातील डोंगरपठारावर जाणारे ग्रामीण रस्ते हे पवचनचक्की प्रकल्पांच्या अवजड साहित्यांच्या वाहतूकीमुळे मोठया प्रमाणात खराब झाले असून या कामांना आवश्यक असणारा निधी मंजुर करावा अशी मागणी ऊर्जामंत्री यांचेकडे केल्यानंतर तातडीने पाटण तालुक्यातील या रस्त्यांचे प्रस्ताव हरीतऊर्जा योजनेतंर्गत मंजुरीकरीता सादर करावेत अशा सुचना जागेवर ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबधित यंत्रणांना दिल्या.
     राज्याचे ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार शंभूराज देसाई यांचे मागणीवरुन पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागातील पवचनचक्की प्रकल्पांच्या अवजड साहित्यांच्या वाहतूकीमुळे मोठया प्रमाणात खराब झालेल्या ग्रामीण रस्त्यांच्या कामांना यापुर्वी भरघोस असा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल पाटण मतदारसंघाच्या वतीने ऊर्जामंत्री यांचा जाहीर सत्कार केला. या सत्काराच्या दरम्यानच आमदार शंभूराज देसाईंनी पाटण तालुक्यात पवचनचक्की प्रकल्पांच्या अवजड साहित्यांच्या वाहतूकीमुळे खराब झालेल्या ११ रस्त्यांची कामे प्रलंबीत असून या कामांना आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन दयावा अशी आग्रही मागणी ऊर्जामंत्री यांचेकडे केल्यानंतर अशा रस्त्यांना निधी न देण्याचा शासनाने निर्णय घेतला असून आमदार शंभूराज देसाईंची आग्रही मागणी या खात्याचा मंत्री असल्याने मला मोडवत नसल्याने निर्णयात बदल करुन पाटण तालुक्यातील अशा रस्त्यांना हरीतऊर्जा योजनेतंर्गत निधी मिळणेकरीताचे प्रस्ताव तात्काळ मंजुरीकरीता सादर करावेत अशा सुचना त्यांनी अधिका-यांना दिल्या.यासंदर्भात आमदार शंभूराज देसाईंनी ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचे विशेष आभार मानले.
     आमदार शंभूराज देसाई यांनी ऊर्जामंत्री यांचेकडे मागणी केलेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये हुंबरणे ते पांढरेपाणी रस्ता ४ किमी, कोकीसरे नवलाईवॉर्ड ते गवळीनगर रस्ता ३ किमी, वेताळवस्ती काळगांव ते मस्करवाडी रस्ता १.५०० किमी, माईंगडेवाडी ते गणेशवाडी ते हौदाचीवाडी म्हाळुंगेवाडी ते सातर रस्ता ८.५००किमी, भोसगांव ते आंब्रुळकरवाडी ते कोळेकरवाडी रस्ता ७ किमी, कोळेकरवाडी अनुतेवाडी ते कारळे रस्ता ४ किमी, नेरळे ते गुंजाळी रस्ता ३ किमी, घेरादातेगड गावपोहोच रस्ता ३ किमी, गावडेवाडी फाटा ते धुईलवाडी रस्ता ३ किमी, काठीटेक ते अवसरी रस्ता ३.५०० किमी व रामेल फाटा ते रामेल रस्ता ३ किमी असे एकूण ४३.५०० किमी लांबीचे रस्ते सुचविले आहेत. ऊर्जामंत्री यांनी सदरचे प्रस्ताव मंजुरीकरीता सादर करण्याच्या सुचना संबधित यंत्रणांना दिल्या असल्याने या कामांना आवश्यक असणारा निधी मंजुर होईल अशी आशा आमदार शंभूराज देसाईंनी व्यक्त केली आहे.
चौकट:- दोन टप्प्यात मिळणार निधी- ऊर्जामंत्री यांनी केले जाहीर.
       आमदार शंभूराज देसाईंनी या ११ रस्त्यांच्या कामांसंदर्भात ऊर्जामंत्री यांचेशी सविस्तर अशी चर्चा केल्यानंतर या ११ कामांना दोन टप्प्यामध्ये निधी उपलब्ध करुन देण्याचे ऊर्जामंत्री यांनी मान्य केले आहे. २०१८ च्या डिसेंबरच्या अधिवेशनात व २०१९ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या कामांना निधी मंजुर करुन दिला जाईल असे ऊर्जामंत्री यांनी आमदार शंभूराज देसाईंना सांगितले आहे.


Wednesday 24 October 2018

नाडे-मरळी रस्त्याचे ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचे हस्ते शुक्रवारी नाडे येथे भूमिपुजन. पाटण विधानसभा मतदारसंघाच्या वतीने ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचा जाहीर सत्कार समारभांच्या अध्यक्षस्थानी आमदार शंभूराज देसाई.



      सन २०१८-१९ चे अर्थसंकल्पातून पाटण तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी मंजुर करुन आणलेल्या नाडे सांगवड-मंद्रुळकोळे- ढेबेवाडी प्रजिमा ५८ भाग नाडे नवारस्ता ते मरळी किमी ०/०० ते ५/०० या रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा करणे या कामांचा भूमिपुजन समारंभ राज्याचे ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचे शुभहस्ते शुक्रवार दि.२६.१०.२०१८ रोजी सकाळी ०९.३० वा नाडे नवारस्ता येथे आयोजीत केला असून या समारंभात ऊर्जा मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार शंभूराज देसाई यांच्या विनंतीवरुन राज्याच्या हरीतऊर्जा निधीमधून पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागातील ग्रामीण रस्त्यांच्या कामांना भरघोस असा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल पाटण विधानसभा मतदारसंघाच्या वतीने त्यांचा आमदार शंभूराज देसाईंचे जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी आमदार शंभूराज देसाई असणार असल्याची माहिती नाडे-सांगवड-गव्हाणवाडी- चोपदारवाडी व मरळी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने प्रसिध्दीस देण्यात आली आहे.
       पोफळी जलविद्युत प्रकल्पाच्या पहाणी दौ-यावर असणारे राज्याचे ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे हे शुक्रवार दि.२६.१०.२०१८ रोजी पाटण विधानसभा मतदारसंघाच्या दौ-यावर येत असून त्यांचे हस्ते आमदार शंभूराज देसाईंनी सन २०१८-१९ चे अर्थसंकल्पातून सुमारे ७.५० कोटी रुपयांचा मंजुर करुन आणलेल्या नाडे सांगवड-मंद्रुळकोळे- ढेबेवाडी प्रजिमा ५८ भाग नाडे नवारस्ता ते मरळी किमी ०/०० ते ५/०० या रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा करणे या कामांचा भूमिपुजन समारंभ त्यांचे हस्ते आयोजीत करण्यात आला आहे या समारंभात आमदार शंभूराज देसाईंच्या सातत्याच्या मागणीवरुन ऊर्जामंत्री यांनी राज्याच्या हरीतऊर्जा निधीमधून पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागातील ग्रामीण रस्त्यांच्या कामांना भरघोस असा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल पाटण विधानसभा मतदारसंघाच्या वतीने त्यांचा आमदार शंभूराज देसाईंचे जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. सदर समारंभ हा शुक्रवार दि.२६.१०.२०१८ रोजी सकाळी ०९.३० वा नाडे नवारस्ता येथे आयोजीत केला असून या समारंभास मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नाडे-सांगवड-गव्हाणवाडी- चोपदारवाडी व मरळी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. 

लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याकडे नोंद केलेला सर्व ऊस शेतकरी सभासदांनी गळीताकरीता दयावा. आमदार शंभूराज देसाईंचे सभासद शेतक-यांना आवाहन. शासनाच्या नियमाप्रमाणे ऊसाचा दर देणार.


सातारा जिल्हयातील असो व जिल्हयाच्या शेजारील जिल्हयातील साखर कारखाने असोत हे सर्व कारखाने ५०००, ७५०० व १२५०० मे.टन एवढया मोठया क्षमतेचे कारखाने असून या कारखान्याबरोबर पाटणसारख्या डोंगरी व अडचणीच्या भागातील १२५० मे.टन क्षमतेच्या आपल्या लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याला कोणत्याच बाबतीत स्पर्धा करुन चालणार नाही.कारण कारखान्याचे कार्यक्षेत्र पाहिल्यानंतर निम्माहून अधिेक क्षेत्र हे डोंगंरी भागात आहे. कोयनानदीकाठी अल्प प्रमाणात ऊसाचे कार्यक्षेत्र आहे.संपुर्ण पाटण तालुक्यातील ऊसाची लागवड पाहिली तर तीन ते साडेतीन लाख मे.टनाच्या वर जात नाही.ही वस्तूस्थिती असताना देखील आपले कारखान्याने कारखान्याच्या सभासंदाना व ऊस उत्पादक शेतक-यांना इतर मोठया कारखान्यांच्या बरोबरीने प्रतिवर्षी दर दिला आहे.त्यामुळे तालुक्यातील शेतक-यांनी व सभासदांनी कुणाच्याही सांगण्यावरुन कार्यक्षेत्रातील ऊस बाहेरच्या कारखान्यांना न घालता नोंद केलेला संपुर्ण ऊस हा आपलेच लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यास गळीताकरीता दयावा असे जाहीर आवाहन आमदार शंभूराज देसाईंनी कारखान्याच्या सभासदांना केले असून शासनाच्या नियमाप्रमाणे ऊस उत्पादकांना ऊसाचा दर देणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
 दौलतनगर,ता.पाटण याठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे ४५ व्या बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रमात आमदार शंभूराज देसाई बोलत होते.याप्रसंगी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,युवा नेते यशराज देसाई,जयराज देसाई,आदित्यराज देसाई,कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,माजी चेअरमन डॉ. दिलीपराव चव्हाण यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.प्रारंभी या कार्यक्रमा निमित्त कारखान्याचे संचालक शंकर शेजवळ व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.वंदना शेजवळ यांचे हस्ते सत्यनारायण महापूजा आयोजीत करण्यात आली होती.
याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,यापुर्वीच मी कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पाटणसारख्या डोंगरी व अडचणीच्या भागात वसलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याची कशी वाटचाल सुरु आहे.याचे स्पष्टीकरण दिले होते.सातारा जिल्हयातील पाटणसारख्या डोंगरी भागात १२५० इतक्या कमी गाळप क्षमतेचा व कोणताही उपपदार्थ नसलेल्या आपल्या देसाई सहकारी साखर कारखान्याने कारखान्यास उस पुरवठा करणा-या ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांना जिल्हयातील इतर मोठया क्षमतेच्या कारखान्यांच्या बरोबरीने मागील गळीत हंगामातील गाळप केलेल्या ऊसाला अनुदानासह २६०० रुपये अंतिम दर दिला आहे.कारखान्याच्या इतिहासातील हा उच्चांकी दर असून संपुर्ण महाराष्ट्रामध्ये १२५० मे. टन क्षमता असणा-या अनेक कारखान्यापैकी एकही कारखाना आपले कारखान्यासारखा दर या परिस्थितीमध्ये देवू शकणार नाही.ही वस्तूस्थिती आहे.साखर उद्योगातील मान्यवर व्यक्तीं मग ते कोणत्याही पक्षाचे असोत त्यांना जरी यासंदर्भात विचारणा केली तरी तेही याची स्पष्टोक्ती जाहीरपणे देवू शकतील.असे स्पष्ट करुन ते म्हणाले,कारखाना चालवित असताना वस्तूस्थितीची जाणिव ठेवूनच कारखान्यामध्ये पारदर्शी कारभार आपण करीत आहोत. विरोधासाठी विरोध करण्याचे प्रयत्न आपल्या विरोधकांचे नेहमीच असतात.राजकीय टिका होत असतानाही शेतक-यांच्या हिताचेच निर्णय आतापर्यंत कारखान्यांच्या संचालक मंडळाने घेतले आहेत.
गत दोन वर्षात कुणाच्या तरी सांगण्यावरुन तालुक्यातील शेतक-यांनी बाहेरच्या कारखान्यांना आपला ऊस घातला त्यांनी घातलेल्या ऊसाचा संपुर्ण दर तरी या शेतक-यांना मिळाला का? कोण तरी सांगतय म्हणून बाहेरच्या कारखान्यांना ऊस घालून कुणाचे नुकसान झाले या विरोधक मंडळींना शेतक-यांची एवढीच काळजी वाटते तर त्यांनी जाहीर केलेल्या कारखान्याची वीट कधी उभी राहणार याबदृल ही विरोधक मंडळी काहीच बोलत नाहीत याचाही विचार तालुक्यातील शेतक-यांनी करावा.आपल्याकडे कोयना नदीकाठचा ऊस सोडला तर डोंगरी भागातील ऊसाची रिकव्हरी सरासरी ११.४३ लागते आणि शेजारच्या कृष्णा काठी असणा-या ऊसाची रिकव्हरी सरासरी १२.४२ इतकी लागते. रिकव्हरीमध्ये एक टक्का जरी परिणाम झाला तर सुमारे ३०० ते ३५० रुपयांचा फरक पडतो.तसेच त्यांचे गाळप जास्त असल्याने उपपदार्थामधून त्यांना कमीत कमी १०० रुपये तर जास्तीत जास्त २०० रुपये मिळतात तर उत्पादन खर्चामध्ये १० ते १२ लाख मे.टन ऊस गाळप करण्याकरीता खर्च कमी येत असल्याने त्यामध्ये या कारखान्यांना १०० ते १२५ रुपयांचा फायदा होतो त्यामुळेच या मोठया क्षमतेच्या कारखान्यांना एका टनामागे ५०० ते ६०० रुपये जादा देणे सहज परवडते ही परिस्थिती आपल्या कारखान्याची नाही.मग सवंग लोकप्रियता मिळविण्याकरीता कारखान्यावर कर्ज काढायचे आणि या कर्जाचा बोजा कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांवर टाकायचा हे धोरण कारखान्याचा विश्वस्त म्हणून मी कधीही राबविले नाही आणि हे आमच्या धोरणामध्ये बसतही नाही.असेही त्यांनी शेवठी बोलताना स्पष्ट केले. समारंभास मोठया प्रमाणात सभासद कारखान्याचे अधिकारी,कर्मचारी यांची उपस्थिती होती.उपस्थितांचे आभार संचालक पांडुरंग नलवडे यांनी मानले.

Thursday 18 October 2018



आमदार शंभूराज देसाईंना तारळे विभागातील शेतक-यांनी पाणीदार आमदार म्हणून गौरविले.
धरणातून ५० मीटर वरील जमिनीला पाणी देण्याचा एैतिहासिक निर्णय करुन घेतलेबद्दल
आमदार शंभूराज देसाईंचा तारळे विभागाने केला भव्य नागरी सत्कार.

         पाटण तालुक्यातील तारळी मध्यम धरण प्रकल्पातील पाणी या विभागातील ५० मीटर हेडच्या वरील शेतीकरीता देणेचा एैतिहासिक निर्णय तालुक्याचे आमदार शंभूराज देसाईंनी राज्य शासनाकडून राज्य मंत्रीमंडळात करुन घेतलेबद्दल आणि आमच्या हक्काचे पाणी मोठया संघर्षातून त्यांनी आम्हाला मिळवून दिल्याबद्दल तारळे विभागातील तमाम जनता व शेतक-यांनी पाणीदार आमदार म्हणून आमदार शंभूराज देसाईंना गौरवून त्यांचा तारळे याठिकाणी भव्य असा नागरी सत्कार केला.सत्कार समारंभास शेतक-यांनी मोठया संख्येने उपस्थित राहून मोठा जल्लोष करीत या निर्णयाचे जंगी स्वागत केले व आमदार शंभूराज देसाई व युतीच्या राज्य शासनाचे उपस्थित शेतक-यांनी मोठया उत्साहाने जाहीर आभार मानले.
         तारळे ता.पाटण याठिकाणी तारळे विभागाकरीता एैतिहासिक आणि न भूतो न भविष्यती असा धोरणात्मक निर्णय तालुक्याचे आमदार शंभूराज देसाईंनी मोठया संघर्षातून दि.०९ ऑक्टोंबर रोजीच्या राज्य मंत्रीमंडळात युतीच्या शासनाकडून करुन घेतलेबद्दल व या कामांकरीता वाढीवचे ५५३ कोटी रुपये मंजुर करुन घेतलेबद्दल आमदार शंभूराज देसाईंचा शेतक-यांच्या वतीने भव्य नागरी सत्कार आयोजीत केला होता.यावेळी माजी पंचायत समिती सदस्य बबनराव शिंदे, शंभूराज युवा संघटना अध्यक्ष भरत साळुंखे,उपाध्यक्ष अभिजित पाटील,कारखान्याचे संचालक गजाभाऊ जाधव, सोमनाथ खामकर,बबनराव भिसे, माणिकशहा पवार,तारळे सरपंच अर्चना जरग,युवराज नलवडे,रामचंद्र देशमुख,विकास जाधव,प्रल्हाद पवार,बाळासाहेब सुर्यवंशी,रणजित शिंदे,बबन शिंदे,शंकर सावंत,पतंग सावंत,अमोल घाडगे,उत्तमराव कदम, राजेंद्र पवार,शिवाजी रांजणे,बाळू चव्हाण,पोपटराव साळूंखे,सागर सोनवले,मधुकर साळूंखे,विठ्ठलराव जाधव,अरुण पिंपळे, राहूडे सरपंच तुषार चव्हाण,संध्या मोरे,विश्वास निकम,बाबा चौधरी,तुकाराम कदम,रामचंद्र कदम,रविंद्र सपकाळ,घोट सरपंच मधुकर आरेकर,गौरव परदेशी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.
         याप्रसंगी बोलताना आमदार देसाई म्हणाले,तारळी मध्यम धरण प्रकल्पातील पाणी ५० मीटर हेडच्या वरील शेतीला देणे हा निर्णय करुन घेणे सोपे नव्हते,पाणी वाटप आणि व्याप्तीमध्ये बदल असल्याने या निर्णयाकरीता मोठा संघर्ष करावा लागला.२००९ ला धरणाच्या कार्यक्षेत्रात बंधिस्त कॅनॉलचे काम सुरु झालेनंतर हे पाणी आता आपल्या हातातून जाणार हे निश्चितच झाले होते.या तालुक्याच्या माजी आमदारांनी या विभागातील शेतक-यांना वा-यावर सोडून त्यांच्या नेत्यांचा मतदारसंघ हिरवागार करणेकरीता बंदिस्त कॅनॉलचा घाटच घातला होता.म्हणूनच त्यांनी आमदार असताना तारळी धरणाच्या माध्यमातून या विभागातील डोंगराकडेच्या शेतीचे इंच इंच क्षेत्र भिजले पाहिजे याकरीता विधानसभेत ना विधानसभेच्या बाहेर आपले तोंड देखील उघडले नाही.असा आरोप आमदार शंभूराज देसाईंनी केला.
           २००९ ला आपण हे पाणी या विभागातील १०० टक्के क्षेत्राला कोणत्याही परिस्थितीत मिळवायचेच याकरीता पाणी परिषदेच्या माध्यमातून सुरुवात केली.२००९ पासून तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आपला हा लढा सुरु होता त्यास या ९ तारखेला यश मिळाले. सलग ९ वर्षे सुरु असलेला हा संघर्ष आणि आपल्या हक्काचे जाणारे पाणी कुणी थांबविले आहे हे या विभागातील शेतक-यांनी व जनतेने उघडया डोळयांनी पाहिले आहे त्यामुळे माजी आमदारांनी कितीही भूलथापा दिल्या तरी या विभागातील सुज्ञ शेतकरी आता पाटणकरांच्या भूलथांपाना बळी पडणार नाहीत.मी एकटयानेच सर्व केले असे मी म्हणणार नाही आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन,वित्त मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार व जिल्हयाचे पालकमंत्री ना.विजय शिवतारे बापू यांच्या विशेष सहकार्यामुळे आपण हा लढा यशस्वी करु शकलो याचे मला खुप समाधान आहे.सातारा पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता विजय घोगरे यांचेही आभार मानणे तितकेचे गरजेचे आहे.केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्याच्या ३२ जिल्हयात २६ प्रकल्पांना प्रधानमंत्री सिचाई योजनेत सहभागी केले आहे यात आपल्या सातारा जिल्हयातील ५ प्रकल्प असून आपल्या पाटण तालुक्यातील तीन प्रकल्प आहेत. माजी आमदारांच्या काळात हे का शक्य होवू शकले नाही याचा विचार याच विभागाने नाहीतर तालुक्यातील जनतेने करणे गरजेचे आहे.प्रकल्पाची पहिली मान्यता १०५७ कोटींची होती आता मान्यता १६१० कोटी रुपयांची मिळाली आहे ५५३ कोटी रुपयांचा वाढीवचा निधी याकरीता देण्यात आला आहे. ५० मीटर हेडच्या एैतिहासिक निर्णयामुळे सुमारे १७ गांवातील २७२५ एकर जादाचे क्षेत्र ओलिताखाली येणार आहे भिजणारे हे क्षेत्र एकटया देसाई गटाच्या शेतक-यांचे भिजणार नाही संगळयांनाचा याचा फायदा होणार आहे.शेतक-यांनी आपला फायदा कुणामुळे होणार आहे हे ओळखून विकासाच्या प्रवाहामध्ये सामील व्हावे. केवळ निवडणूकीपुरते मतांचे राजकारण करणा-या विरोधकांना खडयासारखे बाजुला ठेवावे व त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.यावेळी बबनराव शिंदे,एस.के.वाघडोळे,गौरव परदेशी यांची भाषणे झाली.उपस्थितांचे स्वागत भाऊसाहेब जाधव यांनी केले आभार गजाभाऊ जाधव यांनी मानले.
चौकट:- पाणी अडविण्याचे ज्यांना जमले नाही ते काय पाणी देणार ?

       कृष्णा खोरे विकास महामंडळाचा जन्मच युतीच्या शासनाने घातला. धरणाच्या माध्यमातून शेतक-यांचे जीवनमान उंचावण्याचा निर्णयही युतीचे शासन घेत आहे आघाडी शासनाचा यामध्ये काडीचाही संबध नाही व आपले माजी आमदार जर यानिर्णयानंतर सोशल मिडीयावर त्यांची टिमकी वाजवित असतील तर दुर्दैव म्हणावे लागेल.सत्तेवर असताना जे करता आले नाही ते हातात काहीच नसताना आम्हीच केले म्हणणा-यांनी आता तरी या सवयी सोडाव्यात असा खरपुस समाचारही आमदार शंभूराज देसाईंनी पाटणकरांच्या सोशल मिडीयावरील चुकीच्या मोठेपणाचा घेतला.

Tuesday 16 October 2018

विजयादशमीच्या शुभमुहुर्तावर आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते देसाई कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रम.


          लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या सन २०१८-१९ च्या ४५ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ विजयादशमीचे शुभमुहुर्तावर गुरुवार दि. १८/१०/२०१८ रोजी सकाळी ११ वाजता लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुहाचे मार्गदर्शक व पाटण तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते कारखाना कार्यस्थळ दौलतनगर (मरळी) येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमानिमित्त कारखान्याचे संचालक राजेंद्र येडू गुरव व त्यांच्या पत्नी सौ. शिल्पा राजेंद्र गुरव यांचे हस्ते सत्यनारायण महापुजा आयेाजित केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
         प्रसिध्दी पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व पाटण तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली चालू गळीत हंगामाची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली असून मशिनरी ओव्हर ऑईलिंग व रिपेअरिंगची कामे पुर्णत्वाकडे आली आहेत. तसेच ऊस तोडणी व वाहतूकीसाठी आवश्यक तेवढया तोडणी मजूर यंत्रणेचे नियोजन झालेले असून या गळीत हंगामाध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद व बिगर ऊस उत्पादक सभासद यांनी कारखान्याचे शेती विभागाकडे नोंदवण्यात आलेल्या संपूर्ण ऊसाचे गाळप करण्याच्या दृष्टीने सर्व ते नियोजन झाले असून यंदाचाही गळीत हंगाम सर्वांच्या सहकार्यातून यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करीत लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुहाचे मार्गदर्शक व पाटण तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते यंदाच्या ४५ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ विजयादशमीचे शुभमुहुर्तावर गुरुवार दि. १८/१०/२०१८ रोजी दुपारी ११ वाजता कारखाना कार्यस्थळ, दौलतनगर (मरळी) येथे संपन्न होत असून या कार्यक्रमास कारखान्याचे सभासद बंधू-भगिनी, ऊस उत्पादक शेतकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी शेवटी प्रसिध्दीपत्रकांत केले आहे.

Saturday 13 October 2018

तारळे विभागात विकासकामांचा धडाका. आमदार शंभूराज देसाईंच्या हस्ते १ कोटी ४८ लाख रुपयांच्या विकासकामांची भूमिपुजने.



         गत चार वर्षात युती शासनाच्या माध्यमातून राज्याच्या तिजोरीतून सर्वात जास्त निधी सातारा ‍जिल्हयामध्ये पाटण तालुक्याच्या विकासासाठी आणला आहे. गाव तेथे विकास सुरु असून तारळे विभागात तर ९९ टक्के गावांत एक एक नाही तर दोन-दोन,तीन-तीन विकासकामे या चार वर्षात दिली आहे.गावाला जोडणारा रस्ता झाला की पाणी,पाणी झाले की साकव पुल,मोठा पुल,ग्रामपंचायत कार्यालय,अंगणवाडया,शाळा खोल्या, जलयुक्त शिवार योजनेतंर्गत लहान लहान बंधारे,मंदीरापुढील सभामंडप,डोंगरपठारावरील गांवाना जोडणारे रस्ते, स्मशानभूमिकडे जाणारे रस्ते,स्मशानभूमिची सुधारणा अशी अनेक जनतेची मुलभूत गरजा असणारी विकासकामे करण्याकरीता कोटयावधी रुपयांचा निधी मंजुर करुन आणला आहे.तारळे विभागात तर विकासकामांचा धडाकाच सुरु आहे.आपण करीत असलेल्या विविध विकासकामांमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली असून टिका करण्याव्यतिरिक्त त्यांचेकडे दुसरे कुठले कामच शिल्लक नसल्याने या विभागाने येणा-या विधानसभा निवडणूकीत विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता विकासकामांकडे बघून मतदान करावे असे जाहीर आवाहन आमदार शंभूराज देसाईंनी केले आहे.
         तारळे विभागातील विविध गांवातील विकासकांमाच्या भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमानंतर चिंचेवाडी वजरोशी ता.पाटण येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत रस्त्यांचे भूमिपुजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,माजी पंचायत समिती सदस्य बबनराव शिंदे,शंभूराज युवा संघटना उपाध्यक्ष अभिजित पाटील,कारखान्याचे संचालक गजाभाऊ जाधव,सोमनाथ खामकर,माणिकशहा पवार, बबनराव भिसे,बाळासाहेब सुर्यवंशी,ॲङ अमोल माने,शिवाजी रांजणे,पोपटराव साळूंखे,सागर सोनवले,मधुकर साळूंखे,प्रदिप नेवगे,राहूडे सरपंच तुषार चव्हाण,संध्या मोरे,रविंद्र सपकाळ,युवराज नलवडे,घोट सरपंच मधुकर आरेकर,गौरव परदेशी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.
         याप्रसंगी बोलताना आमदार देसाई म्हणाले,मतदारसंघात विविध विकासकामांसाठी निधी देताना गावात आणि वाडीवस्तीवर मला मतदान किती झाले हे न बघता गरज कोणाला आहे याचा विचार करुन या चार वर्षात विविध विकासकामे मतदारसंघात दिली.२०१४ च्या निवडणूकीत जी जी आश्वासने मतदारसंघातील जनतेला दिली होती ती ती आश्वासने पुर्ण करण्याचे काम आमदार म्हणून मी करीत आहे.मागील आणि आत्ताच्या जिल्हा परिषद निवडणुकीत काय झाले हे मी बोलणार नाही परंतू या दोन्ही निवडणूकीत विरोधकांनी या विभागातील जनतेला दिलेली आश्वासने तरी पूर्ण केलीत का? केवळ निवडणूकीपुरते मते मागायला येणा-या विरोधकांना विकासकामांचा जाब विचारण्याची वेळ आली आहे,त्यांच्या हातात देण्यासारखे खुप काही असताना ते जनतेला देवू शकले नाहीत आता हातात देण्यासारखे काही नसताना ते जनतेला काय देणार आहेत.आज आपल्या गरजा विकासकामांच्या माध्यमातून कोण पुर्ण करीत आहे.हे पाहणे गरजेचे आहे.असे सांगत आमदार शंभूराज देसाई म्हणाले,येणा-या निवडणूकीत विकासकामांच्या मुद्दयावर मतदारसंघात मतदान झाले तर भविष्यातील या मतदारसंघाचा आमदार कोण हे सांगण्याकरीता कोणत्या जोतिष्याची गरज लागणार नाही.मतदारसंघातील जनतेने केवळ भूलथापांना बळी न पडता विकासकामांकडे बघून येणा-या विधानसभा निवडणूकीत मतदान करावे पुढील पाच वर्षात गावा गावात विकासाचे काम करायला शिल्लक राहणार नाही. अशी ग्वाही त्यांनी शेवठी बोलताना दिली.
       यावेळी आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते एका दिवसात कडवे खुर्द वळण बंधारा १३ लाख,कडवे बुद्रुक सभामंडप ०७.५० लाख, आवर्डे फाटा ते भुडकेवाडी रस्ता १५.०० लाख,राहुडे सभामंडप ७.५० लाख व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील वजरोशी ते चिंचेवाडी रस्ता ०१ कोटी ०६ लाख ४९ हजार अशा एकूण दिड कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ करण्यात येवून वजरोशी ०७ लाख रुपयांच्या सभामंडपाचे उद्घाटनही करण्यात आले.
चौकट:- विरोधी गटातील चिंचेवाडी व करमाळे गावांतील शेकडो कार्यकर्त्यांचा देसाई गटात प्रवेश.
       पाटणकर गटातून एकदा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढविलेले चिंचेवाडी येथील नाथाजी पुजारी यांनी त्यांच्या चार भावांसह तसेच करमाळयातील नारायण मोहिते, सदाशिव मोहिते, पशुपती मोहिते, हरीबा मोहिते, रघूनाथ मोहिते, वंसत मोहिते, दिनकर मोहिते, ज्ञानेश्वर मोहिते, जालिंदर मोहिते, राजाराम मोहिते, बजरंग मोहिते, अशोक मोहिते, अमोल मोहिते, शिवाजी मोहिते, संतोष मोहिते व रघूनाथ मोहिते यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी देसाई गटात प्रवेश केला.प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार आमदार शंभूराज देसाईंच्या हस्ते करण्यात आला.



Friday 12 October 2018

तारळे विभागातील शेतकरी बांधवाकडून आमदार शंभूराज देसाईंचा मंगळवारी भव्य नागरी सत्कार. युती शासनाचे मानले जाणार जाहीर आभार.दि.१६ ऑक्टोंबर रोजी दु.०४.०० वा तारळेत समारंभ.




पाटण तालुक्यातील कृष्णा खोरे विकास महामंडळातंर्गत तारळी मध्यम धरण प्रकल्पातील पाणी तारळे विभागातील ५० मीटर हेडच्या वरील शेतीकरीता देणेस पाटण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांनी सातत्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा करुन या प्रस्तावास दि.०९ ऑक्टोंबर रोजीच्या राज्य मंत्रीमंडळाची मान्यता मिळवून घेतलेबद्दल तारळे विभागातील तमाम शेतकरी बंधू भगिनींच्यावतीने उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचा भव्य नागरी सत्कार व युती शासनाचे जाहिर आभार समारंभ मंगळवार दि.१६.१०.२०१८ रोजी दुपारी ०४.०० वा.मौजे तारळे,ता.पाटण येथे आयोजित केला असल्याची माहिती तारळे विभागातील शेतकरी बंधू भगिनी,शिवसेना पाटण तालुका व शंभूराज युवा संघटना पाटण तालुका,तारळे विभागातील पदाधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
    पत्रकामध्ये म्हंटले आहे की,पाटण तालुक्यातील कृष्णा खोरे विकास महामंडळातंर्गत तारळी मध्यम धरण प्रकल्पातील पाणी या विभागातील ५० मीटर हेडपर्यंतच्या शेतीला देण्याचे नियोजीत होते या नियोजनामुळे तारळे विभागातील डोंगराकडेच्या बहूतांशी गांवातील शेतजमिन ही या पाण्यापासून वंचीत रहात होत्या ही बाब या विभागातील शेतक-यांवर अन्याय करणारी असून तारळी धरणातील पाणी या विभागातील शेतक-यांच्या १०० टक्के जमिनक्षेत्राला मिळालेच पाहिजे यासंदर्भात प्रथमत: आमदार शंभूराज देसाई यांनी विधानसभेत आवाज उठविला त्यानंतर २००९ ते २०१४ आमदार नसताना देखील त्यांनी यासंदर्भात या विभागात अनेकदा पाणी परिषदा घेवून शेतक-यांमध्ये जनजागृती केली. २०१४ ला पुनश्च: आमदार झालेनंतर तारळी धरणातील ५० मीटर हेडचा विषय तर त्यांनी सातत्याने युतीच्या राज्य शासनाकडे लावून धरला. गेली साडेचार वर्षे ते तारळी धरण प्रकल्पातील पाणी या विभागातील ५० मीटर हेडच्या वरील शेतीला मिळाले पाहिजे याकरीता शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत होते.२०१६ साली दि.०८.डिसेंबर,२०१६ रोजी या प्रस्तावास आमदार शंभूराज देसाईंनी तत्वत: मान्यतादेखील मिळवून दिली आहे. व्याप्तीत व पाणी वाटपामध्ये बदल असल्याने या प्रस्तावास राज्य मंत्रीमंडळाची मान्यता घेणे आवश्यक असल्याने राज्य मंत्रीमंडळाची मान्यता कोणत्याही परिस्थितीत शासनाकडे पाठपुरावा करुन मिळवायचीच आणि या विभागातील शेतक-यांना न्याय मिळवून दयायचा असा चंगच आमदार शंभूराज देसाईंनी मनाशी बांधला होता.त्यानुसार गेली चार वर्षे ते सातत्याने राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेकडे पाठुपरावा करीत होते त्यांच्या पाठपुराव्याला दि.०९ ऑक्टोंबर रोजीच्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत युतीच्या शासनाने यश मिळवून देत तारळे विभागातील शेतक-यांचे जीवनमान उंचावण्याकरीता युतीच्या शासनाने धोरणात्मक आणि एैतिहासिक निर्णय घेतला आणि तारळी मध्यम धरण प्रकल्पातील पाणी तारळे विभागातील ५० मीटर हेडच्या वरील शेतीकरीता देणेस राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत विशेष बाब म्हणून मान्यता दिली. व ५० मीटरवरील पाणी देणेच्या योजनांच्या कामांना वाढीवचे ५५३ कोटी मंजुर करुन दिले ही मान्यता मिळवून घेणेकरीता आमदार शंभूराज देसाईंचे योगदान खुप मोलाचे असल्याने तारळे विभागातील सर्व शेतकरी बंधू-भगिनींनी आमदार शंभूराज देसाईंचा शासनाच्या या एैतिहासिक निर्णयाबद्दल भव्य नागरी सत्कार व युती शासनाचे जाहिर आभाराच्या समारंभाचे आयोजन केले आहे.
  मंगळवार दि.१६.१०.२०१८ रोजी दुपारी ०४.०० वा.मौजे तारळे,ता.पाटण येथे भव्य नागरी सत्कार व युती शासनाचे जाहिर आभार सोहळा तारळे विभागातील सर्व शेतकरी बंधू-भगिनींनी मोठया उत्साहाने आयोजित केला या सोहळयास तारळे विभागातील तमाम शेतकरी बंधू-भगिनींनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समस्त शेतकरी बंधू भगिनी,शिवसेना पाटण तालुका व शंभूराज युवा संघटना,पाटण तालुका,तारळे विभाग यांचेवतीने करण्यात आले आहे.
     

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत ४ रस्त्यांच्या कामांना ८ कोटी ०१ लक्ष रुपयांच्या निधीची शासनाची मंजुरी. आमदार शंभूराज देसाईंची माहिती.



     राज्य शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत संशोधन व विकास अंतर्गत सन २०१७-१८ करीता सुचविण्यात आलेल्या चार रस्त्यांच्या कामांना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली असून या कामांना देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि.१० ऑक्टोंबर,२०१८ रोजी पारित केला असून चार रस्त्यांच्या कामांकरीता ८ कोटी ०१ लाख २५ हजार रुपयांचा निधी मंजुर केला असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
    पत्रकामध्ये आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे की, पाटण तालुक्यातील ग्रामीण आणि डोंगरी भागातील मोठया रस्त्यांच्या कामांना राज्य शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत संशोधन व विकास अंतर्गत सन २०१७-१८ मध्ये आवश्यक असणारा निधी मंजुर करणेविषयी चार कामांचे प्रस्ताव शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे गतवर्षी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या संबधित यंत्रणेमार्फत सादर करण्यात आले होते. या कामांना राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने प्रशासकीय मान्यता देवून या चार रस्त्यांच्या कामांकरीता ८ कोटी ०१ लाख २५ हजार रुपयांचा निधी मंजुर दिला आहे. यामध्ये महाबळवाडी ते सडादाढोली रस्ता करणे २.५०० किमी १ कोटी ५४ लाख ३२ हजार,जळवखिंड ते जांभेकरवाडी रस्ता करणे १.२५० किमी ८८ लाख ६० हजार,शिरळ ते मिरासवाडी रस्ता करणे १.२५० किमी ७६ लाख ६४ हजार व गणेवाडी ठोमसे पोहोच रस्ता करणेकरीता ५.५६० किमी ४ कोटी ४१ लाख १६ हजार रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे तर या चारही कामांची पाच वर्षाकरीता नियमीत देखभाल दुरुस्ती करणेकरीता अनुक्रमे सडादाढोली रस्ता ९ लाख ४१ हजार, जांभेकरवाडी रस्ता ०४ लाख ९३ हजार,मिरासवाडी रस्ता ४ लाख ३७ हजार व गणेवाडी ठोमसे रस्ता २१ लाख ८२ हजार रुपयांची तरतूदही शासनाने केली असून या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्याचा शासन निर्णय शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि.१० ऑक्टोंबर,२०१८ रोजी पारित केला आहे या कामांच्या निविदा लवकरच प्रसिध्द होवून या कामांना लवकरच सुरुवात होईल असेही आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकात म्हंटले असून सदरचे ग्रामीण भागातील अडचणीतील हे रस्ते पुर्ण करण्याकरीता आमदार शंभूराज देसाई यांनी विशेष प्रयत्न केल्यामुळे या चार गांवातील ग्रामस्थांनी आमदार शंभूराज देसाई यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Thursday 11 October 2018

तालुक्यातील युवकांच्या गराडयात युवा नेते यशराज देसाईंचा वाढदिवस उत्साहात साजरा. युवकांच्या आग्रहास्तव दौलतनगरला झालेल्या वाढदिवसामुळे युवकांच्या उत्साहात वाढ.


        पाटण तालुक्यातील युवकांच्या आग्रहास्तव दि.१०ऑक्टोंबर रोजी पाटणचे युवा नेते यशराज देसाई (दादा) यांचा वाढदिवस दौलतनगर ता.पाटण याठिकाणी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.युवकांच्या गराडयात आणि मांदियाळीत सुमारे तीन ते चार तास वाढदिवसाच्या शुभेच्छा स्विकारणारे युवा नेते यशराज देसाई (दादा) यांचा यंदाच्या वर्षी युवकांच्या आग्रहास्तव दौलतनगरला आयोजीत केलेल्या वाढदिवसामुळे पाटण तालुक्यातील युवकांच्या उत्साहामध्ये वाढ झाली असून यशराज देसाईंचा वाढदिवस पाटण तालुक्यातील युवक वर्गाने उत्सवाप्रमाणे तालुक्यात साजरा केला.
       पाटणचे लोकप्रिय आमदार उत्कृष्ट संसदपटु यांचे चिरंजीव आणि अल्पावधीतच पाटण तालुक्यातील युवकांच्या गळयातील ताईत बनलेले यशराज देसाई यांचेकडे पाटण तालुक्यातील युवकवर्ग हा पाटणचे युवा नेतृत्व म्हणून पाहू लागला आहे.तालुक्यातील युवक वर्गात यशराज देसाई यांची मोठी के्रझ असून तालुक्यातील विविध निवडणूकीच्या प्रचाराच्या माध्यमातून तसेच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून यशराज देसाई यांनी आपल्या अभ्यासू वकृत्वशैलीमुळे युवकांच्या मनामध्ये युवा नेतृत्वाचे स्थान पटकावले आहे.यंदाच्या वर्षी यशराज यांचा वाढदिवस हा दौलतनगर ता.पाटण याठिकाणी साजरा करावयाचा असा आग्रह पाटण तालुक्यातील युवा वर्गाने केला त्याप्रमाणे हा वाढदिवस कारखाना कार्यस्थळावर मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला.
       सुरवातीस तालुक्याचे मुख्यव्दार असणा-या चाफळ फाटा याठिकाणी चाफळ विभागाच्या वतीने यशराज देसाईंचे जंगी स्वागत तालुक्यात करण्यात आले.त्यानंतर त्यांनी मरळी गावची ग्रामदैवत श्री निनाई देवीचे दर्शन घेवून    कै.सौ.वत्सलादेवी देसाई(ताईसाहेब),स्व.शिवाजीराव देसाई(आबासाहेब) यांचे समाधी व पुर्णाकृती पुतळा,लोकनेते बाळासाहेब देसाई पुर्णाकृती पुतळयास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करुन कारखाना कार्यस्थळावरील श्री गणेशाचे दर्शन घेतले. कारखाना कार्यस्थळावर वाढदिवसानिमित्त त्यांचे हस्ते शालेय मुलांना खाऊवाटप,शालेय साहित्यांचे वाटप  करण्यात आले.युवा कार्यकर्त्यांनी व शंभूराज युवा संघटना पाटण तालुका यांच्यावतीने करण्यात आलेल्या आवाहनानुसार शुभेच्छा देणा-या प्रत्येक कार्यकर्त्यांनी हार,तुरे,गुच्छ न आणता मोठया प्रमाणात शालेय साहित्य,वहया यशराज देसाईंना शुभेच्छांच्या रुपाने भेट दिल्या.पाटण तालुक्यातील प्रत्येक विभागातील युवक तसेच आमदार शंभूराज देसाईंच्या नेतृत्वा खालील विविध संस्थांचे प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी यशराज देसाईंची दुपारी ०४ वाजेपर्यंत कारखाना कार्यस्थळावर भेट घेवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दुपारी ०४ नंतर सातारा येथील निवासस्थानी त्यांनी श्रीमती विजयादेवी देसाई मासाहेब,आई सौ.स्मितादेवी देसाई, काकी सौ.अस्मितादेवी देसाई यांचे आर्शिवाद घेतले. भगिनी ईश्वरी देसाई, बंधू जयराज देसाई व आदित्यराज देसाई यांचेकडून शुभेच्छा स्विकारल्या.
      सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दुरध्वनीवरुन यशराज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.दौलतनगरला प्रारंभी वडील आमदार शंभूराज देसाई,चुलते मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांचे यशराज यांनी आर्शिवाद घेतले.कारखाना कार्यस्थळावर प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रामहरी भोसले,नायब तहसिलदार राजेंद्र तांबे,कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,शिवदौलत बँकेचे चेअरमन ॲड.मिलींद पाटील,माजी उपसभापती डी आर पाटील,कारखान्याचे व्हाईस चेअरमन राजाराम पाटील,संचालक अशोक डिगे,बबनराव भिसे,गजानन जाधव,आंनदराव चव्हाण,शशिकांत निकम,सोमनाथ खामकर विकास गिरी गोसावी,शिवसेना उपजिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,माजी सभापती सौ.मुक्ताबाई माळी,जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,सुग्रा खोंदू, प्रदिप पाटील तांबवे,पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई,सुरेश पानस्कर,सौ.सुभद्रा शिरवाडकर,सौ.सिमा मोरे,बशीर खोंदू,नथुराम कुंभार,माजी संचालक टि डी जाधव,बबनराव शिंदे,अशोकराव पाटील रासाटी, बबनराव माळी,सदानंद साळुंखे,शंभूराज युवा संघटनेतील भरत साळुंखे,अभिजित पाटील,नाना साबळे,अंकुश महाडिक, मनोज मोहीते,माणिक पवार,एकनाथ जाधव,गौरव परदेशी,संजय पवार,सचिन जाधव,रणजित पाटील,तुषार चव्हाण, उत्तम मोळावडे,शंकर पवार,किसन गालवे,गणेश भिसे,बाबा मोकाशी,सुनील शेडगे,मुजम्मील खोंदु,विष्णु पवार,दादा जाधव,अभय आफळे,शंकर देसाई,डॉ.विजय संकपाळ,मनोज पाटील,जोतिराज काळे,सुरेश कदम,सचिन पाटील बेलदरे, सुरेश जाधव,राजाराम मोहिते,शंकर साळुंखे नथुराम सावंत,जयवंत पवार,धनंजय केंडे,दिलिपराव जानुगडे,प्रकाश तवटे, दिलीप सपकाळ,अशोक पाटील तळीये,अमोल पाटील,विजय शिंदे,रमेश गालवे,दिनकर कोळेकर,तुषार देशमुख,प्रसाद देवळेकर,विनायक भोमकर,संदिप,राजेश चव्हाण,गोविंद गोटुगडे,बाळासाहेब सुर्यवंशी,महेश पाटील,दिलीप भिलारे,रणजित शिंदे, विकास देशमुख,सुनील देसाई, संजय जाधव,नेताजी मोरे,विश्वास निकम,शंकर माने,नवनाथ पाळेकर या प्रमुख युवा कार्यकर्त्यांसह तालुक्याच्या प्रत्येक विभागातील शंभूराज युवा संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी यशराज देसाई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Tuesday 9 October 2018

पवनचक्की वाहतूकीमुळे खराब झालेल्या ८ रस्त्यांच्या कामांना १६ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजुर. प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय दि.०८ ऑक्टोंबर रोजी पारित. आमदार शंभूराज देसाईंची माहिती.­­


­­
     पाटण तालुक्यात पवनऊर्जा प्रकल्पाच्या अवजड वाहतूकीमुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या कामांना आवश्यक असणारा निधी मिळणेकरीता राज्याचे ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचेकडे माझा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. पाटण तालुक्यात पवनचक्कीच्या अवजड वाहतूकीमुळे खराब झालेल्या एकूण ८ रस्त्यांची कामे ऊर्जामंत्री यांचेकडे प्रस्तावित केली होती या ८ रस्त्यांच्या कामांना १६ कोटी ५० लाख रुपयांचा निधी आवश्यक होता आवश्यक असणारा तो निधी राज्याचे ऊर्जामंत्री यांनी मंजुर केला असून या कामांना दिलेल्या प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागामार्फत दि.०८ ऑक्टोंबर, २०१८ रोजी पारित केला असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे. 
      आमदार शंभूराज देसाईंनी दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, पाटण तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगावर मोठया प्रमाणात पवनऊर्जा प्रकल्प साकारण्यात आला आहे.या पवनऊर्जा प्रकल्पांच्या अवजड साहित्यांच्या वाहतुकीमुळे तालुक्यातील डोंगरपठारावर जाणा-या ग्रामीण रस्त्यांची मोठया प्रमाणात दुरावस्था झाली होती. या दुरावस्था व वाहतूकीच्यादृष्टीने अत्यंत खराब झालेल्या रस्त्यांच्या कामांना आवश्यक असणारा निधी मंजुर होणेकरीता राज्याचे ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचेकडे पाटण तालुक्यातील ८ ग्रामीण रस्त्यांची कामे प्रस्तावित केली होती. या रस्त्यांना आवश्यक असणारा निधी मंजुर होणेकरीता सन २०१७ च्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये तारांकीत प्रश्न तसेच लक्षवेदी सुचनाही मांडली आहे.लक्षवेदी सुचनेला उत्तर देताना यांनी आमदार शंभूराज देसाईंच्या मागणीनुसार पवनऊर्जा प्रकल्पाच्या वाहतूकीमुळे खराब झालेल्या ०८ रस्त्यांच्या कामांना आवश्यक असणारा १६ कोटी ५० लाख रुपयांचा निधी तात्काळ उपलब्ध करुन देण्यात येईल असे उत्तर दिले होते. त्यानुसार राज्याचे ऊर्जामंत्री यांनी पाटण तालुक्यात पवनऊर्जा प्रकल्पांच्या अवजड वाहतूकीमुळे खराब झालेल्या गावडेवाडी ते खुडुपलेवाडी रस्ता ग्रामा ६४ ची दुरुस्ती करणे ३.०० किमी करीता १ कोटी ८ लाख ७८ हजार, घोट ते जन्नेवाडी ग्रामा ३९ ची दुरुस्ती करणे ७.०० किमीकरीता १ कोटी ३६ लाख,९४ हजार,ढेबेवाडी उमरकांचन जिंती रस्ता इजिमा १३८ भाग जिंती मोडकवाडी ते सातर १०.०० किमीकरीता ३ कोटी ८९ लाख ४२ हजार,डावरी ते चोपडेवाडी ते भालेकरवाडी रस्ता दुरुस्ती करणे १.७०० किमीकरीता ८८ लाख १३ हजार,सातेवाडी नाटोशी ते जाधववाडी नाटोशी रस्ता दुरुस्ती करणे ४.००किमीकरीता १ कोटी २३ लाख, करपेवाडी ते टेटमेवाडी रस्ता ग्रामा ३६५ ची दुरुस्ती करणे ५.७०० किमीकरीता २ कोटी ४८ लाख ४० हजार,लोटलेवाडी काळगाव ते डाकेवाडी ते कसणी रस्ता दुरुस्ती करणे ७.०० किमीकरीता ३ कोटी ७४ लाख ११ हजार, व तळमावले कुंभारगांव मान्याचीवाडी मोरेवाडी माटेकरवाडी ते वरपेवाडी रस्ता दुरुस्ती करणे ५.०० किमीकरीता १ कोटी ८१ लाख २३ हजार असे एकूण १६ कोटी ४९ लाख ९७ हजार रुपयांचा निधी आठ कामांना मंजुर करण्यात आला आहे. या कामांना दिलेल्या प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागामार्फत दि.०८ ऑक्टोंबर, २०१८ रोजी पारित करण्यात आला आहे. लवकरच या कामांचा निविदा सार्वजनीक बांधकाम विभाग, सातारा यांच्या मार्फत प्रसिध्द करण्यात येतील व या कामांना लवकरात लवकर सुरुवात करण्यात येईल असे आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकात म्हंटले आहे. दरम्यान पाटण तालुक्यातील डोंगरी आणि दुर्गम भागातील हे मोठया लांबीचे रस्ते आमदार शंभूराज देसाईंनी विशेष प्रयत्न करुन मंजुर करुन आणलेबद्दल या आठ गांवातील जनतेने आमदार शंभूराज देसाईंचे प्रत्यक्ष भेटून आभार व्यक्त करुन त्यांना धन्यवाद व्यक्त केले आहेत.
चौकट:- कोटींच्या आकडयाकरीता माजी आमदार पुत्रांनी या चार वर्षातील शासन निर्णय काढून पहावेत.
माजी आमदार पुत्र मी जाहीर करीत असलेले कोटींचे आकडे खरे का खोटे आहेत हे तालुक्यातील जनतेला चांगलेच माहिती आहेत. तुम्हाला ते दिसत नाहीत आठच रस्त्यांच्या कामांकरीता १६ कोटी ५० लाखांचा निधी मंजुर करुन आणला आहे. माजी आमदारपुत्रांना याची खात्री करावयाची असेल तर त्यांनी दि.०८ ऑक्टोबर,२०१८ रोजीचा उद्योग,ऊर्जा व कामगार विभागाचा शासन निर्णय काढून पहावा.यासारखे अनेक शासन निर्णय या चार वर्षात शासनाकडून करुन घेतले आहेत.असे अनेक शासन निर्णय त्यांना शासन दफतरी पहावयास मिळतील असेही आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे.

Monday 1 October 2018

सांगवड,बनपेठ येराड व गुंजाळी गावच्या पुरसंरक्षक भिंतीचे प्रस्ताव मान्यतेला सादर करा. आमदार शंभूराज देसाईंच्या मागणीवरुन मंत्री ना.गिरीश महाजनांच्या मंत्रालयीन अधिका-यांना सुचना.



दौलतनगर दि.01: पाटण विधानसभा मतदारसंघातील कोयना नदीकाठी वसलेल्या गावांना कोयना नदीस अतिवृष्टीच्या काळात येणा-या पुरामुळे धोका निर्माण होत असल्याने या गावांना पुरसंरक्षक भिंती बांधण्यास व कोयना नदीवर घाट बांधणेस जलसंपदा विभागाने निधी उपलब्ध करुन द्यावा अशी या विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाईंची आग्रहाची मागणी होती.त्यांनी यासंदर्भात लक्षवेदी सुचना देखील मांडली होती.त्यानुसार साजूर,तांबवे बौध्दवस्ती,नेरळे,गिरेवाडी,पश्चिम सुपने,केसे व मंद्रुळहवेली या सात गांवाना जलसंपदा विभागाने मान्यताही दिली आहे.त्या कामांच्या निविदाही प्रसिध्द झाल्या आहेत.उर्वरीत सांगवड,बनपेठ येराड व गुंजाळी या तीन गांवाचे प्रस्ताव मान्यतेकरीता जलसंपदा विभागाकडे सादर झाले आहेत त्या प्रस्तावांना तात्काळ मान्यता देणेकरीता सदरचे तीन प्रस्ताव लगेचच सादर करा अशा सुचना जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांनी आमदार शंभूराज देसाईंच्या विनंतीवरुन मंत्रालयीन अधिका-यांना दिल्या.
              राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन हे पाटण आणि सातारा दौ-यावर आले असताना पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी पाटण विधानसभा मतदारसंघातील कोयना नदीकाठी वसलेल्या सांगवड,बनपेठ येराड व गुंजाळी या तीन गांवाना पुरसंरक्षक भिंती बांधणे व कोयना नदीवर घाट बांधणे या कामांचे प्रस्तावाना जलसंपदा विभागाने मान्यता देणेचे प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे प्रलंबीत असल्याची बाब जलसंपदा मंत्री यांचे निदर्शनास आणून दिल्यानंतर जलसंपदा मंत्री ना.महाजन यांनी तात्काळ भ्रमणध्वनीवरुन मंत्रालयीन अधिका-यांना पाटण विधानसभा मतदारसंघातील उर्वरीत सांगवड,बनपेठ येराड व गुंजाळी या तीन गांवाचे पुरसंरक्षक भिंती बांधणे व कोयना नदीवर घाट बांधणे या कामांचे प्रस्ताव तात्काळ मान्यतेकरीता सादर करा अशा सुचना दिल्या. यावेळी आमदार शंभूराज देसाईंनी जलसंपदा मंत्री यांचे आभार व्यक्त केले.पाटण मतदारसंघातील कोयना नदीकाठी वसलेल्या उर्वरित सांगवड गावाच्या पुरसंरक्षक भिंती बांधणे व कोयना नदीवर घाट बांधणेकरीता 5 कोटी 43 लाख 72 हजार, बनपेठवाडी (येराड) 2 कोटी 3८ लाख 8७ हजार व गुंजाळीकरीता 3 कोटी 46 लाख 85 हजार असे अंदाजपत्रक संबधित यंत्रणेकडून तयार करण्यात आले आहे.या तीन गावांचे प्रस्ताव रक्कम रुपये २ कोटीच्या वरील असल्याने शासनाकडे मंजुरीकरीता प्रलंबीत राहिले आहेत.राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ याची दखल घेवून मंत्रालयीन अधिकारी यांना मान्यतेसंदर्भात सुचना केल्याने लवकरच या उर्वरीत तीन गांवाच्या कामांनाही आवश्यक असणारा अंदाजपत्रकानुसारचा निधी मंजुर होवून ही कामे सुरु करता येतील असा विश्वास आमदार शंभूराज देसाईंनी व्यक्त केला आहे. 
चौकट:- पुरसरंक्षण भिंतीच्या कामांकरीता १० टक्के लोकवर्गणीचीही अट शिथील करण्यास मान्यता.
             पुरसरंक्षण भिंतीच्या कामांकरीता १० टक्के लोकवर्गणी भरण्याचा शासन निर्णय असून मतदारसंघातील साजूर,तांबवे बौध्दवस्ती,नेरळे,गिरेवाडी,पश्चिम सुपने,केसे व मंद्रुळहवेली या सात गांवाना ही लोकवर्गणी भरणे शक्य नसल्याने या सर्व कामांसदर्भातील १० टक्के लोकवर्गणीचीच अट शिथील करावी अशी मागणी आमदार शंभूराज देसाईंनी जलसंपदामंत्री यांचेकडे केल्यानंतर तातडीने जलसंपदा मंत्री ना.महाजन पाटण मतदारसंघातील पुरसंरक्षक भिंतीच्या कामांची १० टक्के लोकवर्गणीची अट शिथील करण्यास मान्यता दिली असून तशाप्रकारच्या सुचनाही त्यांनी भ्रमणध्वनीवरुन मंत्रालयीन जलसंपदा अधिका-यांना दिल्या.