Saturday 21 December 2019

सातारा पोलीस अधीक्षक व त्यांच्या सर्व पोलीस यंत्रणांकडून लोकप्रतिनिधींसदर्भांतील राजशिष्टाचार पाळला जात नाही. अनेक आमदारांची विधानसभेत शासनाकडे तक्रार. विधानसभा अध्यक्षांकडून गंभीर दखल- शासनाने तात्काळ कार्यवाही करण्याचे दिले निर्देश



                  दौलतनगर दि.२१:- महाराष्ट्र राज्याचे सार्वभौम सभागृह असणारे महाराष्ट्र विधानमंडळाच्या विधानसभा सदस्यांना सर्व शासकीय,निमशासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस यंत्रणाकडून राजशिष्टाचारासंदर्भात (प्रोटोकॉल) आदराची,सन्मानाची व सौजन्यांची वागणूक देणेविषयी राज्य शासनाने दि.२७ जुलै,२०१५ रोजी व त्यापुर्वी अनेकदा शासन आदेश निर्गमित केले आहेत.परंतू या शासन आदेशांची तसेच निर्णयांची अंमलबजावणी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक व त्यांच्याकडील सर्व पोलीस यंत्रणांकडून केली जात नसून लोकप्रतिनिधींना दयावयाच्या सन्मानां संदर्भातील राजशिष्टाचार त्यांच्याकडून जाणिवपुर्वक पाळला जात नाही अशी तक्रार अनेक आमदारांनी आज विधानसभेत शासनाकडे केली.या तक्रारीची गंभीर दखल महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ना.नानासाहेब पटोले यांनी घेत शासनाने तात्काळ यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश शासनाला दिले आहेत.
                 नागपुर येथे सुरु असणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आज शेवठच्या दिवशी पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी औचित्याच्या मुद्दयाव्दारे ही बाब राज्य शासनाच्या व विधिमंडळ सभागृहाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर विधानसभा सभागृहातील अनेक आमदारांनी यासंदर्भातील तक्रार सभागृहात करुन आमदार शंभूराज देसाईंनी मांडलेल्या मुद्दयाला सर्वांनी मिळून समर्थन दिले.या औचित्याच्या मुद्दयाची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ना.नानासाहेब पटोले यांनी गंभीर दखल घेवून शासनाने या विषयाची गंभीर दखल घ्यावी, महाराष्ट्र विधीमंडळाच्या सदस्यांच्या बद्दल या पध्दतीचा बरताव कुठलेही अधिकारी करतील तर ही गोष्ट आपण कोणीही खपवून घेण्याचे कारण नाही. शासनाचे जे धोरण आहे त्याच पध्दतीने सर्व अधिकाऱ्यांनी अंमलबजावणी केली पाहिजे.शासकीय अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र विधीमंडळ सदस्यांचा मान सन्मान हा राखलाच पाहिजे जे अधिकारी राज्य शासनाने पारित केलेल्या शासन आदेशांची तसेच निर्णयांची अंमलबजावणी करणार नाहीत तसेच विधीमंडळ सदस्यांचा मान सन्मान राखणार नाहीत त्यांची ही वर्तणुक खपवून घेतली जाणार नाही शासनाने या गोष्टीची गंभीर दखल घेवून तात्काळ यावर कार्यवाही करावी असे निर्देश यावेळी शासनाला दिले.
                     सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक व त्यांच्याकडील पोलीस यंत्रणांच्या वागणुकीसंदर्भात प्रश्न उपस्थित करीत आमदार शंभूराज देसाई म्हणाले,लोकप्रतिनिधीसंदर्भात विशेषत: विधानसभा सदस्यांच्या संदर्भात साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक यांची वर्तणुक आणि वागणूक ही लोकप्रतिनिधींना असौजन्यांची आहे.महाराष्ट्र राज्याचे सार्वभौम सभागृह असणारे महाराष्ट्र विधानमंडळाच्या विधानसभा सदस्यांना पोलीस यंत्रणाकडून राजशिष्टाचारा संदर्भात (प्रोटोकॉल) आदराची,सन्मानाची व सौजन्यांची वागणूक देणेविषयी राज्य शासनाने दि.२७ जुलै,२०१५ रोजी व त्यापुर्वी अनेकदा शासन निर्णय पारित केले आहेत.सातारा जिल्हा पोलीस यंत्रणेतील वरीष्ठ तसेच कनीष्ठ अधिकारी व कर्मचारी यांचेकडून लोकप्रतिनिधींच्या सौजन्याच्या वागणूकीसंदर्भात शासन आदेशांचे पालन करण्यात येत नाही याची पोलीस अधीक्षकांनी गंभीर दखल घेवून यामध्ये आपणांकडून सुधारणा करुन योग्य ती कार्यवाही करावी यासंदर्भात मी स्वत: एकदा नव्हे तर चार-चारदा जिल्हा पोलीस अधीक्षक यांना ते सर्व शासन निर्णय जोडून पत्रव्यवहार केला आहे. यातील एकाही पत्राचे उत्तर देण्याची तसदी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतली नाही तसेच फोनवर माहिती विचारली तर त्यांना ती देताही येत नाही किंवा लोकप्रतिनिधींच्या सौजन्याच्या वागणूकीसंदर्भात पोलीस यंत्रणांकडून आवश्यक ती कार्यवाही करुन घेण्यात त्यांना यश येत नाही.ही बाब शासनाच्या आदेशांची आणि निर्णयांची पायमल्ली करणारी असून यासंदर्भात अनेक विधानसभा सदस्यांनी या बाबी अनेकदा विधानसभेच्या सभागृहात शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत परंतू यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींना तसेच विधानसभा सदस्यांना सातारा पोलीस अधीक्षक व त्यांच्याकडील पोलीस यंत्रणाकडून चांगली वागणूक देण्याची समज सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्याची गरज असून सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक ज्याप्रमाणे विधानसभा सदस्यांशी वर्तणूक करीत आहेत त्यावर शासनाने तात्काळ कार्यवाही करावी असे ते यावेळी बोलताना म्हणाले.

No comments:

Post a Comment