Tuesday 24 December 2019

अधिवेशन संपताच आमदार शंभूराज देसाईंचा कामाचा सपाटा. बैठका,भेटीतून जनतेचे प्रश्न सोडविण्याचा धडाका.



दौलतनगर दि.२४:- मतदारसंघाचा आमदार या नात्याने सातत्याने जनतेत राहणे पसंत करणारे पाटणचे आमदार आपला जास्तीत जास्त वेळ जनतेचे प्रश्न त्यांच्या समस्या मार्गी लावण्याकरीता व्यतीत करीत असल्याचे पाटण मतदारसंघातील जनतेने अनेकदा अनुभवले आहे. अधिवेशन काळात मतदारसंघाचे प्रश्न मांडण्यासाठी प्राधान्य देत अधिवेशन संपताच मतदारसंघात कार्यरत राहून जनतेचे प्रश्न,समस्या समजून घेवून त्या सोडविण्याचा प्रयत्न त्यांचेकडून नेहमीच केला जातो.महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन शनिवारी संपताच नागपुरहून रात्री उशीरा मतदारसंघात येवून त्यांनी बैठका,जनतेच्या भेटीमधून जनतेचे प्रश्न सोडविण्याचा धडाका लावला असून मंगळवारी तहसिल कार्यालयात त्यांच्या उपस्थितीत जनतेच्या समस्यांसाठी शासकीय अधिकाऱ्यांना बरोबर घेवून मेगा बैठका पार पडल्या. बैठकामधून त्यांनी अनेक प्रश्न मंगळवारी मार्गी लावले.
  सतर्क आमदार म्हणून आमदार शंभूराज देसाईंच्या कार्यपध्दतीचे नेहमीच कौतुक केले जाते.महाराष्ट्र विधानसभेचे एक आठवडयाचे हिवाळी अधिवेशन शनिवारी समाप्त झाले. आठ दिवसाचा बॅकलॉग त्यांनी मंगळवारी तहसिल कार्यालयात विविध बैठकांच्या माध्यमातून भरुन काढला.त्यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसिल कार्यालयात बँकांनी कर्ज नाकारलेल्या उपसा जलसिंचन योजनांमधील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणेकरीता मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे व सहकार मंत्री ना.जयंत पाटील यांचेकडे पाठपुरावा केलेल्या विषयाचा सविस्तर प्रस्ताव शासना कडे सादर करणेकरीता तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत मंजुर करण्यात आलेल्या महिंद स्टॉप ते माथणेवाडी, बोर्गेवाडी ते वर्पेवाडी रस्त्यांच्या कामांतील अडचणी समजुन घेवून त्यावर मार्ग काढणेकरीता व मणदुरे येथील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई मिळाली नाही ती कशाप्रकारे मिळवून देता येईल याकरीता बैठका घेतल्या त्यानंतर त्यांनी तहसिल कार्यालयात प्रलंबीत प्रश्नांसाठी आलेल्या जनतेच्या प्रश्नांची माहिती घेवून त्यांच्या प्रश्नांची जागेवरच सोडवूणक केली.
  बँकांनी कर्ज नाकारलेल्या उपसा जलसिंचन योजनांमधील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणेकरीता आमदार शंभूराज देसाईंनी राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे व सहकार मंत्री ना.जयंत पाटील यांचेकडे अधिवेशन काळात पत्रव्यवहार करुन या उपसा जलसिंचन योजनांनाही राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये लाभ दयावा अशी लेखी मागणी केली होती त्यानुसार यासंदर्भातील सविस्तर प्रस्ताव शासनाकडे सादर करावेत अशा सुचना लेखी  पत्रावर दिल्यानंतर त्या योजनांचा सविस्तर प्रस्ताव शासनाकडे सादर करणेकरीता तहसिलदार, सहाय्यक निंबधक, उपसा जलसिंचन योजनांचे संचालक मंडळ व शेतकरी यांची संयुक्त बैठक घेवून हे प्रस्ताव आठ दिवसात तयार करुन शासनाकडे सादर करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गंत उपअभियंता तसेच महिंद स्टॉप ते माथणेवाडी,बोर्गेवाडी ते वर्पेवाडी रस्त्यांच्या कामांतील अडचणीसंदर्भात बोर्गेवाडी व वर्पेवाडी येथील ग्रामस्थांचीही संयुक्त बैठक घेवून या रस्त्यामध्ये ज्या अडचणी आहेत त्यावर सविस्तर चर्चा करुन त्यांनी मार्ग काढला. त्यानंतर मणदुरे येथील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या सुमारे १४२ शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई मिळाली नाही शेतकऱ्यांनी त्यांच्या नुकसानीचे पंचनामे कृषी कार्यालयाकडे देवून सुध्दा शासकीय मदतीच्या यादीमध्ये या शेतकऱ्यांच्या नांवाचा समावेश नसल्याने पुनश्च: या शेतकऱ्यांच्या शेतीच्या नुकसानीची पहाणी त्यांचे सातबारावरील पिकाची माहिती नुकसानीचे क्षेत्र याची सविस्तर माहिती तालुका कृषी अधिकारी यांनी घेवून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची रक्कम मिळवून देणेकरीताचा अहवाल जिल्हाधिकारी सातारा यांचेकडे सादर करण्याच्या सुचना केल्या व यामध्ये जाणिवपुर्वक या शेतकऱ्यांना वंचीत ठेवणाऱ्या येथील कृषी विभागाच्या संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा अहवाल तहसिलदार यांनी तयार करुन तोही जिल्हाधिकारी व शासनाकडे कारवाईकरीता सादर करावा अशा सुचना केल्या.तहसिल कार्यांलयातील बैठक संपल्यानंतर आमदार शंभूराज देसाईंनी तहसिल कार्यालयात भेटण्यास आलेल्या प्रत्येक नागरिकांचे प्रश्न समजावून घेत त्यांचे प्रश्न जागेवरच सोडविले. आमदार शंभूराज देसाई पाटण तहसिल कार्यालयात आल्यानंतर तिथेच सुमारे दोन तास त्यांचा जनता दरबार पहावयास मिळाला.यावरुनच आमदार शंभूराज देसाई हे किती सतर्क आणि जनतेच्या प्रश्नाविषयी तळमळ असणारे आमदार आहेत याचा प्रत्यय मतदारसंघातील जनतेला यादिवशी आला. 
आठ दिवस नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात असल्यामुळे जनतेला भेटता आले नाही त्यामुळे जनतेच्या प्रश्नांसाठी शासकीय बैठकांच्या निमित्ताने पाटण तहसिल कार्यालयात येवून आमदार शंभूराज देसाईंनी आठ दिवसातील कामकाजांचा बॅकलॉग भरुन काढला असल्याची चर्चा तहसिल कार्यालयाच्या परिसरात एैकावयास मिळत होती.

No comments:

Post a Comment