Saturday 13 October 2018

तारळे विभागात विकासकामांचा धडाका. आमदार शंभूराज देसाईंच्या हस्ते १ कोटी ४८ लाख रुपयांच्या विकासकामांची भूमिपुजने.



         गत चार वर्षात युती शासनाच्या माध्यमातून राज्याच्या तिजोरीतून सर्वात जास्त निधी सातारा ‍जिल्हयामध्ये पाटण तालुक्याच्या विकासासाठी आणला आहे. गाव तेथे विकास सुरु असून तारळे विभागात तर ९९ टक्के गावांत एक एक नाही तर दोन-दोन,तीन-तीन विकासकामे या चार वर्षात दिली आहे.गावाला जोडणारा रस्ता झाला की पाणी,पाणी झाले की साकव पुल,मोठा पुल,ग्रामपंचायत कार्यालय,अंगणवाडया,शाळा खोल्या, जलयुक्त शिवार योजनेतंर्गत लहान लहान बंधारे,मंदीरापुढील सभामंडप,डोंगरपठारावरील गांवाना जोडणारे रस्ते, स्मशानभूमिकडे जाणारे रस्ते,स्मशानभूमिची सुधारणा अशी अनेक जनतेची मुलभूत गरजा असणारी विकासकामे करण्याकरीता कोटयावधी रुपयांचा निधी मंजुर करुन आणला आहे.तारळे विभागात तर विकासकामांचा धडाकाच सुरु आहे.आपण करीत असलेल्या विविध विकासकामांमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली असून टिका करण्याव्यतिरिक्त त्यांचेकडे दुसरे कुठले कामच शिल्लक नसल्याने या विभागाने येणा-या विधानसभा निवडणूकीत विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता विकासकामांकडे बघून मतदान करावे असे जाहीर आवाहन आमदार शंभूराज देसाईंनी केले आहे.
         तारळे विभागातील विविध गांवातील विकासकांमाच्या भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमानंतर चिंचेवाडी वजरोशी ता.पाटण येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत रस्त्यांचे भूमिपुजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,माजी पंचायत समिती सदस्य बबनराव शिंदे,शंभूराज युवा संघटना उपाध्यक्ष अभिजित पाटील,कारखान्याचे संचालक गजाभाऊ जाधव,सोमनाथ खामकर,माणिकशहा पवार, बबनराव भिसे,बाळासाहेब सुर्यवंशी,ॲङ अमोल माने,शिवाजी रांजणे,पोपटराव साळूंखे,सागर सोनवले,मधुकर साळूंखे,प्रदिप नेवगे,राहूडे सरपंच तुषार चव्हाण,संध्या मोरे,रविंद्र सपकाळ,युवराज नलवडे,घोट सरपंच मधुकर आरेकर,गौरव परदेशी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.
         याप्रसंगी बोलताना आमदार देसाई म्हणाले,मतदारसंघात विविध विकासकामांसाठी निधी देताना गावात आणि वाडीवस्तीवर मला मतदान किती झाले हे न बघता गरज कोणाला आहे याचा विचार करुन या चार वर्षात विविध विकासकामे मतदारसंघात दिली.२०१४ च्या निवडणूकीत जी जी आश्वासने मतदारसंघातील जनतेला दिली होती ती ती आश्वासने पुर्ण करण्याचे काम आमदार म्हणून मी करीत आहे.मागील आणि आत्ताच्या जिल्हा परिषद निवडणुकीत काय झाले हे मी बोलणार नाही परंतू या दोन्ही निवडणूकीत विरोधकांनी या विभागातील जनतेला दिलेली आश्वासने तरी पूर्ण केलीत का? केवळ निवडणूकीपुरते मते मागायला येणा-या विरोधकांना विकासकामांचा जाब विचारण्याची वेळ आली आहे,त्यांच्या हातात देण्यासारखे खुप काही असताना ते जनतेला देवू शकले नाहीत आता हातात देण्यासारखे काही नसताना ते जनतेला काय देणार आहेत.आज आपल्या गरजा विकासकामांच्या माध्यमातून कोण पुर्ण करीत आहे.हे पाहणे गरजेचे आहे.असे सांगत आमदार शंभूराज देसाई म्हणाले,येणा-या निवडणूकीत विकासकामांच्या मुद्दयावर मतदारसंघात मतदान झाले तर भविष्यातील या मतदारसंघाचा आमदार कोण हे सांगण्याकरीता कोणत्या जोतिष्याची गरज लागणार नाही.मतदारसंघातील जनतेने केवळ भूलथापांना बळी न पडता विकासकामांकडे बघून येणा-या विधानसभा निवडणूकीत मतदान करावे पुढील पाच वर्षात गावा गावात विकासाचे काम करायला शिल्लक राहणार नाही. अशी ग्वाही त्यांनी शेवठी बोलताना दिली.
       यावेळी आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते एका दिवसात कडवे खुर्द वळण बंधारा १३ लाख,कडवे बुद्रुक सभामंडप ०७.५० लाख, आवर्डे फाटा ते भुडकेवाडी रस्ता १५.०० लाख,राहुडे सभामंडप ७.५० लाख व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील वजरोशी ते चिंचेवाडी रस्ता ०१ कोटी ०६ लाख ४९ हजार अशा एकूण दिड कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ करण्यात येवून वजरोशी ०७ लाख रुपयांच्या सभामंडपाचे उद्घाटनही करण्यात आले.
चौकट:- विरोधी गटातील चिंचेवाडी व करमाळे गावांतील शेकडो कार्यकर्त्यांचा देसाई गटात प्रवेश.
       पाटणकर गटातून एकदा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढविलेले चिंचेवाडी येथील नाथाजी पुजारी यांनी त्यांच्या चार भावांसह तसेच करमाळयातील नारायण मोहिते, सदाशिव मोहिते, पशुपती मोहिते, हरीबा मोहिते, रघूनाथ मोहिते, वंसत मोहिते, दिनकर मोहिते, ज्ञानेश्वर मोहिते, जालिंदर मोहिते, राजाराम मोहिते, बजरंग मोहिते, अशोक मोहिते, अमोल मोहिते, शिवाजी मोहिते, संतोष मोहिते व रघूनाथ मोहिते यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी देसाई गटात प्रवेश केला.प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार आमदार शंभूराज देसाईंच्या हस्ते करण्यात आला.



No comments:

Post a Comment