दौलतनगर दि.२८ :- राज्याचे
गृह (ग्रामीण),वित्त,नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता, पणन
राज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी पाटण मतदारसंघात सत्कार, समारंभांना फाटा
देत पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरपठारावरील जनतेकरीता राज्य शासनाच्या वतीने मोफत
सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन करण्याची संकल्पना मांडून ना.शंभूराज देसाईंच्या
संकल्पनेतून घाणबी डोंगर पठारावर या विभागातील डोंगर पठारावरील मोफत सर्व रोग
निदान शिबीराचे आयोजन केले असून या शिबीराचे उद्घाटन गृहराज्यमंत्री नामदार
शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते शनिवार दि. 01/02/2020 रोजी सकाळी 10 ते 03
वाजेपर्यंत न्यू इंग्लिश हायस्कूल घाणबी या ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री
नामदार शंभूराज देसाई यांचे कार्यालयाकडून प्रसिध्दीस देण्यात आली आहे.
प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे की, डोंगरपठारावरील जनतेला वर्षानुवर्षे
आरोग्य सुविधा मिळत नाहीत आरोग्य सुविधा घेणेकरीता डोंगरपठारावरील जनतेला,वयोवृध्दांना
तालुक्याच्या ठिकाणी येवून आरोग्य तपासणी करावी लागत असल्याने डोंगरपठारावरील
जनतेला,वयोवृध्दांना तसेच महिलांचे शासनाच्या वतीने मोफत सर्व रोग निदान व्हावे
त्यांच्यावर उपचार व्हावेत याकरीता राज्याचे गृह (ग्रामीण),वित्त,नियोजन,राज्य
उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता,पणन राज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई
यांनी डोंगरपठारावरच शासनाच्या वतीने मोफत सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन करण्याची
संकल्पना मांडली त्यानुसार ग्रामीण,दुर्गम व डोंगराळ जनतेच्या आरोग्य सेवांचा
दर्जा वाढविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या व शासनाच्या
वतीने हे मोफत सर्वरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगर पठारावरील गरीब ग्रामीण जनतेला,
वयोवृध्दांना तसेच महिलांना, लहान बालकांना उच्च प्रतिच्या आरोग्य सेवा उपलब्ध
करुन देणेचा या मोफत सर्वरोग निदान शिबिराचा मानस असून सदर शिबिरामध्ये सिव्हिल
हॉस्पीटल,सातारा,ग्रामीण रुग्णालय- पाटण,जिल्हा परीषद आरोग्य विभाग, कृष्णा
हॉस्पीटल,कराड,सहयाद्री हॉस्पीटल,कराड,शारदा हॉस्पीटल,कराड व कोळेकर हॉस्पीटल,कराड
येथील विशेष तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने मोफत तपासणी चाचणी,औषधोपचार तसेच नेत्र
रोग,स्त्री रोग,बालरोग,मदुमेह, रक्तदाब कर्करोग चिकित्सा,क्षयरोग चिकित्सा,त्वचारोग
व कुष्टरोग,नाक,कान,घसा,आयुर्वेद,पंचकर्म,योग, होमियोपॅथी,आरोग्य समुपदेशन इत्यादी
आरोग्य विषयक चिकित्सा व त्यावर औषधोपचाराचा लाभ या शिबिराच्या माध्यमातून संबंधित
रुग्णांना देणार आहेत.दरम्यान डोंगरपठारावरील जनतेने व रुग्णांनी तसेच प्राथमिक
आरोग्य केंद्र,केरळ अंतर्गत येणाऱ्या या विभागातील सर्व जनतेने तसेच रुग्णांनी
आपल्या नावाची नोंदणी नजिकच्या अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका,आरोग्य कर्मचारी
यांच्याकडे करावी,असे आवाहन पत्रकांत करण्यात आले असून या मोफत सर्व रोग निदान शिबीराचा लाभ
डोंगरपठारावरील जनतेने, वयोवृध्दांनी, महिलांनी घ्यावा असेही आवाहन प्रांताधिकारी
श्रीरंग तांबे यांनी केले आहे.
सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा
ReplyDelete7066306549
ReplyDelete