Saturday 27 October 2018

हरीतऊर्जा योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील ग्रामीण रस्त्याचे प्रस्ताव सादर करा. ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संबधित यंत्रणांना सुचना.




      पाटण तालुक्याच्या दौ-यावर आलेले राज्याचे ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचेकडे तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यातील डोंगरपठारावर जाणारे ग्रामीण रस्ते हे पवचनचक्की प्रकल्पांच्या अवजड साहित्यांच्या वाहतूकीमुळे मोठया प्रमाणात खराब झाले असून या कामांना आवश्यक असणारा निधी मंजुर करावा अशी मागणी ऊर्जामंत्री यांचेकडे केल्यानंतर तातडीने पाटण तालुक्यातील या रस्त्यांचे प्रस्ताव हरीतऊर्जा योजनेतंर्गत मंजुरीकरीता सादर करावेत अशा सुचना जागेवर ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबधित यंत्रणांना दिल्या.
     राज्याचे ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार शंभूराज देसाई यांचे मागणीवरुन पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागातील पवचनचक्की प्रकल्पांच्या अवजड साहित्यांच्या वाहतूकीमुळे मोठया प्रमाणात खराब झालेल्या ग्रामीण रस्त्यांच्या कामांना यापुर्वी भरघोस असा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल पाटण मतदारसंघाच्या वतीने ऊर्जामंत्री यांचा जाहीर सत्कार केला. या सत्काराच्या दरम्यानच आमदार शंभूराज देसाईंनी पाटण तालुक्यात पवचनचक्की प्रकल्पांच्या अवजड साहित्यांच्या वाहतूकीमुळे खराब झालेल्या ११ रस्त्यांची कामे प्रलंबीत असून या कामांना आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन दयावा अशी आग्रही मागणी ऊर्जामंत्री यांचेकडे केल्यानंतर अशा रस्त्यांना निधी न देण्याचा शासनाने निर्णय घेतला असून आमदार शंभूराज देसाईंची आग्रही मागणी या खात्याचा मंत्री असल्याने मला मोडवत नसल्याने निर्णयात बदल करुन पाटण तालुक्यातील अशा रस्त्यांना हरीतऊर्जा योजनेतंर्गत निधी मिळणेकरीताचे प्रस्ताव तात्काळ मंजुरीकरीता सादर करावेत अशा सुचना त्यांनी अधिका-यांना दिल्या.यासंदर्भात आमदार शंभूराज देसाईंनी ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचे विशेष आभार मानले.
     आमदार शंभूराज देसाई यांनी ऊर्जामंत्री यांचेकडे मागणी केलेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये हुंबरणे ते पांढरेपाणी रस्ता ४ किमी, कोकीसरे नवलाईवॉर्ड ते गवळीनगर रस्ता ३ किमी, वेताळवस्ती काळगांव ते मस्करवाडी रस्ता १.५०० किमी, माईंगडेवाडी ते गणेशवाडी ते हौदाचीवाडी म्हाळुंगेवाडी ते सातर रस्ता ८.५००किमी, भोसगांव ते आंब्रुळकरवाडी ते कोळेकरवाडी रस्ता ७ किमी, कोळेकरवाडी अनुतेवाडी ते कारळे रस्ता ४ किमी, नेरळे ते गुंजाळी रस्ता ३ किमी, घेरादातेगड गावपोहोच रस्ता ३ किमी, गावडेवाडी फाटा ते धुईलवाडी रस्ता ३ किमी, काठीटेक ते अवसरी रस्ता ३.५०० किमी व रामेल फाटा ते रामेल रस्ता ३ किमी असे एकूण ४३.५०० किमी लांबीचे रस्ते सुचविले आहेत. ऊर्जामंत्री यांनी सदरचे प्रस्ताव मंजुरीकरीता सादर करण्याच्या सुचना संबधित यंत्रणांना दिल्या असल्याने या कामांना आवश्यक असणारा निधी मंजुर होईल अशी आशा आमदार शंभूराज देसाईंनी व्यक्त केली आहे.
चौकट:- दोन टप्प्यात मिळणार निधी- ऊर्जामंत्री यांनी केले जाहीर.
       आमदार शंभूराज देसाईंनी या ११ रस्त्यांच्या कामांसंदर्भात ऊर्जामंत्री यांचेशी सविस्तर अशी चर्चा केल्यानंतर या ११ कामांना दोन टप्प्यामध्ये निधी उपलब्ध करुन देण्याचे ऊर्जामंत्री यांनी मान्य केले आहे. २०१८ च्या डिसेंबरच्या अधिवेशनात व २०१९ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या कामांना निधी मंजुर करुन दिला जाईल असे ऊर्जामंत्री यांनी आमदार शंभूराज देसाईंना सांगितले आहे.


No comments:

Post a Comment