Wednesday 29 January 2020

गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई जनतेच्या दरबारी. मतदारसंघात आलेनंतर विभागा-विभागामध्ये जावून जनतेच्या प्रश्नांची करत आहेत सोडवणूक.




            दौलतनगर दि.28 :- महाराष्ट्र राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता,पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मंत्री झालेनंतर मतदारसंघात सत्कार किंवा स्वागत समारंभांना वेळ न देता मंत्रालयीन कामकाज संपवुन मतदारसंघात आलेनंतर विभागा-विभागामध्ये जावून जनतेच्या भेटी-गाठी घेत जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे.मागील आठवडयात त्यांनी तारळे व कालच ढेबेवाडी विभागात जावून जनतेच्या भेटी गाठी घेत जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक केली.राज्यमंत्री म्हणून राज्यभर वावरताना मतदारसंघातील जनतेची असणारी नाळ त्यांनी कायम ठेवली असून त्यांच्या या उपक्रमाचे पाटण मतदारसंघातील जनतेकडून कौतुक  केले जात आहे.
                              अलर्ट आमदार म्हणून ख्याती असणारे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई आता अलर्ट नामदार म्हणून ओळखले जावू लागले आहेत. राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलेनंतर मंत्रालयीन कामकाजाबरोबर शासकीय बैठका, वाशिम जिल्हयाच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर तेथील शासकीय बैठका, तेथील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या बैठका घेवून त्यांच्या असणाऱ्या समस्या मार्गी लावणे याचबरोबर सातारा जिल्हयातील शासकीय बैठकांना उपस्थिती व जिल्हयातील पक्षसंघटना वाढीसाठी पक्षाच्या पदाधिकारी व शिवसेना पक्षाचे  कार्यकर्ते यांच्या बैठका घेण्याकरीता वेळ देण्याबरोबर त्यांनी आपल्या मतदारसंघातील जनतेचेही प्रश्न सोडविण्या करीता मोठया प्रमाणात वेळ देत आहेत.मुंबईहून मंत्रालयीन कामकाज उरकल्यानंतर थेट मतदारसंघ गाठणारे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे विभागा-विभागामध्ये जावून मतदारसंघातील जनतेला वेळ देत आहेत त्यांच्या समस्या समजून घेवून जागेवरुनच संबधित अधिकाऱ्यांना सुचना देत संबधित जनतेचे प्रश्न मार्गी लावत आहेत. मागील आठवडयामध्ये त्यांनी तारळे विभागातील तर काल ढेबेवाडी विभागातील जनतेच्या त्या त्या विभागात जावून भेटी-गाठी घेतल्या.गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई आपल्या भेटीसाठी विभागात येत आहेत म्हणून त्या त्या विभागातील अनेक गांवानी प्रथमत: ना.शंभूराज देसाई यांची राज्यमंत्रीपदी निवड झालेबद्दल त्यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करीत  आपल्या समस्या त्यांचेपुढे मांडून त्या जागेवरच सोडवूण घेतल्या. ना.शंभूराज देसाईंच्या तारळे आणि ढेबेवाडी विभागातील भेटीमध्ये जनता दरबाराचे स्वरुप पहावयास मिळाले.
                          यावेळी बोलताना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले,राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळताना शासकीय बैठका, राज्यभरातील दौरे, पक्षवाढीसाठी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचे नियोजन असले तरी पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या विविध कामांना न्याय मिळवून देणे हे माझे पहिले कर्तव्य आहे. मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नासाठी आठवडयातील दोन तीन दिवस मतदारसंघातच राहण्याचा निर्णय मी घेतला आहे. मतदारसंघातील जनतेच्या पाठीब्यांमुळे आपल्याला मंत्रीपद मिळाले आहे त्यांच्याशी असणारी नाळ ही कायम राहिली पाहिजे.आपला हक्काचा आमदार जनतेला पहिल्यांदा उपलब्ध झाला पाहिजे.या भूमिकेतुनच माझी भविष्यातील वाटचाल सुरु राहणार आहे. तुमचा हक्काचा आमदार म्हणून आणि राज्याचा  राज्यमंत्री म्हणून पाटण मतदारसंघातील जनतेला वेळ देवून त्यांच्या समस्या, त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याकरीता माझे प्राधान्य राहणार आहे. मी आपल्या भेटीकरीता कायम उपलब्ध आहे परंतू ज्या ज्या वेळी मंत्रालयीन कामकाजाबरोबर, मंत्रालयीन बैठकाकरीता मला मुंबई अथवा मतदारसंघाबाहेर उपस्थित रहावे लागेल तेव्हा जनतेने आपल्या समस्या मला मतदारसंघाच्या दौऱ्यावर आल्यानंतर आर्वजुन सांगाव्यात त्या समस्या सोडविण्यासाठी मी कटीबध्द आहे असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

ना.शंभूराज देसाईंच्या संकल्पनेतून डोंगर पठारावरील जनतेकरीता दि.०१ फेब्रुवारी रोजी घाणबी पठारावर मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन.



दौलतनगर दि.२८ :- राज्याचे गृह (ग्रामीण),वित्त,नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी पाटण मतदारसंघात सत्कार, समारंभांना फाटा देत पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरपठारावरील जनतेकरीता राज्य शासनाच्या वतीने मोफत सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन करण्याची संकल्पना मांडून ना.शंभूराज देसाईंच्या संकल्पनेतून घाणबी डोंगर पठारावर या विभागातील डोंगर पठारावरील मोफत सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन केले असून या शिबीराचे उद्घाटन गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते शनिवार दि. 01/02/2020 रोजी सकाळी 10 ते 03 वाजेपर्यंत न्यू इंग्लिश हायस्कूल घाणबी या ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे कार्यालयाकडून प्रसिध्दीस देण्यात आली आहे.
                                  प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे की, डोंगरपठारावरील जनतेला वर्षानुवर्षे आरोग्य सुविधा मिळत नाहीत आरोग्य सुविधा घेणेकरीता डोंगरपठारावरील जनतेला,वयोवृध्दांना तालुक्याच्या ठिकाणी येवून आरोग्य तपासणी करावी लागत असल्याने डोंगरपठारावरील जनतेला,वयोवृध्दांना तसेच महिलांचे शासनाच्या वतीने मोफत सर्व रोग निदान व्हावे त्यांच्यावर उपचार व्हावेत याकरीता राज्याचे गृह (ग्रामीण),वित्त,नियोजन,राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता,पणन राज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी डोंगरपठारावरच शासनाच्या वतीने मोफत सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन करण्याची संकल्पना मांडली त्यानुसार ग्रामीण,दुर्गम व डोंगराळ जनतेच्या आरोग्य सेवांचा दर्जा वाढविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या व शासनाच्या वतीने हे मोफत सर्वरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
                           पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगर पठारावरील गरीब ग्रामीण जनतेला, वयोवृध्दांना तसेच महिलांना, लहान बालकांना उच्च प्रतिच्या आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणेचा या मोफत सर्वरोग निदान शिबिराचा मानस असून सदर शिबिरामध्ये सिव्हिल हॉस्पीटल,सातारा,ग्रामीण रुग्णालय- पाटण,जिल्हा परीषद आरोग्य विभाग, कृष्णा हॉस्पीटल,कराड,सहयाद्री हॉस्पीटल,कराड,शारदा हॉस्पीटल,कराड व कोळेकर हॉस्पीटल,कराड येथील विशेष तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने मोफत तपासणी चाचणी,औषधोपचार तसेच नेत्र रोग,स्त्री रोग,बालरोग,मदुमेह, रक्तदाब कर्करोग चिकित्सा,क्षयरोग चिकित्सा,त्वचारोग व कुष्टरोग,नाक,कान,घसा,आयुर्वेद,पंचकर्म,योग, होमियोपॅथी,आरोग्य समुपदेशन इत्यादी आरोग्य विषयक चिकित्सा व त्यावर औषधोपचाराचा लाभ या शिबिराच्या माध्यमातून संबंधित रुग्णांना देणार आहेत.दरम्यान डोंगरपठारावरील जनतेने व रुग्णांनी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र,केरळ अंतर्गत येणाऱ्या या विभागातील सर्व जनतेने तसेच रुग्णांनी आपल्या नावाची नोंदणी नजिकच्या अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका,आरोग्य कर्मचारी यांच्याकडे करावी,असे आवाहन पत्रकांत करण्यात आले असून या  मोफत सर्व रोग निदान शिबीराचा लाभ डोंगरपठारावरील जनतेने, वयोवृध्दांनी, महिलांनी घ्यावा असेही आवाहन प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी केले आहे.


लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याचे ०१ लाख ११ हजार १११ साखर पोत्यांचे गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाईं यांचे हस्ते पूजन.



            दौलतनगर दि.28 :- दौलतनगर,ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यांमध्ये सन २०20-२1 चे गळीत हंगामामध्ये उत्पादित  झालेल्या १ लाख ११ हजार १११ साखर पोत्याचे पूजन महाराष्ट्र राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता,पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते करण्यात आले.
        यावेळी नामदार शंभूराज देसाई म्हणाले, कारखान्यांने 61 दिवसांत 95855 मे.टनाचे गाळप करुन १ लाख 11 हजार १११ साखर पोती उत्पादित केली आहे. यावर्षी सरासरी साखर उतारा ११.६4 असून आजचा साखर उतारा १२.५2 इतका आहे.असे सांगून ते पुढे म्हणाले कारखान्याचे संचालक मंडळ,अधिकारी,कर्मचारी कारखान्यांला नियमितपणे ऊस पुरवठा होणेसाठी प्रयत्न करीत आहेत. कारखान्याचा चालू गळीत हंगाम अत्यंत चांगल्या प्रकारे चालला असून कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक आपल्या ऊसाचा पुरवठा नियमितपणे सुरु आहे. याहीपुढे अशाच प्रकारे कारखान्यांस ऊस पुरवठा करुन  चालू गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पाडणेसाठी सर्वानी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
     यावेळी युवा नेते यशराज देसाई, कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील, व्हाईस चेअरमन राजाराम पाटील,संचालक पांडूरंग नलवडे,बबनराव भिसे,आनंदराव चव्हाण,संपतराव सत्रे,राजेंद्र गुरव,अशोकराव डिगे, विकास गिरी गोसावी,बाळासाहेब शेजवळ,वसंतराव कदम,माजी पंचायत समिती सदस्य प्रकाशराव जाधव, दिलीपराव जानुगडे, ॲड.बाबूराव नांगरे, राजाराम मोहिते, कारखान्याचे कार्यकारी संचालक सुहास देसाई,चीफ अकौंटट,चीफ केमिस्ट, चीफ इंजिनियर व कारखान्याचे सभासद, ऊस  उत्पादक, अधिकारी  व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Thursday 23 January 2020

वंदनीय स्व.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंकडून विनम्र अभिवादन. नामदार शंभूराज देसाईंचे प्रमुख उपस्थितीत सातारा येथे जयंती समारंभ संपन्न.



            दौलतनगर दि.23 :- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे ९4 व्या जयंती दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे गृह (ग्रामीण),वित्त,नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सातारा जिल्हयाच्या ठिकाणी वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विन्रम अभिवादन केले.
  सातारा याठिकाणी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे ९ व्या जयंती दिनानिमित्त शिवदौलत सहकारी बँकेमध्ये अभिवादन कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.प्रारंभी गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता,पणन राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या हस्ते स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विन्रम अभिवादन करण्यात आले याप्रसंगी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, शिवदौलत सहकारी बँकेचे संचालक अभिजीत पाटील, संजय देशमुख, नामदेवराव साळुंखे, प्रा.पी.पी.यादव या प्रमुख पदाधिकारी यांच्यासह पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्रमंडळातील प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते व शिवसैनिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
   याप्रसंगी बोलताना राज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले,हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांचे आणि पाटण विधानसभा मतदारसंघाचे श्रध्दास्थान महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे ऋणानुबंध महाराष्ट्राला परिचीत आहेत.शिवसेना पक्षाच्या उभारणीत लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे मोलाचे सहकार्य असल्याचे प्रतिपादन स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकदा आपल्या वक्तव्यातून केले आहे.लोकनेते बाळासाहेब देसाई यांना अभिवादन करण्याकरीता स्व.बाळासाहेब ठाकरे हे कारखाना कार्यस्थळावर आले होते. त्यांच्याच प्रमुख उपस्थितीत माझा शिवसेना पक्षात प्रवेश झाला त्यांच्या माध्यमातून मला सहकार परिषदेचे अध्यक्षपद मिळाले ही पाटण विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. सन १९९६ ला शिवसेनाप्रमुख हिंदूह्दयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी दौलतनगर येथे आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे कर्मभूमि आणि जन्मभूमिमध्ये येवून मला सहकार परीषदेचे अध्यक्षपद देवून राज्यमंत्रीपदाचा दर्जा बहाल करुन पाटण विधानसभा मतदारसंघाचा केलेला सन्मान हा अविस्मरणीय आहे.सन १९९६ पासून मी शिवसेना पक्षात स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक म्हणून कार्यरत असून स्व.बाळासाहेब यांनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून मला तीनवेळा महाराष्ट्र विधानसभेमध्ये पाटण मतदारसंघाचा आमदार म्हणून जाण्याची संधी मिळाली.स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात पक्षाचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री ना. उध्दवजी ठाकरे यांनी राज्य शासनातील महत्वाच्या असणाऱ्या खात्यांच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी माझेवर सोपविली आहे.हे पक्षातील निष्ठेचे फळ आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे जाण्याने शिवसेनेत निर्माण झालेली पोकळी आजही कायम आहे. मुंबईत राहणाऱ्या गावाकडील जनतेला दिलासा देण्याचे मोठे काम स्व. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले. गावाकडचा माणूस मुंबईसारख्या मायानगरीत ताठ मानेने उभा होता आणि आजही आहे तो स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे.त्यांचे अनंत उपकार महाराष्ट्रातील जनतेवर असून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या तसेच पाटण विधानसभा मतदारसंघातील तसेच सातारा जिल्हयातील तमाम शिवसैनिकांच्या वतीने त्यांचे ९ व्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो.
चौकट:- लोकनेते बाळासाहेब देसाई सह.उद्योग,शिक्षण समुहाच्या वतीने दौलतनगरला शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी.
शिवसेनाप्रमुख वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे ९ व्या जयंती दिनानिमित्त लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग,शिक्षण समुहाच्या वतीने कारखाना कार्यस्थळावरही स्व. बाळासाहेब ठाकरे यांना विन्रम अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी साखर कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,संचालक संपतराव सत्रे,राजाराम मोहिते या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह पाटण मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, बाबासाहेब आंबेडकर विचार मंच,जय मल्हार संघटनेचे सर्व पदाधिकारी, कोयना परिसर साखर कामगार संघटना,पाटण तालुका शंभूराज युवा संघटना,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कामगार सेवा सोसायटी आणि देसाई उद्योग व शिक्षण समुहातील अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Monday 13 January 2020

गृहराज्यमंत्री म्हणून पदभार स्विकारल्यानंतर ना.शंभूराज देसाईंनी मतदारसंघात केला ग्रामीण, डोंगरी भागाचा दौरा. डोगंरी विभागातील तीन महत्वाच्या रस्त्यांच्या कामांचा केला प्रारंभ.




दौलतनगर दि.१३:- गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी  त्यांचेवर सोपविलेल्या  गृह (ग्रामीण),वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास उद्योजकता,पणन या सहा खात्यांचा मुंबई येथे पदभार स्विकारलेनंतर प्रथमच पाटण विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलेनंतर त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण आणि डोंगरी भागात जाणे पसंत केले. मोरणा विभागातील डोंगरपठारावरील अनेक वर्षापासून प्रलंबीत असणारे तीन रस्ते त्यांनी २०१४ ते २०१९ या आमदारकीच्या कार्यकालात मंजुर केले होते त्या तीन रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ ना.शंभूराज देसाईंच्या हस्ते मतदारसंघात पार पडला.गृहराज्यमंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर मोरणा विभागात आलेले ना.शंभूराज देसाईंचे विभागातील प्रत्येक गांवामध्ये जंगी स्वागत करण्यात आले. त्यांनी पदभार स्विकारले नंतर डोंगरी भागाचा दौरा केल्याने त्यांच्या या दौऱ्याचे मोठे कौतुक करण्यात आले.
                                राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते मोरणा विभागातील डोंगरपठारावरील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत पाचगणी ते नागवाणटेक ०२ कोटी 32 लाख 66 हजार रक्कमेच्या 3.7० किमी अंतर असणाऱ्या तसेच धावडे ते शिद्रुकवाडी 99 लाख 45 हजार 1.27० किमी अंतर असलेल्या आणि आटोली ते भाकरमळी 01 कोटी 20 लाख रक्कमेच्या 1.400 किमी अंतर असणाऱ्या तीन पोहोच रस्त्यांच्या भूमिपुजनांचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी त्यांचेसोबत मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवा नेते यशराज देसाई, जयराज देसाई, जिल्हा परीषद सदस्या सौ.सुग्रा खोंदू यांच्यासह पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व शासकीय अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
                                यावेळी ना.शंभूराज देसाई म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी माझेवर राज्याच्या गृह (ग्रामीण),वित्त,नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास उद्योजकता,पणन या सहा खात्यांचा राज्यमंत्री म्हणून कार्यभार दिला आहे त्यातच वाशिम जिल्हयाचा पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी दिली आहे. पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेने मला मोठया मताधिक्कयाने विधानसभेत आमदार म्हणून जाण्याची पुन्हा संधी दिली यामुळेच मला राज्याच्या राज्यमंत्री पदी विराजमान होता आले.पाटण विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे माझेवर हे ऋृण असून ते कधीही फेडता येणारे आहे.आज माझेवर राज्याच्या सहा खात्यांची तसेच वाशिमच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी असली तरी माझे लक्ष आपल्या पाटण विधानसभा मतदारसंघावरच राहणार आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे घार हिंडे आकाशी,चित्त तिचे पिलापाशी त्याप्रमाणे मी संपुर्ण महाराष्ट्रभर राज्याचा राज्यमंत्री म्हणून जरी मला फिरावे लागले तरी माझे सगळे लक्ष हे आपल्या पाटण मतदारसंघातील जनतेपाशीच राहणार आहे. ज्या मतदारांच्या आशिर्वादाने आपण राज्यमंत्री झालो त्या जनतेच्या प्रश्नांना पहिले प्राधान्य देणेकरीता माझे प्रयत्न राहणार आहेत. मिळालेल्या मंत्रीपदाच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणेकरीता मी कटीबध्द आहे अशी ग्वाही देत ना.शंभूराज देसाई म्हणाले, आज राज्याच्या सहा खात्यांचा मुंबई येथे पदभार स्विकारुन पाटण मतदारसंघात येत असताना माझा पहिला दौरा पाटण मतदारसंघातील डोंगरी आणि दुर्गम भागात होत आहे याचा मला अत्यानंद आहे.मोरणा विभागातील डोंगरपठारावरील जनतेची अनेक वर्षांची असणारी या रस्त्यांची मागणी आपण २०१४ ते २०१९ या कार्यकालात आमदार असतानाच  मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत निधी मंजुर करुन पुर्ण केली होती. आज या कामांचा शुभारंभ झाला येत्या दोन महिन्यात डोंगरपठारावरील जनतेला या रस्त्यांची सोय होईल.ठेकेदाराने उद्यापासूनच या कामांला सुरुवात करावी अशा सुचना देत  आता पहिल्यासारखे चालणार नाही आज भूमिपुजन झाले आणि कामाला विलंब झाला ज्यादिवशी कामांची भूमिपुजने झाली त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच विकासकामांना सुरुवात झाली पाहिजे याची दखल अधिकारी आणि ठेकेदारांनी घ्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले. उपस्थितांचे स्वागत माजी जिल्हा परीषद सदस्य बशीर खोंदू  यांनी केले आभार माजी पंचायत समिती सदस्य नथूराम कुंभार यांनी मानले.
चौकट:- अधिकाऱ्यांचा ताफा आणि गावोगांवी ना.शंभूराज देसाईंचे जंगी स्वागत.
             ना.शंभूराज देसाई हे राज्याचे सहा खात्यांचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्विकारुन पाटण मतदारसंघात प्रथमत: येणार असल्याने त्यांचेसोबत पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व शासकीय यंत्रणेचे अधिकारी त्यांच्या गाडयांचा ताफा होता. गांवोगावी मोठया प्रमाणात आतिषबाजी करीत गावकऱ्यांनी ना.शंभूराज देसाईंचे मोठया उत्साहाने जंगी स्वागत शालेय साहित्य देवून सत्कार केला.