Friday, 12 October 2018

तारळे विभागातील शेतकरी बांधवाकडून आमदार शंभूराज देसाईंचा मंगळवारी भव्य नागरी सत्कार. युती शासनाचे मानले जाणार जाहीर आभार.दि.१६ ऑक्टोंबर रोजी दु.०४.०० वा तारळेत समारंभ.




पाटण तालुक्यातील कृष्णा खोरे विकास महामंडळातंर्गत तारळी मध्यम धरण प्रकल्पातील पाणी तारळे विभागातील ५० मीटर हेडच्या वरील शेतीकरीता देणेस पाटण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांनी सातत्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा करुन या प्रस्तावास दि.०९ ऑक्टोंबर रोजीच्या राज्य मंत्रीमंडळाची मान्यता मिळवून घेतलेबद्दल तारळे विभागातील तमाम शेतकरी बंधू भगिनींच्यावतीने उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचा भव्य नागरी सत्कार व युती शासनाचे जाहिर आभार समारंभ मंगळवार दि.१६.१०.२०१८ रोजी दुपारी ०४.०० वा.मौजे तारळे,ता.पाटण येथे आयोजित केला असल्याची माहिती तारळे विभागातील शेतकरी बंधू भगिनी,शिवसेना पाटण तालुका व शंभूराज युवा संघटना पाटण तालुका,तारळे विभागातील पदाधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
    पत्रकामध्ये म्हंटले आहे की,पाटण तालुक्यातील कृष्णा खोरे विकास महामंडळातंर्गत तारळी मध्यम धरण प्रकल्पातील पाणी या विभागातील ५० मीटर हेडपर्यंतच्या शेतीला देण्याचे नियोजीत होते या नियोजनामुळे तारळे विभागातील डोंगराकडेच्या बहूतांशी गांवातील शेतजमिन ही या पाण्यापासून वंचीत रहात होत्या ही बाब या विभागातील शेतक-यांवर अन्याय करणारी असून तारळी धरणातील पाणी या विभागातील शेतक-यांच्या १०० टक्के जमिनक्षेत्राला मिळालेच पाहिजे यासंदर्भात प्रथमत: आमदार शंभूराज देसाई यांनी विधानसभेत आवाज उठविला त्यानंतर २००९ ते २०१४ आमदार नसताना देखील त्यांनी यासंदर्भात या विभागात अनेकदा पाणी परिषदा घेवून शेतक-यांमध्ये जनजागृती केली. २०१४ ला पुनश्च: आमदार झालेनंतर तारळी धरणातील ५० मीटर हेडचा विषय तर त्यांनी सातत्याने युतीच्या राज्य शासनाकडे लावून धरला. गेली साडेचार वर्षे ते तारळी धरण प्रकल्पातील पाणी या विभागातील ५० मीटर हेडच्या वरील शेतीला मिळाले पाहिजे याकरीता शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत होते.२०१६ साली दि.०८.डिसेंबर,२०१६ रोजी या प्रस्तावास आमदार शंभूराज देसाईंनी तत्वत: मान्यतादेखील मिळवून दिली आहे. व्याप्तीत व पाणी वाटपामध्ये बदल असल्याने या प्रस्तावास राज्य मंत्रीमंडळाची मान्यता घेणे आवश्यक असल्याने राज्य मंत्रीमंडळाची मान्यता कोणत्याही परिस्थितीत शासनाकडे पाठपुरावा करुन मिळवायचीच आणि या विभागातील शेतक-यांना न्याय मिळवून दयायचा असा चंगच आमदार शंभूराज देसाईंनी मनाशी बांधला होता.त्यानुसार गेली चार वर्षे ते सातत्याने राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेकडे पाठुपरावा करीत होते त्यांच्या पाठपुराव्याला दि.०९ ऑक्टोंबर रोजीच्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत युतीच्या शासनाने यश मिळवून देत तारळे विभागातील शेतक-यांचे जीवनमान उंचावण्याकरीता युतीच्या शासनाने धोरणात्मक आणि एैतिहासिक निर्णय घेतला आणि तारळी मध्यम धरण प्रकल्पातील पाणी तारळे विभागातील ५० मीटर हेडच्या वरील शेतीकरीता देणेस राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत विशेष बाब म्हणून मान्यता दिली. व ५० मीटरवरील पाणी देणेच्या योजनांच्या कामांना वाढीवचे ५५३ कोटी मंजुर करुन दिले ही मान्यता मिळवून घेणेकरीता आमदार शंभूराज देसाईंचे योगदान खुप मोलाचे असल्याने तारळे विभागातील सर्व शेतकरी बंधू-भगिनींनी आमदार शंभूराज देसाईंचा शासनाच्या या एैतिहासिक निर्णयाबद्दल भव्य नागरी सत्कार व युती शासनाचे जाहिर आभाराच्या समारंभाचे आयोजन केले आहे.
  मंगळवार दि.१६.१०.२०१८ रोजी दुपारी ०४.०० वा.मौजे तारळे,ता.पाटण येथे भव्य नागरी सत्कार व युती शासनाचे जाहिर आभार सोहळा तारळे विभागातील सर्व शेतकरी बंधू-भगिनींनी मोठया उत्साहाने आयोजित केला या सोहळयास तारळे विभागातील तमाम शेतकरी बंधू-भगिनींनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समस्त शेतकरी बंधू भगिनी,शिवसेना पाटण तालुका व शंभूराज युवा संघटना,पाटण तालुका,तारळे विभाग यांचेवतीने करण्यात आले आहे.
     

No comments:

Post a Comment