लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या सन २०१८-१९ च्या ४५ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ विजयादशमीचे शुभमुहुर्तावर गुरुवार दि. १८/१०/२०१८ रोजी सकाळी ११ वाजता लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुहाचे मार्गदर्शक व पाटण तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते कारखाना कार्यस्थळ दौलतनगर (मरळी) येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमानिमित्त कारखान्याचे संचालक राजेंद्र येडू गुरव व त्यांच्या पत्नी सौ. शिल्पा राजेंद्र गुरव यांचे हस्ते सत्यनारायण महापुजा आयेाजित केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
प्रसिध्दी पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व पाटण तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली चालू गळीत हंगामाची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली असून मशिनरी ओव्हर ऑईलिंग व रिपेअरिंगची कामे पुर्णत्वाकडे आली आहेत. तसेच ऊस तोडणी व वाहतूकीसाठी आवश्यक तेवढया तोडणी मजूर यंत्रणेचे नियोजन झालेले असून या गळीत हंगामाध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद व बिगर ऊस उत्पादक सभासद यांनी कारखान्याचे शेती विभागाकडे नोंदवण्यात आलेल्या संपूर्ण ऊसाचे गाळप करण्याच्या दृष्टीने सर्व ते नियोजन झाले असून यंदाचाही गळीत हंगाम सर्वांच्या सहकार्यातून यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करीत लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुहाचे मार्गदर्शक व पाटण तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते यंदाच्या ४५ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ विजयादशमीचे शुभमुहुर्तावर गुरुवार दि. १८/१०/२०१८ रोजी दुपारी ११ वाजता कारखाना कार्यस्थळ, दौलतनगर (मरळी) येथे संपन्न होत असून या कार्यक्रमास कारखान्याचे सभासद बंधू-भगिनी, ऊस उत्पादक शेतकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी शेवटी प्रसिध्दीपत्रकांत केले आहे.
No comments:
Post a Comment