दौलतनगर दि.१8 :- पाटण तालुक्यातील हिरवा पट्टा म्हणून मल्हारपेठ आणि मारुलहवेली
विभागाची ओळख आहे. हे दोन्ही भाग राजकीयदृष्टया आपले बालेकिल्ले मानले जातात परंतू
याच बालेकिल्लयामधून मतांची आकडेवारी कमी होवू लागली आहे.राजकीय तसेच सर्वच बाबतीत
सदन असणारा हा भाग पुन्हा एकदा राजकीय दृष्टया अबाधित राखणेकरीता सर्वांनी प्रयत्न
करण्याची गरज असून याकरीता प्रयत्नशील रहा असे आवाहन आमदार शंभूराज देसाईंनी केले.
मल्हारपेठ व मारुलहवेली विभागाच्या आभार दौऱ्यामध्ये मल्हारपेठ ता.पाटण याठिकाणी
आयोजीत आभार मेळाव्यात आमदार शंभूराज देसाई बोलत होते. याप्रसंगी आमदार शंभूराज
देसाई यांचेसमवेत लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे चेअरमन अशोकराव
पाटील,संचालक पांडूरंग नलवडे,आनंदराव चव्हाण,संपत सत्रे,अशोक डिगे,बबनराव
भिसे,शशिकांत निकम,माजी संचालक प्रा.विश्वनाथ पानस्कर,मानसिंगराव नलवडे,मल्हारपेठ
माजी सरपंच आर.बी.पवार,जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,पंचायत समिती सदस्य संतोष
गिरी,सुरेश पानस्कर, माजी सदस्य राजेंद्र चव्हाण,सुनिल पानस्कर,शिवदौलत बँकेचे
संचालक जयसिंग बोडके,सुनिल पवार,सुधीर पाटील,ॲड.मारुती नांगरे,प्रकाशराव
जाधव,राजाराम मोहिते यांच्यासह प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठया संख्येने
उपस्थित होते.
याप्रंसगी बोलताना आमदार शंभूराज देसाई
म्हणाले,पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्वच विभागातील मतदारांनी नुकत्याच झालेल्या
विधानसभा निवडणूकीमध्ये अहोरात्र कष्ट घेतले. गत पाच वर्षात आपण कोटयावधी रुपयांची
विकासकामे मतदारसंघाच्या प्रत्येक विभागात केली. विकासकामांकडे पाहून मतदारसंघातील
मतदारांनी आपल्याला भरघोस असे मतदान केले.परंतू दुसरीकडे याही गोष्टीकडे पाहण्याची
तितकीच गरज आहे आपल्या विरोधात विधानसभा निवडणूकीला उभ्या राहिलेल्या विरोधकांनी
गत पाच वर्षात एक रुपयांचे विकासकाम मतदारसंघाच्या कोणत्याही गावात किंवा
वाडीवस्तीवर दिले नसताना अनेक गांवामध्ये बरोबरीचे मतदान विरोधकांना पडले
आहे.आपल्या मल्हारपेठ व मारुलहवेली विभागात ही परिस्थिती दिसून येते. गत पाच
वर्षात किंवा त्याच्या अगोदरही आपण मतदारसंघात सत्तेत असताना विकासकामांच्या
संदर्भात गटातटाचे राजकारण न करता मागेल त्याला विकासकाम देण्याचा आपण प्रयत्न
केला तसेच मतदारसंघातील जी जी समस्या आपल्याकडे घेवून आले त्यांना तू कुठल्या
गटाचा,आमचा पदाधिकारी बरोबर आणयला का? अशी
विचारणा न करता सांगेल त्याची कामे करण्याचा सपाटा आपण लावला होता.जनतेचे
प्रश्न सोडविणे लोकप्रतिनिधींचे कामच असते त्याचपध्दतीने आपण आपले काम करीत आहोत
परंतू राजकीयदृष्टया ही पहाणे तितकेच गरजेचे आहे. मतदारसंघाचा आमदार म्हणून
विकासकामे करायला मी कुठेही कमी पडलो नाही आणि कमी पडणार देखील नाही. आता
राज्यामध्ये आपल्या पक्षाचे सरकार सत्तेवर आले आहे मुख्यमंत्री आपल्या पक्षाचे
आहेत त्यामुळे प्रलंबीत राहिलेल्या कामांना निधी आणणे आणि विकास करुन घेणे अवघड
नाही.माझा तोच प्रयत्न राहणार नाही. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचण्याचा
त्यांचा विकास साधण्याचा आपला प्रयत्न राहणार असून ज्याप्रमाणात विकासाची कामे आपण
करीत आहोत त्याचप्रमाणात निवडणूकामध्ये आपल्याला मताधिक्य मिळावे हेही
लोकप्रतिनिधींना वाटत असते. त्यात गैर असे काहीच नाही. असे सांगून ते म्हणाले, आता
विधानसभेची निवडणूक पार पडली असली तरी भविष्यात येणाऱ्या निवडणूकांना सामोरे
जाताना आत्ताच्या विधानसभा निवडणूकीत आपण कोणत्या गांवात कोणते विकासकाम दिले आणि
त्या गांवात आपल्याला आणि विरोधकांना किती मतदान पडले याचा विचार पदाधिकारी यांनी
करणे आवश्यक आहे. आपण कुठे कमी पडलो याची चाचपणी पदाधिकाऱ्यांनी गावोगांवी जावून
करावी जेणेकरुन पुढील भविष्यातील निवडणूकांमध्ये आपल्याला दगाफटका होणार नाही. या
विभागात विविध संस्थामध्ये बरेच पदाधिकारी कार्यरत आहेत प्रत्येक कार्यकर्त्याने
त्यांच्या विभागातील गांवे, वाडयावस्त्या वाटून घेवून आपल्या कार्यकर्त्यांबरोबर
बैठका करुन कोणती विकासकामे झाली कोणती प्रलंबीत आहेत याची सविस्तर टिपणी तयार
करुन माझेकडे दयावी अनेक पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणूकीदरम्यान काही आश्वासने
जनतेला दिली आहेत जी आश्वासने दिली आहेत त्या कामांची यादी करुन माझेकडे दयावी
त्यानुसार विकासकामे मंजुर करण्यात येतील असे आश्वासित करुन या विभागात मताधिक्क्य
घटले असले तरी विकासकांमामध्ये झुकते माप देण्याचा माझा प्रयत्न राहणार असल्याचेही
आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी बोलताना सांगितले. मल्हारपेठ व मारुलहवेली विभागातील
मतदारांनी आमदार शंभूराज देसाईंचे जंगी स्वागत करुन त्यांचा ठिकठिकाणी आमदार म्हणून
पुनश्च: निवड झालेबद्दल सत्कारही केला.उपस्थितांचे आभार पांडूरंग नलवडे यांनी
मानले.
No comments:
Post a Comment