Thursday, 9 January 2020

ना.शंभूराज देसाईंनी घेतले माजी कृषी मंत्री शरद पवारसाहेबांचे आर्शिवाद. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे घेतली सदिच्छा भेट.




दौलतनगर दि.०9:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री मा.खासदार श्री.शरदचंद्रजी पवारसाहेब यांची राज्याचे नवनिर्वाचीत गृह (ग्रामीण),वित्त,नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता,पणन राज्यमंत्री ना.श्री.शंभूराज देसाई यांनी राज्याचे राज्यमंत्री म्हणून विराजमान झालेनंतर आज मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सदिच्छा भेट घेतली.यावेळी ना.शंभूराज देसाईंनी मा.खासदार श्री.शरदचंद्रजी पवारसाहेब यांना पुष्पगुच्छ देत पवारसाहेबांचे आर्शिवाद घेतले. पवारसाहेब यांनी ना.शंभूराज देसाईंना आर्शिवाद देत पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच राज्याचे राज्यमंत्री  म्हणून उत्कृष्ट काम करावे माझ्या तुम्हाला कायम सदिच्छा असल्याचेही पवारसाहेबांनी यावेळी ना.शंभूराज देसाईंना सांगितले.
                   यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री मा.खासदार श्री.शरदचंद्रजी पवारसाहेब यांची सदिच्छा भेट घेणेकरीता राज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे आले होते.१५ मिनीटांच्या भेटीमध्ये ना.शंभूराज देसाईंनी त्यांना मिळालेल्या  गृह (ग्रामीण),वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता,पणन या सहा खात्यांच्या संदर्भात पवारसाहेबांशी सविस्तर चर्चा करुन या खात्यांमधील कामकाजासंदर्भात पवारसाहेबांकडून मार्गदर्शन घेतले. तसेच विविध विषयांवर ना.देसाईंनी पवारसाहेबांबरोबर चर्चा ही केली.यावेळी पवारसाहेबांनी गृह (ग्रामीण),वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता,पणन राज्यमंत्री म्हणून राज्यामध्ये चांगले काम करण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे.मिळालेल्या संधीचे सोने करुन राज्यातील जनतेला या खात्यांच्या माध्यमातून न्याय मिळवून दयावा. तुम्हाला प्रशासकीय कामांचा चांगला अनुभव आहेच याच अनुभवाचा लाभ राज्यातील जनतेला व्हावा मिळालेल्या खात्यांच्या माध्यमातून बरेच काही नवीन शिकण्यासारखे आहे माझे आपणांस सहकार्य आहेच त्याचबरोबर चांगले काम करणेकरीता तुम्हाला सदिच्छाही आहेत असे सांगून पवारसाहेबांनी ना.शंभूराज देसाईंना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देत आर्शिवादही दिले.शपथविधी दिवशीही ना.शंभूराज देसाईंनी माजी केंद्रीय कृषी मंत्री मा.खासदार श्री.शरदचंद्रजी पवारसाहेब यांची विधान भवनाच्या प्रांगणात सदिच्छा भेट घेतली होती यावेळी पवासाहेबांनी ना.शंभूराज देसाई यांना आर्शिवाद देत राज्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा दिल्या असल्याचे तसेच ना.शंभूराज देसाई व पवारसाहेब यांच्यामध्ये बराच वेळ चर्चा सुरु असलेलीही शपथविधीला उपस्थित असणाऱ्या जनतेने पाहिले होते.

No comments:

Post a Comment