आमदार शंभूराज
देसाईंना तारळे विभागातील शेतक-यांनी पाणीदार आमदार म्हणून गौरविले.
धरणातून ५० मीटर वरील
जमिनीला पाणी देण्याचा एैतिहासिक निर्णय करुन घेतलेबद्दल
आमदार शंभूराज देसाईंचा
तारळे विभागाने केला भव्य नागरी सत्कार.
पाटण
तालुक्यातील तारळी मध्यम धरण प्रकल्पातील पाणी या विभागातील ५०
मीटर हेडच्या वरील शेतीकरीता देणेचा एैतिहासिक निर्णय तालुक्याचे आमदार शंभूराज
देसाईंनी राज्य शासनाकडून राज्य मंत्रीमंडळात करुन घेतलेबद्दल आणि आमच्या हक्काचे
पाणी मोठया संघर्षातून त्यांनी आम्हाला मिळवून दिल्याबद्दल तारळे विभागातील तमाम
जनता व शेतक-यांनी पाणीदार आमदार म्हणून आमदार शंभूराज देसाईंना गौरवून त्यांचा
तारळे याठिकाणी भव्य असा नागरी सत्कार केला.सत्कार समारंभास शेतक-यांनी मोठया
संख्येने उपस्थित राहून मोठा जल्लोष करीत या निर्णयाचे जंगी स्वागत केले व आमदार
शंभूराज देसाई व युतीच्या राज्य शासनाचे उपस्थित शेतक-यांनी मोठया उत्साहाने जाहीर
आभार मानले.
तारळे ता.पाटण याठिकाणी तारळे विभागाकरीता
एैतिहासिक आणि न भूतो न भविष्यती असा धोरणात्मक निर्णय तालुक्याचे आमदार शंभूराज
देसाईंनी मोठया संघर्षातून दि.०९ ऑक्टोंबर रोजीच्या राज्य
मंत्रीमंडळात युतीच्या शासनाकडून करुन घेतलेबद्दल व या कामांकरीता वाढीवचे ५५३
कोटी रुपये मंजुर करुन घेतलेबद्दल आमदार शंभूराज देसाईंचा
शेतक-यांच्या वतीने भव्य नागरी सत्कार आयोजीत केला होता.यावेळी माजी
पंचायत समिती सदस्य बबनराव शिंदे, शंभूराज युवा संघटना अध्यक्ष भरत साळुंखे,उपाध्यक्ष अभिजित पाटील,कारखान्याचे संचालक गजाभाऊ जाधव, सोमनाथ खामकर,बबनराव भिसे, माणिकशहा पवार,तारळे सरपंच अर्चना
जरग,युवराज नलवडे,रामचंद्र देशमुख,विकास जाधव,प्रल्हाद पवार,बाळासाहेब
सुर्यवंशी,रणजित शिंदे,बबन शिंदे,शंकर सावंत,पतंग सावंत,अमोल घाडगे,उत्तमराव कदम,
राजेंद्र पवार,शिवाजी रांजणे,बाळू चव्हाण,पोपटराव साळूंखे,सागर सोनवले,मधुकर
साळूंखे,विठ्ठलराव जाधव,अरुण पिंपळे, राहूडे सरपंच तुषार चव्हाण,संध्या
मोरे,विश्वास निकम,बाबा चौधरी,तुकाराम कदम,रामचंद्र कदम,रविंद्र सपकाळ,घोट सरपंच
मधुकर आरेकर,गौरव परदेशी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची प्रमुख
उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना आमदार देसाई म्हणाले,तारळी मध्यम धरण
प्रकल्पातील पाणी ५० मीटर हेडच्या वरील शेतीला देणे हा निर्णय करुन घेणे सोपे
नव्हते,पाणी वाटप आणि व्याप्तीमध्ये बदल असल्याने या निर्णयाकरीता मोठा संघर्ष
करावा लागला.२००९ ला धरणाच्या कार्यक्षेत्रात बंधिस्त कॅनॉलचे काम सुरु झालेनंतर
हे पाणी आता आपल्या हातातून जाणार हे निश्चितच झाले होते.या तालुक्याच्या माजी
आमदारांनी या विभागातील शेतक-यांना वा-यावर सोडून त्यांच्या नेत्यांचा मतदारसंघ
हिरवागार करणेकरीता बंदिस्त कॅनॉलचा घाटच घातला होता.म्हणूनच त्यांनी आमदार असताना
तारळी धरणाच्या माध्यमातून या विभागातील डोंगराकडेच्या शेतीचे इंच इंच क्षेत्र
भिजले पाहिजे याकरीता विधानसभेत ना विधानसभेच्या बाहेर आपले तोंड देखील उघडले
नाही.असा आरोप आमदार शंभूराज देसाईंनी केला.
२००९ ला आपण हे पाणी या विभागातील
१०० टक्के क्षेत्राला कोणत्याही परिस्थितीत मिळवायचेच याकरीता पाणी परिषदेच्या
माध्यमातून सुरुवात केली.२००९ पासून तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आपला हा लढा
सुरु होता त्यास या ९ तारखेला यश मिळाले. सलग ९ वर्षे सुरु
असलेला हा संघर्ष आणि आपल्या हक्काचे जाणारे पाणी कुणी थांबविले आहे हे या
विभागातील शेतक-यांनी व जनतेने उघडया डोळयांनी पाहिले आहे त्यामुळे माजी आमदारांनी
कितीही भूलथापा दिल्या तरी या विभागातील सुज्ञ शेतकरी आता पाटणकरांच्या भूलथांपाना
बळी पडणार नाहीत.मी एकटयानेच सर्व केले असे मी म्हणणार नाही आपल्या
सर्वांच्या सहकार्याने आणि राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, जलसंपदा
मंत्री ना.गिरीश महाजन,वित्त मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार व जिल्हयाचे पालकमंत्री
ना.विजय शिवतारे बापू यांच्या विशेष सहकार्यामुळे आपण हा लढा यशस्वी करु शकलो याचे
मला खुप समाधान आहे.सातारा पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता
विजय घोगरे यांचेही आभार मानणे तितकेचे गरजेचे आहे.केंद्र शासनाने महाराष्ट्र
राज्याच्या ३२ जिल्हयात २६ प्रकल्पांना प्रधानमंत्री सिचाई योजनेत सहभागी केले आहे
यात आपल्या सातारा जिल्हयातील ५ प्रकल्प असून आपल्या पाटण तालुक्यातील तीन प्रकल्प
आहेत. माजी आमदारांच्या काळात हे का शक्य होवू शकले नाही याचा विचार याच विभागाने
नाहीतर तालुक्यातील जनतेने करणे गरजेचे आहे.प्रकल्पाची पहिली मान्यता १०५७ कोटींची
होती आता मान्यता १६१० कोटी रुपयांची मिळाली आहे ५५३ कोटी रुपयांचा वाढीवचा निधी
याकरीता देण्यात आला आहे. ५० मीटर हेडच्या एैतिहासिक निर्णयामुळे सुमारे १७
गांवातील २७२५ एकर जादाचे क्षेत्र ओलिताखाली येणार आहे भिजणारे हे क्षेत्र एकटया
देसाई गटाच्या शेतक-यांचे भिजणार नाही संगळयांनाचा याचा फायदा होणार
आहे.शेतक-यांनी आपला फायदा कुणामुळे होणार आहे हे ओळखून विकासाच्या प्रवाहामध्ये
सामील व्हावे. केवळ निवडणूकीपुरते मतांचे राजकारण करणा-या विरोधकांना खडयासारखे
बाजुला ठेवावे व त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये
असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.यावेळी बबनराव
शिंदे,एस.के.वाघडोळे,गौरव परदेशी यांची भाषणे
झाली.उपस्थितांचे स्वागत भाऊसाहेब जाधव यांनी केले आभार गजाभाऊ जाधव यांनी मानले.
चौकट:- पाणी अडविण्याचे ज्यांना जमले
नाही ते काय पाणी देणार ?
कृष्णा खोरे विकास महामंडळाचा जन्मच युतीच्या शासनाने घातला. धरणाच्या माध्यमातून
शेतक-यांचे जीवनमान उंचावण्याचा निर्णयही युतीचे शासन घेत आहे आघाडी शासनाचा
यामध्ये काडीचाही संबध नाही व आपले माजी आमदार जर यानिर्णयानंतर सोशल मिडीयावर
त्यांची टिमकी वाजवित असतील तर दुर्दैव म्हणावे लागेल.सत्तेवर असताना जे करता आले
नाही ते हातात काहीच नसताना आम्हीच केले म्हणणा-यांनी आता तरी या सवयी सोडाव्यात
असा खरपुस समाचारही आमदार शंभूराज देसाईंनी पाटणकरांच्या सोशल मिडीयावरील चुकीच्या
मोठेपणाचा घेतला.
No comments:
Post a Comment