दौलतनगर दि.३१:- महाराष्ट्र
राज्याच्या राज्यमंत्री पदाची शपथ घेवून राज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे मुंबईहुन
प्रथमच बुधवार दि.०१.०१.२०२० रोजी पाटण विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत असून
दौलतनगर ता.पाटण येथील त्यांच्या निवासस्थानी ते दिवसभर मतदारसंघातील जनतेच्या
शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
सकाळी १०.०० वा
त्यांचे साताराहून कोयना दौलत या निवासस्थानावरुन प्रयाण होणार असून उंब्रजमार्गे
ते चाफळ फाटा, उरुल,निसरेफाटा,मल्हारपेठ,नाडे नवारस्ता,पाटण मार्गे येराड येथे
श्री.येडोबा देवाचे दर्शनाकरीता येणार आहेत तेथून पाटण येथील मुख्य बाजारपेठेतील
श्री.सिध्दीविनायक गणपतीचे दर्शन करुन नाडे - नवारस्ता मार्गे दौलतनगर येथे महाराष्ट्राचे
पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई,स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांच्या
पुर्णाकृती पुतळयास व समाधीस पुष्पचक्र अर्पण करुन विनम्र अभिवादन करणार आहेत.
दौलतनगर येथील श्री.गणेशाचे दर्शन घेवून ग्रामदैवत श्री.निनाई देवीचे दर्शन
केलेनंतर ते दिवसभर दौलतनगर ता.पाटण येथील त्यांचे निवासस्थानी येणाऱ्या जनतेच्या
शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत.
उत्कृष्ट संसदपटू शंभूराज देसाई यांची
राज्याच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री म्हणून निवड झालेमुळे पाटण विधानसभा
मतदारसंघामध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असून राज्यमंत्री पदाची शपथ घेवून
राज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे मुंबईहुन प्रथमच बुधवारी दि.०१.०१.२०२० रोजी पाटण
विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत.राज्याच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री
म्हणून निवड झालेले ना.शंभूराज देसाई हे मंत्री म्हणून प्रथमत:च मतदारसंघाच्या दौऱ्यावर
येत असल्यामुळे त्यांचे स्वागत करण्याकरीता व त्यांना मंत्रीपदी निवड झाली म्हणून
शुभेच्छा देणेकरीता जनतेमध्ये व मतदारांमध्ये आतुरता व उत्सुकता असून येराड येथील
श्री.येडोबा देवाचे व पाटण येथील मुख्य बाजारपेठेतील श्री.सिध्दीविनायक गणपतीचे
दर्शनाकरीता ते येत असल्यामुळे या मार्गावरील चाफळ फाटा,
उरुल,निसरेफाटा,मल्हारपेठ,नाडे-नवारस्ता,पाटण,येराड येथे त्यांचे स्वागत करण्यात
येणार आहे. दुपारी ०१.०० वा.नंतर ते दौलतनगर येथील त्यांचे निवासस्थानीही
मतदारांच्या,हितचिंतकाच्या भेटी घेवून शुभेच्छा स्वीकारणार आहेत. ना.शंभूराज देसाई
बुधवार दि.०१ व गुरुवार दि.०२ जानेवारी रोजी दोन दिवस दौलतनगर येथे उपस्थित असणार
असल्याचे त्यांचे कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
चौकट: शुभेच्छा
देणाऱ्या हितचितंकानी शाल, हार- तुरे न आणता वह्या आणाव्यात.
ना.शंभूराज देसाई
यांची राज्याच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री म्हणून निवड झालेमुळे त्यांना शुभेच्छा
देणेकरीता येणाऱ्या हितचितंकांनी, मतदार जनतेने शाल, हार तुरे न आणता शालेय उपयोगी
वह्या आणाव्यात. शाल, हार तुरे यांचा स्विकार केला जाणार नाही असे ना.शंभूराज
देसाई यांचेकडूनच सांगण्यात आले असल्याचेही त्यांचे कार्यालयाकडून कळविण्यात आले
आहे.