Wednesday, 24 October 2018

लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याकडे नोंद केलेला सर्व ऊस शेतकरी सभासदांनी गळीताकरीता दयावा. आमदार शंभूराज देसाईंचे सभासद शेतक-यांना आवाहन. शासनाच्या नियमाप्रमाणे ऊसाचा दर देणार.


सातारा जिल्हयातील असो व जिल्हयाच्या शेजारील जिल्हयातील साखर कारखाने असोत हे सर्व कारखाने ५०००, ७५०० व १२५०० मे.टन एवढया मोठया क्षमतेचे कारखाने असून या कारखान्याबरोबर पाटणसारख्या डोंगरी व अडचणीच्या भागातील १२५० मे.टन क्षमतेच्या आपल्या लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याला कोणत्याच बाबतीत स्पर्धा करुन चालणार नाही.कारण कारखान्याचे कार्यक्षेत्र पाहिल्यानंतर निम्माहून अधिेक क्षेत्र हे डोंगंरी भागात आहे. कोयनानदीकाठी अल्प प्रमाणात ऊसाचे कार्यक्षेत्र आहे.संपुर्ण पाटण तालुक्यातील ऊसाची लागवड पाहिली तर तीन ते साडेतीन लाख मे.टनाच्या वर जात नाही.ही वस्तूस्थिती असताना देखील आपले कारखान्याने कारखान्याच्या सभासंदाना व ऊस उत्पादक शेतक-यांना इतर मोठया कारखान्यांच्या बरोबरीने प्रतिवर्षी दर दिला आहे.त्यामुळे तालुक्यातील शेतक-यांनी व सभासदांनी कुणाच्याही सांगण्यावरुन कार्यक्षेत्रातील ऊस बाहेरच्या कारखान्यांना न घालता नोंद केलेला संपुर्ण ऊस हा आपलेच लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यास गळीताकरीता दयावा असे जाहीर आवाहन आमदार शंभूराज देसाईंनी कारखान्याच्या सभासदांना केले असून शासनाच्या नियमाप्रमाणे ऊस उत्पादकांना ऊसाचा दर देणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
 दौलतनगर,ता.पाटण याठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे ४५ व्या बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रमात आमदार शंभूराज देसाई बोलत होते.याप्रसंगी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,युवा नेते यशराज देसाई,जयराज देसाई,आदित्यराज देसाई,कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,माजी चेअरमन डॉ. दिलीपराव चव्हाण यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.प्रारंभी या कार्यक्रमा निमित्त कारखान्याचे संचालक शंकर शेजवळ व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.वंदना शेजवळ यांचे हस्ते सत्यनारायण महापूजा आयोजीत करण्यात आली होती.
याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,यापुर्वीच मी कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पाटणसारख्या डोंगरी व अडचणीच्या भागात वसलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याची कशी वाटचाल सुरु आहे.याचे स्पष्टीकरण दिले होते.सातारा जिल्हयातील पाटणसारख्या डोंगरी भागात १२५० इतक्या कमी गाळप क्षमतेचा व कोणताही उपपदार्थ नसलेल्या आपल्या देसाई सहकारी साखर कारखान्याने कारखान्यास उस पुरवठा करणा-या ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांना जिल्हयातील इतर मोठया क्षमतेच्या कारखान्यांच्या बरोबरीने मागील गळीत हंगामातील गाळप केलेल्या ऊसाला अनुदानासह २६०० रुपये अंतिम दर दिला आहे.कारखान्याच्या इतिहासातील हा उच्चांकी दर असून संपुर्ण महाराष्ट्रामध्ये १२५० मे. टन क्षमता असणा-या अनेक कारखान्यापैकी एकही कारखाना आपले कारखान्यासारखा दर या परिस्थितीमध्ये देवू शकणार नाही.ही वस्तूस्थिती आहे.साखर उद्योगातील मान्यवर व्यक्तीं मग ते कोणत्याही पक्षाचे असोत त्यांना जरी यासंदर्भात विचारणा केली तरी तेही याची स्पष्टोक्ती जाहीरपणे देवू शकतील.असे स्पष्ट करुन ते म्हणाले,कारखाना चालवित असताना वस्तूस्थितीची जाणिव ठेवूनच कारखान्यामध्ये पारदर्शी कारभार आपण करीत आहोत. विरोधासाठी विरोध करण्याचे प्रयत्न आपल्या विरोधकांचे नेहमीच असतात.राजकीय टिका होत असतानाही शेतक-यांच्या हिताचेच निर्णय आतापर्यंत कारखान्यांच्या संचालक मंडळाने घेतले आहेत.
गत दोन वर्षात कुणाच्या तरी सांगण्यावरुन तालुक्यातील शेतक-यांनी बाहेरच्या कारखान्यांना आपला ऊस घातला त्यांनी घातलेल्या ऊसाचा संपुर्ण दर तरी या शेतक-यांना मिळाला का? कोण तरी सांगतय म्हणून बाहेरच्या कारखान्यांना ऊस घालून कुणाचे नुकसान झाले या विरोधक मंडळींना शेतक-यांची एवढीच काळजी वाटते तर त्यांनी जाहीर केलेल्या कारखान्याची वीट कधी उभी राहणार याबदृल ही विरोधक मंडळी काहीच बोलत नाहीत याचाही विचार तालुक्यातील शेतक-यांनी करावा.आपल्याकडे कोयना नदीकाठचा ऊस सोडला तर डोंगरी भागातील ऊसाची रिकव्हरी सरासरी ११.४३ लागते आणि शेजारच्या कृष्णा काठी असणा-या ऊसाची रिकव्हरी सरासरी १२.४२ इतकी लागते. रिकव्हरीमध्ये एक टक्का जरी परिणाम झाला तर सुमारे ३०० ते ३५० रुपयांचा फरक पडतो.तसेच त्यांचे गाळप जास्त असल्याने उपपदार्थामधून त्यांना कमीत कमी १०० रुपये तर जास्तीत जास्त २०० रुपये मिळतात तर उत्पादन खर्चामध्ये १० ते १२ लाख मे.टन ऊस गाळप करण्याकरीता खर्च कमी येत असल्याने त्यामध्ये या कारखान्यांना १०० ते १२५ रुपयांचा फायदा होतो त्यामुळेच या मोठया क्षमतेच्या कारखान्यांना एका टनामागे ५०० ते ६०० रुपये जादा देणे सहज परवडते ही परिस्थिती आपल्या कारखान्याची नाही.मग सवंग लोकप्रियता मिळविण्याकरीता कारखान्यावर कर्ज काढायचे आणि या कर्जाचा बोजा कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांवर टाकायचा हे धोरण कारखान्याचा विश्वस्त म्हणून मी कधीही राबविले नाही आणि हे आमच्या धोरणामध्ये बसतही नाही.असेही त्यांनी शेवठी बोलताना स्पष्ट केले. समारंभास मोठया प्रमाणात सभासद कारखान्याचे अधिकारी,कर्मचारी यांची उपस्थिती होती.उपस्थितांचे आभार संचालक पांडुरंग नलवडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment